गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.

अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.

गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणार्‍या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.

गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?

गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्‍यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्‍यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.

तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्‍याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्‍याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्‍याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्‍यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्‍याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.

स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्‍याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्‍याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्‍याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्‍यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.

मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्‍यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्‍यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्‍याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्‍यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्‍या अधिकार्‍यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्‍यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्‍यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्‍यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्‍या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्‍यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी सारख्या कार्यतत्पर माणसाने पुतळे जाळेपर्यंत, वाद न्यायालयात जाण्यापर्यंत शीख शेतकर्‍यांना भेटायचं टाळले होते. "तुम्ही गुजराती नाही आहात, त्यामुळे तुम्हाला गुजरातमध्ये जमीन मालक होण्याचा अधिकारच नाही",अशी त्या सरकारची निर्लज्ज भूमिका होती.

पण आता निवडणुकीतला साथीदार अकाली दल यांचे रट्टे पडल्यामुळे मोदीला हि पश्चातबुद्धी सुचली आहे.

खरेतर गुजराती लोकांचा साहसीपणा माहित असल्यामुळे १९६५ सालच्या भारत-पाक युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री शीखांना कच्छमध्ये येण्याचे आवाहन केले होते. या भागात वसाहती निर्माण झाल्यास येथे विकास तर होईलच, पण पाकिस्तानच्या कारवायांनाही आळा बसेल, अशी मागील शास्त्रींची भूमिका होती. आपल्या मेहनतीच्या जोरावर शीख शेतक-यांनी कच्छच्या वाळवंटात नंदनवन फुलविले. त्याच शीखांना आता मोदी सरकार तेथून निघून जाण्यासाठी छळित आहे.ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे असे करताना.

>>१९६५ सालच्या भारत-पाक युद्धानंतर लाल बहादूर शास्त्री शीखांना कच्छमध्ये येण्याचे आवाहन केले होते. या भागात वसाहती निर्माण झाल्यास येथे विकास तर होईलच, पण पाकिस्तानच्या कारवायांनाही आळा बसेल, अशी मागील शास्त्रींची भूमिका होती. <<

आदरणीय पंतप्रधान लालबहदूरशास्त्रींच्या नावावर कांहीही खपवू नका.
पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्यास मिलिटरी लागते. तीही सध्याच्या केंद्रसरकारसारखे सरकार असेल तर फक्त 'शहीद' होते. हा कायदेशीर वाद आहे आणि त्यात फक्त शीखच आहेत असे नाही इतर प्रंतीय पण आहेत.३००० शिखांना दिल्लित ठार करणारे आता त्यांच्या नावावर राजकारण करताहेत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि शेवटी न्यायालय आहेच की.
मोदींना जमेल तितके बदनाम करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे.

मोदींची भलावण करणारे लेख कसे ईमेल मधे फॉर्वरड होत असतात हे या लेखाच्या सुरुवातीलाच दिलं आहे. मोदींची लोकप्रियता हा असा पसरवण्यात आलेला भ्रम आहे. हे काही मोदीविरोधकांचं काम नाही. हा प्रपोगंडा आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला कि मोदींचा प्रचार त्यांचे विरोधकच करतात अशी उलटी बोंबाबोंब करायची रणनीती देखील जुनीच आहे. मोदींचा विकास किती खरा किती खोटा याची तुलना न होताच प्रपोगंडा करायचा, प्रचारमोहिमा राबवायच्या, शंका घेतली कि त्याला देशद्रोही लेबल लावायचे यासारखी करमणूक नाही. ही मोहीम सुरू झाल्यापासून महाराष्ट्र गुंतवणूक, मानव विकास निर्देशांक आणि अर्थव्यवस्था यामध्ये अव्वल असल्याचं दडवून ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही हा क्रमांक राज्याने टिकवून ठेवला होता हे विशेष. गुजरातमधे कंत्राटी कामगारांचं शोषण हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रात कामगार पुरवणा-या माफियांचा अद्याप इतका सुळसुळाट झालेला नाही. पण गुजरातचे हे मॉडेल इतके घातक आहे कि चाकण औद्योगिक परिसरात काही प्रमाणात छोट्या प्रमाणावर या माफियांचे अस्तित्त्व जाणवू लागले आहे. कष्टक-यांसाठी गुजरातच्या विकासाचे मॉडेल किती उपयोगाचे आहे हा एक प्रश्नच आहे. बिहारच्या नीतीशकुमारांचे विकासाचे मॉडेल राज्याने आणि देशाने स्विकारावे यातच सर्वांचे भले आहे.

Kiranu ,

>> बिहारच्या नीतीशकुमारांचे विकासाचे मॉडेल राज्याने आणि देशाने स्विकारावे यातच सर्वांचे भले आहे.

फक्त बिहारातल्या २२ मुलांना सोडून बाकी सार्‍यांचं भलं होईल. पण त्या मुलांची चिंता नको. ती अगोदरच मेलीत.

आ.न.,
-गा.पै.

अरे हो,
गुजरातला अनैसर्गिक मृत्यू ठाऊकच नाहीत, नाही का ? Wink
नीतीशकुमारांनी कुनाशीतरी दोस्ती तोडली आणि विषबाधा प्रकरण घडले. त्याआधी त्यांचे गोडवे गाणा-यांनी सबक सिखाओ असा आदेश आल्याबरोबर यूटुबवर बिहारच्या शिक्षणव्यवथेवर शंका उपस्थित करणारे व्हिडीओ अपलोड केलेत.

कॉण बरं ते ? Uhoh

महाराष्ट्रात कामगार पुरवणा-या माफियांचा अद्याप इतका सुळसुळाट झालेला नाही.
<<
बरे झाले इथल्या हजारो क्षेत्रातल्या माफियांना या क्षेत्रात स्कोप असल्याचे आता कळेल.

मोदींच्या सभांना अशी जमते गर्दी?

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/come-with-5000-people-in-m...
>>> राहुल गांधिंच्या सभांना कशी जमते गर्दी त्याची पण लिंक द्या ना.

सुप्रीम कोर्टाने "खराब रस्त्यांबाबत गुजरात सरकार ला नोटीस बजावली,,,

कोर्टाने हा "धागा" बघितला नाही??
Wink

Infant mortality rate down by 33% in Gujarat

GANDHINAGAR: There's good news for Gujarat on the Human Development Index (HDI) front as the state's Infant Mortality Rate (IMR) has declined significantly. It has fallen to 38 in 2012 from 57 in 2003 - a drop of 33.3% - better than the 30% decline at the national level. IMR is defined as deaths of infants below one year of age per 1,000 live births.

Though Gujarat has shown good results in the last decade, states like Bihar, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Rajasthan and Andhra Pradesh have performed better. Bihar reduced its IMR from 62 to 43, Uttar Pradesh brought it down from 82 to 53, Madhya Pradesh from 86 to 56, Rajasthan from 79 to 49 and Andhra Pradesh from 66 to 41, during this period.

Gujarat's annual IMR decline for the last three years, at 7.5%, is among the highest in the country. The target set by the Centre was 7%, to achieve the Millennium Development Goal.

Gujarat faces the challenge of continuing this good performance and achieve an IMR of 29 by 2015.

The Narendra Modi-led state government is often criticized for its poor performance on social and health indicators like IMR, Maternal Mortality Rate (MMR) and anaemia prevalence rate despite its tall claims of economic growth.

The state is projected to achieve major improvements on these indicators in the next five years will still not be able make the top five, as projected by the Planning Commission in 12th Five Year Plan.

Gujarat's present IMR, MMR and anaemia levels are 38, 148 and 55.3 respectively, and is projected to go down to 24, 67 and 28 respectively, by the end of the 12th Five Year Plan.

ही मोहीम सुरू झाल्यापासून महाराष्ट्र गुंतवणूक, मानव विकास निर्देशांक आणि अर्थव्यवस्था यामध्ये अव्वल असल्याचं दडवून ठेवण्यात आलं होतं. >>

दडवून ठेवणे म्हणजे काय ? तुमचे हात कुणी धरले होते ? आम्ही गुजरातचा विकास सांगतो. तुम्ही तुमचा सांगा ना. पण त्याऐवजी तुम्हाला फक्त गुजरातेत दंगल झाली, इतकी माणसं मेली, अयोध्या, बाबरी मशीद प्रकरण, मुंबई दंगली अशी जुनीच दळणं दळण्यात इंटरेस्ट आहे.

नवीन काय आहे तुमच्याकडं ? ते अन्नसुरक्षा सोडून बोला.

गुजरात विकासाची आकडेवारी कशी फसवी असते त्याचे उदाहरण.
+
इन्फन्ट मॉर्टॅलिटी ३३%ने कमी झाली, याचा अर्थ काय होतो, हे समजून न घेता चिकटवलेली पोस्ट @ (विनंतीवरून येथील नांव काढून टाकले आहे). (उर्फ लक्ष्य२०१४)

अहो साहेब,

किमान आपण काय बातमी देतो आहोत, त्या बातमीने मोदी यांची जाहिरात होणार की नाचक्की? हा विचार करून लिहित जा Happy ७.५%ने घटवला, तरीही टोटल मॉर्टॅलिटी रेट खूपच जास्त आहे. अगदी तुमच्या बातमीतली आकडेवारी घेतली तरीही.

http://censusindia.gov.in/vital_statistics/SRS_Bulletins/MMR_release_070...

हे वाचा जरा. भल्या मोठ्या इंग्रजी बातम्या डकवायची सवय तुम्हाला असल्याने त्यातील इंग्रजी व "MDG" Target याबद्दल आपल्याला समजेलच. अडचण आल्यास कृपया इथे लिहावे, यथाशक्ती मराठी भाषांतर सांगण्याचा यत्न करीन.

प्लस,
हे यश, माताबालसंगोपन कार्यक्रम, जो केंद्रसरकार राबविते, त्याचे फलित आहे. मोदी यांनी 'एन्व्हिजन' केलेल्या वा राबविलेल्या कोणत्याही नव्या कार्यक्रमाचे ते फलित नाही. तुम्हीच डकवलेल्या बातमीतले हे वाचा :

>>Gujarat's annual IMR decline for the last three years, at 7.5%, is among the highest in the country. The target set by the Centre was 7%, to achieve the Millennium Development Goal.<<

बोल्ड केलेल्या शब्दांचा अर्थ होतो, की हे लक्ष्य केंद्र सरकारने ठरवून दिलेले होते. Proud
महाराष्ट्रासारखी राज्ये ऑलरेडी MDG ला पोहोचलेली आहेत, (३-४ वर्षांपूर्वी)

राहुलजींच्या सभेला जमलेली गर्दी उस्फुर्त असते. >>>>>>>
Rofl
आता फक्त जमिनीवर लोळायाचाच बाकी आहे मी. खरतर मी यासाठीच अधून मधून अशा धाग्यावर फेरी मारतो. मस्त मनोरंजन होत. धन्यवाद.

कालपरवा वर्तमान पत्रामध्ये वाचल होत, कॉंग्रेस आता आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ते शिकविणार आहे. हे अस असल तर आमची चांगलीच चंगळ आहे. मस्त मनोरंजन होणार.

नमो चालिसा!

नमो नमो ज्ञान गुन सागर।
कमलदूत तिहुं लोक उजागर।।
राम दूत अतुलित बल धामा।
"हिरा बा'सुत नरेंदर नामा।।
महाबीर बलि गुर्जरसेरा।
खमणप्रताप बहु अतुलित वीरा।।
केसरी बरन बिराज सुबेसा।
उग्र मूंछदढी सुभ्रति केसा।।
मुखपर ऐनक सदा बिराजै।
गुर्जर भासा जनेउ साजे।।
संकर सुवन कमलिनिनंदन।
तेजप्रताप बीजेपी बंदन।।
बहुबलवान गुनि अति चातुर।
राजकाज करिबे को आतुर।।
नमो चरित्र सुनिबे को रसिया।
मन में तिहुं सिंघासन बसिया।।
सूक्ष्म रुप धरि सियहिं दिखावा।
बिकट रुप धरी गोध्रा जरावा।।
"अटल' सुमिरे कहै मित बानी।
"मम गुरुदेव लाल अडवानी'।।
गुरुवर जबहुं शिष्यसे हारे।
लंबैं से नित कुर्सी निहारे।।
साधु संत के तुम रखवारे।
कांग्रेसनिकंदन "लाल' दुलारे।।
उग्ररुप धरि "हाथ' संहारे।
राजनीति के काज संवारे।।
लाय संजीवन "राज'नाथ जियाये। "
नमोनमो' हरषि उर लाये।।
राजनाथ कीहनी बहुत बडाई।
"तुम मम प्रिय नितीश नहीं भाई'।।
लालक्रिश्‍न, मुरलीदि मुनीसा।
जेटली, सुसमा सहित अहीसा।।
राहुल हूल उठा परि राखा।।
तुम लहरौ जग कमल पताका।।
जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सकै कहां ते।।
तुम उपकार गुजरातहि कीहना।
बिजली सडक विकासहि दिहना।।
तुमरो मंत्र भाजपाहि माना।
दिल्लीस्वर अब भये कोई अपना।।
इंटरनेट मेलि मुख माहीं।
जलधि लांघी गये अचरज नाहीं।।
ट्‌विटर फेसबुक सोसल नेटवर्का।
शहा अमितवा हीरा परखा।।
पहुंच्यो ठेठ भासनकौ बिदेसा।
जबहु अमरिका नकरै व्हीसा।।
बीजनेस के तुम रखवारे।
आम आदमी बहु मतवारे।।
उद्योगजगत तुम्हारी सरना।
तुम रच्छक काहू को डरना।।
"हाथ' कहे उंगलिया उठाए।
प्रजा रोएं हैं धांए धांए।।
"हाथ' उठै गरीबोंकी पीरा।
"कमल' पक्ष तो भक्‍त अमीरा।।
पूरी रोटी खईके जइबे।
अबकै बार "हाथ'ही लईबे।।
असुर कहत दढियल औ' फेकू।
तुम गरजै "आओ तो देखूं'।।
"इ गरीबोंका का दुख जाने।
शहजादे के न होश ठिकाने'।।
जबहुं वीर पटने में पधारा।
जलन लगै तब नितीश कुमारा।।
अब तो वीरकी निकली सवारी।
परचार की झडी, खर्च भी भारी।।
भूत पिसाच निकट नहीं आवें।
नमोमंत्र जब नाम सुनावें।।
नमोनामही हरै सब पीरा।
जपत निरंतर वीर नरेंद्रा।।
संकट तें अब "नमो' छुडावें।
मनमोहन की नींद उडावें।।
राम रसायन तुमरे पासा।
सदा रहो सत्ता के दासा।।
जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदी महा सुख होई।।
जो यह पढै नमोचालिसा।
उसका मुख हो तब राहुलसा।।
हमरा क्‍या हम तो मतदाता।
जो आए, सो ताली बजाता
नंदीदास कहे गुर्जरबीरा।
कीजै मतदाता मनमहॅं डेरा।।

आभार : रचनाकार ब्रिटीश नंदी

Though Gujarat has shown good results in the last decade, states like Bihar, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Rajasthan and Andhra Pradesh have performed better. Bihar reduced its IMR from 62 to 43, Uttar Pradesh brought it down from 82 to 53, Madhya Pradesh from 86 to 56, Rajasthan from 79 to 49 and Andhra Pradesh from 66 to 41, during this period.

इस दौरान नरेंद्र मोदी ने पटेल से जुड़ा एक किस्सा भी सुनाया कि सरदार पटेल ने 1919 में महिलाओं के लिये आरक्षण लाने की बात कहकर अपनी दूरदर्शिता का परिचय दिया था.

फिर मंच पर आए केंद्र सरकार के मंत्री और कांग्रेस सांसद दिनशा पटेल. उन्होंने मोदी के इतिहास ज्ञान पर सवाल उठाते हुए कहा, 'मोदी जी ने कहा कि सरदार पटेल ने 1919 में महिला आरक्षण की बात कही थी. मैं उन्हें सुधारना चाहता हूं. वो 1926 था.'

फिर क्या था, समारोह में मौजूद कांग्रेस के समर्थक मोदी को फेंकू...फेंकू... कहके बुलाने लगे. इस दौरान सोनिया गांधी और कांग्रेस जिंदाबाद के नारे भी लगे.

और भी... http://aajtak.intoday.in/story/congress-supporters-call-narendra-modi-fe...

मंगलवार को यह दूसरा मौका था जब नरेंद्र मोदी के इतिहास ज्ञान पर गंभीर सवाल उठे. इससे पहले राजगीर में बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने मोदी पर हुंकार रैली के दौरान बिहार का इतिहास बदलने का आरोप लगाते हुए कहा, 'पाकिस्तान के तक्षशिला विश्वविद्यालय को बिहार का बता डाला. सिकंदर को गंगा नदी तक पहुंचा दिया जबकि वह सतलज नदी तक भी पहुंच नहीं सका था. चंद्रगुप्त मौर्य को गुप्त वंश का बता दिया.'

फेकुचंद

शाळेत गेला नाही वाटते.......

अरे याला कोणी तरी इतिहास शिकवा रे.........

मौर्य गुप्तवंशाचा..... तक्षशिला बिहार मधे......सिकंदर गंगा नदीत.........

फेकायची सुध्दा मर्यादा असते..........खो खो

यावरुनच समजुन येते.....नरेंद्र मोदी विकासाच्या सुध्दा थापा मंच वरुन मारत असतात

आपण आता राष्ट्रीय नेते आहोत.. साधी छापिल भाषण वाचताना सुध्दा इतिहासाच्या चुका होत असतील तर नक्कीच भाषण लिहिणार्‍यांना सुध्दा इतिहास शिकवायला लागेल..

२० कोटी महिन्याचे जाहीरातीवर खर्च करण्यापेक्षा एक १० हजार महिना पगार एका शाळेच्या इतिहास शिक्षकाला दिला तर तो जास्त चांगली इतिहासाची माहीती देईल... आणि भर सभेत हसे देखील होणार नाही Biggrin

उदयन.. एकच पोस्ट वेगवेगळ्या धाग्यांवर का टाकताय?

>>> कालपरवा वर्तमान पत्रामध्ये वाचल होत, कॉंग्रेस आता आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ते शिकविणार आहे. <<<<

ऑर यू ह्याव लर्न्ड फ्रॉम देअर कोचिन्ग क्लास अ‍ॅज मेन्शन्ड अबॉव्ह टू यूज सोशल मिडिया बाय रिपिटिन्ग सेम पोस्ट्स ऑन व्हेरियस धागाज् ?? आय मिन थ्रेड्स?? Proud

तुम्हाला काय प्रोब्लेम आहे का ? Wink

कॉंग्रेस आता आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मिडीयाचा वापर कसा करावा ते शिकविणार आहे. <<<<

बरोबर आहे... अमेरिकन कंपनीला जाहीरात करायला ते २० कोटी खर्च देत नाहीत ..म्हणुन शिकवावे लागते Wink

ऑर यू ह्याव लर्न्ड फ्रॉम देअर कोचिन्ग क्लास अ‍ॅज मेन्शन्ड अबॉव्ह टू यूज सोशल मिडिया बाय रिपिटिन्ग सेम पोस्ट्स ऑन व्हेरियस धागाज् ?? आय मिन थ्रेड्स?>>>

यु आलरेडी लर्न्ड फ्रोम फेकुचंद क्लासेस हाउ लाय फ्रन्ट ओफ मिडीया विथ लाउड व्हॉईस Biggrin

बायदिवे, उदयन, आजतक वरीलच नन्तरची बातमी तुम्ही देणार नाहीच, नै का? तसे तुमच्या "मिडीया क्लास मधे" शिकवले नसेलच.

ही घ्या लिन्क
http://aajtak.intoday.in/story/bjp-gives-proof-to-prove-narendra-modi-ri...

>>>> सवाल मोदी पर उठे और बीजेपी चुप बैठ जाए, भला ये कैसे हो सकता था. दिनशा पटेल की बात सुनकर बीजेपी नेताओं के चेहरे पर एक बार के लिए मायूसी जरूर आई, लेकिन जब इतिहास के पन्ने खंगाले गए तो पाया कि मोदी गलत नहीं थे. गलत दिनशा पटेल थे. <<<<

बीजेपी की ओर से रात में ही मीडिया को मेल के जरिए यह सबूत दिया गया कि मोदी ने जो 1919 का जिक्र किया था, वह सही था. पहली बार सरदार पटेल ने इसका जिक्र 1919 में ही किया था.

बीजेपी की ओर से रात में ही मीडिया को मेल के जरिए यह सबूत दिया गया कि मोदी ने जो 1919 का जिक्र किया था, वह सही था. पहली बार सरदार पटेल ने इसका जिक्र 1919 में ही किया था.

Pages