फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंकु तुला एक फर्मास उपाय सांगू?
www.starcj.com वर जा, तिथेही चांगली ज्वेलरी ते लोक विकतात. मी ज्वेलरी नाही घेतलेली, पण गृहोपयोगी वस्तू घेतल्यात. डिलिव्हरी आणि वस्तूंची क्वालिटी उत्तम असते. त्यांचं एक्स्क्लूझिव्ह चॅनल आहे टाटा स्कायवर. पाहून घे एकदा. खूप फ्री गिफ्ट्स पण असतात.

साईटवर फार कल्पना येत नाही, पण टिव्हिवर त्यांची सेशन्स असतात. साड्या ड्रेस मटेरियल्स, किचन, इलेक्ट्रॉनिक.. बरेच आयटम्स असतात.
तेव्हा त्या वस्तू जवळून दाखवतात, कशा वापरायच्या ते ही सांगतात. तेव्हाच्या तेव्हा ऑर्डर केली तर टिव्हित दाखवलेल्या फ्रि गिफ्टा मिळतात.

दक्षे, त्या टीवी आणी मासिकातल्या साड्या आणि ड्रेसेस ना त्या स्लीम एन ब्युटिफुल मॉडेल्समुळे छान दिसतात. प्रत्यक्षात फार भ्रमनिरास होतो. Happy तुम्ही वाट्टेल ते घातलेलं सुट होतं जर फिगर चांगली असेल. शक्यतो प्रत्यक्ष कलर बघुन, फॅब्रिकला स्पर्श करुन कपडे घेणं शहाणपणाचं.

बाय द वे, तुला नोज रिंग साठी कॉम्प्लीमेंट द्यायची होती. तुला खुप छान दिसते. ( फॅशनच्या धाग्यावर हे सांगणं म्हणजे म्हणजे अजुन ४ जणांना नोज रिंग घालण्याची हिंमत देणं आहे. Happy बरेच जण कॉन्शस होतात. )

अंकु तुला ट्रॅडिशनल डिझाईन्स म्हणायचंय का?

मने Blush
नोज रिंगने पहिली २ वर्ष भयंकर त्रास दिलेला आहे मला, बट इट्स वर्थ इट.. आता स्वत:ला काढ घाल करता येते. मी पारंपारिक पद्धतीने सोन्याने टोचलं होतं म्हणून मला त्रास झाला असं बर्‍याच जणींचं मत पडलं. त्यापेक्षा गन शॉट इज बेस्ट म्हणे. खखोदेजा Uhoh

मने अगं ड्रेसेस नाहीच घ्यायचे. दागिन्यांसाठी कशाला हविये स्लिम अ‍ॅन्ड ट्रिम ब्यूटी? Wink

३ प्रकारचे शॉपर असतात
१.ट्रॅडिशनल>>>>>>>>> जे स्व्तः मार्केट मधे जातात... १०० वस्तु पाहुन एक पंसद करतात... मग विक्रेत्यात बरच डोक खातात मालाच्या किमती आनि गॅरंटी साठी आनि मग च विकत घेतात
२ सायबर >>>>>>>>> जे वस्तु फक्त नेटावर पाहतात.. आवडली की लगेच ऑर्डर करुन टाकतात.. पेमेंट पण ऑनलाईन.. काहीही खराबी वाटली की भांडण पण ऑनलाईन्च Happy
३ हायब्रीड >>>> जे वरच्या दोघांच कॉम्बो असत Happy ते मे बी.. वस्तु नेट वर पाहतात... आनि स्व्तः जाउन खरेदी करतात किंवा कधी ऑन्लाईन तर कधी मार्केट मधे जाउन Happy

बरं ह्या माझ्या डेफिशिन्स नाहीत.. मार्केटिंग मॅन... च्या आहेत Happy

ओके. हे असे प्रकार कधी ऐकले नाहीत.

न्यूयॉर्क किंवा कुठलीही कॉश्च्युम शॉप्स आपले स्वतःचे शॉपर्स बाळगतात. तेच डोक्यात होतं माझ्या.

ते 'फिश्/बटरफ्लाय' टाइप च्या कुर्तीज आल्या आहेत हल्ली. कोणी घेतल्या आहेत का?
कशा दिसतात.. दोन्ही बाजुने लोंबकळणार्‍या..

दोन्ही बाजुने लोंबकळणार्‍या <<<
यानंतर त्या चांगल्या दिसतील कुणावरही यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? Wink

खरं आहे नी. Happy
पण मलाही अजिबात नाही आवडल्या. अगदी पावलापर्यंत त्याची टोकं आलेली असतात बरेचदा!

दोन्ही बाजुने लोंबकळणार्‍या <<<
यानंतर त्या चांगल्या दिसतील कुणावरही यावर कोणीतरी विश्वास ठेवेल का? >>>>>>>> Lol

अरे वा चर्चा जोर्रात चालु आहे...

माझ्या पुरतं सांगायचं तर मी मस्त स्कीन कलरच्या फुटवेअर बहुतेकदा वापरते. नाही तर बेज कलरच्या... पाय मोठे नाहीत पण जरा गुबगुबीत आहेत. एक मात्र आहे की बर्‍याचदा मी पेडिक्युअर करते ( माझ्या पायाची स्कीन खुपच कोरडी आहे त्या मुळे महिन्याला पेडि करुन ती बरीच मेंटेंन रहाते), त्या मुळे पाय नीगा राखलेले वाटतात... थंडीत तर पेडि करायलाच लागते.

रेडिमेड एकतर वेस्ट साईड नाहीतर बिबा. बाकी शिवुन घेताना माझी एक डिझायनर शेजारीण आहे. ती प्रोफेशनल आहे आणि बर्‍याच शोंचे ड्रेसेस तिच्या कडे शिवायला असतात. तिच माझ्या फॅशन ची काळजी घेते. माझ्या आकारमानाला सुट होतील अश्या फॅशन ती नेहेमी करते. मी शक्यतो लेगिंग्ज घालत नाही. जिन्स व ट्राउजर्स मात्र खुप घालते. शक्यतो मोत्या, खड्यांचे, हिर्‍याचे (व्ही.व्ही.एस) चे एलिगंट दागिने ऑफिस मधे वापरते. कारण बर्‍याचदा मीटींग्ज ना ते बरं दिसतं. कधी कधी टसर च्या साड्या नेसते. ऑफिस मधे कटाक्षाने ब्लाउजचे गळे मागुन जास्त खोल नसलेलेच घालते. हातात शक्यतो एखादीच बांगडी किंवा कडं.

भडक रंग जवळ जवळ नाहीतच... पण काही काही रंग जसा गर्द हिरवा, गर्द जांभळा, मला मना पासून आवडतात. पिवळा रंग बघायला खुप आवडतो पण घालायला जरा ऑड वाटतो... त्या मुळे माझ्या वॉर्डरोब मधे पिवळा, जवळ जवळ नाहीच्चे....

मोकीमी तु पुण्यात की माँबई?
आंबा कलर तुला आवडत नाही? एकदा घालून बघ, छान फ्रेश दिसतो.

ते 'फिश्/बटरफ्लाय' टाइप च्या कुर्तीज आल्या आहेत हल्ली.>>>

हॉरीबल दिसतात.... अगदीच काही तरी... शेपलेस वाटतात

माधवी, ही फॅशन मी पहिल्यांदा माझी कामवाली पोरगी घालुन आली तेव्हा पाहिली त्यामुळे मी तर कधीच घालणार नाही. Happy पण माझ्या बिल्डींगमधे एक मॉडेल फिगर आणि हाइटची मुस्लीम शेजारीण आहे तीही घालते. तिला ती एवढी छान दिसते.

दक्ष, गनशॉट पण भयानक असतात गं. माझा कान बघ. इतका कुरुप आहे. Renowned दुकानातुन तीन गनशॉटस घेतले ते तीनही फेल गेले. कानाला मागे टुंगु आले होते. ते कमी झाले पण कान जरा विचित्रच दिसतो, त्यामुळे मी आता केस कधीच बांधु शकत नाही. ऑपरेशन करुन ठीक करण्याएवढापण वाईट नाही, म्हणुन मला ते आवश्यक वाटलं नाही. Sad माझ्या मैत्रिणीने एकाच कानाला नेहमीचं पिअरसिंग धरुन ९ शॉट्स घेतेले आहेत. सगळ्यात छोटुश्या रिंग्ज आहेत. एवढं छान दिसतं.

मी मुंबै वाली....

आंबा कलर तुला आवडत नाही>>> अगं आवडतो खुप आवडतो पण बघायला... घेताना हात धजावतच नाही. मागे एक होता त्या रंगात. माझ्या टेलर ने जबर्दस्ती गळ्यात मारलेला... पण तो मी फार सा वापरुच शकले नाही...

आता परत घेवुन बघेन.... सलवार ओढणी अंबा कलर ची घेवुन मधे वेग्ळं काँबो करेन....

मने गनशॉटने चिडत नाही ना कान? Uhoh पारंपारिक ने चिडतो.. मला ही टोंब्या आला होता नाकाला, पण मी चिकाटीने घरात असलेली सर्व मलमं लावली... त्याला नक्की कोणत्या मलमाने बरा झाला ते ठावूक नाही. धीरज रखना पडताय.. थोडा.

मोकीमी काळा लाँग टॉप, त्यावर मँगो एम्ब्रॉयडरी आणि चुडीदार मँगो असं शिवून घेतलंस तर अंगावरही येणार नाही बहुतेक.

पारंपारीक ने चिडतो?
नाय बा. तीन वेळा नाक (एकदा बुजले, एकदा चुकीच्या ठिकाणी टोचले म्हणून बुजू दिले) आणि तीन ठिकाणी कान सगळं पारंपारीक. चिल्डे बिल्डे नथ्थी.
समईतलं तेल लावायचं आणि चमकी फिरवायची थोडी थोडी की झाले.
टोचणार्‍याचा हात कसा आहे, सोन्याचीच तार आहे ना टोचायला यावर अवलंबून.
बारीक तारेच्या चमकीनेच टोचले जावे. किंवा सुंकल्याची तार पण बारीक तार.

एक्सेप्शन आहेस मग तू नक्कीच.. कारण पारंपारिक ने चिडतो अवयव कान लहानपणी टोचलेत त्यामुळे त्याचं माहित नाही पण मी एकदा कान आणि नाक दोन्ही पारंपारिक पद्धतीनेच टोचलंय दोन्ही वेळा फिरवून बिरवूनही टोंबे..:अओ:

मी नाही एक्सेप्शन. ओळखीपाळखीच्यात बहुतेकांचे सोनाराने टोचलेले किंचित दुखणे, किंचित सूज बाकी व्यवस्थित आहेत. गनशॉटने संपूर्ण कान फुगणे बिगणे असलं झालेलं पाह्यलंय.

ती सोन्याची तार तापवून सरळ करतात, टोक करतात आणि आपल्याला कळायच्या आधी टोचून टाकतात. ते बरे. गनने जास्त मोठी जखम होते.

दक्ष नाही गं. मी पण नाक पीएनजीमधे तारेने टोचलं होतं. त्याला काहीही झालं नाही. हवं तेव्हा नोज रिंग घालु शकते. नको तेव्हा तसंच ठेवलं तरी बुजत नाही. पण गनशॉट्स मात्र महागात पडले मला.

नी, ब्राउन फॉर्मल ट्राउझर्सबरोबर कोणकोणते कलर्स जातील याचं फ्री कन्सल्टेशन मिळेल का? Happy फक्त पांढरं घालुन कंटाळा आला आहे.

टॉपच्या कलरशी मॅच कर ना. >> अगं तोच तर प्रॉब्लेम आहे ना. कोणत्या कलर्सचे टॉप्स सुट होतील ब्राउनबरोबर ते कळत नाहीए. मी वेगवेगळे घालुन बघते, पण पांढरा सोडता कोणताच कलर जात नाही. आणि शक्यतो काळा दिवसा घालायला आवडत नाही.

ब्राउन बरोबर पिंकच्या शेड्सचे प्लेन /लायनींगवाले शर्ट छान दिसतात. लेमन यलो किंवा यलोच्या दुसर्‍या काही शेड्स पण बर्‍या दिसतिल बहूतेक.

वेल, कॉफी ब्राउन !

अल्पना, थँक्स. पिंक ट्राय केला. जातो आहे असं वाटलं नाही. लेमन यलो बघते आता.

Pages