रस्ते, अपघात आणि आपण

Submitted by श्यामली on 25 December, 2012 - 00:16

काल घडलेली अतिशय सुन्न करणारी घटना.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्याच्या दोन वर्शाच्या मुलाचं पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर झालेलं अपघाती निधन.

या आधीपण अशा कितीतरी मंडळींना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. हे फक्त एक्सप्रेस वे वर होतं आहे असं नाही, पुण्यात रोज एकतरी अशी बातमी असते. मुंबईत हिट & रन केस असतेच असते.

याबाबत आपण काय करु शकतो? सरकारनी काय करायला हवय. हा अवेअरनेस गरजेचा नाही का? आज रस्त्यावर चालायच म्हटल तरी जीव मुठीत धरुन चालाव लागत. रस्ता ओलांडायचा म्हणजे अरे बाप रे... वाटावं अशी परिस्थिती. मुलांना सायकल्/दुचाकी घेऊन रस्त्यावर जाऊ द्यायला भिती वाटावी अशी परिस्थिती. आपल्यापैकी कुणी प्रवासात असेल तर ती व्यक्ती सुखरुप घरी येईपर्यंत जीवात जीव येत नाही.
घरातून बाहेर पडताना, रस्त्यावरच्या या दहशतीचं काय करायच?

हे सगळं कुठे तरी नीट व्हायला हवं म्हणून ही चर्चा आवश्यक वाटते.

मला सुचलेले मुद्दे लिहिते आहे

आर टि ओ च ढिसाळ रस्ता नियोजन - व्यवस्थापन
लायसन्स देताना योग्य प्रशिक्षणाची आणि कडक निकषांची गरज आहे
आपल्या वाहनाची योग्य ती काळजी आपण घेतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाईची..... Happy

त्याच्याही पलीकडली अवस्था असते त्यांची. 'देर हो गयी' वाली

तुम्हाला नियमाने, शिस्तित गाडी चालवायची असेल तरी आजु-बाजुने जाणारे चालवू देणार नाहीत ह्याची खात्रा बाळगायची असते इथे. <<
फूटपाथ सोडून रस्त्यावरून चालायचे आणि गाडीने हॉर्न दिल्यावर बाजूला व्हायच्या ऐवजी 'कौन गुस्ताख हमे ललकार रहा है!' अश्या अ‍ॅटिट्यूडने मागे वळून बघायचं असं किती जण करतात चालताना?
पार्ल्यात हनुमान रोडवर हे रोज दिसतं Happy

इतर अनेक ठिकाणीही दिसत असेलच

'कौन गुस्ताख हमे ललकार रहा है!' अश्या अ‍ॅटिट्यूडने मागे वळून बघायचं
>> आणि गम्मत म्हणजे एक चालक असताना आपल्याला ह्याचा काय त्रास होतो हे माहित असुनही गाडीचालक खुद्द चालताना असेच वागतात...

नी.... एक्सप्रेसवर हा अनुभव अनेकदा येतो, आलाय. पण मी हटत नाही. जर मी ८० ने जात असीन तर मी लेनही बदलत नाही. Happy बाकी मागच्याने लाईट दाखवाय्ला अति केले की मी एकदाच टेल फॉग लाईट दाखवून त्याचा स्विकार केलेला आहे हे दाखवतो... Proud

हो ना.
मी बहुतेक गाडी चालवायला लागायच्या आधी हे करत असणार. मग गाडी चालवायला लागल्यावर इरिटेशन कळलं. मग एक दिवस चालताना मीच हे केलं आणि साक्षात्कार झाला.. Happy
तेव्हापासून चालताना जाणीवपूर्वक हे टाळण्याचा प्रयत्न करते.

फुटपाथवर चालायला जागा नसेल (फेरीवाले वगैरे तत्सम कारणे) म्हणुन कोणी खालून चालत असेल तर समजू शकतो. पण अश्याने सवयच लागून जाते आणि लोक चांगला फुटपाथ सोडून रस्त्याने चालत बसतात.. Sad

तुम्ही घाईची शी वाले चालक असाल तर <<< नी हे एकदम जबरी, रस्तावर घाईने जाणार्‍या लोकांबद्दल माझेही हेच मत

shodh.gov.in ह्या वेबसाईट वर अपघातात जखमी किवा मृत झालेल्याची तसेच हरवलेल्या सापडलेल्या व्यक्तिंची माहिती आपण पाहू शकतो. सध्या फक्त मुंबई रेल्वे कक्षेत येणारया अपघातांची तसेच हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तिंची नोंद ह्या साईट वर होत आहे. लवकरच संपूर्ण मुंबईची नोंद ह्या साईट वर सुरु होणार आहे.

@निधप.. मला सेफ्टी-फिचर असलेली गाडी चालवणारे हमखास निष्काळजी असतात असं म्हणायचं नव्हतं, पण तसा अर्थ निघत असेल तर चूक मान्य. मला लहान गाड्यांच्या तुलनेत सुरक्षित असलेल्या मध्यम आकाराच्या वाहनचालकांच्या मग्रुरी विषयी म्हणायचं होतं. माझ्या पाहण्यात बीएमडब्ल्यू किंवा तत्सम लक्झरी कार्स, महागड्या एसयूव्ही (ज्यात या सोयी खच्चून असतात), ती मंडळी कधीही वेगमर्यादा पाळताना दिसत नाहीत. आणि वेग ही गोष्ट अशी संसर्गजन्य आहे की जवळून भन्नाट गाडी जाताना पाहून निदान ५० टक्के हात-पाय फुरफुरतात. पुणे-कोल्हापूर रस्त्यावर तर १२० च्या खाली या गाड्या चालवणं अपमानास्पद वाटतं की काय कोण जाणे.

शेवटी काय, घोडं वाहतुकीचे नियम कडकपणे अमलात आणण्यापाशी पेंड खातं. गंभीर अपघात पाहून, त्याविषयी ऐकून/वाचून लोकं प्रबोधन मार्गे सुधारतील यावर आता माझा विश्वास बसत नाही.

बाय द वे, मागून घाई करणाऱ्या लोकांसंदर्भात वापरलेली उपमा अप्रस्तुत वाटली.

मला लहान गाड्यांच्या तुलनेत सुरक्षित असलेल्या मध्यम आकाराच्या वाहनचालकांच्या मग्रुरी विषयी म्हणायचं होतं. <<
मग्रुरी ही गाडीच्या आकारावर, सेफ्टी फिचर्सवर अवलंबून नसते.
उदाहरणार्थ मारूती ८०० चं जुनं मॉडेल वाट्टेल त्या स्पीडला बेदरकारपणे रापटवणारे अनेक दिसत असतात.

मागून घाई करणाऱ्या लोकांसंदर्भात वापरलेली उपमा अप्रस्तुत वाटली. <<
अनेकांना चपखल वाटते ती. मलाही. ज्याचा त्याचं मत.

भयानक वाटतय हे सगळं वाचून, अनुभवून. नॅनो ही हायवेला चालवायची कार आहे का हे फारसे माहित नाही पण नॅनो घाटात बंद पडलेल्या पाहिल्या आहेत आणि त्यावेळी लोकांची अवस्था केविलवाणी झालेलीही पाहिली आहे. मुंबई पुणे एयरपोर्ट ते घर अश्या सर्व्हिसेस देणारे ड्रायव्हर पुरेशी झोप न झालेले माझ्याच वाट्याला येतात की असेच असतात माहित नाही. पहाटे मुंबईतून बाहेर पडून हायवेला लागलं की झुंजुमुंजु होत असतं. गार वार्‍यात जवळ्जवळ सगळे ड्रायव्हर्स पेंगतात. मग आपणच त्यांच्याशी बोलत रहायचं, विचारपूस करायची की किती तास ताटकळताय म्हणून! त्यांची दया येते आणि आपल्या जिवाची काळजी वाटते. काहीजण ट्रकच्या इतक्या जवळून चालवतात की माझा आरडाओरडा सुरु होतो. मुंबई एयरपोर्ट ते पुणे यावर माझ्या अनुभवांचे तरी पुस्तक लिहू शकीन असे दरवेळी का भेटतात? दरवेळी ड्रायव्हरशी ठरलेला संवाद आहे की मी हळू चालवा, मला कुठेही पोहोचायची घाई नाही असे म्हणते तर ते सांगतात की ताई, हा भारत आहे, गाडी हाणली नाही तर घरी पोहोचणार नाही. वाद घालण्यासारखी परिस्थिती आणि वेळ नसते.

तुम्हाला नियमाने, शिस्तित गाडी चालवायची असेल तरी आजु-बाजुने जाणारे चालवू देणार नाहीत ह्याची खात्रा बाळगायची असते इथे >> असहमत. तुम्हाला जर नियम काय आहे हे अचूक माहिती असेल तर तुम्हाला नियमाने गाडी चालवण्यापासून कोणिही थांबवू शकत नाही (तुमच्या स्वतःशिवाय).

आपल्याकडं स्टेअरींगचं जजमेंट आणि गियर बदलायला आले की गाडी चालवता आली असं मानलं जातं (आणि लायसन्स पण त्याप्रमाणंच दिलं जातं). या मानसिकतेत सगळा लोचा आहे. गाडी चालवायचे मॅनर्स, सुरक्षितता पाळणे, इतर वाहनचालकांबद्दल,पादचार्‍यांबद्दल कर्टसी या गोष्टी लोकांच्या/पोलिसांच्या गावीपण नाहीत.

बाकी.. नी त्या उपमेशी सहमत Happy

सेफ्टी फीचर्स तर गाडी घेताना सगळ्यात पहिला बघितले पाहिजेत. सेफ्टी फीचर्सना जास्तीत जास्त १-२ लाख जास्त पडतील जी आपल्या आयुष्याच्या किमतीसमोर काहीच नाही. सेफ्टी फीचर्स असतील तर अपघाताची शक्यता कमी नाही होणार पण दुसर्‍याच्या चुकीनं झालेल्या अपघातात आपल्याला इजा व्हायची शक्यता नक्कीच कमी होते. कालच्या अपघातातल्या गाडीत काय सेफ्टी फीचर्स होते माहिती नाही पण एयर बॅग्स असते तर कदाचित एखादा जीव वाचलाही असता (इथं मला ब्लेम गेम खेळायचा नाहिये पण ही एक शक्यता आहे)

मग्रुरी ही गाडीच्या आकारावर, सेफ्टी फिचर्सवर अवलंबून नसते<<
तत्वतः नसते. पण भारतात तरी महागड्या गाड्या आणि काळा पैसावाले, जमीनमाफिया, राजकीय वरदहस्त असलेले गुंड इत्यादी यांचा जवळचा संबंध आहे. आणि यांच्या मग्रुरीबद्दल वेगळं लिहायची गरज नाही. विशेषतः या गाड्यांना जर १०००, ९९९९ असे आकडे असतील तर खासच. अशा एका गाडीला कितीही मागून हॉर्न दिला तरी त्यांना हवी तेंव्हा साईड न दिल्याबद्दल पुढच्या टोलनाक्यावर मरेपर्यंत मारहाण केल्याची बातमी वाचली होती. अशा गाड्या सुशिक्षित आणि समंजस माणसं वापरत नाहीत असं नाही, पण त्यांचं प्रमाण कमी आहे.

दुर्दैवाने आजकाल रस्त्यावर चूक कुणाची आणि सगळ्यांसाठी सुरक्षित कृती कुठली यापेक्षा बळी तो कान पिळी हा न्याय चालतो.

नॅनो ही हायवेला चालवायची कार आहे का हे फारसे माहित नाही पण नॅनो घाटात बंद पडलेल्या पाहिल्या आहेत आणि त्यावेळी लोकांची अवस्था केविलवाणी झालेलीही पाहिली आहे. => यावरुन एक आठवले.

आम्ही माथेरान वरुन परतत असताना घाटात एका वळणावर एक नवी कोरी मारुती ८०० थांबली होती. आत नवरा बायको आणि दोन लहान मुले होती.
नवरा गाडी चालवत होता आणि त्या विशिष्ट अशा चढाच्या वळणावर त्याला योग्य गियर न टाकता आल्यामुळे अडकुन पडले होते. आणि अती तिव्र चढ असल्यामुळॅ १ला गियर टाकुन नंतर ब्रेक सोडुन गाडी अक्सलेट करुन पुढे कशी न्यावी हे त्याला कळत नव्हते. त्यांची गाडी जिथे थांबली होती त्याच्यामागे फक्त एक गाडी उभी राहील एवढिच जागा व त्याच्यामागे खोल दरी होती आणि पुढे थोड्या अंतरावर लगेच शार्प चढणीचे वळण व खोल दरी होती.

माथेरानचा घाट नविन बनवन्याआधिची गोष्ट आहे. नंतर खुप दिवस मला त्यांच पुढे काय झाल ती कल्पना करुन भिती वाटत होती की अशा कठिण अती तिव्र घाटात मी अडकलो तर?

नॅनो ही हायवेला चालवायची कार आहे का हे फारसे माहित नाही पण नॅनो घाटात बंद पडलेल्या पाहिल्या आहेत => अजुन एक. जेव्हा नॅनॉ नवीन लाँच केली होती तेव्हा कुठल्यातरी न्युज चॅनलने मेकिंग ऑफ नॅनो दाखवले होते. टाटांचे स्वप्न वगैरे.
त्यात त्यांनी भारतीय रस्त्यांवर नॅनो चांगली चालावी म्हणुन वेगवेगळ्या टेस्टस केल्या होत्या. त्यात माउंट अबुच्या घाटात नॅनो चांगली चालली असे दाखवले होते.

तुम्हाला नियमाने, शिस्तित गाडी चालवायची असेल तरी आजु-बाजुने जाणारे चालवू देणार नाहीत ह्याची खात्रा बाळगायची असते इथे >> असहमत. तुम्हाला जर नियम काय आहे हे अचूक माहिती असेल तर तुम्हाला नियमाने गाडी चालवण्यापासून कोणिही थांबवू शकत नाही (तुमच्या स्वतःशिवाय).

>>> मित्रा.. तु लेनमध्ये गाडी चालवत असताना तुझ्या उजव्या / डाव्या बाजुने कोणी अर्ध्या फुटावरून घुसत असेल तर तु गाडी तशीच चालवत ठेवणार आहेस की लेन बदलणार आहेस?

पण भारतात तरी महागड्या गाड्या आणि काळा पैसावाले, जमीनमाफिया, राजकीय वरदहस्त असलेले गुंड इत्यादी यांचा जवळचा संबंध आहे. आणि यांच्या मग्रुरीबद्दल वेगळं लिहायची गरज नाही. <<<
बापरे गेट वेल सून....
परदेसाईंच्या ’लग्नाचा खर्च’ वाल्या बाफवर जी आंधळी जनरलायझेशन्स होती त्याची आठवण झाली.

आपल्याकडं स्टेअरींगचं जजमेंट आणि गियर बदलायला आले की गाडी चालवता आली असं मानलं जातं (आणि लायसन्स पण त्याप्रमाणंच दिलं जातं). या मानसिकतेत सगळा लोचा आहे. गाडी चालवायचे मॅनर्स, सुरक्षितता पाळणे, इतर वाहनचालकांबद्दल,पादचार्‍यांबद्दल कर्टसी या गोष्टी लोकांच्या/पोलिसांच्या गावीपण नाहीत. <<<
मनीष +१०००००

टोल नाक्यांवरच अल्कोहोल इन्टेक चेक करणारी यंत्रणा बसवली तर बराच उपयोग होईल असे वाटते. कित्येक ट्रक ड्रायव्हर रात्री लावल्याशिवाय स्टेरींगवर बसतच नाहीत. दुसरे म्हणजे - जसे की शाळेच्या परिसरात पान-तंबाखूची विक्री करता येत नाही तसे हाय-वेच्या/स्टेट हाय-वेच्या आजूबाजूला दारूच्या विक्रीबंदीचा कायदा करावा. मौज करणारे लोक त्यातूनही मॅनेज करतील. पण कायदा तरी करून ठेवावा लागेल. म्हणजे दारूस विरोध करणाऱ्या लोकांना त्याचे पाठबळ मिळते. आता 31 डिसेंबर समोरच आहे. तेव्हा बारमधून जे लोक बाहेर पडतात ते काय न पिलेला स्वतंत्र ड्रायव्हर बाळगतात काय? नाही. अशा लोकांनी गाडी चालवायला घेतली की बारसमोरच कार्यवाही व्हायला हवी.

सर्वात उजवीकडे असलेला (भारतातील) लेन हा फक्त ओव्हर टेकींग साठी असतो,म्हणजे त्या
लेन मध्ये गाडी दामटु नये, समोरच्या गाडीला ओव्हर टेक केल्यावर परत दुसर्या लेनमध्ये गाडी
घ्यावी हा सर्व साधारण नियम आहे. पण आपल्याकडे पोलिसांनाच ह्या नियमाची माहीती नाही
तिथे सर्व साधारण चालकाची काय अवस्था ?
मला हे नियम आंतरराष्ट्रीय रस्त्यावर गेल्यामुळे चालवल्या मूळे कळलेत.
रहदारीचे नियम सर्वत्र अतिशय कडक असतात, रस्त्यात जागोजागी स्पीड कॅमेरे लावलेले असतात.
ईथले रस्ते निर्धारीत गती साठीच बनवलेले असतात. येणारी व जाणारी लेन वेगवेगळी असून
त्यामध्ये किमान अंतर असून त्यामध्ये काँक्रिट भिंत असते.
गाडी चालकाला चालवण्याचा परवाना मिळायला बर्याच वेळा तिन ते चार वेळ परीक्षा
द्यावी लागते.
गाडीची नोंदणी + चाचणी + विमा दरवर्षी करावी लागते,

चांगला धागा आहे.

इथे ठाणा मुंबईत ई. एक्प्रेसवे वर नेहेमी एक प्रॉब्लेम येतो. तो म्हणजे शेवटच्या लेन मधे बस आणि ट्रक असतात ते हमखास ओव्हरब्रिज चालु व्हायच्या आधी आणि संपल्यावर अचानकपणे थांबतात. त्यातुन लोकांची चढ उतार होते. आणि पटकन ते ट्रक दुसर्‍या लेन मधे घुसतात. म्हणजे आपण शेवटच्या लेन मधे त्यांच्या मागे असलो तरी प्रॉब्लेम, दुसर्‍या लेन मधे असलो तरी प्रॉब्लेम.
जर आपण ब्रीजच्या खालुन जात असु तर या बसमधुन उतरलेले लोक अचानक रस्ता क्रॉस करताना सामोरे येतात Sad

माझ्या परिचयातले एक गृहस्थ जे CAG मध्ये वरिष्ट अधिकरि होते. त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाचे ४ चाकी लायसंस आर.टी.ओ च्या पहाणी दरम्यान करून घेतले. संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहे. लायसंस झाल्यावर हे सगळे गाडी शिकले. असे असल्यावर का नाही होणार अपघात. सर्व घटना पहिल्यातर मुळात शिक्षा होएईल ह्याची भीतीच नाहीये. उलट शिक्षा होणार नाही ह्याची खात्री आहे. परवाच्या दिल्लीच्या घटने मध्ये पण हेही एक कारण आहे. मुळातच नियम पाळणे आपल्याला शिकवलेच जात नाही. आणि दुसरे म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे येत जाता नियम पायदळी तुडवत असतात. मग हे असेच होणार आणि होत राहणार. ३ वेळा मुंबई हून पुण्याला येताना ड्रायव्हारशी भरपूर भांडून गाडी हळू चालवायला लावली पण त्याचा माज असा की तू कोण मला सांगणार. अवघड आहे. जगलो वाचलो तर आपले नशीब असे समजायचे.

लेन बदलताना ओवर द शोल्डर म्हणजे आपल्या गाडीच्या मागल्या खिडकीतून बाजूच्या लेन मध्ये कुणी नाही न हे बघणे पण आवश्यक आहे. आपल्याकडे ही सवय चालकांना/आपल्याला नसते.
लेन बदलताना आपल्या गाडीच्या blind spots ला कुणी नाही ना हे जरूर बघावे.
रात्रीचा प्रवास होता होई तो टाळावा किंवा सार्वजनिक वाहनाने प्रवास करावा.
आणि express way वर (छोटी गाडी असल्यास) शक्यतो लेफ्ट लेन नेच drive करावे.लेफ्ट लेन ला डावीकडे बर्यापैकी शोल्डर स्पेस असते त्यामुळे गाडी पटकन कडेला घेता येऊ शकते.

मला जाणवणाऱ्या आणखी काही गोष्टी.

१. आजकाल बऱ्याच गाड्यांच्या एन्ट्री-लेवल मॉडेल्सना चक्क डाव्या बाजूचा आरसाच नसतो. चालकही पदरचे पैसे खर्च करून तो बसवण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत.

२. ड्रायव्हर व्यतिरिक्त इतरांनी (मागे बसणारे तर हमखास नाही) सीट बेल्ट लावणे याची कित्येकांना गरजच वाटत नाही, आणि पोलीसही त्याची फिकीर करत नाहीत.

३. मला सापडतील तितक्या RTO, Police वगैरेंच्या वेबसाईट धुंडाळल्या पण सुरक्षित गाडी चालवण्यासंदर्भात उद्बोधक माहिती कुठेही आढळली नाही.

४. नियमांची अंमलबजावणी तर सोडाच पण दंडाची रक्कम ही जरब बसवणारी वाटली नाही. (शिवाय स्वस्तात सुटण्याचा भ्रष्ट मार्ग आहेच).

मला वाटतं, भरपूर प्रमाणात सुरक्षित ड्रायव्हिंग विषयीचं मटेरियल अतिशय कमी दरात सगळीकडे उपलब्ध झालं पाहिजे. निदान छोट्या वीडीओ क्लिप्स प्राईम टाइम च्या टीव्ही मालिका, चित्रपटगृहे, शाळा कॉलेज मधले महत्वाचे आणि इतरही सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी दाखवण्याचा आग्रह झाला पाहिजे.

नव्या मुंबईत हल्ली एक नविन ट्रेंड रुळायला लागलाय. मी मुंबईत फारसे ड्राईव केले नसल्याने तिथले माहित नाही.

रस्त्यावर मध्ये लेन डिवायडर असतानाही गाडी चालवणारे आपल्या सोईसाठी चुकीच्या लेनमधुन गाडी चालवतात. म्हणजे आता डबल लेनवाल्या रस्त्यावर गाडी चालवताना मागे पाहा, शेजारी पाहा,पुढच्या गाडीच्या जास्त जवळ तर आपण जात नाही तेही पाहा आणि त्याचवेळी पुढुन कोणी शहाणा उलट्या बाजुने येतोय का तेही पाहा. तुर्भे रेल्वे स्टेशन समोर तर कायम टु व्हिलरवाले समोरुन येतात, त्याच्या आधी बास्फ कंपनीसमोरही लोक उलटे जातात. ज्यांना ठाण्याला जायचेय त्यांना गाडी तुर्भे जंक्शनपर्यंत नेऊन वळवावी लागते. ते टाळण्यासाठी सरळ उलटे जायचे. आणि रात्रीची वेळ असेल तर हाय बीमही लावायचा. Angry आज बेलापुरला अर्बन हाटसमोरुन जाताना हाटाला भेट देऊन बाहेर पडणारा शहाणा गाडीसमोर उलटा आला. एकतर तिथे राउंडअबाऊट आहे, गर्दी कमी असते तेव्हा सिग्नल बंद असतो, त्यामुळे गाडी तिथुन काढताना दोन्ही बाजुला बघुन गाडी काढावी लागते आणि अश्या वेळी समोरुन उलट्या येणा-या लोकांचे काय करायचे??? आणि हे उलटे चालवणारे जपुन चालवतील असेही नाही, हे अगदी नेहमीसारखे वेगात जात असतात.

माझी इतकी चिडचिड होते अशा लोकांमुळे. ट्रॅफिक पोलिस अशा वेळी कुठे दडतात हा प्रश्न नेहमी मनात येतो. मी तर सरळ बिहारी/युपीवाल्यानी इथे येऊन गाड्या हव्या तशा चालवुन इथल्या ट्रॅफिकचा सत्यानाश सुरू केला अशी चिडचिड करते. आता हे वाचुन इथे लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालेल पण असे उलटे येणा-यांच्या नंबरप्लेटी पाहिल्या तर त्या हमखास बाहेरच्या असतात.

बँगलोरला जाणा-या रस्त्यावरही मी उस भरुन निघालेले ट्रॅक्टर असेच उलटे आणि तेही पहिल्या लेनमधुन येताना बरेचदा पाहिलेय. एकदा आम्ही तिथुन जाताना आमच्या जराशा आधी एक बोलेरो आणि उल्टा येणारा ट्रॅक्टर यांची टक्कर झालेली. बोलेरोमधल्या पहिल्या सिटवरची माणसे बेशुद्ध होती आणि दोन बायका खाली उतरुन इतका आक्रोश करत होत्या की ते पाहुन गठाळल्यासारखे झाले एकदम ....

वर मुंगेरीलाल यांनी मोठ्या गाड्यांच्या माजोरीपणाबद्दल लिहिलेय त्याच्याशी मी तरी सहमत आहे. मोठी गाडी घेऊन रस्त्यावर उतरणारे नेहमी इतर गाड्यांनी त्यांना आधी जाऊ द्यावे ही अपेक्षा ठेवतात आणि त्याप्रमाणे आपली गाडी पुढे रेटतात. अशांचे काय करणार?? 'जाऊदे बाबा त्यांना आधी, ते मोठ्या बापांचे, त्यांच्या गाड्या मोठ्या' हा डायलाग टाकुन जायचे पुढे... शेवटी आपली गाडी आपल्याला संभाळावी लागते Happy माझ्या गाडीला एखाद्या इनोवा किंवा स्कॉर्पिओने ठोकले तर जास्त नुकसान माझे होणार, त्या गाडीवर ओरखडाही पडायचा नाही कदाचित.

कात्रज घाट ओलांडून कोल्हापूरकडे निघालो की असेच उलट्याबाजूने येणारे ट्रक्स ते बाइक्सवाले, डिव्हायडरच्या मधून येऊन रस्ता क्रॉस करणारे किंवा क्रॉस करण्यासाठी उलटे येणारे बाइक्सवाले.. ठेचेठेचेला समोर येतात. आणि हा सगळा पॅच म्हणे मुंबई-बंगलोर एक्स्प्रेस हायवेचा भाग आहे बरंका..

माझ्या परिचयातले एक गृहस्थ जे CAG मध्ये वरिष्ट अधिकरि होते. त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबाचे ४ चाकी लायसंस आर.टी.ओ च्या पहाणी दरम्यान करून घेतले

Happy भोपाळवरुन आलेल्या माझ्या एका ऑफिस-मैत्रिणीने आत्ता दोन महिन्यांपुर्वी मारुती ड्राइअविंग स्कुलमधुन गाडी चालवायचे शिक्षण घेतले. तिने याआधी चार चाकीच काय पण दुचाकीही कधी चालवली नव्हती, चालवायचा येतच नव्हती, पण तिच्याकडे दोन्ही प्रकारच्या गाड्या चालवायचे लायसन्स मात्र होते. Happy ती म्हणाली तिकडे मिळते करुन.

४. नियमांची अंमलबजावणी तर सोडाच पण दंडाची रक्कम ही जरब बसवणारी वाटली नाही. (शिवाय स्वस्तात सुटण्याचा भ्रष्ट मार्ग आहेच).

रक्कम जरी जरब बसवणारी नसली तरी ती एक रुपयाही अजिबात कमी न करता वसुन केली गेली तर बराच आळा बसु शकेल. माझ्या ऑफिसात एकदा गेटच्या आत आले की गाडी फक्त ३० च्या स्पिडने चालवायचे बंधन आहे. स्पिडगन घेऊन सिक्युरीटी कुठे लपलेले असतात कळत नाही पण स्पिड ३१वर जरी गेला तरी लगेच धावत येऊन डेबिट नोटवर आपली सही घेतात. Happy नंतर पगारातुन २०० रुपये कापले जातात. समोर बसलेल्या दोघांनीही सिटबेल्ट लावायचा, टु विलरवर दोघे असतील तर दोघांनीही हेल्मेट घालायचे, गाडी पार्किंग लॉटमध्येच पार्क करायची, असे बरेच नियम आहेत आणि नियम तोडल्यावर निमुटपणे डेबिट नोटवर सही करायची. ५० रुपये घ्या आणि आजपुरते सोडाअ साहेब्, परत चुकी करणार नाही, हे म्हणायची संधी मिळतच नाही. बाहेरही जर असे झाले तर बराच आळा बसेल.

नव्या मुंबईत तरी असे लवकर होईल अशी आशा आहे. इथले आरटिओ बरेच जागरुक आहेत.

रक्कम जरी जरब बसवणारी नसली तरी ती एक रुपयाही अजिबात कमी न करता वसुन केली गेली तर बराच आळा बसु शकेल.>> अगदी सहमत. सीटबेल्ट साठी दंड केवळ १०० रु असून फार लवकर त्याबाबत जागृती झाली (निदान ड्रायव्हर साठी). पण जरबेचं उदाहरण द्यायचं झालं तर युकेमध्ये फुटपाथ वरून सायकल चालवल्यास कोर्टात होणाऱ्या दंडाची कमाल मर्यादा ५०० पौंड आहे तर बऱ्यापैकी नव्या सायकलीची खरेदी किंमत २४५ पौंड आहे! असं काहीतरी आपल्याकडे व्हायला पाहिजे.

ऑफिसमधलं विचाराल तर आजही मी आमच्या कंपनी पार्किंग मध्ये हेडलाईट न लावता वेगात गाड्या घुसवणारी मंडळी पाहतो, हद्द म्हणजे एका कानाला मोबाईल देखील. निदान पार्किंग मध्ये तरी पायी जाणाऱ्यांना प्रेफरन्स द्यावा याचंही भान नाही. कशाला फक्त ट्रक-टॅक्सी वाल्यांना दोष द्यायचा? (अरेच्या, अचानक पटतंय निधप ना काय म्हणायचं होतं ते Happy )

सगळे नियम पाळूनही अपघात होण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे टायर मध्ये हवेचा योग्य दाब नसणं. त्यातही गैरसमज म्हणजे हवा जास्त भरली गेली तर फुटण्याचा धोका आहे. तसं नसून कमी भरलेली हवा टायर फुटण्यासाठी कारणीभूत असते. कारण एकतर टायरचा रस्त्याला स्पर्श करणारा एरिया वाढतो आणि साईड (जो नाजूक भाग असतो) खालीवर होऊन तापमान वाढते. आपल्या टायर चे स्पीड/लोड रेटिंग ही माहित असणं आवश्यक आहे. उदा. 95L हे साईड वर छापलेलं असेल तर गाडीत जास्तीत जास्त ६९० किलो वजन (प्रवासी + सामान मिळून) आणि वेग जास्तीत जास्त १२० चा ठेवता येतो, त्यापलीकडे टायर फुटू शकतं. त्यातही हिवाळा असेल तर हवा थोडी जास्त भरावी लागते. धोका जास्त हिवाळ्यात असतो. याउलट अति हवा असेल तर stopping-distance वाढून ब्रेक दाबल्यावर गाडी हवी त्या ठिकाणी थांबत नाही. हेही धोकादायक आहे. गावाबाहेरच्या प्रवासात सुरक्षितते साठी नेहेमी हवा चेक करणं आवश्यक आहे. नायट्रोजन भरल्यानी आणि ट्यूबलेस टायरनी धोका बऱ्यापैकी कमी होतो.

टायर कोड ची माहिती सहज उपलब्ध आहे.
http://en.wikipedia.org/wiki/Tire_code

आणि इतकं करूनही टायर फुटल्याचं लक्षात आलंच तर पहिली प्रतिक्रिया होते ब्रेक दाबण्याची. हे केलंत तर गाडी हमखास उलटलीच समजा (आणि राईट लेन मध्ये असाल तर पलीकडे जाऊन येणाऱ्या वाहनावर कपाळमोक्ष ठरलेला). तर तसं न करता स्टीअरिंग घट्ट धरून उलट किंचित अक्सेलरेटर दाबून स्पीड मेंटेन करावा आणि नंतर हळूहळू तो कमी करावा. हे प्रसंगावधान अवघड आहे, पण निघण्यापूर्वी सतत स्वतःला बजावून जमू शकतं.

खाली दिलेली युट्यूब लिंक पहा
http://www.youtube.com/watch?v=bkMYiV0xD00

सुदैवाने माझ्या ऑफिसमध्ये ह्या डेबिट नोट प्रकरणामुळे सगळे शिस्त पाळतात. ऑफिसात रोज १००० गाड्या तरी येत असाव्यात किंवा जास्त. शिवाय आत स्टाफसाठीच्या बस वगैरे फिरत असतात. पण ३० च्या वर कोणी जाणार नाही. मी तरी गेल्या ५ वर्षात अपघात ऐकला/पाहिला नाही. स्पिड लिमिटमध्ये गाडी चालवायची इतकी सवय झालीय की मी बाहेरही रस्त्यावर जे लिमिट असते त्याच्यावर कधी जात नाही. सगळे हसतात मला पण सवय झालीय आता. आणि यामुळेच मला वाटते की जर दर वेळेस दंड पुर्णपणे वसुन केला गेला तर लोक सुधारतील थोडेफार. पण हे दंड वसुलीचे काम तिथल्या तिथे नको व्हायला तर काही देशात आहे तसे थेट बँकेमधुन गेले पाहिजे. आता नविन मिळणा-या आरसी कार्डमध्ये चिप आहेच, त्यात गाडीच्या मालकाचे बँक डिटेलही घालुन घ्यायचे.

नवी मुंबईतल्या आरटिओ ऑफिसरची परवा मुलाखत वाचली. त्यात त्यांनीही काही वर्षात थेट बँकेतुन दंड वसुली करायचा प्लॅन आहे हे सांगितले.

दर दिवशी १००-२०० रुपये जर थेट बँक अकाऊंटमधुन जायला लागले तर निम्मे लोक तरी सावध होतील.

Pages