खवा-बेसन वड्या/बर्फी

Submitted by चिन्नु on 24 December, 2012 - 06:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२५० ग्रॅ. बेसन, एक लहान वाटी खवा, बेसनापेक्षा किंचीत कमी साखर, वेलचीपूड, ३ टे.स्पू. तूप.

क्रमवार पाककृती: 

थोड्या तुपावर बेसन हल्का गुलाबी रंग येइपर्यंत भाजा. (खवा घरी करणार असाल तर दुध न लागु देता मध्यम गॅसवर सतत ढवळून तयार करून घ्या. एक पाकीट फॅट असलेल्या दुधाचा एक लहान वाटी खवा तयार होऊ शकतो.)
बेसन थंड्/कोमट झाले की त्यात खवा मिसळा. गुठळ्या होवू देऊ नका. ताटाला तूप लावून तयार ठेवा. वेलची पूड तयार करा.
साखर भांड्यात काढून तीत साखर फक्त ओली होईल एव्हढे पाणी अंदाजे घाला. वरील प्रमाणाला १/४ ग्लास पाणी लागले. हे भांडे गॅसवर ठेवा. मंद आचेवर ढवळत ठेवून दोनतारी पाक करा. बोटामध्ये पाक धरल्यास तारा दिसायला लागताच गॅस बंद करा. बेसन, वेलची-पूड, बेसन खवा मिश्रण घालून एकजीव करा. तूप घातलेल्या ताटात पसरा. थोडे कोरडे झाल्यावर वड्या कापा.

बर्फी

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे!
अधिक टिपा: 

१. बाजारू खव्यात मिल्क पावडर्/मैदा मिक्स असू शकते. त्याप्रमाणे साखर अ‍ॅडजस्ट करावी. नाहीतर वडी अगोड होते.
२. आवडत असल्यास ड्रायफ्रुट्स वापरू शकता. मिश्रण ताटात पसरल्यावर त्यावर ड्रायफ्रुट्सचा चुरा दाबून बसवावा.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता फोटो नाहीये गं. खव्यामुळे बर्फीचा रंग जरा क्रीमीश होतो, पण चव सही असते.

हो दिनेशदा. खव्यामुळे ही बर्फी जरा मऊसर बनते. ज्यांना खव्याची चव आवडते त्यांना नक्की आवडेल.

मी खाल्ल्या आहेत पण चिन्नुच्या हातच्या नाही. Happy
मस्त लागतात. बंगळूरात ताज दुध खूप मिळायच तेव्हा तिकडे नेहमी बनवल्या जात.
चिन्नु फोटो छान आहे. तोंपासु.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. Happy
चिन्नु मकरसंक्रातीची तयारी चालू झाली का???

चिन्नु... वड्या केल्या... छान झाल्या... मऊ नाही एकदम खुसखुशीत... पाकाची भिती होती पण जमला.. धन्यवाद

धन्यवाद स्वधा. या वड्यांची गंमत अशी की पाक नाही जमला तरीही बर्या होतात. Happy
रोचीन, मेसेज वेळात पाहिला नाही, तरी साखर आपल्या आवडेल तशी घ्यावी. 2 वाट्या बेसनाला दीड पेक्षा थोडी जास्त साखर घ्या. खव्यामुळे या वड्या गोडमिट्ट होत नाहीत.

खवा बनवायला थोडा वेळ लागेल. बाजारातून आणायचा नसेल तर त्या ऐवजी पनीर टाकून बघितले तर? कोणी करून बघितले आहे का? मी try करून बघते.

पनीर -
पनीरची चव चांगली नसते. त्याऐवजी मिठाईवाल्यांकडे साधी पांढरी मावा बरफी कायम मिळते. ती अधिक भाजलेले बेसन एकत्र करायचे. साखर/पाक, खवा जरुरी नाही कारण मावा बरफी म्हणजे ओला खवा अधिक भरपूर साखर. खमंगपणा थोडा कमी येईल.
गाजर/दुधी हलवा करतानाही ही बरफी वापरता येते॥