फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा सगळ्या फॅशनी - स्वतः करण्यासाठी - आवड निर्माण होणारी एखादी लस मिळते का ?? <<
ओये रुणू हे विचारतीयेस म्हणजे फॅशन बग इज अ‍ॅक्टिव्हेटिंग Wink

बाकी तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल, व्यवसायाच्या दृष्टीने योग्य रहात असाल, आरश्यात बघितल्यावर स्वतःला छान वाटत असेल. तर इनफ फॅशन बग आहे तुमच्यात Happy

ओये रुणू हे विचारतीयेस म्हणजे फॅशन बग इज अ‍ॅक्टिव्हेटिंग >>
हो हो, आजकाल जरा लोंबते इयरिंग्ज वगैरे पण घालायला लागलेय. नाहीतर आधी कित्येक वर्षे कानाला चिकटून बसणार्‍या रिंग्ज झिंदाबाद Happy
चप्पल्स, पर्सेस ह्याबाबत मात्र फॅशनपेक्षा सोय बघितली गेल्याने हमखास मी दरवेळी ठराविकच डिझाइन्स उचलून आणते.

फाइव्ह फिंगर शूज कोणी घेतलेत / वापरलेत का? कसा अनुभव आहे? मला ते मोजा + शूज कॉम्बो जरा डाइसी वाटते. पण वीकेन्ड कॅज्युअल्स साठी चांगले वाटतात - इति मेव्हणा. त्याला विचारले, कुणी गर्दीत पायावर पाय दिला तर....? तर म्हणे, आपण चटकन आपला पाय काढून घ्यायचा!! Uhoh Proud

हे ते फाइव्ह फिंगर शूज

@ मी गौरी ह्या नंबर वर फोन करुन बघा ?

Sabi, ground floor, Neptune Building, Pali Hill, Bandra (W), call 31924744

Papia Roy (ex-Barefoot) started Sabi, her own fashion store for women

जाम वियर्ड वाटतात ते. इथे मिळतात का?
फ्लेममधे एक लंडनचा अ‍ॅक्टर आला होता वर्कशॉप घेण्यासाठी त्याचे पाह्यले होते.

नीधप, मेव्हण्याने बांद्र्याला घेतले. त्याचे म्हणणे की इथे (भारतात) ते फक्त मुंबईत व तेही बांद्र्याला मिळतात! Wink
त्याच्या पायांना ते बरे दिसत होते - ग्रे-ब्लू कलर कॉम्बो, बर्म्युडा व टीशर्ट अशा पेहरावावर. त्याचे म्हणणे आहे की लेडीज डिझाईन पण मिळतात.

झंपी, आता इथे भारतात मार्च सुरु झाला की त्याला विचारेन, वापरतोस का फाइव्ह फिंगर शूज अजून म्हणून! Wink

मी पाह्यलेत ग्रे-शेवाळी कॉम्बो मधे. कॉम्फी असणार. मला बाप्यांच्या सेक्शनमधलेच घ्यावे लागतील त्यामुळे कायमच बर्म्युडा घालून फिरावं लागेल... Wink

बीचवेअरला बरे वाटतील, पण मुंबईच्या गर्दीत पाय वाचवत असे शूज घालून चालायच्या कल्पनेनेच मला कसेसे होते! Proud

फाय फिंगर शूज<<
जाम वियर्ड वाटतात ते. >>> अगदीच. मला पण अजिबात आवडलेले नाहीत.

या न-आवडीवरुन आठवलं. फॅशनमधल्या आपल्याला न आवडणार्‍या गोष्टी सांगुयात का? या फार पर्सनल असतील, कारण एकाची आवड दुसरीची नावड असु शकते. पण तरीही सहजच.
मला पर्सनली न आवडणार्‍या गोष्टी) -

>चुडी/चुणीदारवर किंवा लेगिंग्जवर प्लॅटफॉर्म हिल्स घालणे. त्यावर स्टिलेटोज, किटन हिल्स, किंवा उंच असाल तर फ्लॅटस चांगल्या दिसतात.
>बेबी पिंक, पिस्ता, पांढरा किंवा तत्सम पेस्टल शेडसवर काळं फुटवेअर घालणं
>वेस्टर्न फॉर्मल वर बिंदी लावणं ( आमच्याकडची एक जण तर त्याखाली हळदीचा ठिपका पण लावते. कदाचित रोज पुजा करत असावी.)
>गोल्डन नेकपीस ( किंवा मंगळसुत्रावर- जे शक्यतो सोन्याचं असतं) सिल्वर कानातलं किंवा उलट.
>साडीवर क्लोज्ड शुज घालणं.
>ऑफिसमधे ग्लॉसी लिपकलर्स लावणं. अगदी किसेबल लिप्स दिसतील असे चकचक कलर्स.
>इन अ‍ॅप्रोप्रिएट ड्रेसिंग - एक-दोन उदाहरण - सिनेमाला, बागेत जाताना जरीसाडी. किंवा दिवाळीमधे मुलींनी एथनिक वेअर ऐवजी मॉडर्न आउटफिट्स घालुन दिवाळी पार्टीला जाणं.

हे सगळं उगीचच. धागा वर आणण्यासाठी. Wink

अनु,

माझ्या आई कडे नथी चा सेट होता.. तिने कोल्हापुरातुन मागवला होता १० वर्ष तरी आधी..
कानातल्या नथी आणी गळ्यात एक आडवी. खालील प्रमाणे दिसायची..
मला त्याचं खूप अप्रुप होतं,
तो सेट अजुन आहे की नाही विचारुन फोटो टाकेन..

लेफ्ट कान ६
राईट कान ३
गळा
\ /
\ /
w

hi
mala plz sanga na mumbai la changali aani swast cotton che kurte kuthe bhetali?

इथे सिंगापुरात खुप यंग मुल स्पेशली मुलगे ते फाईव्ह फिंगर शूज घालतात बहुतेकदा कॅज्युअल्सवर.... बघताना थोडा हटके प्रकार वाटतो.

मी पाहिले ते शूज अगदी विचित्र दिसताहेत. फंक्षनल अस्तील पण फॅशनेबल नक्की नाहीयेत.
आपण क्लासिक स्टायलिन्ग आणि गुड लुक्स वर शूज घेतो.

फॅशनची चर्चा चाललीचये तर लागलीच ईथेच विचारते. उद्या नवरयाच्या ऑफिसमध्ये अ‍ॅन्युअल पार्टी आहे . मी ही माझ्या ऑफिसमधुन हाफ डेने जाणार आहे. काय घालु? काय करावे?

दिपाली, ऑफिसमधलं क्राऊड कश्याप्रकारचं आहे त्यावरच ठरव Happy साऊथ इंडियन्सचा भरणा असेल तर सिल्क साडी शोभेल. कॉस्मोपॉलिटन असेल तर सलवार कमिज, स्कर्ट्स, पँट्स असं काहीही चालेल. अगदी वेस्टर्न कल्चर फॉलो करणारं असेल तर प्युअरली वेस्टर्न आउटफिट्सच.

अश्विनी के, आयटी कंपनी आहे सो क्राऊड कॉस्मोपॉलिटन असेल. अगदी ढिंच्यांक काही करुन जायचे नाहीये मलाही. त्यातल्या त्यात बरी दिसु शकेन असे काही तरी हवीये. अनारकली नाहीये माझ्याकडे. Sad जीन्स आहे तो सगळ्यात लास्टचा ऑप्शन ठेवलाय. साडी मध्ये प्लेन आणी काठात आणी पदरावर जरदोशी वर्क असणारी कशी दिसेल?

दोर्याने विणलेल्या जाकिटाला घरी डाय करता येईल का? कसा ?
नसल्यास पुण्यात कुठे करुन मिळेल?
मूळ रंग केशरी आहे. व त्याला काळा रंग द्यायचा आहे.
हा प्रश्न कुठे विचारावा ते कळले नाही म्हणून इथेच विचारते.

शमा, दोरा कॉटन आहे का? तर घरी करता येईल पण डाय करायची सवय आहे का? नसल्यास राहू दे.
पायोनियर वाले डाय करून देतात.

हो नीधप दोरा कॉटन आहे. डाय पहिल्यांदाच करणार आहे. सवय नाही.
पायोनियर वाले कुठे असतात? कृपया पत्ता सांगाल का?
आणि इतक्या पट्कन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

पहिल्यांदाच करणार... तर चुकू शकते, परत करायला लागू शकते असे सगळे लक्षात ठेवून करा.
डाय उकळण्यासाठीचे पातेले वेगळे ठेवा. ते चुकूनही खाण्याच्या वस्तूंसाठी वापरू नका.
किचनमधेच डाय उकळणार असाल असे गृहित धरते आहे. किचनमधे काहीही उघडे ठेवू नका. सगळे आतमधे, झाकणबंद स्वरूपात असूदेत. पंखा बंद ठेवा.
डायचे काम झाल्यावर संपूर्ण किचनची कॅबिनेटस आणि बाहेर असलेले डबेडुबे किंवा जे काही असेल त्यावरून ओले फडके फिरवून घ्या. डायची पावडर फार बारीक असते आणि धुळीसारखी उडून बसू शकते कुठे कुठे. ती अन्नात गेलेली चांगली नाही.

किंवा मग सरळ पायोनियर.
सदाशिव पेठेत. भिकारदास मारूती बसस्टॉपच्या बाजूला, स्काऊटग्राऊंड लगत पूर्वीची दातेवाडी होती आता तिथे मोठी बिल्डींग झालीये. तिथेच आहे पायोनियर लॉण्ड्री

बापरे!!! केवढा तो डायचा पसारा!!!!!

पुण्यात इतर कुठेही असु शकतो ना डाय वाला ? ( ठाण्याला माझ्या बिल्डिंग मधला लॉण्ड्री वाला सुध्धा करुन देतो !!!)... नाहीतर जॅकेटच्या किमती पेक्षा रिक्षा/ पेट्रोल जास्तिचं होइल....( हे आपलं उगाचच हां.... मत दिल्या शिवाय रहावत नाही म्हणुन...)

हो असतात की. होलसेल डायिंगवाले पण असतात.
एखादाच कपडा डाय करून देणारे पायोनियर हे सगळ्यात जुने आहेत.
मला माहीत नाही शमा कुठे रहातात ते. पण सदाशिव पेठ ही शक्यतो मध्यवर्ती समजली जाते.

धन्यवाद नीधप.
इतकं मोठं प्रकरण असेल डायचं हे माहित नव्हतं.
पायोनीयर च गाठते.
मोहन की मीरा , जवळचा लॉण्ड्री वाला नाही म्हणाला, म्हणून इथे विचारलं.

मोठं प्रकरण म्हणलं तर आहे म्हणलं तर नाही.
मला हे प्रयोग करायला आवडतं. मी करत असते. कामाचा भागही आहे. पण जेव्हा ३०-४० मीटर्स किंवा जास्त रंगवून घ्यायचे असतात तेव्हा बाहेरच. त्यांचे डाय पण वेगळे असतात.
घरात वापरू ते डाय सुद्धा घातक रसायनांपासून बनवलेले असतात आणि फ्लॅटसमधे डाय उकळायचा तर किचनशिवाय जागा नसते त्यामुळे सेफ्टी महत्वाचीच.

Pages