काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.
या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.
याबाबत आपण काय करु शकतो? सरकारनी काय करायला हवय. हा अवेअरनेस गरजेचा नाही का? आज रस्त्यावर चालायच म्हटल तरी जीव मुठीत धरुन चालाव लागत. रस्ता ओलांडायचा म्हणजे अरे बाप रे... वाटावं अशी परिस्थिती. मुलांना सायकल्/दुचाकी घेऊन रस्त्यावर जाऊ द्यायला भिती वाटावी अशी परिस्थिती. आपल्यापैकी कुणी प्रवासात असेल तर ती व्यक्ती सुखरुप घरी येईपर्यंत जीवात जीव येत नाही.
घरातून बाहेर पडताना, रस्त्यावरच्या या दहशतीचं काय करायच?
हे सगळं कुठे तरी नीट व्हायला हवं म्हणून ही चर्चा आवश्यक वाटते.
मला सुचलेले मुद्दे लिहिते आहे
आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे
आपल्या वाहनाची योग्य ती काळजी आपण घेतो का?
एक प्रमुख कारण म्हणजे टायर
एक प्रमुख कारण म्हणजे टायर मध्ये हवेचा योग्य दाब नसणं. त्यातही गैरसमज म्हणजे हवा जास्त भरली गेली तर फुटण्याचा धोका आहे. तसं नसून कमी भरलेली हवा टायर फुटण्यासाठी कारणीभूत असते >>
+१ लोकांना वाटतं की जोरात चालविल्यामुळे हवेचे प्रेशर निर्मान होऊन योग्य तो PSI आपोआप तयार होईल व चांगले अॅवरेज मिळेल. टायर प्रेशर योग्यच हवे. नेहमी चेक करणे टाळन्यासाठी चाकात एअर ऐवजी नायट्रोजन भरले तर नेहमी चेक करण्याऐवजी दोन पाच महिन्यांना केले तरी चालेल.
मला हायवेवर १२० +/- ने जाणार्या अल्टो, वॅगन आर, झेन, पोलो, आय टेन ह्या ड्रायवर बद्दल फार आदर वाटतो. त्या सर्वांनी खरे तर देशासाठी "बलिदान पथका" समाविष्ट झाले पाहिजे.
त्या बीम बाबत वर चर्चा वाचली. मला जोरात जायचे असेल (योग्य रितिने) आणि मी हाय बीम दाखवले तर तुम्ही साईड (योग्य ती सावधगीरी वगैरे बाळगून आणि तुम्ही अगदी ८० ने च जात असाल तरीही साईड देणे बंधनकारक (नियमानुसार) आहे, पण नेहमी हेच पाहिले की जर तुम्हाला जोरात जायचे असेल तर समोरच्याचा इगो दुखावतोच आणि तो तुम्हाला साईड देत नाही, मग तुम्ही थोडे पॅनिक होऊन दुसर्या लेन मधून ओव्हरटेक करणार (कारण पर्यायच नाही) त्यातदेखील अॅक्सिडेंट होऊ शकतो. त्यात चुकी खरे तर त्या न साईड देणार्याची आहे.
लोकांना वाटतं की जोरात
लोकांना वाटतं की जोरात चालविल्यामुळे हवेचे प्रेशर निर्मान होऊन योग्य तो PSI आपोआप तयार होईल व चांगले अॅवरेज मिळेल.>> अगदी अगदी.
दंडाच्या बाबतीत एकच म्हणावेसे
दंडाच्या बाबतीत एकच म्हणावेसे वाटते ते म्हणजे तो अफॉर्डेबल नसावा. दॅट्स ऑल.
नेहमी चेक करणे टाळन्यासाठी
नेहमी चेक करणे टाळन्यासाठी चाकात एअर ऐवजी नायट्रोजन भरले तर नेहमी चेक करण्याऐवजी दोन पाच महिन्यांना केले तरी चालेल.
काय चेक करायचे??
मीही नायट्रोजन भरलाय चाकात पण दर वेळेला गाडी पेट्रोल भरायला नेली की नायट्रोजन चेक करते. जसे आपण नॉर्मल हवा चेक करतो तसे. हे करायला नको का?
साधना, नायट्रोजन असेल तर दर
साधना, नायट्रोजन असेल तर दर वेळी चेक करायची अजिबात गरज नाही, तो सहज ३-४००० किमी पर्यंत चालतो. दर तीन महिन्याला वगैरे (किंवा तेवढे रनिंग झाल्यावर) चेक कर.
काय चेक करायचे?? >> गाडीचा बिपी अर्थात टायर प्रेशर.
ओके. मी दर वेळेला नायट्रोजन
ओके. मी दर वेळेला नायट्रोजन चेक करते... चेक करणा-याने पण कधी सांगितले नाही, रोज रोज करायची गरज नाही म्हणुन.
अलॉय व्हील्स असतील तर ३
अलॉय व्हील्स असतील तर ३ महिन्यांनी नायट्रोजन भरला तर चालू शकेल. शिवाय अलॉय व्हील्स १०% नी थंड राहतात कारण त्यात अल्युमिनियम असतं जे लवकर उष्णता वाहून नेतं. माझ्या गाडीला साधे स्टील रीम्स आहेत त्याला टायरवाला १.५ ते २ महिन्यांनी भरण्याचा सल्ला देतो. मुख्य म्हणजे बाहेरगावी जाताना आवर्जून चेक करावं. स्टेपनी चेक करण्याचा कंटाळा करू नये. विशेषतः वॉशिंग सेंटर ला लागून असलेल्या ठिकाणी हवा भरू नये, कारण त्या हवेत आर्द्रता असते आणि ती हवेपेक्षा लवकर प्रसरण पावते. गाडी रस्त्याच्या कडेला लावताना टायर फुटपाथ ला घासणार नाही याची काळजी घ्यावी, साईड नाजूक असते, तिथे कट गेला तरी अगदी नवे टायरही फुटू शकते. हवे बरोबर चेक करण्याची हीदेखील गोष्ट आहे.
नायट्रोजन आपण गाडीला साधे
नायट्रोजन आपण गाडीला साधे टायर-ट्युब असल्यास भरु शकतो का? की ट्युबलेस सारखे वेगळे टायर्स असतात? आणि दुचाकीला (स्कुटी) ला पण नाय्ट्रोजन भरता येइल का? स्कुटीला चालत असेल तर मग किती महिन्यांनी/किमी नंतर प्रेशर चेक करायला हवं? हवेऐवजी नाय्ट्रोजन भरला तर अॅव्हरेजवर फरक पडतो का? ट्युबलेस ला अॅव्हरेज कमी बसतं असं ऐकुन आहे..
सॉरी, खुपच प्रश्न आहेत, पण ज्ञानात भर केव्हा ना केव्हा टाकायलाच हवीय..
गाडीला हव्या त्याच प्रेशरने
गाडीला हव्या त्याच प्रेशरने हवा भरली असल्यास हवेचा आणि नायट्रोजनचा अॅव्हरेजशी फारसा संबंध नसतो. जर प्रेशर खूप कमी आणि खूप जास्त असल्यास चाक मात्र खराब होते आणि जास्त असेल तर राईड बम्पी होते.
तसेच ट्युब टायर वा ट्युबलेस टायर ह्या दोन्हीचा अॅव्हरेजशी संबंध नसतो. (गैरसमज आहेत)
ट्युबलेसचे फायदे जास्त असतात, पंक्चर झाले तरी हे चाक इत्सिप्त स्थळापर्यंत तुम्हाला पोचवू शकते. (त्यात प्कंचर फ्लुईड टाकले असल्यास)
स्कुटीचे टायर ट्युबलेस नसावे. (अर्थात मला नक्की माहिती नाही, पण स्कुटी अन तत्सम गाड्या ट्युबवाल्या आहे. ) ट्युबलेस आणि ट्युब टायर ह्या दोन्ही मध्ये नायट्रोजन भरता येते.
एक लक्षात घ्यावे की नायट्रोजन भरल्यावर फक्त दर आठवड्यात / महिन्यात प्रेशर चेक करायची गरज राहत नाही, बाकी दावे फोल आहेत. (नायट्रोजन मुळे अॅव्हरेज वाढते वगैरे)
नायट्रोजन हे स्पिड टायर्स मध्ये ( वेगात आणि अतिवेगात धावणार्या गाड्या) आवश्यकच आहे, नेहमीच्या वेगात धावणार्या गाड्यात नाही भरले तरी चालते. आणि नायट्रोजन दिलेल्या मर्यांदांपेक्षा एखाद PSI कमी भरले तरी चालते.
केदार, धन्स. माझ्याही
केदार, धन्स.
माझ्याही डोक्यातले बरेच गोंधळ दूर झाले नायट्रोजेन संबंधी.
धन्यवाद केदार. अतिशय उपयुक्त
धन्यवाद केदार. अतिशय उपयुक्त माहिती.
नायट्रोजन बद्दल चांगली
नायट्रोजन बद्दल चांगली माहिती.

दुचाकीत भरुन घेइन. आधी शोधावं लागेल कुठे भरायचं ते.
वर उल्लेख केलेल्या अपघातात
वर उल्लेख केलेल्या अपघातात ज्याला आपण गमावले असा गुणी कलाकार 'अक्षय पेंडसे' याचा लहान भाऊ 'तन्मय पेंडसे' हा "Movement Against Road Accidents" सुरु करतो आहे. ज्यांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्याला संपर्क करावा:
Tanmay Pendse
9604389735
naturecubs@gmail.com
Pages