गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते. थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापुर्वी भरून राहिलेलं एक नि:शब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायच असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजुनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्र्कन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डिंग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.

अहमदाबाद कुठे संपतं आणि कुठे गांधीनगर सुरू होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथे दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमधे असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण, गाडीने नर्मदेचा पाण्याने भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमधे पोहोचल्याची पक्की खूण पटते.मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारे पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेले असेल ज्याने गुजरात समृद्ध होतोय.

गांधीनगर हे राजधानीचे शहर, पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमधेच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादला आलेलंच बरं. २० कि.मी. पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरे. सिकंदराबाद-हैद्राबाद, पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमधे कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमधेही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तिन एक महिन्यांपासुन माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते, होत राहतील, आमचे एक घर सद्ध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणार्‍या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा बदल कोणता झाला असेल तर मला वाटते मोदींबाबत माझे मत पुर्णपणे बदलले. मत बनविण्याची माझी एक पद्धत आहे. कोणी कितीही सांगितले तरी इतरांच्या सांगण्यावरून माझे अमुक अमुक म्हणुन मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फूटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबाबत पाच सहा वर्षांपासुन उलटसुलट बरच काही ऐकून झालय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वाने भारावलोय.

गुजरातमधे सद्ध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरू आहे. हे पाचवे जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातुन उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरू केलेले हे संमेलन दरवर्षी भरते. एका व्यासपीठावर येण्याचे टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजुला बसलेले दिसतायत. एवढेच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबर देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलय ते केंद्राला तरी जमेल ?

गुजरात हे उद्योगी लोकांचे राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदींनी फक्त व्यापार्‍यांचेच हित सांभाळले का ? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबवलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपुर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथे मोदींच्या 'स्वागतम'ची चर्चा सुरू होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आयडिया अशी. समजा तुमचे एखादे काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी ते करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका 'स्वागतम'मधे जायचे. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानेही काम नाही केले तर 'जिल्हा स्वागतम'मधे जिल्हाधिकार्‍यांकडे जायचे. तिथेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचे. मोदी 'स्वागतम'मधे आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठविल्या जातात. संबंधित अधिकार्‍यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतेच.

तक्रारदाराला मोदी बाजुच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधित अधिकार्‍याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचे काम का नाही झाले ? अधिकार्‍याने जर सांगितले की तक्रारदाराने आवश्यक असलेले कागदपत्रे पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात. समजा चूक अधिकार्‍याची असेल तर मोदी तिथेच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदाराने आवश्यक बाबींची पुर्तता केली नसेल तर त्याला तसे सांगतात, पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकार्‍यांना झापत नाहीत. किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधित पहिल्या अधिकार्‍याकडे पाठवतात. तालुका स्वागतम मधे हे विशेष.

स्वागतम मधे जाऊन आलेल्या एका पोलिस अधिकार्‍याने सांगितलेला अनुभव अधिक बोलका आहे. एकजण मोदी स्वागतम मधे एका अनधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डिंग तर अनधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदींनी संबंधित शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधित पालिकेच्या अधिकार्‍यांना विचारले की तक्रारीत किती तथ्य आहे ? अधिकार्‍याला स्पष्ट उत्तर देता येईना. त्याची तारांबळ उडाली. मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डिंग अनधिकृत आहे की नाही ? अधिकार्‍याने अखेर सांगितले हो --- अनधिकृत आहे --- मग पाडली का गेली नाही ? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डिंगमधे सगळे दादा लोक राहतात. अधिकार्‍याचे उत्तर --- मोदींनी फॅक्सवरून बिल्डिंगचे सगळे कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकार्‍यांनी ती तिथेच तपासली आणि अनधिकृत असल्याचे सांगितले. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डिंग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा --- मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचे टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातुन अधिकार्‍यांना फक्त भेट घ्यायचीय असे नाही तर तक्रारीचे निवारणही करायचेय म्हणजेच काहीही करून कामातुन सुटका नाही. आपल्याकडे हे कधी होईल ? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारी तिकडे फिरकत नाहीत.

मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होते. गुजरातला वाचते करायचे तर काय करावे ? मोदींनी सांगितले, ' वाँच्छे गुजरात '. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचे. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरूवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यावर मंत्री गेले, आख्खे मंत्रीमंडळ गेले म्हणजे अधिकारीही गेलेच, जावेच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकार्‍यांना सादर करावा लागतो, त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसे ज्ञानेश्वरीचे पारायण होते तसे गुजरातमधे वाँछे गुजरातची पारायणे लागली. आख्खे गुजरात वाचत राहिले. एका कल्पनेने आख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय ?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ' गुणोत्सव ' नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकार्‍यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन, प्रत्येक दिवशी पाच असे तीन दिवस १५ शाळांमधे जाऊन शिकवायचे. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवले त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकार्‍याने कुठल्या शाळेत शिकवायचे याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचे नाही आणि पाट्या टाकून यायचे नाही. गावात गेल्यानंतर अधिकार्‍यांनी गावकर्‍यांशी बोलायचे. पुस्तके, गणवेषाचा प्रश्न असेल तर तो तिथेच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळते आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येते याचे समाधान वाटते. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातले अंतर मिटवायचे ? काय करावे ? मोदींनी सांगितले ' खेलोत्सव ' म्हणजे अख्ख्या गुजरातने खेळायचे. कल्पना चांगली आहे पण वाटते तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमधे अगोदर गाव पातळीवर लोक, स्थानिक नेते, अधिकार्‍यांनी खेळायचे. खेळ कुठलाही असो. खेळायचे. नंतर तालुक्यावर खेळायचे त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथेही सगळे अधिकृत... खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करते. खेळणार्‍या अधिकार्‍यांच्या ड्युट्या तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदाने तयार झाली, असलेली सुधारली, नविन खेळाडू मिळाले. अधिकार्‍यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकार्‍यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथेच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचे मंदिर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलावले. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्विकारले आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलावले आणि वार्‍यावर सोडले असे नाही. मोदींच्या एका कल्पनेने दूर गावत असलेला गावकरी आणि समिटमधे बसून चर्चा करणारा उदयोगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसर्‍या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकर्‍यांच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेने जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडे. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात त्याचा फील आला नाही. गुजरातमधे त्याचा विसर पडत नाही. मी इथे एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचे की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचे निश्चित केलय. कारण दंगली कोण घडवत नाही ? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पहायचय जे सद्ध्या अशक्य वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, ओह, आत्ता आल लक्षात, कॉन्गीण्च्या मिडिया ट्रेनिन्गमधे असाही अंतर्भाव आहे की "विरुद्ध जात असलेल्या" दुसर्‍याचा मुद्दा/संदर्भ डिलीट तर मारता येत नाही, पण वहावुन टाकता तर येतोच्च की या अशा भरमसाठ निरर्थक पोस्टी टाकून! गुड स्ट्रॅटेजी हां कॉन्गीज् Proud
अर्थात उगाच कॉलर ताठ करुन घेऊ नका! ही स्ट्रॅटेजी तर केव्हान्ची जुनीपानी वाडकर्‍यान्नी वापरुन वापरुन चोथा झालेली आहे! Wink आत्ताच कॉन्गीन्ना कळली असे नाही

अगर आप मानते है कि मोदीजी अच्छे इन्सान है, और वह काँग्रेस को एनिमी नं १ (शत्रू) मानते है..तो कृपया ध्यान दें
1374190_743726252311377_969309218_n.jpg

>>>>> अगर आप मानते है कि मोदीजी अच्छे इन्सान है, और वह काँग्रेस को एनिमी नं १ (शत्रू) मानते है..तो कृपया ध्यान दें <<<<< अबे ध्यान दे ध्यान दे क्या लगाया है? मान्नामान मै तेरा मेहमान | Proud
ध्यान तो कॉन्गिज दे, की आम आदमी के मनकीही बात जो वो खुलके बोलभी नही सकता इतनी दहशतगर्दी है, वो बात मोदी बोलते है, तो समझ लो की मोदी नही, बल्की जो भी कुछ मानना है वो आम आदमीही मान गया है, मोदी तो सिर्फ एक "निमित्त" है |

पास्ट लाईफ रिग्रेशनच्या बीबीवर आपला विचारवारू सोमरस झोकलेल्या घोड्यागत खिंकाळत फिरत होता<<<

हे म्हणजे शेळीने मांजराकडे मूठभर लेंडकं मागण्याचा प्रकार आहे.<<<

पास्ट आय डी रिग्रेशन होत असलेला आंबा.<<<

Rofl

अशक्य मनोरंजनात्मक धागा आहे हा!

यह तो ट्रेलर था. पिक्चर अभी बाकि है दोस्त. यह देखा गया हैं कि टूर्नामेंट के पहले सात आठ माह अपना कँपेन शुरू करनेवालों कि हालत अक्सर टूर्नामेंट मे खराब हो जाती है | लोग उन्हें प्यार से चोकर कहते है !

- दिग्विजयसिंहजी

नरेंद्र मोदी काँग्रेसमधे जाणार

अहमदाबाद ३१.१०२०१३ : (आमच्या बातमिदाराकडून ) गुजरात मधे सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या कामाची पायाभरणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संघाच्या तालमीत तयार झालेल्या मोदिंनी एका काँग्रेस नेत्याचा पुतळा उभारावा याबद्दल संघ नेतृत्व आणि भाजपमधील इतर नेते नाराज झाले आहेत. मोदी यांच्या या कृतीबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले असून भविष्यात ते कोंगेसमधे जाण्याचे संकेत देत असावेत इकडे त्यांच्या निकटवर्तियांनी लक्ष वेधले आहे.

अहो, त्यांना हसायला कारण लागत नाही. ते आधीपासून हसरेच आहेत. नेहेमी गोलगोल फिरत हिरवे हसतात तरी, किंवा पिवळ्या टिकल्या तरी लावतात.

अहो अ‍ॅडमिन, यांना एक तरी भगव्या रंगाची स्मायली द्या हो! 9.gif

असो.

मोदी आजकाल फार पुतळे उभारत सुटलेत. त्यांनी "सूरत लुटणार्‍या शिवाजी महाराजांचा" पुतळा सूरतेतच उभारून काहीतरी युगप्रवर्तक वगैरे केलं असं काहीतरी वाचलं मध्यंतरी. फेसबुकचा उकिरडा फुंकावासा वाटत नसल्याने मी तिकडे नसतो. काय बातमी होती ती?

आजच्या ईसकाळमधे मोदींना धू धू धुतलंय लोकांनी. इतके दिवस ज्या भाषेत मोदी, भाजप आणि सचिन सोडून इतरांची टवाळी चालू होती त्याच भाषेत त्यांना उताणे पाडण्यात आले आहे.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=T2OFH

गुजरातमधील दंगलीला मोदी जबाबदार नाहीत-गिल

नवी दिल्ली- गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे जबाबदार नाहीत, असे पंजाबचे माजी पोलिस महासंचालक केपीएस गिल यांनी म्हटले आहे.

'केपीएस गिलरू द पॅरामाऊंट कॉप' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना गिल म्हणाले, 'गुजरातमधील दंगल संपविण्यासाठी मोदी आग्रही होते. देशामध्ये आजही मोठ्या प्रमाणात दंगली होत आहेत. सगळेच पक्ष एकाच विचाराने चालत आहेत. मात्र, देशाचा विकास होणे गरजेचे आहे. पुस्तकामध्ये मोदी यांची स्तुती करण्यात आली आहे.'

गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीला मोदींना जबाबदार धरले जात आहे. यावेळी गिल हे मोदींचे सल्लागार होते. गिल म्हणाले, 'दंगलीवेळी इतर राज्यांमधून पोलिस दलांची मागणी केली होती. परंतु, राज्यांनी पोलिस देण्यास नकार दिला होता. खूप प्रयत्न केल्यानंतर त्यावेळी दंगल थांबविण्यास यश आले होते.'

<<<आजच्या ईसकाळमधे मोदींना धू धू धुतलंय लोकांनी. इतके दिवस ज्या भाषेत मोदी, भाजप आणि सचिन सोडून इतरांची टवाळी चालू होती त्याच भाषेत त्यांना उताणे पाडण्यात आले आहे.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=T2OFH>>>

वीरू जी,
जरा प्रतीक्रिया नीट वाचा आणी likes, dislikes पण बघा जरा...

likes, dislikes >>> मोजून चार पाच निरुद्योगी लोक असतात. पुन्हा पुन्हा सिस्टीम रिसेट करून likes, dislike करत बसतात. प्रतिक्रिया लिहीणारेही तेच तेच लोक सगळीकडे प्रतिक्रिया देतात. इतरांच्या प्रतिक्रिया प्रसिद्धच होत नव्हत्या. म्हणून कालचा दणका महत्वाचा.

मोदींना 'पीएम' पदासाठी शुभेच्छा- लता मंगेशकर

पुणे- "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उद्‌घाटन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. आता रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन नरेंद्र मोदी करीत असल्यामुळे ते पंतप्रधान म्हणून आपल्याला दिसावे, अशी सर्वांची इच्छा आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,'' अशी मनीषा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी शुक्रवाी येथे व्यक्त केली.

"मोदी मला भावासारखे आहेत,' अशीही भावना दीदींनी या वेळी व्यक्त केली.

""रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यावर उद्‌घाटनासाठी कोणाला बोलवायचे, असा प्रश्‍न मनात आल्यावर पहिले नाव मोदींचेच आले. मोदींना भेटल्यावर आपलं माणूस भेटल्यासारखे वाटते,'' असे लतादीदी म्हणाल्या.

तत्पूर्वी, रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रास्ताविकात राज्य सरकारने रुग्णालयासाठी सहा एकर जमीन दिल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार, कै. विलासराव देशमुख, नारायण राणे आदी नेत्यांचे आभार मानले.

मोदींचे पुण्यात 'फटाके'

माझ्या बदनामीचा कॉंग्रेसचा एककलमी कार्यक्रम

पुणे- "गेली बारा वर्षे माझी बदनामी करण्याचा एककलमी कार्यक्रम कॉंग्रेसकडून सुरू आहे. माझ्या जागी दुसरा कोणी असता, तर जगणे मुश्‍कील झाले असते; परंतु जनतेची साथ आणि देवाचा आशीर्वाद यामुळे मी उभा आहे,'' अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपली बाजू मांडली. गरज पडली तर देशासाठी जीव देण्याची माझी तयारी आहे, असेही मोदी म्हणाले. केंद्रातील कॉंग्रेस सरकारवर हल्लाबोल करत मोदी यांनी आपल्या भाषणात आरोपाचे "फटाके' फोडले.

एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते आज पुण्यात आले होते. या वेळी शहर भाजपतर्फे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, चंद्रकांत पाटील, पंकजा पालवे-मुंडे, नगरसेवक योगेश मुळीक, गणेश बिडकर उपस्थित होते.

अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी गुजरातच्या विकासावर होत असलेल्या टीकेला; तर केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देतानाच कॉंग्रेसला लक्ष्य केले. विविध प्रकारे मला अडकविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होत आहे. केंद्रात पंतप्रधान आणि सत्ताही कॉंग्रेसची आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर दिले पाहिजे; परंतु मोदींना प्रश्‍न विचारले जात आहेत. कॉंग्रेस अहंकारी असून, पत्रकारांनाही भेटण्यास तयार नाही. गेल्या दोन महिन्यांतील कॉंग्रेस नेत्यांची भाषणे पाहा; जनतेचे प्रश्‍न किती सोडविले, याचे कोणतेही उत्तर त्यांनी दिलेले नाही.

केवळ आरोप करण्याचे काम ते करीत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ""दहा महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्याबद्दल कॉंग्रेसकडून विषारी प्रचार करण्यात आला. पैसा खर्च करण्यात आला; परंतु तिसऱ्यांदा भाजपला बहुमत मिळाले. माझा जनतेवर विश्‍वास आहे. कॉंग्रेसच्या भूलथापांना जनता आता बळी पडणार नाही.
देशात आणि राज्यांमध्ये विविध पक्षांचे, आघाड्यांचे आणि भाजपच्या सरकारचे काम करण्याच्या पद्धतीचा अनुभव जनता घेत आहे. देशातील राजकीय पंडित आणि अर्थतज्ज्ञांना माझे आव्हान आहे, त्यांनी काही निकष निश्‍चित करून जर तुलना केली, तर भाजपचे सरकार ज्या राज्यांमध्ये आहे, त्या राज्यांचा विकास गतीने होत असल्याचे दिसेल.'' या वेळी अनिल शिरोळे यांचे भाषण झाले. राजेश पांडे यांनी सूत्रसंचालन केले.

दर वर्षी प्रगती अहवाल देणार
आगामी लोकसभा निवडणुकीत देशाची सेवा करण्याची संधी कोणाला द्यायची, हे जनता ठरविणार आहे. गेली साडेनऊ वर्षे कॉंग्रेसप्रणीत आघाडी सरकार केंद्रात राज्य करीत आहे. निवडणुकांनंतर शंभर दिवसांत महागाई कमी करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले होते; परंतु महागाई कमी झाली का, याचे उत्तर देण्याऐवजी केवळ आरोप करण्याचे काम कॉंग्रेस करीत आहे. ते खोटी आश्‍वासने देत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ""भाजप सत्तेवर आल्यास दर वर्षी सरकारकडून प्रगती अहवाल सादर केला जाईल.''

मोदींचा हल्लाबोल
कॉंग्रेसने जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर दिले पाहिजे; परंतु मोदींना प्रश्‍न विचारले जात आहेत.
कॉंग्रेस नेत्यांची भाषणे पाहा; जनतेचे प्रश्‍न किती सोडविले, केवळ आरोप करण्याचे काम ते करीत आहेत. निवडणुकांनंतर शंभर दिवसांत महागाई कमी करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले; परंतु महागाई कमी झाली का?

Modi visits family of Patna serial blasts victim, gives a cheque of Rs 5 lakh

A day after the Bharatiya Janata Party (BJP) conducted the 'Shahid Asthi Kalash Yatra' with the ashes of those killed in Sunday's Patna serial blasts , party's prime ministerial candidate Narendra Modi on Saturday met the family of one of the victims.

Modi arrived in a chopper at Gaurichak in Bihar to meet the family of one Rajnarain Singh, who was killed in the blasts in and around Patna's Gandhi Maidan on Sunday.

During the meeting, the Gujarat Chief Minister assured the family of all possible help by the party and said that he stood with them in the time of grief. Modi was accompanied by senior party leader Ravi Shankar Prasad.

Addressing mediapersons after the meeting, Prasad said that the Gujarat Chief Minister just gave strength to the family of the victim and did not talk politics. He further said that Modi gave a cheque of Rs 5 lakh to the victim's family.

The BJP prime ministerial candidate left in his chopper soon after the meeting. He is now slated to visit families of other victims in Kaimur, Begusarai, Gopalganj, Supaul and Nalanda.
,
,
,
,
,

मोदी लताबैना भेटले हे बरे झाले.

भाजपेयी लताबैना भेटले. त्या बोलल्या हे माझे बाबा की मी त्यांची मुलगी, असे काहीतरी.

आणि मग भाजपेयी पुढच्या निवडणुकीत पडले.

..

आता मोदी लताबैना भेटले. त्या बोलल्या हे माझे भाऊ.

........................

देवा ! मोदींचे काय होणार ?????????????

Proud

Rofl

खोटेपणा उघड...........तोंडावर आपटले (की मारले) ........फुल्ल धोबीपछाड.......

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/--/articleshow/28157...

ताळेबंद, महाराष्ट्र आणि गुजरातचा!

आपल्या राज्याच्या विकासाचा सार्थ अभिमान दुसऱ्या राज्यांच्या टिंगलीतून का व्यक्त व्हावा? बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्ये तर हा विकास गुजरातपेक्षा जास्त वेगाने आणि महाराष्ट्र, केरळमध्ये तेवढ्याच वेगाने झाला. परंतु यातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच फक्त विकासाचे मॉडेल आहे, असा टेंभा मिरवलेला नाही.

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि ' सध्याचे ' गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत झालेल्या ' महागर्जना रॅली ' मधील भाषणात नेहमीप्रमाणेच इतिहासातील नोंदींची सरधोपट विटंबना, सत्य व पुराव्याअभावी केलेली बेधडक विधाने यांची हजेरी होती. त्यांचे ' टोलनाक्यावरील ' महसुलाबद्दलचे विधान किंवा महाराष्ट्र आणि गुजरातमधील मुख्यमंत्रीबदलाचे आकडे किती चुकीचे आणि दिशाभूल करणारे होते, हे सगळ्यांसमोर उघडे पडलेच आहे.

परंतु याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे गुजरातचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे असा ‌आभास निर्माण करण्याचा मोदी यांचा प्रयत्न! एकाच वेळी जन्माला आलेल्या या दोन राज्यांमध्ये ' लहान ' भाऊ असूनही आज गुजरात महाराष्ट्रापेक्षा विकासपथावर कितीतरी पुढे निघून गेला आहे आणि गुजरातचे, म्हणजे पर्यायाने मोदींकडे असलेले ' विकासाचे मॉडेल ' हा महाराष्ट्रासारख्या राज्याचे मागासलेपण दूर करण्याचा एकमेव उपचार आहे असा युक्तिवाद या भाषणातून मोदी यांनी तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय नियोजन आयोग, राज्यांचे नियोजन आयोग, जनगणना सर्व्हे आणि विकासदर्शकतेचे काही अहवाल जर आपण पाहिले, तर हा युक्तिवाद केवळ पोकळच नव्हे, तर तो धादांत खोटा असल्याचे आपल्या लक्षात येईल. एखाद्या राज्याचा विकास होणे आणि त्यांच्याकडे विकासाचे काही ' मॉडेल ' असणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांत गुजरात राज्याचा विकास झाला ही वस्तुस्थिती असली, तरी इतर राज्यांचाही विकास झालेला आहे. बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्ये तर हा विकास गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाला. महाराष्ट्र, केरळ यांसारख्या राज्यांमध्ये तो तेवढ्याच वेगाने झाला. परंतु या सर्व राज्यांतील कुठल्याही आजी किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच फक्त विकासाचे मॉडेल आहे, असा टेंभा मिरवलेला नाही. अगदी आपल्या कार्यक्षमतेच्या आणि विकासकामांच्या जोरावर मध्यप्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणाऱ्या भाजपाच्या शिवराजसिंह चौहान यांनीदेखील!

विकासाच्या निर्देशांकांचा विचार केला तर आपल्याला काय दिसते? २०१०-११च्या पहाणीनुसार महाराष्ट्राचे सकल ठोकळ उत्पन्न हे १० लाख ३० हजार कोटी रुपये असून ते गुजरातच्या (५ लाख १३ हजार कोटी) तुलनेत जवळपास दुप्पट आहे. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे २०००-०१ साली ते महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांमध्ये अनुक्रमे २ लाख ५२ हजार कोटी आणि १ लाख ११ हजार कोटी रुपये एवढे होते. म्हणजे गेल्या दहा वर्षांतील दोन्ही राज्यांचा वाढीचा दर हा जवळपास सारखाच राहिला आहे.

२००४-०५ सालापासून जर आपण वार्षिक वाढीचा दर (स्थिर किमतीला) लक्षात घेतला तर तो पुढीलप्रमाणे आहेः २००४-०५मध्ये गुजरातचा दर ८.८८ टक्के तर महाराष्ट्राचा ८.७१ टक्के, ०५-०६मध्ये तो १४.९५ टक्के आणि १४.४९ टक्के, ०६-०७मध्ये ८.३९ टक्के आणि १४.१३ टक्के, ०७-०८मध्ये ११ आणि १०.७८ टक्के, ०८-०९मध्ये ६.७८ आणि ३.३८ टक्के, ०९-१०मध्ये १०.१० आणि १३.२८ टक्के आणि २०१०-११मध्ये दोन्ही राज्यांचा १०.४७ टक्के असा आहे. यामध्ये केवळ ०८-०९ या वर्षाचा अपवाद वगळला तर दुप्पटीपेक्षा जास्त आवाका असलेले महाराष्ट्र राज्य मोदी यांना कुठल्या परिमाणांवर गुजरातपेक्षा कमी वाटते?

खरे म्हटले, तर १९९४-९५ ते २००१-०२ यामधील गुजरातची सरासरी आर्थिक वाढ ही ६.४५ टक्के एवढी होती, आणि २००४-०५ ते २०११-१२ या काळात ती वाढून १०.०८ टक्के एवढी पोहोचली. महाराष्ट्राच्या बाबतीत तर ती याच काळामध्ये ४.९७ टक्क्यांवरून १०.७५ टक्के एवढी वाढली. म्हणजे गेल्या दहा वर्षांतील महाराष्ट्राचा आर्थिक विकास हा गुजरातपेक्षा अधिक वेगाने झाल्याचे स्पष्ट होते. मासिक दरडोई उत्पन्नाचा जर विचार केला, तर गुजरातचे ग्रामीण व शहरी प्रमाण हे अनुक्रमे ७२५ व ९५१ रु. एवढे आहे, तर महाराष्ट्राचे अनुक्रमे ७४३ व ९६१ रु. एवढे आहे. म्हणजे यातही दोन्ही राज्यांत महाराष्ट्र कांकणभर सरस असल्याचे दिसून येते. हेच चित्र आपल्याला दरडोई नक्त उत्पन्न (पर कॅपिटा नेट स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट्स) यामध्ये देखील पहायला मिळते. २०००-०१ व २०१०-११ मध्ये गुजरातची वरील वाढ ही १८, ३९२ वरून ७५, ११५ रु. एवढी झाली, तर महाराष्ट्राची २२, ७७७ वरून ८३, ४७१ रु. एवढी झाली आहे.

विकासाचे कुठलेही ' मॉडेल ' हे त्या विकासाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात किती यशस्वी ठरते याच्या निकषांवर पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या लोकसंख्यावाढीचा दर हा २००१ सालच्या जनगणनेनुसार अनुक्रमे २.०३ आणि २.०४ (म्हणजे सारखाच) राहिला. २०११च्या जनगणनेनुसार तो घटून अनुक्रमे १.७७ व १.४९ एवढा झाला. दोन्ही राज्यांमधील होणारी ही घट स्तुत्य आहे. परंतु दरहजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण २००१ ते २०११ या काळात गुजरातमध्ये ९२० वरून ९१८ एवढे कमी आले, तर महाराष्ट्रात ते ९२२ वरून ९२५ एवढे वाढले. लोकसंख्येतील वाढणारे स्त्रियांचे प्रमाण हे समाजाच्या उन्नतीचे द्योतक असल्याने यामध्ये गुजरात पिछाडीवर आहे.

याहून पुढे जाऊन जर आपण बालमृत्यूचे प्रमाण पाहिले तर गुजरातमध्ये २०१० साली ते ४४ टक्के (४१ टक्के मुले व ४७ टक्के मुली) एवढे आहे. महाराष्ट्रात ते २८ टक्के (२७ टक्के मुले व २९ टक्के मुली) एवढे आहे. ग्रामीण गुजरातमध्ये तर ते मुलांमध्ये ४८ टक्के (महाराष्ट्र ३३ टक्के) आणि मुलींमध्ये ५४ टक्के (महाराष्ट्र ३५ टक्के) इतके भयावह आहे.

शिक्षणाच्या प्रसारामध्ये सुद्धा स्थिती फारशी वेगळी नाही. साक्षरतेचा दर पाहिला तर २००१ ते २०११ या कालावधीत गुजरातचे तो ५८.६ टक्क्यांवरून ७९.३ टक्क्यांवर गेला. महाराष्ट्रात तो ६७.५ वरून ८३ टक्के एवढा वाढला. शिक्षण प्रसार मोजण्याचे ठोबळ तीन प्रमुख निर्देशांक म्हणजे कुठलीही भाषा वाचता येणे, अंकओळख असणे आणि इंग्रजी अक्षरओळख असणे अशी आहेत. त्यामध्ये २०११च्या पहाणीनुसार गुजरात अनुक्रमे ६३ टक्के, ६५ टक्के आणि २५ टक्के एवढा आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण ८९ टक्के, ८९ टक्के व ४० टक्के एवढे आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांत महाराष्ट्राची प्रगती प्रचंड वेगाने झाली किंवा त्यापेक्षा जास्त ती होऊ शकली नसती अशा भ्रमात मी नाही, किंवा तसा भ्रम मी निर्माण करूही इच्छित नाही. परंतु गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा खोटा भ्रम तयार करण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाची अवहेलना करणाऱ्यांस हे काही दाखले आहेत. गुजरातच काय, पण प्रत्येक राज्याच्या विकासाचा सार्थ अभिमान आपणास वाटावयास हवा, पण तो दुसऱ्या राज्यांच्या टिंगलीतून का व्यक्त व्हावा? अर्थात ' इंडिया शायनिंग ' चे ' टायमिंग ' फेल झाल्यानंतर आता ' वोट फॉर इंडिया ' चा नारा देणाऱ्या मोदी यांच्या कक्षेतून खरा ' भारत ' वंचित राहिला, यातच सगळे आले.

बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्ये तर हा विकास गुजरातपेक्षा जास्त वेगाने आणि महाराष्ट्र, केरळमध्ये तेवढ्याच वेगाने झाला

विकासाचा वेग ही फसवी संकल्पना आहे. उदा. एखाद्या विषयात पूर्वी २० मार्क मिळवलेल्या मुलाला जरा अभ्यास केला तर ४० सहज मिळू शकतात; मात्र ८५ वरून ९० वर जाताना तो विग राखणे शक्य नसते. हीच गोष्ट औद्योगिक विकास किंवा अन्य विकासाबाबत आहे. जिथे एकही फॅक्टरी नाही तिथे एक फॅक्टरी झाली तर प्रचंड विकास होतो. तिथे २० फॅ़क्टर्‍या आहेत तिथे २१ वी झाली तर विकास नगण्य होतो.

Pages