खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का?
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डार्क ग्रेला केशरी किंवा राणी
डार्क ग्रेला केशरी किंवा राणी काठाच्या गढवाल सिल्क फार अशक्य भारी दिसतात. >>> अगदी अगदी !
स्वाती, हिंमत नाही होत गं. माझ्या मैत्रिणीने टॅटु करुन घेताना माझा हात पकडला होता. तिने ऑलमोस्ट क्रश केला हात माझा. ती म्हणे लेबर पेन माहित नसतील तर टॅटु करुन घ्यावा, म्हणुन मी जास्तच घाबरले आहे.
तो कानात चिकटवायचा खडा कुठे मिळतो? >>> मी वंडरलँडमधुन आणला होता, पण कोणत्याही कॉ. ज्वेलरीच्या दुकानात मिळेल. बिंदीजचं पाकिटच असतं गं ते. ग्लॉसी कुंदनसारख्या दिसणार्या किंवा स्टील लुक असणार्या पीनहेडसारख्या दिसणार्या. स्टड जरा महाग असतो, पण तीही बिंदीच असते.
मी वंडरलँडमधुन आणला होता, पण
मी वंडरलँडमधुन आणला होता, पण कोणत्याही कॉ. ज्वेलरीच्या दुकानात मिळेल. बिंदीजचं पाकिटच असतं गं ते. ग्लॉसी कुंदनसारख्या दिसणार्या किंवा स्टील लुक असणार्या पीनहेडसारख्या दिसणार्या. स्टड जरा महाग असतो, पण तीही बिंदीच असते.>>>
हे असं चिकटवणं धोकादायक नाही वाटत? काही कारणाने अनवधानाने कानात हात गेला आणि तो खडा/ बिंदी कानात गेलं तर? बापरे मला तर ऐकुनच कससच झालं.....
मोकिमी, अगं बिंदीसारखा घट्ट
मोकिमी, अगं बिंदीसारखा घट्ट चिपकतो तो. शिवाय दिवसरात्र नाही लावायचा काही. थोडा वेळ फंक्शन पार्टीमधे काही तरी फंकी स्टाइल. अगदी छोटंसं असतं आणि कानात कितीतरी बाहेर असतं ना.
कानाच्या पाळीत अगदी वर घालतात ते गदेसारखं काही सोन्याचं असतं ते, त्याला काय म्हणतात? ते मॉडर्न आउटफिट्सवर चांगलं नाही दिसत, पण अशी डॉटसारखी बिंदी चिपकवली तर ट्रॅडिशनल आणि मॉडर्न दोन्ही कडे चालुन जाते.
कोणाला चांगले,भरवशाचे ऑनलाईन
कोणाला चांगले,भरवशाचे ऑनलाईन साडयांचे स्टोर माहित आहे का? जिथुन साडयांची ऑनलाईन खरेदी करुन भारतात गिफ्ट (होमडिलिव्हरी) करता येतील. मला माझ्या आईला व साबांना सरप्राईज साडी गिफ्ट दयायची आहे. गुगल करताना काही ऑनलाईन शॉप दिसले पण आधी कधी अशी साडयांची खरेदी केली नाही त्यामुळे जर साडीत डिफेक्ट वगैरे निघाला तर गोंधळ नको.
http://www.aishwaryadesignstudio.com/sarees/4251-pink-tussar-silk-saree-...
कानाच्या पाळीत अगदी वर घालतात
कानाच्या पाळीत अगदी वर घालतात ते गदेसारखं काही सोन्याचं असतं ते, त्याला काय म्हणतात? >> मने टने त्याला बुगडी म्हणतात.
ही बघ ही अशी दिसते तीच ना?
ही बघ ही अशी दिसते तीच ना?
कान टोचायचे नसतील तर प्रेस
कान टोचायचे नसतील तर प्रेस करुन लावता येइल अशी बुगडी मिळते.. मोती, पोवळं टाइप मधे..
दक्ष, हीच गदा ती. चिमु,
दक्ष, हीच गदा ती.
चिमु, परवा टाइम्स मधे पाहिले का फोटोज. बाहेर देशात लेटेस्ट फॅशन आहे ती. पण फक्त बुगडी नाही. ३-४ कानातल्यांचा एक सेटच फिक्स करता येतो. तो मागुन एकमेकाला जोडलेला होता आणि फारच क्लास दिसत होता. टीनएजर्स ना छान आहे.
कुर्डू म्हणून एक पारंपारीक
कुर्डू म्हणून एक पारंपारीक अलंकार आहे. कानात घालायचा. गालाकडून कानाकडे जाताना कान सुरू होतो तेव्हा कानाचा कार्टिलेज असलेला त्रिकोणी भाग असतो ना तिथे टोचलं जातं. चमकीसारखाच असतो. पुढे फूल आणि मागे वळवलेली तार.
ते तिथे जे टोचून घेऊ शकतात ते धन्य आहेत. माझी हिंमत नाही झाली कधी.
गदा
गदा
हो ना .... म्हटलं गदा तर काही
हो ना .... म्हटलं गदा तर काही मुलं गळ्यात घालतात..
नी+१ , असे म्हणतात की तो एकच
नी+१ , असे म्हणतात की तो एकच दागिना मेल्यावरही आपल्या बरोबर जातो.. बाकीचं काढुन ठेवतात. कुर्डु नाही काढत.
हे कुर्डु पहायची आता उत्सुकता
हे कुर्डु पहायची आता उत्सुकता आहे.
चला आता मीही बोलते
चला आता मीही बोलते फॅशनवर!
लेकाच्या लग्नात आम्ही बर्याच जणी नऊवारीसाडी नेसलो होतो. तर तर हेअर स्टाइल करायला आलेल्या ब्यूटिशियनने मला कानात(की कानावर) बुगडी घालायला लावली होती!
ममा, लिंक दे..
ममा, लिंक दे..
स्वाती. वेळ मिळेल तेव्हा
स्वाती. वेळ मिळेल तेव्हा स्कॅन करून टाकेन.
चिमु, तो माझा प्रांत नाही.
चिमु, तो माझा प्रांत नाही. मी माबो आणि फेबु सोडता नेटवर फारसं काही वाचत नाही. मी आपल्या कागदावर छापलेल्या पुणे टाइम्समधे पाहिलं.
घरी गेल्यावर तारीख सांगु शकते.
कुल मॉम, तु मस्तच दिसली
कुल मॉम, तु मस्तच दिसली असशील. ती बुगडी प्रेसवाली होती ना.
पान नं ५ वर दक्षीने जो फोटो
पान नं ५ वर दक्षीने जो फोटो टाकलाय कान टोचलेला, त्याच जागी चमकी टाइप ऐवजी सोन्याची साखळी अन ती साखळी मागे वेलासारखी केसात अडकवलेली पाहिली आहे..
स्वाती कुर्डु बघ बहुतेक हेच,
स्वाती कुर्डु बघ बहुतेक हेच, नी कन्फर्म करेल.
चिमुरे तसं काश्मिरी मुली
चिमुरे तसं काश्मिरी मुली टोचतात. लग्नानंतर त्या साखळ्या त्यांना कंपल्सरी घालाव्या लागतात.
नाही हे नाही. अगं आपली
नाही हे नाही. अगं आपली नाकातली चमकी कशी असते... पुढे फूल आणि मागे तार तसंच असतं कुर्डू.
दागिना म्हणून फार वेगळं नाहीये पण पोझिशन वेगळी आहे.
दिपाली, कुर्डूबद्दलचा हा संदर्भ माहित नव्हता मला. सांगितल्याबद्दल धन्यवाद.
अगं ते केसात अडकवणं असतं पण
अगं ते केसात अडकवणं असतं पण टोचलेलं नॉर्मल ठिकाणीच असतं काश्मिरी मुलींचं.
WZCC ने गोव्यात नाट्यमहोत्सव आयोजित केला होता तिथे आलेल्या काश्मिरी मुलींची साखळीवाली कानातली होती पण नॉर्मल ठिकाणीच टोचलेली.
पण कुर्डुची जागा बरोबर आहे
पण कुर्डुची जागा बरोबर आहे ना?
हा माझाच कान आहे. पण ही
हा माझाच कान आहे. पण ही कुर्डु नाही.
http://img134.imageshack.us/i
http://img134.imageshack.us/img134/4404/dejharoodesign.jpg
हे काश्मिरी कानातलं देझारू म्हणतात बहुतेक याला.
दिपडे याला पॅरलल पिअर्सिंग
दिपडे याला पॅरलल पिअर्सिंग म्हणतात बहुतेक. माझंही असं टोचलेलं आहे पण मी नाही घालत काही.
ही कुर्डूची पोझिशन
ही कुर्डूची पोझिशन
दक्षिणाने दिलेल्या
दक्षिणाने दिलेल्या लिंकमधल्यासारखंच म्हणत होते मी.. अन जिच्या कानात पाहिलेलं ती काश्मिरीच होती..
होय का मग मला भेटलेल्या
होय का मग मला भेटलेल्या थोड्या कमी तीव्रतेच्या काश्मिरी असतील
Pages