घटस्फोट

Submitted by सौ. वंदना बर्वे on 1 December, 2012 - 12:45

माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.

"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते. घटस्फोटांची प्रकरणं जी न्यायालयासमोर आली त्यांचं प्रमाण गोव्यात २००८ साली ७५० होतं. तेच २००९ साली ७७० झालं, २०१० साली ७९३ आणि २०११ साली ११८९. त्यातही घटस्फोट मिळण्याच्या प्रमाणात झालेली ५०% ते ७०% एवढी वृध्दीसुध्दा अशीच चक्रावणारी आहे.

बदलते सामाजिक जीवन. त्या अनुषंगाने बदलती कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाला कुठे घेवून चाललय? ह्या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती तशी तोकडी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण अशा प्रकारे ह्या समस्येचा विचार अजुनही करत नाही. घटस्फोटीतांचे जिल्हावार प्रमाण देण्यापलिकडे फारसं काही हाती लागत नाही. इतर देशामध्ये माहितीची साठवणूक अभ्यासात्मक दृष्टीकोनातून केली जाते. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर घटस्फोटांची कारणे, वयोगट, लग्न होऊन किती वर्षांनी घटस्फोट, मुलांची भुमिका, घटस्फोटाआधीचि दंपतीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, इत्यादी अनेक कोनातून ह्या समस्येविषयी माहिती गोळा केली जाते व एकत्रितपणे त्याचा वापर तौलनीक विचार करून विवेकाने मार्ग काढण्यासाठी होतो. मग ते समुपदेशन असेल किंवा सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार असेल.

परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत कालाप्रमाणे अनेक बदल झाले. त्यांची कारणे अनेक आहेत. भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय. मग त्यातला गोडवा तो कुठून येणार. "आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय. मुलांना आईव्यतिरिक्त संभाळणारी काकू, आज्जी, आत्ते, मामी ह्यांची जागा आयांनी घेतली. आया मिळणे दुरापास्त होऊ लागले तेंव्हा पाळणाघरे विकसित झाली, बोर्डींग शाळा सुरू झाल्या. कुंटुंब चालवण्यासाठी आम्ही कुटुंबापासूनच दूर गेलो. आज नातेवाईकांचं सोडा, नवराबायकोमधले संवाद, एकमेकांना भेटणं कमी झालय. एकमेकांना भेटायला वेळ नाही. चिमणा चिमणीचा चिवचिवाट हरवलाय. घरटी मोडताहेत.

मी बालविवाहाचं समर्थन करीत नाही फक्त माझा मुद्दा मांडण्यासाठी व फरक दाखविण्यासाठी उल्लेख करतेय. आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची, त्या कारणाने ती वधू नवीन घरात रुजायची. त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची. आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी एका विचारात, संस्कारात व नातेसंबंधात जवळपास पंचवीस वर्षे वाढते. तिचे विचार, आचार पक्के होतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ती परिपक्व होते. मग लग्न करून जेंव्हा ती सासरी जाते तेंव्हा तिथले संस्कार, तिथली नाती, तिथले आचार विचार ह्यात ती रुजावी, तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. माहेरी व सासरी साधारण समानता असेल तर तेवढं कठीण जात नाही. पण असं प्रत्येक ठीकाणी असतच असं नाही. इथेच कुरुबुरींना सुरुवात होते. तिचं देणंघेणं हे वैचारिक व भावनिक दृष्ट्या फक्त पतीपुरतच मर्यादित राहतं. ह्याचा दोष त्या मुलीच्या व तिच्या माहेरच्यांच्या माथी मारला जातो. शिकली सवरली असेल तर शिक्षणावर मारला जातो. ह्यावर उपाय म्हणून "लहानपणीच मुलीचा विवाह करावा" हे अत्यंत हिणकस व आक्रस्ताळेपणाचे ठरेल. त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल बालविवाह होता. आजची परिस्थिती वेगळी आहे व समस्याही वेगळ्या आहेत. म्हणूनच उपायही वेगळे हवेत.

बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या. घटस्फोटांच्या कारणं विषद करताना वक्त्याने सांगितलेली हकीकत आठवते, घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". ते रात्री साडेदहा अकराला शेवटचा फोन. मधे २०-२५ फोन. जरा काही बिनसलं नवऱ्याबरोबर की लगेच मम्मीकडे तक्रार. मग मम्मीचे सल्ले आणि तिने तिच्या नवऱ्यावर केलेले प्रयोग. मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. सक्ती नको. खरतर वडिलधाऱ्यांची नसती लुडबूड ही समस्या सोडवण्याऐवजी समस्या बिघडवूनच अधिक ठेवतात. एकत्र कुटुंब असणे म्हणजे संसारात लुडबूड करण्याचं अलिखित प्रमाणपत्र नव्हे.

आपली नाती, आपलं कुटुंब हे आपणच जपायचं असतं. नवरा बायकोचं नातं हे वरवर पाहता खूप सोपं पण तितकच गुंतागुंतीचं असतं. ते दोन शरीरांचं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा भागवण्याची सोय म्हणून एकत्र येणं नाही. नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. संस्कारांची बीजं रोवणं आणि पर्यायानं चांगला समाज घडवणे हे विवाहसंस्थेचे कार्य आहे. आम्ही आमच्याच मुळावर उठलोय. संस्कारांच्या वळचणीतली ही काड्या काड्या जमवून बांधलेली घरटी कायद्याच्या काठीनं अशी नका पाडू. घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

nust hech nahi ter ... gharchi sarvi kam kara oofice la jat paryant.... m ghari aal ki parat tech.... aani jevha job la sutti aste tya ved la ter purn divas majha kamat jato... mala sasuchi kaslich madat hot nahi....

majya sasu ni clear mahntal hot ki pagar majya hatat dyach.... je aamhi lagna sathi karz kadl hot te tu pan fhedaych .

mi ya gosticha virodh kela ... mi mahnatl karz fedna tumch kam aahe... majha navra purn pagar tumchya hati deto na... mag aamcha karch aamhi dogh majya pagaratun karu.....

tyavar sasu mahnali ki jar pagar majya hati det nashil ter job sod mala tujya job chi kahi garaj nahi... job kart hoti mahnun amhi magitli tula...

mi navrala boli mi job sodnar nahi aani pagar pan tumchya aaichya hati denar nahi... navra mahnana ki aaichya hati det nasil ter majya hati purn pagar de mi tula kharchala paise deil...

purn pagar mi aata navryachya hati dete...

khup cheap mentality che lok aahet majya gharche....

mor la kahi breakfast banla asel ter adhi sarve kahun ghetat mala kuni vichart pan nahi....

office madhan thakun aalya alya mi sarvan sathi chaha karun dyacha .... kuni kashachich madat kart nahi....
m ashya ghari rahun mi kya kru?

प्रति, हे सगळ तुम्ही तुमच्या घरच्यांना (तुमच्या माहेरी ) सांगितले आहे का? नसेल तर सांगून टाका बघा त्यांनी समजावून काही फरक पडतो का ते..... जर नसेलच काही बदलत तर उगाच दु:खात आयुष्य घालवण्यात अर्थ नाही. जो काही निर्णय घ्याल तो शांतपणे पूर्ण विचार करुन घ्या.
(हे सगळ इथे लिहीण्यापेक्षा "कोणाशी तरी बोलायच आहे"मधे लिहा.... तुम्हाला अधिक चांगले सल्ले मिळतील)

माझ्या मते,
वाढता घटस्फोट म्हणजे स्त्रीची होत चाललेले प्रगती याचं लक्षण होय. घटस्फोट म्हणजे विवाह संस्थेला सबल स्त्रियानी दिलेलं आव्हान होय. हे प्रमाण वाढत वाढत एक दिवस इतक वाढेल की विवाह संस्था कोलमडून पडेल. पणे हे सगळं अचानक न होता हळू हळू घडणार. त्यामुळे समाजाला हे कळणारही नाही कि विवाह संस्था कोलमडून पडली आहे. तो काळ म्हणजे सहजिवनाला फक्त अन फक्त सोलमेट हे मान्य असलेला काळ असेल. जोखड वाहणे संपुर्णपणे बंद झालेलं असेल. बरं हा आजचा सोलमेट उद्याचा फोलमेट होऊ शकतो. पण 'ए मिनट ही/शी बिकम्स फोलमेट(हा माझा शब्दय) रेलेशन इज ओव्हर' असा तो काळ असेल.

थोडक्यात तो काळ म्हणजे रिलेशन ऑफ क्वालिटी.... नो मोरे गेम ऑफ क्वांटिटी & नो मोर एन्डुरन्स.

प्रश्नः- घे घडायला किती काळ लागणार?
- अहो सुरुवात झालिये... फक्त शेवटचा घटोस्फोट कधी होणार त्याची वाट बघा. ते नाही बुवा सांगता येणार!

.

mi navrala boli mi job sodnar nahi aani pagar pan tumchya aaichya hati denar nahi... navra mahnana ki aaichya hati det nasil ter majya hati purn pagar de mi tula kharchala paise deil...

purn pagar mi aata navryachya hati dete... >> काय मुर्खपणा आहे

प्रतिहे हॉरिबल आहे, तुम्ही स्वतः कमत्या आहात आणि नसाल तर कमवत्या व्हा. तुमचा पगार, नवरा खर्चाला पैसे देणार? तुम्ही सहन करताय म्हणुन ही थेर चालली आहेत, जमणार नाही म्ह्णुन स्प्ष्ट सांगा, मानसिक आणि शारिरीक त्रास दिला तर सरळ पोलिस कंप्लेंट करा. अद्दल घडवा चांगली... तुमच्या माहेरच्यांना, सासरच्या इतर नातेवाईकांना, मित्रांना शेजार-पाजार्‍यांना ह्या गोष्टीची कल्पना द्या... मनाची नाहीतर जनाची लाज असायला हवी लोकांना.

लग्नाच कर्ज फेडण्या साठी बायकोने-सुनेने नोकरी करायची? तुम्ही उलट सांगा मी घर खर्चाला काय ते पैसे देईन. तुम्ही कसला पगार त्याच्या हाती ठेवताय.

मुख्य म्हणजे नवर्‍याशी शांतपणे बोलून बघा, तुमचा मुद्दा निट समजवण्याचा प्रयत्न करा. तो दडपणाखाली तसा वागतो का? की त्याची पण तिच मनोवृत्ती आहे हे समजुन घेण्याचा प्रयत्न करा. दडपणाखाली वागत असेल तर त्याला सपोर्ट करा आणि त्यातुन मार्ग निघणार असेल तर बघा, प्रेमाने समजला तर ठीक.

मुलगी कमवती हवी अशी मागणी असलेल्या मुलांशी मुली लग्नच का करतात? नोकरी ही लग्नासाठी अट होऊच कशी शकते? उद्या नोकरी गेली तर काय बायकोलो घरा बाहेर काढणार का?

खंबिर रहा आणि खंबिर व्हा, एकघाव दोने तुकडे चांगल नाही पण हळुहळू करवतिने तुकडे होण्या पेक्षा एक घाव हे बरं... पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा धोका संभावत असेल तर मात्र लगेच रिअ‍ॅक्ट करा.

मुख्या म्हणजे तुमची सिच्यूएशन तुम्हाला माहीत, लोकांचे सल्ले त्यांच्या अनुभवाने येतात, सल्ले पाडताळुन पहा. विचार पुर्वक निर्णय घ्या. तुमचा अनुभव, तुमाचा विचार आणि तुमचा निर्णय महत्वाचा.

सत्यजित

dhyanwad tumchya pratisada badal....

mi ya sar gostinchi purn kalpna माहेरच्यांना, सासरच्या इतर नातेवाईकांना, मित्रांना शेजार-पाजार्‍यांना dili aahe....

maherche mahntat ki tula honara tras tula mahit aahe tu jo nirnay gheshil tyat aamhi tula sath (support) karu....

Navra kuthlyahi dadhapana khali asa vagat nahi... tyachi pan manorutti tashich aahe.... to mala clear bolto ki majya gharche je mahntil tasach tula vagav lagel aani karav lagel...

mi pan aata tharavl ahe aata pagar kunalahi denar nahi....

सत्यजित, प्रतिच्या प्रॉब्लेमबद्दल पूर्ण सहानुभूती आहे पण
१. कमावती मुलगी हवी हे एखाद्याचे म्हणणे चूक कसे? एखाद्याला खरंच आपल्या सहचराकडून आर्थिक मद्तही अपेक्षित असेल आणि ते लग्नाअगोदरच ते क्लिअर केले असेल तर ते चूक कसे?
२. मलातरी नवर्याने काही काळाने मी कमावणार नाही घरीच बसणार हे लग्नानंतर अचानक सांगितलेले चालले नसते. नोकरी गेली/ सोडावी लागली तर ती वेगळी गोष्ट.
३. एकत्र कुटुंबात झालेल्या तेही आपल्या लग्नात झालेल्या कर्जाची जबाबदारी अंशतः आपली नाही का?
अर्थात सगळा पगार कुणाच्या ताब्यात देऊ नयेच पण पार्ट ऑफ इट जबानदारीने द्यायलाच हवा. वरच्या उदाहरणात प्रतिचे पती सगळा पगार घरि देतायत म्हणजे तो पार्ट आपोआपच सांभाळला जातोय.

एम.,

आपला इथला प्रतिसाद वाचला. बरेच नवरे बायकांना नीट वागवत नसतील. मात्र त्यासाठी कुटुंबसंस्थेस जबाबदार धरणे पटले नाही.

तुमच्या तथाकथित समतेपायी स्त्री देशोधडीला लागेल. मुलांचे संगोपन नावाचा प्रकार शिल्लक राहणार नाही. मुले एकाच पालकाच्या संगतीत वाढतील. अशा कुटुंबात मुलाकडे आवश्यक लक्ष देता येत नाही. यातून वाईट संगतीमुळे ती गुन्हेगारीकडे वळण्याचा संभव बराच जास्त आहे. या सगळ्या गोष्टी एकदम १-२ वर्षांत न होता हळूहळू २५-३० वर्षांत होतील. त्यामुळे कुठे चुकलं हे कळण्याचा मार्गही पुसट झाला असेल.

तुमच्या प्रतिसादास साम्यवादाचा भयंकर वास मारतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

बरेच नवरे बायकांना नीट वागवत नसतील. मात्र त्यासाठी कुटुंबसंस्थेस जबाबदार धरणे पटले नाही.>>>

गा. पै.
नव-यानी निट वागवलं नाही म्हणून घटस्फोट होतील असं मला अजिबात म्हणायचं नाहिये. नवरा मला निट वागवतोय का वगैरे विचार त्याना स्पर्श करणार नाही. 'तो कोण मला वागवणारा? मिच त्याला वागवेण!' असा तो काळ असेल. नव-याला 'मी तीला वागवतो' वगैरेच्या डोयलोग मारायला स्कोपच नसणार. जस जसा स्त्रीयांचा अर्थार्जनाचा पाया भक्कम होत जाईल तस तसं नव-याने वागविणे सारख्या गोष्टी लुप्त होत जातील. अन हे फार दूर नाहिये, बघा!
----

यातून वाईट संगतीमुळे ती गुन्हेगारीकडे वळण्याचा संभव बराच जास्त आहे.>> तुमचं बरोबरही असेल पण माझ्या मते आर्थिक सुबत्ता असलेल्या देशात तेवढी गुन्हेगारी नाही जेवढी गरीब देशात आहे. अन मी जे बोलतोय तो काळ म्हणजे स्त्री ही आर्थिक दृष्ट्या समर्थ बनलेला काळ. म्हणजे देशात आर्थिक सुबत्त नक्कीच असेल. त्या नियमाने पाहिल्यास गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर मी शाशंक आहे.
----

तुमच्या प्रतिसादास साम्यवादाचा भयंकर वास मारतो आहे.>>>>
आय हेट कार्ल मार्क्स!

आकडा सांगतोय की १००० मागे ८०० - ९०० मुलीच आहेत. म्हणजे हजारी १०० पुरुष बिनल्ग्नाचेच रहाणार की २०-३० वर्षानी.>>>

डेलिया,
तसं नाही होणार,
कारण आकडे पाहून जरी तसं वाटलं तरी मुलगा वयाच्या ३२-३५शीत लग्न करतो तर मुलगी १८ ची झाली की घरच्यांचं तुणतुण चालू होतं. २५ पर्यंत फार फार तर उच्च शिक्षणाच्या नावाखाली मुलींवर दबाव नसतो पण २५ नंतर तर घरचे कधी एकदा हिचं लग्न करुन पाठवू असा पवित्रा घेतात. यामुळे मुला मुलीतील संख्येतील व्यस्त प्रमाणाने मुलाना मुली मिळण्याची कधीच अडचण भासणार नाही.

तर मग हे कधी भासलं असतं?
जर २० वर्षाचा मुलगा २० वर्षाच्याच मुलिशी, व २२चा २२ची, २५चा २५ची शी असं असतं तर प्रचंड गोंधळ उडाला असता.

.

सौ वंदना बर्वेजी
तुमच्या सर्वच लेखांना बरेच प्रतिसाद मिळणे याचा अर्थ विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असणे असा घेतो. एकदा लेख वाचला आहे. विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. या विषयासदर्भात कुणाचे संशोधन वगैरे उपलब्ध आहे का ? काही गोष्टींनी गोंधळ उडाला आहे. एका ठिकाणी तुम्ही एकत्रित कुटुंबव्यवस्थेचं महत्व सांगितलं आहे. त्यातच आई वडिलांना दादा-वहिनी असे संबोधणे, एकत्र राहण्यातला गोडवा याचं महत्व सांगितलं आहे. त्याचवेळी मुलगी सासरी गेल्यानंतर तिला होणारा एकत्रित कुटुंबपद्धतीतला त्रास सांगितला आहे. हा विरोधाभास आहे असं नाही का वाटत ? थोडक्यात मुलीच्या माहेरची एकत्रित कुटुंबपद्धती योग्य. त्यातही नात्यांची घुसमट असेलच ना ? आपली मुलगी नांदायला गेली कि तिची घुसमट योग्य पण परक्याची आपल्याकडे आली कि एकत्रित कुटुंबपद्धतीत ती आनंदी होते का ? बराच गोंधळ झालाय वाचताना.

लेखातले बरेचसे मुद्दे हे काही काळापूर्वी ठराविक मासिके आणि साप्ताहिकांमधून वाचले जायचे. त्या वेळी तेच योग्य वाटायचे. पण त्यातले मुद्दे सहका-यांबरोबरच्या चर्चेत, मित्रांबरोबर गप्पा मारताना फोल असल्याचे आढळून आले. सध्या या विचारांच्या अंमलातून बाहेर आहे. घटस्फोटाची कारणे केस टू केस वेगळी असतात. एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे होणारा त्रास हे कारण आकडेवारीनिशी जास्त आहे किंवा कसे हे लेखाद्वारे स्पष्ट झाले असते तर बरे झाले असते. एकंदर विचाराला चालना देण्यात यशस्वी झालेला लेख आहे इतकं नमूद करतो.

एकत्र कुटुंबात झालेल्या तेही आपल्या लग्नात झालेल्या कर्जाची जबाबदारी अंशतः आपली नाही का? >> कर्ज काढताना हे ठरल होत का? ठरल नसेल तर नंतर त्याबद्दल विनंती, आग्रह किंवा जबरदस्ती करण्यात आली? उत्पन्नावर टक्स कसा भरतात - हिंदू फमिली म्हणून कि व्यक्ती म्हणून? कर्जावर सही कोणी केली होती - नवर्यानी कि सासू-सासर्यांनी?? वरील प्रश्नांचे उत्तर (भावना बाजूला ठेवून) आधी ठरवून मगच "एकत्र कुटुंबात झालेल्या तेही आपल्या लग्नात झालेल्या कर्जाची जबाबदारी अंशतः आपली नाही का?" ह्याचे उत्तर ठरवायला हवे असे मला वाटते.

प्रती तुम्हाला मना पासुन शुभेच्छा, सर्व विचार करुन योग्य निर्णय घ्या...

१. कमावती मुलगी हवी हे एखाद्याचे म्हणणे चूक कसे? एखाद्याला खरंच आपल्या सहचराकडून आर्थिक मद्तही अपेक्षित असेल आणि ते लग्नाअगोदरच ते क्लिअर केले असेल तर ते चूक कसे? >> माझा मुद्दा तो नाही, मुलगी लग्ना आधी पासुन नोकरी करते, तिच संगोपन व शिक्षण आणि तिची व्यवसाईक पात्रता ही मुलीच्या आई-वडिलांनी घडवली आहे. त्या मुलीच्या मिळकतीवर जबरदस्ती हक्क सांगण्याचा अधिकार सासरच्यांना नाही अगदी नवर्‍यालाही नाही. दोघांच्य संगमनताने होत असेल तर ठिक. मुलींनी देखिल ह्या बद्दल लग्ना आधी चर्चा करणे अपेक्षित आहे. प्रतीच्या परिस्थीतीत किंवा इतर कुठल्याही कारणाने असो स्त्रीने आर्थिक दृष्ट्या सबळ असणं हे अत्यंत गरजेच आहे, आणि ते करण्याची जबाबदारी स्त्रीची स्वतः ची आहे.

"मुलगी कमवती पाहीजे म्हणजे काय?" तुम्ही केलेली कर्ज फेडायला कमवती पाहीजे का? मुलीच्या आईबापाच्या कर्जाच काय?
"तुझा पगार तू आम्हाला दिला नाहीस तर घरी बस" हे अती होतय. जर पैशांची गरज असेल तर सासू का नाही जात कामाला?

आपल्या इथे मुलींनी सासरी जाउन कस वागाव याची एक नियमावली असते. अगदी व्रत व्यकल्याच्या कथां मधुनही ती सांगितली जाते, घोकवली जाते, पण नविन मुलगी घरी आली की कुटुंबियांनी-नवर्‍याने काय करावं याची नियमावली कुठे आहे?
आमच्या घरात सगळे सुजाण आहेत नियमावलीची गरज नाही, अस बहुतेकानां वाटत असेल पण तस नसत. रहदारीचे नियम समजुन चांगली गाडी चालवणे आणि न समजता चांगली चालवणे ह्या फरक हा असतोच. आणि एकाचे चांगली चालवयची आनि इतरानी बेताल आणि अ‍पघाताचा दोश नियमाने चालणार्‍यांवर लादायचा. majority wins but it may not be justice.

आमच्या मुलीला ४ दिवस घरी पाठवा असा फोन माहेच्या मंडळीनी करायची गरज असणे हे म्हणजे फार होत अस नाही वाटत? च्यायला काय सुट्टीच अ‍ॅप्लिकेशन आहे का? पण हे अगदी कॉमन आहे. सासू-नवरा परवानगी नाही देत, हे तर मी खुप वेळा ऐकलय. परवानगी हवी कशाला?

नवरा-बायकोचा एकमेंका बद्दल नितांत आदर असला ना १००% प्रॉब्मेस सुटतात, तसच सुनेला सासरचा आणि सासरचा सुने बद्दल आदर असला की मग प्रॉब्लेम सुटतात. पण दोन्ही बाजुनी चुकाच काढायच्या म्हटल्या तर नोबडी इज पर्फेक्ट मग चक्काचुर होणारच.
पण सगळीच कडे दोष सासरकडे जात नाही, मुली घरात शिरतानाच जर अतिशहाणपणच भिंग आणि प्रऑक्यूपाईड माईंड घेऊन शिरल्या तर काशीच ना.. मग अशा मुली पहील्या दिवशीच जर माहेरी किंवा मैत्रीणील फोन लावतात
"ह्यांच्या इथे ना हे अस आहे."
"हो का? बरेच मागासलेले दिसता आहेत" झाला सुखी संसार. काही ठिकाणी माहेर चे पण अ चुकतात "आमची मुलगी आम्हाला जड नाही" हा अट्टाहास.
किंवा
"माझ्या पप्पा मम्मी ने मल कधी विचारल नाही, तर हे कोण"
"माझ्या माहेरी हे अस असतं"
दोन वेगळ्या रहाणार्‍या सख्ख्या भावाच्यां घरतल कल्चर हे वेगळ असतं, तर तुम्ही वेगळ्या गावातल्या वेगळ्या कुटूंबा रहायला जाताय तर तेवढी तयारी तुमची असायलाच हवी. नाहितर लग्ना आधीच वेगळ रहायची इच्छा प्रकट करावी.
इथे प्रत्येकाला वाटतं की माझ्या आईवडीलांनी दिलेले संस्कार हेच बेस्ट आहेत, पण मी भरतातून अमेरिकेत आलो तर मी अमेरिकेचे नियम पाळतो, ते मला पटोत न पटोत. मी इथे नियम तोडुन कोणाला शहाणपणा शिकवायला जात नाही, की आमच्या देशाचे नियम आणि कल्चर कसं ग्रेट आहे हेही सांगयला जात नाही. अजुन तरी मुली सासरी जातात त्या मुळे त्यांना हे असेच नियम पाळावे लागतात. पण तिचा विचार हा व्हायलाच हवा, जुळवुन घ्यायची जबाबदारी फक्त तिच्या एकटीवर टाकणे खरच चुकीचे आहे.हा बदल खुपच गरजेचा आहे.

संसारात देखिल "आमचे संस्कार उच्च आणि तुमचे भुरसटलेले" हे सिद्ध करायची खुमारी म्हणजे वाटोळ.

माझा मुलगा मला रोज विचारतो की आपण बिफ का नाही खात? मी त्याला सांगितल की आपण भारतिय आहोत म्हणुन, त्याचा प्रश्न आता बदलला आहे की मझ्या स्कूल मध्ये इंडियन मुल आहेत ती खातात, मग आपण का नाही खात? त्याला आपण हिंदू आहोत म्हणुन खात नाही म्ह्टलं तर तो उद्या शाळेत हिंदु कोण आणि कोण नाही हे विचारत बसेल आणि तो स्वतःला इतरां पेक्षा वेगळ समजायला लागेल. आणि आपण हिंदू, तो मुस्लिम, तो ख्रिस्चन असा भेदभाव करु लागेल.
बरेच हिंदू देखिल बिफ खातात त्या मुळे तो उद्या " हिंदु देखिल खतात, मग आपण का नाही?" हा प्रश्न विचारेल हे नक्की. ते खातात ते चुक करता अस तर नक्कीच नाही काय खाव आणि काय नाही हा वयक्तीक प्रश्न आहे. त्या उपर हिंदू हा धर्मच नाही असं माझ पक्क मत आहे आणि धर्मा बद्दलच्या माझ्या कल्पना जरा वेगळ्या आहेत त्या मुळे धर्म वगैरे उत्तर बाद.
बिफ खाउन त्याचा धर्म भ्रष्ट वगैरे काही होईल असं मला वाटत नाही तरीही, तूला हव तर तू बिफ खा हे म्हणायला माझ मन धजावत नाही आणि त्याच्या प्रश्नाला सजेस उत्तर मला सापडत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की संस्कार हे योग्य अयोग्य या पलीकडचे असतात त्यांचा पगडा फार घट्ट असतो मनावर. त्यात काही चुक की अचुक हे ठरवण अवघड आणि ते ठरलं तरी ते अंगिकारण अजुन अवघड. अशा अनेक गोष्टीं लग्नशी निगडित असतात, त्या सगळ्याच गोष्टींचा विचार करण अवघड आहे. पण जिथे प्रॉब्लेम दिसतो तिथे कारण मिंमासा करुन मधला मार्ग काढणे गरजेचे असते. मार्ग नाहीच निघाला तरी त्याचा त्रास नक्की कमी होईल.

आपल कल्चर कसं वाईट, एकत्र कुटूंब पद्धतीच कशी वाईट, घटस्फोट हा एक बेस्ट ऑप्शन अशा जनरलाईस स्टेटमेंटना काही अर्थ नाही. माझे अनुभव तुमच्यावर थोपण्यात किंवा माझ्या अनुभवाने तुम्ही तुमचे निर्णय घेणे निव्वळ मुर्खपणाचे ठरेल.

घटस्फोट हा पहिला ऑप्शन नसुन शेवटचा आहे, तर तो शेवटचाच असावा हे सांगण्या प्रयत्न वंदनाताई कळकळुन करता आहेत. घटस्फोटचे परिणाम हे त्यांनी लिहिले नाहीत पण ते फार सुख कारक नाहीत हे सगळे जाणुन आहेत अस त्यांनी गृहीत धरलेल आहे. त्याची कळकळ न समजुन घेता त्यांच्या लेखवर एकांगी केलेली टिका मला पटली नाही इथे टिका करायला जेवढी बुद्धी खर्ची घातली तेवढी बुद्धी त्यांना काय म्हणायच हे समजुन त्या अनुशंगाने प्रतिक्रीया देण्यात घातलेली नाही. त्यानी अख्खा थिसीस मांडायला हवा तोही १६ बाजुंचा विचार करुन अशी अपेक्षा असेल तर मग ठीक आहे.
पण मायबोलीवर ओ ला ठो करायची रित पडली आहे. प्रत्येक ठिकाणी लचके तोडुन, दुसर्‍याची अक्कल कढुन तुमचा मुद्दा कसा काय सिद्ध होतो हे मला कळत नाही. काही लोकांचे तर विचार इतके मिळतात आणि मोदकांची देवाण घेवाण तर येवढी की कुठेच कधीच एखादा मोदक देखिल मिठाचा नसतो. इतके गोड मोदक आहे इतरांनीही वाटा, गोड सगळ्यांना आवडत, वाटल्यास तिखट व्हा पण कडू होऊ नका. असो...

म्हणजे देशात आर्थिक सुबत्त नक्कीच असेल. त्या नियमाने पाहिल्यास गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणावर मी शाशंक आहे. >>माणुस हा येडा प्राणी आहे, त्याला न खाजत्या जागीही खाजवुन खरुज काढायाची सवय असते. अमेरिकेत सिंगल किंवा घटस्फोटीत मुला मध्ये मानसिक त्रास आणि गुन्हेगारी वृत्ती जास्त दिसते. कदाचित तुम्ही म्हणाल तसही होईल पण इट्स सायकल, जे खाली जाईल ते वर येणारच.

प्रति,

आपली वेदना वाचली. सल्ला वगैरे नाही पण मला जे वाटलं ते मांडते. आपण काहीही झालं तरी नोकरी सोडू नये. घटस्फोट घेतलात किंवा नाही घेतलात, दोनही परिस्थितीत नोकरीच तुम्हाला खंबीर रहायला मदत करेल.

सौ. वंदना बर्वे.

सिमंतिनीजी,
<कर्ज काढताना हे ठरल होत का? ठरल नसेल तर नंतर त्याबद्दल विनंती, आग्रह किंवा जबरदस्ती करण्यात आली? उत्पन्नावर टक्स कसा भरतात - हिंदू फमिली म्हणून कि व्यक्ती म्हणून? कर्जावर सही कोणी केली होती - नवर्यानी कि सासू-सासर्यांनी?? वरील प्रश्नांचे उत्तर (भावना बाजूला ठेवून) आधी ठरवून मगच "एकत्र कुटुंबात झालेल्या तेही आपल्या लग्नात झालेल्या कर्जाची जबाबदारी अंशतः आपली नाही का?" ह्याचे उत्तर ठरवायला हवे असे मला वाटते.>

सहमत.

सौ. वंदना बर्वे.

बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या.

हे मला अतिशय समर्पक विधान वाटते. बरीचशी नाती तूटण्यासाठी हेच बऱ्याचवेळा कारण असते.

Pages