माझा आणि आपल्यापैकी बहुतांशी स्त्रियांचा विश्वास आजही कुटुंबव्यवस्थेवर टिकून आहे. मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते. घटस्फोटांची प्रकरणं जी न्यायालयासमोर आली त्यांचं प्रमाण गोव्यात २००८ साली ७५० होतं. तेच २००९ साली ७७० झालं, २०१० साली ७९३ आणि २०११ साली ११८९. त्यातही घटस्फोट मिळण्याच्या प्रमाणात झालेली ५०% ते ७०% एवढी वृध्दीसुध्दा अशीच चक्रावणारी आहे.
बदलते सामाजिक जीवन. त्या अनुषंगाने बदलती कुटुंब व्यवस्था हे आपल्या समाजाला कुठे घेवून चाललय? ह्या सगळ्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती तशी तोकडी आहे. इतर देशांच्या तुलनेत आपण अशा प्रकारे ह्या समस्येचा विचार अजुनही करत नाही. घटस्फोटीतांचे जिल्हावार प्रमाण देण्यापलिकडे फारसं काही हाती लागत नाही. इतर देशामध्ये माहितीची साठवणूक अभ्यासात्मक दृष्टीकोनातून केली जाते. उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर घटस्फोटांची कारणे, वयोगट, लग्न होऊन किती वर्षांनी घटस्फोट, मुलांची भुमिका, घटस्फोटाआधीचि दंपतीची परिस्थिती व नंतरची परिस्थिती, इत्यादी अनेक कोनातून ह्या समस्येविषयी माहिती गोळा केली जाते व एकत्रितपणे त्याचा वापर तौलनीक विचार करून विवेकाने मार्ग काढण्यासाठी होतो. मग ते समुपदेशन असेल किंवा सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार असेल.
परंपरेने आलेली व शास्त्रिय बैठकीवर आधारलेल्या भारतीय कौटुंबिक व्यवस्थेत कालाप्रमाणे अनेक बदल झाले. त्यांची कारणे अनेक आहेत. भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय. मग त्यातला गोडवा तो कुठून येणार. "आई"ची मॉम व "बाबांचा" डॅड झालाय. मुलांना आईव्यतिरिक्त संभाळणारी काकू, आज्जी, आत्ते, मामी ह्यांची जागा आयांनी घेतली. आया मिळणे दुरापास्त होऊ लागले तेंव्हा पाळणाघरे विकसित झाली, बोर्डींग शाळा सुरू झाल्या. कुंटुंब चालवण्यासाठी आम्ही कुटुंबापासूनच दूर गेलो. आज नातेवाईकांचं सोडा, नवराबायकोमधले संवाद, एकमेकांना भेटणं कमी झालय. एकमेकांना भेटायला वेळ नाही. चिमणा चिमणीचा चिवचिवाट हरवलाय. घरटी मोडताहेत.
मी बालविवाहाचं समर्थन करीत नाही फक्त माझा मुद्दा मांडण्यासाठी व फरक दाखविण्यासाठी उल्लेख करतेय. आधीच्या काळी लहानपणीच लग्न व्हायची, त्या कारणाने ती वधू नवीन घरात रुजायची. त्या घरच्या चालीरिती, संस्कार, नातेसंबंध, उठबस त्या मुलीला लहानपणापासूनच शिकविली जायची. आजच्या परिस्थितीमध्ये मुलगी एका विचारात, संस्कारात व नातेसंबंधात जवळपास पंचवीस वर्षे वाढते. तिचे विचार, आचार पक्के होतात. एक सक्षम व्यक्ती म्हणून ती परिपक्व होते. मग लग्न करून जेंव्हा ती सासरी जाते तेंव्हा तिथले संस्कार, तिथली नाती, तिथले आचार विचार ह्यात ती रुजावी, तिनं जुळवून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा करणं विपर्यस्त ठरतं. माहेरी व सासरी साधारण समानता असेल तर तेवढं कठीण जात नाही. पण असं प्रत्येक ठीकाणी असतच असं नाही. इथेच कुरुबुरींना सुरुवात होते. तिचं देणंघेणं हे वैचारिक व भावनिक दृष्ट्या फक्त पतीपुरतच मर्यादित राहतं. ह्याचा दोष त्या मुलीच्या व तिच्या माहेरच्यांच्या माथी मारला जातो. शिकली सवरली असेल तर शिक्षणावर मारला जातो. ह्यावर उपाय म्हणून "लहानपणीच मुलीचा विवाह करावा" हे अत्यंत हिणकस व आक्रस्ताळेपणाचे ठरेल. त्यावेळच्या परिस्थितीशी अनुकूल बालविवाह होता. आजची परिस्थिती वेगळी आहे व समस्याही वेगळ्या आहेत. म्हणूनच उपायही वेगळे हवेत.
बऱ्याच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या घटनांची कारणमीमांसा ही संवाद नसणे, अहंकार व इतरांची लुडबूड असते. प्रामाणिकपणे सांगायचं तर मला माझ्या संसारात विनाकारण लुडबूड नको असते. मग ती सासरच्या मंडळींची असो अथवा माहेरच्या. घटस्फोटांच्या कारणं विषद करताना वक्त्याने सांगितलेली हकीकत आठवते, घटस्फोटाचं कारण एका ठिकाणी मुलीच्या आईची प्रचंड ढवळाढवळ हे होतं. सकाळी उठल्या उठल्या फोन, "शोन्या उठला माझा, बोर्न्व्हिटा पिला?". ते रात्री साडेदहा अकराला शेवटचा फोन. मधे २०-२५ फोन. जरा काही बिनसलं नवऱ्याबरोबर की लगेच मम्मीकडे तक्रार. मग मम्मीचे सल्ले आणि तिने तिच्या नवऱ्यावर केलेले प्रयोग. मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. सक्ती नको. खरतर वडिलधाऱ्यांची नसती लुडबूड ही समस्या सोडवण्याऐवजी समस्या बिघडवूनच अधिक ठेवतात. एकत्र कुटुंब असणे म्हणजे संसारात लुडबूड करण्याचं अलिखित प्रमाणपत्र नव्हे.
आपली नाती, आपलं कुटुंब हे आपणच जपायचं असतं. नवरा बायकोचं नातं हे वरवर पाहता खूप सोपं पण तितकच गुंतागुंतीचं असतं. ते दोन शरीरांचं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा भागवण्याची सोय म्हणून एकत्र येणं नाही. नवरा बायको दोघांच्यातल्या चांगल्या गुणांची प्रकर्षाने वृध्दी करणारी सुप्रजा घडवणं हे विवाहाचं खरं उद्दीष्ट आहे. संस्कारांची बीजं रोवणं आणि पर्यायानं चांगला समाज घडवणे हे विवाहसंस्थेचे कार्य आहे. आम्ही आमच्याच मुळावर उठलोय. संस्कारांच्या वळचणीतली ही काड्या काड्या जमवून बांधलेली घरटी कायद्याच्या काठीनं अशी नका पाडू. घटस्फोट हा शेवटचा पर्याय आहे. सुरुवातीचाच नाही.
झंपी, फसवणूक केली असेल तर ते
झंपी, फसवणूक केली असेल तर ते वेगळे पण तुम्ही तर सरसकट "बायकोला मूलच होणार नाही(पण नवर्याला हवय) तर काय करणार एकत्र राहून?" असे विधान केले आहे.
असे म्हणणे योग्य आहे का हे तुम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून सांगा.
केवळ मूल होत नाही म्हणून बायकोला सोडून द्या !! ही फार भयानक मानसिकता आहे. त्याचे कुठलेच समर्थन करता येणार नाही.
बेफिकीरजी, <नैसर्गीक नियमांना
बेफिकीरजी,
<नैसर्गीक नियमांना विचारांच्या परिघात प्रवेशही न देणारा असा आत्मप्रौढीयुक्त, अज्ञानजन्य व बावळट विचारांचे हिरीरीने प्रतिनिधित्व करणारा लेख वाटला.>
आपले मत आहे. आदरणीय आहे. नाही समजलं आत्मप्रौढीयुक्त कसं? नैसर्गिक नियम कुठले आपणास अपेक्षित आहेत हे अवश्य सांगा. आपली विशेषणे नाही पटली. तरीही बेफिकीर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पण "मूल नकोच" असे
पण "मूल नकोच" असे वाटणारी...कठीण आहेत सापडण. >> मूल नको असा विचार जेव्हा "काही" जोडपी करतात तेव्हा मला तरी तो त्यांचा सूज्ञपणा जाणवतो. मी कित्येकदा ( नाही नेहमीच) ऐकलंय की म्हातारपणी आपल्याला आधार हवा म्हणून मूलगा हवा. मग जितक्या मुली होतील त्यावर एक चान्स मुलाचा घ्यायचा. म्हणजे थोडक्यात लोक स्वार्थीपणाने मुलं जन्माला घालतात. (म्हातारपणची सोय म्हणून.) मी तर एकही जोडपं पाहिलेलं नाही जे म्हणतंय ती आमच्या प्रेमाचं प्रतिक म्हणून एक मूल हवं. सोसायटी, सासरचं प्रेशर म्हणून पोरं जन्माला घालायची. पण तेव्हा त्यांच्या भवितव्याचा विचार कुठे केला जातो. मग मूल नको म्हणणारी जोडपी मुलाच्या भवितव्याचा आणि त्यातील संभाव्य धोके(धोके योग्य शब्द नाहीये पण मला तोच सुचतोय) जाणून घेऊन जर मूल होऊ न देण्याच्या निर्णयाप्रत पोहोचले असतील तर त्यात गैर ते काय?
माझ्यामते काही कारणं खालिलप्रमाणे.
उलट अशा निर्णयांचं स्वागत झालं पाहिजे.
१. देशाची लोकसंख्या २. आपली आर्थिक कुवत ३. स्पर्धा ४. उत्तम संस्कार व त्यासाठी पाल्याला द्यावा लागणारा वेळ आणि इतर बरिच कारणं.. इत्यादी गोष्टींची कमतरता असेल तर मूल जन्माला घालून उपयोग काय?
याशिवाय काही जोडप्यांचा आरोग्याशी संबंधितही काही प्रॉब्लेम असू शकतो, ज्यामूळे त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला असेल...
तर त्यांच्याकडे अशा पडीक नजरेने पाहण्यात काय हाशिल?
लग्नाचंही तेच.. आत्ता उमेद आहे तोवर करशील एकटं.. म्हातारपणी साथ संगत लागते..... म्हणून करायचं लग्न?
वंदनाजी, तुमचे विचार जुने
वंदनाजी,
तुमचे विचार जुने आहेत हे तुम्हीच कबूल केले ते एक बरे. पण ते जुने असल्यामुळे चांगले/वाईट ठरत नाहीत, माझा तो मुद्दाच नाही. तुमच्या लेखातील विधानांची एक सुस्पष्ट संगती आहे आणि ती माझ्यामते खालील गृहितकांवर आधारीत आहे.
१] पुरातन भारतीय संस्कृती शास्त्राधारीत व सर्वोत्तम होती.
२] 'परकीय' आक्रमकांमुळे तिचा र्हास झाला.
३] ती प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही, आता आक्रमणाची जागा 'पाश्चात्य' संस्कॄतीने घेतली आहे.
४] याचे एक उदाहरण- 'घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण'.
आय एम नॉट कन्सर्न्ड अबाउट द ट्रूथ ऑफ द प्रिमायसेस, बट अबाऊट द इनव्हॅलिडीटी ऑफ द आर्ग्युमेंट.
अर्थात अशी कोणतीही गृहितके तुमच्या मनात नाहीत असे तुम्ही म्हणू शकताच.
प्रश्न राहिला लेबल लावण्याचा, कवाडे बंद करण्याचा. कुठल्याही विषयावर आपण जेंव्हा काही एक भूमिका घेतो तेंव्हा लेबल हे लागणारच. त्याचा अर्थ समोरच्याने कवाडे बंद करुन घेतली आहेत असा होत नाही.
बरं झालं एकदाचं लिहून टाकलं @
बरं झालं एकदाचं लिहून टाकलं @ अग्गावभौ
आगावा नेमकी पोस्ट. गुरूजी
आगावा नेमकी पोस्ट. गुरूजी झालायस ते बरोबरच
नताशा +१ आणि आगाऊ + १०१ गा
नताशा +१
आणि आगाऊ + १०१
गा पै
जर केवळ कायद्याचं शिक्कामोर्तब हाच अर्थ असेल, तर लग्न या गोष्टीस एव्हढे प्राधान्य द्यायची गरज का भासावी? केवळ नरमादी यांनी एकत्र यावं एव्हढाच हेतू आहे का लग्नाचा? <<<
लिव्ह इन आणि लग्न यात माझ्यामते कायद्याचे शिक्कामोर्तब हाच अर्थ आहे पण सगळ्याठिकाणी तशी परिस्थिती नसते. इतर आणि बाहेरचे अनेक त्रास झेलण्यात वेळ जाऊ नये, तिथेही झगडत बसावं लागू नये म्हणून सोयीसाठी कोणी कायदेशीर लग्न केलेले असू शकतेच.
दोन्ही संकल्पनांमधे तसा काहीच फरक नाही. लिव्ह इन ही व्यवस्थाही केवळ नरमादी एकत्र यावं एवढ्याच हेतूची नसते. लिव्ह इन संदर्भाने जुन्या मायबोलीवर बरीच मोठी चर्चा झाली होती. ती जरूर वाचावी ही विनंती.
आगाऊ + १०१
आगाऊ + १०१
नताशा (००:२२ ची पोस्ट), आगाऊ
नताशा (००:२२ ची पोस्ट), आगाऊ +१००
हा लेख अतिशय प्रामाणिकपणे लिहिला गेला आहे हे खरंच आहे. वंदना, पण काय होतंय ना की तुम्ही तुमच्या आसपासच्या समाजाच्या एका छोट्या हिश्शाकडे बघून ही निरिक्षणं नोंदवताय. ते स्वाभाविकच आहे. पण ती निरिक्षणं अगदी मराठी समाजासाठी सुद्धा लागू होत नाहीत इतकी भिन्नता समाजात असते. त्या मुळे पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय इथे चालवता येत नाही. इतरांचं अनुभवविश्व, आकलनविश्व, सामाजिकतेचा परीघ, वैचारिक जडणघडणीचा प्रवास हा वेगळा, कधीकधी आपल्यापेक्षाही जास्त आवाक्याचा असतो, किंवा इथल्या बर्याच जणांचा आहे. साहजिकच तुमच्या लेखावर अशा सगळ्या प्रतिक्रिया आल्यात. तुम्हीसुद्धा आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हळूहळू सुरुवात केलीत तर तुम्हालाही इतर दृष्टीकोन उलगडत जातील. यामधे आम्ही सगळे फार शहाणे असं कुणाचंच म्हणणं असेल असं वाटत नाही.
आगावा, या पुरातन भारतीय संस्कृतीविषयी वाचायला आवडेल बर्का
पुरातन भारतीय संस्कृती
पुरातन भारतीय संस्कृती शास्त्राधारीत व सर्वोत्तम होती.
पूर्वीचे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ही व्यवस्था एकदम योग्य. हल्लीचे लोक गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात जात नाहीत. मुलाचं लग्न झालं तरी मधेमधे लुडबुड करत बसतात.
>>> या मुद्द्याला माझे जोरदार समर्थन.
हल्लीचे लोक गृहस्थाश्रमातून
हल्लीचे लोक गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात जात नाहीत. मुलाचं लग्न झालं तरी मधेमधे लुडबुड करत बसतात. <<<
अगदी...
घटस्फोट या शब्दाच्या
घटस्फोट या शब्दाच्या अर्थापासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. हा शब्द असा का ? घट म्हणजे घडा, माठ, मडके. त्याचा स्फोट कसा होतो ? लक्षात घ्या. फुटणे हा शब्द वापरला नाही. बाँबस्फोट प्रमाणे हा घटस्फोट आहे. स्फोट कधी होतो ? एखाद्या वस्तूत उर्जा इतकी ठासून भरावी कि त्या उर्जेला अटकाव करण्यासाठी ती वस्तू पुरेशी समर्थ नसते तेव्हां. उदा. फुगा फुगवणे. यात फुगास्फोट होतो. घट हा ही मातीचाच नाही का ? तीत पाणी राहू शकतं. पण नकारात्मक उर्जा साठवण्यासाठी मडके काय कामाचे ? ही उर्जा जेव्हां उत्कलनबिंदूच्या वर जाऊन दाब देईल तेव्हां संसाररुपी मटके आणि दबावाखालील मन, ज्यास सामंज्स्याच्या मातीच्या भिंतीने घडवले आहे त्याचा स्फोट होणारच कि.
जय घटोत्कच.
मूळ शब्दाचा अर्थ न पाहताच मत
मूळ शब्दाचा अर्थ न पाहताच मत देणे म्हणजे "पगार होईना आणि मॉल जळाला" अशी गत आहे.
अतिअवांतर: स्त्रीच्या
अतिअवांतर: स्त्रीच्या नैसर्गिक प्रेरणा नक्की कोणत्या आणि ह्या प्रेरणा नक्की कोणी
ठरवल्या ह्यावर जाणून घ्यायला आवडेल.
पियु परी, तुम्ही म्हंटलंय ते
पियु परी, तुम्ही म्हंटलंय ते अवांतर आजिबात नाहीये. हा खरंतर मूलभूत प्रश्न आहे. पण लक्षात कोण घेतो.
आ.न.,
-गा.पै.
१. नैसर्गीक नियम - बळी तो कान
१. नैसर्गीक नियम - बळी तो कान पिळी:
तुमच्या लेखातील विधानः
>>>भारतावर झालेली सततची आक्रमणं, आक्रमणातून निर्मित निर्नायकी व्यवस्था, भौगोलिक व वैचारीक गुलामगिरी आणि बदलत्या सामाजिक संवेदनांची संक्रमणावस्था ही कौटुंबिक जीवनात झालेल्या बदलांची काही प्रमुख कारणं आहेत. आश्रमव्यवस्थेवर आधारलेली कौटुंबिक समाजव्यवस्था आपण बदलली. एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली. समृध्द असलेली कुटुंबे चौकोनी झाली. घर भर अनेकविध नात्यांनी बांधलेली माणसं दिसेनाशी झाली. स्वत:च्याच जन्मदात्यांना भाऊ, काका, अण्णा व जन्मदात्रीला वहिनी, आक्का, काकू म्हणणारी पिढी संपत चालली आहे. ही एकत्र कुटुंबाची नामाभिधानाची गंमत नावापुरतीही आता दिसेनाशी झाली. काका, मामा आत्ते ही सख्खी नाती सोडल्यास आमच्या मुलांना इतर नाती माहितीही नाही अशी परिस्थिती झालीय.<<<
यावर माझे म्हणणे:
सामर्थ्याच्या बळावर एका संस्कृतीकडून दुसर्या संस्कृतीची उलथापालथ होणे हे निर्विवाद शक्य आहे हे गृहीत धरूनच जुन्या युगातील शिकवणींचा टिकाऊपणा तोलायला हवा. एकत्र कुटुंब पद्धती जवळपास बंद झाल्यामुळे जसे घटस्फोटांचे प्रमाण वाढू शकले असेल, तसेच गृहकलह कमी झाले असतील. पत्नी हा आपला सर्वात महत्वाचा जीवनसाथी असल्याची भावना मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या मानसिकतेत आली असेल व त्यातून स्त्रीबद्दलच्या दृष्टिकोनाला मानवी झालर आलेली असेल. आपण आपल्या समाजावर संस्कृतींचे लादले जाणे अथवा आपली संस्कृती अप्रभावित ठेवणे साधू शकत नाही कारण भारतासारख्या समाजावर माध्यमांमुळे प्रगत संस्कृतींचा प्रभाव वाढत आहे व एक पिढीच्या पिढी तिकडे खेचली जात आहे. हा मोह चांगला की वाईट ही बाब निराळी, पण तो नैसर्गीक आहे व घटस्फोट याही बदललेल्या संस्कृतीत कमी होतील हे शक्य आहे. ज्या नातेवाईकांचा संबंध समारंभ, सण अथवा अंत्यसंस्कारांपुरताच येतो त्यांच्याशी वागण्याबाबत स्त्रीवर पूर्वी लादली जाणारी बंधने आज पूर्वीइतकी नाहीत ही सुखद बाब आहे. भारतीयांना गुलामी सर्वात चांगली जमते (सांस्कृतीक) यामागे आपली शासनप्रणाली, सांस्कृतीक वैविध्य, प्रांतीय एकसंघतेचा अभाव, अमाप लोकसंख्या हे अनेक नैसर्गीक व भौगोलीक घटक आहेत. या घटकांना आपल्या विचारप्रणालीमध्ये स्थान मिळालेले नाही. मिळाले असते तर घटस्फोटांचे प्रमाण वाढल्यामुळे जसा धक्का बसला आहे तसाच स्त्री (निदान शहरांमद्ये तरी) किती मोकळी आणि स्वतंत्र झाली आहे व ते किती आवश्यक होते याचाही सुखद धक्का बसायला हवा होता.
=============================
२. आत्मप्रौढीयुक्त:
तुमच्या लेखातील विधानः
>>>मतभेद, मनभेदांचं प्रमाणही कमी नसेल, पण ते कुटुंबव्यवस्था संपुष्टात यायला लागली आहे ह्या विचाराप्रत येण्याएवढं नाही. संसारीक चिंता, समस्या ह्या विषयावरील चर्चा, ज्या आम्ही मैत्रिणी हेडगेवारच्या आसपास दररोजच्या बौध्दीक विवादातून, अनुभव शेअर करण्यातून मांडतो किंवा अशाप्रकारच्या इतरत्र घडणाऱ्या चर्चांचा, "भांडणं काय प्रत्येक घरात आणि नवराबायकोत असतात" हा समाधानात्मक शेवट असतो. आणि तो तसा व्हावा असं बऱ्याच जणींना वाटतं देखिल.
"स्त्री" हा केंद्रबिंदू मानून शोधनिबंध व तत्संबंधी लेखाची तयारी करीत असताना, एका वाढत चाललेल्या समस्येने माझे लक्ष वेधले. माझ्या स्वत:च्या काही पूर्वग्रहांना, विचारांना प्रचंड धक्काच बसला. अजुनही त्यावर शोध सुरूच आहे. काही अडचणी आहेत. ज्या ह्या लेखमालेच्या निमित्ताने चर्चेस येऊन त्यापध्दतीने जागृती होईल असे वाटते. प्राप्त माहितीचे आकडे चक्रावून टाकणारे होते. होते.<<<
यावर माझे म्हणणे:
घटस्फोट हा कित्येक स्त्रियांसाठी एक सुटका असेल हे आपल्याला जाणवलेले दिसत नाही. कित्येक स्त्रिया वेगळ्या होऊन अधिक शांततेत व समाधानात जगत असतील हा दृष्टिकोन तुमच्या शोधनिबंधाच्या तयारीच्या वेळेस तुमच्या मनाला भिडलेला दिसत नाही. तुम्हाला जी समस्या वाटते ती त्या स्त्री पुरुषांना सुटका वाटत असेल हे न जाणवण्यामागे स्वतःची विचारप्रणाली सुयोग्य असल्याचा दावा आहे. आपलेच विचार मुळापासून तपासण्याची तयारी त्यात नाही.
========================
३. अज्ञानजन्य व बावळट विचारांचे हिरीरीने प्रयत्न करणारा:
तुमच्या लेखातील विधानः
>>>मुलीला जर स्वत:च्या संसारात कसं खंबीर रहावं, नवराबायकोंचे लहानसहान प्रश्न नाही सोडवता येत, तर उपयोग काय त्या इंजिनियरींगच्या डिग्रीचा आणि ६५,०००/- रुपये पगारांचा. नवऱ्यामुलाला शिकवताना आम्ही हाडाची काडं केली आहेत. त्याला शिकता कमावता केला. आज इंजिनियर झालाय, ६५,०००/- रुपये पगार आहे, त्यामागे आम्ही त्याला लहानाचा मोठा केला आणि मग तुला, सुनबाईला मिरवत घरी आणलं. आम्ही एकत्र राहतो, म्हणून आम्हाला मुलाच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे नाही चालायचं. नवरा बायकोचे संसारातले प्रोब्लेम्स त्यांचे त्यानीच सोडवायचे असतात. नवरा बायकोला संवाद साधू दे एकमेकांशी. एकमेकांना समजून घेवू देत ना. नाही सुटली समस्या आणि ते दोघं आपणहून आले सल्ला मागायला तर आणि तेवढाच सल्ला द्यावा. <<<
महिना ६५००.०० च रुपये मिळवणार्यांचा एक तर यात विचार केलेला दिसत नाही. दुसरे म्हणजे 'ढवळाढवळ' हे एक महत्वाचे कारण समजले गेलेले दिसते. निव्वळ सवयी आणि वागणे (वि बा सं, व्यसने अथवा मारहाण ही कारणे तर फार दूरच) पूरक नाही म्हणूनही घटस्फोट घेतले जातात याकडे लक्ष गेलेले दिसत नाही. अतिशय सीमीत घटकांवरून मतप्रदर्शन केलेले दिसते व त्या मतप्रदर्शनाला एका टिपीकल जुन्या काकूबाईच्या अडेलतट्टू कौटुंबिक अपेक्षांचा रंग चढलेला दिसतो. मी आपल्याला काकूबाई म्हणत नाही आहे. पंचविसाव्या वर्षी मुलीचे लग्न झाल्यामुळे तिचे विचार व्यवस्थित घडवले जात नाहीत (बालविवाहाचा आपण पुरस्कार केलेला नाहीत हे नोटेडच) हे आपण म्हणता! पण लहान वयात लग्न झाल्यामुळे विचार घडवले जातात की एका प्रेशरखाली त्या मुलीला ठेवले जाते? तिचे विचार ऐकून घेण्याची तयारी सासरचे लोक दाखवू शकतात? मग भले फक्त अठरा वर्षांची असो! तिला तिचा नवरा विचारेल की काय गं बये इतक्या मोठ्या कुटुंबात राहायला चालेल ना तुला? या इतक्या जबाबदार्या आणि अपेक्षा पेलशील ना?
नवल वाटावे इतका 'अ-व्यापक' लेख आहे असे माझे मत!
======================================
-'बेफिकीर'!
बेफिकीर अनुमोदन!! बाकी ताई ,
बेफिकीर अनुमोदन!!
बाकी ताई , इतके सगळे प्रतिसाद वाचून वाटतेय की तुम्ही एकदम शेवटच्या पायरीवर उडी मारायाचा प्रयत्न करताय. आधी 'लग्नापासून' सुरवात करा बरे. पाया पक्का झाला तरच पुढे जाता येईल ना.
लग्न का करावे? केलेच पाहिजे का? नाहीतर काय होईल ? करायचेच असेल तर जोडीदार कसा निवडावा ई ई.
आपल्याकडे तर लग्न जमवणे हे अजुनही ८०% व्यावहारीक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे अनेक घटस्फोटांची सुरवात लग्नापासूनच होते. लग्नच जर मन मारून तडजोडीच्या तत्वावर झालेले असेल तर त्याचे भविष्य काय चांगले असणार , नाही का?
तर आधी 'बेसिक कन्सेप्ट' क्लीअर करूयात म्हण्जे पुढे जाणे सोप्पे होईल.
अर्थात , या विषयाच्या आसपासची बरीच चर्चा आधीच मायबोलीवर होऊन गेलेली आहे. तेव्हा नविन लग्नाविषयी धागा काढताना जुने सगळे धागे वाचून काढलात तर पुनरावृत्ती होणार नाही.
बेफिकीरजी, <अतिशय सीमीत
बेफिकीरजी,
<अतिशय सीमीत घटकांवरून मतप्रदर्शन केलेले दिसते व त्या मतप्रदर्शनाला एका टिपीकल जुन्या काकूबाईच्या अडेलतट्टू कौटुंबिक अपेक्षांचा रंग चढलेला दिसतो.>
आपले निरिक्षण बरोबर आहे. मला अपेक्षित असलेली माहिती अजुनही मिळत नाही. माझे प्रयत्न सुरू आहेत. आपण माझे सर्व प्रतिसाद वाचलेत तर आपण माझ्याबद्दलचे "अडेलतट्टू अपेक्षा ठेवणारी" व "आत्मप्रौढी असणे" हे मत बदलाल असे वाटते. आपण ज्या वातावरणात वाढतो, जसे अनुभव आपल्याला येतात त्यावरून आपण आपले मत किंवा विचारधारणा बनवतो, बदलतो.
डेलियाजी,
अवश्य लिहीन. आमचे कुटुंबमित्र अनंत गोब्रे घरी आले होते. ते म्हणाले "ही चर्चा मी वाचली. पण घटस्फोटाचे सर्वात महत्वाचे व सर्व घटस्फोटात समान असणारे कारण म्हणजे लग्न". तेंव्हा वेळ मिळाला की अवश्य लग्न या विषयावर लिहीन.
सौ. वंदना बर्वे.
सौ. गळुन पडले ? हा
सौ. गळुन पडले ? हा माबो-इफेक्ट तर नाहिना ?
घटस्फोट, लग्न, लिव्ह ईन
घटस्फोट, लग्न, लिव्ह ईन रिलेशनशीप, मोनोगॉमी ह्या सगळ्या गोष्टी एकाच पुरोगामी पद्धतीच्या विचारसरणीच्या आहेत. इथे प्रत्येक जण आपण जे केले तेच कसे योग्य आहे समजवण्याच्या प्रयत्नात दिसतो आहे. कोणी सर्व बाजूने विचार करून काय योग्य आहे हे मांडलेल नाही.
आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे प्रुव्ह करत जगणं हेच सर्वात मोठ्ठ फेल्यूअर आहे ( इंग्रजी शब्दां सारख वजन मराठी शब्दात नाही
, वंदना ताई तुमच्या लेखाचही तसं काहीसं झाल आहे. तुम्ही फटफट घटस्फोट घ्या अस लिहील असतत तरी लोकांनी अक्कल काढली असतीच हा वेगळा मुद्दा. पण तुमचे सगळे प्रतिसाद प्रचंड आवडले या बद्दल तुमचे अभिनंदन..
वाईट-चांगल, चुक अचुक असं काही नसतं हो, ऑडीयन्स यश-अपयश ठरवतो.
इथे प्रतिसाद दिला आहे त्यांनी लग्न का केलं ह्याच कारण सांगितलं नाही.
लग्न बरोबर, घटस्फोट चूक, मॉम-डॅड म्हणणं चुक ह्या बाबी गृहीत धरून लिहील्या लेखाचा मूळ मुद्दाच न पटलेले ह्या लेखावर चर्चा काय करणार?
सुप्रजा वगैरे घडवणं अस काही नसतं, प्रत्येकजण आपल्या अकले प्रमाणे चालतो. तुम्ही जे आहात ह्यात तुमच्या आईबापाचा फार काही हातभार नसतो. मुल आणि त्यांचे संगोपन, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती सारखी फालतू पुस्तक वाचून ज्ञानेश्वर जन्मले तर झालच ना... गर्भसंस्कार.. चोचले आहेत सगळे. बहीणाबाईची आई गेली होती का गर्भसंस्कार क्लासेस ना..? एकाच घरात वाढलेली भावंड कितीशी सारखी असतात?
आईबापाचा घटस्फोट झालेले कोणी असतिल तर त्यांचे विचार ऐकायला आवडतिल. त्यांचा विचार कोणी केलाला दिसत नाही.
कॉपॅटीबिलीटी वगैरे काही नसत, आपापल्या सोई प्रमाणे जो-तो कॉपॅटेबल होतोच. मला समुद्र किनारी आलीशान बंगला हवा, समोर दोन एकरची बाग हवी, १५-२० नोकर हवेत ते पण कॉपॅटेबल अस म्हणुन चालतं का? कॉपॅटीबिलीटी वगैरे फालतूगिरी आहे, काय ऑप्शन्स आहेत हे बघुन सो कॉल्ड कॉपॅटेबिलीटी ठरते. ज्यांच लग्न झाल नाही त्यां लग्नाळूंना विचारा, त्यांच मत असं असेल "आधी लग्न तर होऊ दे मग बघु काय ती कॉपॅटीबिलीटी".
माझ्या मते लग्न लिव्हईन किंवा एकत्र रहाणे हाच पुरोगामी विचारच आहे, सोईस्कर अॅडजेस्टमेंट, एक प्रकारची.
विवाह संस्था ही सगळ्या प्रॉब्लेमसच मुळ कारण आहे,लिव्हींग बिईंग चे प्रजनन हे प्रमुख उदीष्ठ (एम) आहे आणि विवाह संस्था ह्या उदीष्ठाचे अनवाँटेड बाय प्रोडक्ट आहे.
कॉज्यूअल अनॅलिसिस (कारण मिमांसा) खालील प्रमाणे.
१) विवाह म्हंटल की दोन व्यक्ती आल्या, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आली. (प्रोब्लेम)
२) दोन व्यक्ती आल्या की त्यांची कुटूंब आली, म्हणजे २ पेक्षा जास्त व्यक्ती (मेजर प्रॉब्लेम)
३) त्यांचे नाते वाईक आले की त्यांची कुटूंब आली म्हणजे भरपुर कुटूंब आली (मेजरच्या प्रॉब्लेम)
४) भरपुर कुटूबं म्हणजे समाज झाला, म्हणजे शेवटी ही बाब सामाजिक झाली. (प्रॉब्लेम हाता बाहेर)
५) प्रजनन ह्या एका प्रॉडक्ट साठी, फालतूचे ईमोशन आणि फिसीकल बाय प्रोड्क्ट जास्त आहेत. ( रिजन टू डिस्ट्रॉय इट)
विवाह संस्था ही सगळ्या प्रॉब्लेमसच मुळ कारण हे प्रूव्हड..
मग कुठल्या प्रकारची संस्था असयला हवी. आता प्रॅक्टीकल विचर करता.
प्रत्येकाने वेगळ रहाव, नो स्ट्रींगस अटॅच्ड. पण मग त्या सिनेमा सारखं झाल तरं. इमोशनल होणे हा शिक्षा पात्र गुन्हा ठरवावा. (इमोशनलिसम इज रूट कॉस ऑफ ऑल क्राईम्स )
(प्रजनन ह्या एकमेव मुळ उद्देशाला धरुन) पण मग पोरं जन्माला कशी घालायची आणि सुप्रजा?
सुरवातिला प्रत्येक स्त्रीने (जिला शक्य आहे तिने) एक मुल जन्माला घालायच. जर टेस्ट ट्यूब बेबी ने मुल जन्माला घालण शक्य असेल तर स्त्रीच्य मागे तिही कटकट नको. पोरांच संगोपन करणारी एक "सामाजिक" संस्था वगैरे काढायची ( आता शाळा आहेत ना तशीच) ती पोर वाढवतील आणि काय ते संस्कार करतिल. कोणाची कोणाला बांधिलकी नाही. मामा , काके, मावशा, आत्या, सासू, सासरे बाहू बहीण अशा सगळ्या लोडेड नात्यांची गरज नाही. हे असले काय नसले काय काही फरक पडत नाही कोणाला हे नातेवाईक नाही म्हणुन तो मरत नाही की जन्माला यायचा रहात नाही. टेस्ट ट्यूब बेबी मग आई-बाप भाऊ बहीण पण लोडेड नातीच, त्यांचीही गरज नाही.
तुमच्यातल्या इतरांची लुडबुड नको म्हणणार्यांनी आणि घटस्फोट वाचवा किंवा घटस्फोट घ्या हे म्हणणार्यांना हे पटणार नाहि. पण मी मांडलेली इंडीव्हीज्युलिस्टीक सामाजिक संस्थाच बेस्ट आहे आणि नसेल तर कारण सांगा.
आता ज्यांच्याकडे कारणं नसतिल तर ते म्हणतिल "तू म्हणुन काय होतं?" तर ते तुम्हाला ही लागू पडतं.
(इथे अशी दोन्ही प्रवाहांना सोडुन विधानं करण्यासाठी डुआयडीचा उपयोग करतात, त्या शेपूट घालू डूआयडीचा निषेद..)
सत्यजित, >> मी मांडलेली
सत्यजित,
>> मी मांडलेली इंडीव्हीज्युलिस्टीक सामाजिक संस्थाच बेस्ट आहे आणि नसेल तर कारण सांगा.
ही सोय केवळ घटस्फोटितांसाठीच आहे की सर्व स्त्रीपुरूषांसाठी?
आ.न.,
-गा.पै.
<<आपण घेतलेला निर्णय योग्य
<<आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे प्रुव्ह करत जगणं हेच सर्वात मोठ्ठ फेल्यूअर आहे >>
नाही पटलं. स्वतःला जस्टीफाय करणं हे अगदी नॅचरल आहे.
<<वाईट-चांगल, चुक अचुक असं काही नसतं हो, ऑडीयन्स यश-अपयश ठरवतो. >>
ऑडियन्स ? हा कसला शो आहे ?
<<इथे प्रतिसाद दिला आहे त्यांनी लग्न का केलं ह्याच कारण सांगितलं नाही.>>
मी सांगतो. माझ्या एका सिनियर कलिगने लग्न केलं नव्हतं. का? म्हणून विचारल्यावर तो उलट विचारायचा "तूम्ही का केलत?" यावर बरच वाचल्यावर मला पटलेलं कारण जे धार्मिक आणि सामाजिक आहे ते म्हणजे,
धर्मात जन्मलेल्या प्रत्येकावर तीन ऋणं मानली गेली आहेत व त्यासंबधित कर्तव्य सांगितली गेली आहेत.
१. मातृ-पितृ ऋण
२. देवऋण आणि
३. समाज ऋण
ज्या आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला, सांभाळलं आणि आपल्या पायावर आपल्याला उभं केलं त्यांची सेवा करुन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं
ज्या धर्मात तुम्ही जन्मलात त्या धर्माचं यथामती यथाशक्ती पालन करणे.
ज्या समाजव्यवस्थेचा तुम्ही भाग आहात, ज्याचे फायदे तुम्ही घेत आहात, तो समाज तसाच चालू रहावा याकरता योग्य मार्गाने संतती जन्मास घालून त्यावर योग्य संस्कार करुन त्यांना जबाबदार नागरीक बनवणे.
<<सुप्रजा वगैरे घडवणं अस काही नसतं, प्रत्येकजण आपल्या अकले प्रमाणे चालतो.>>
अमान्य
<< तुम्ही जे आहात ह्यात तुमच्या आईबापाचा फार काही हातभार नसतो >>
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर नक्कीच आहेत. मला माझ्या आईवडीलांनी घडवलं, शिस्त लावली आणि संस्कारही दिले.
<<मुल आणि त्यांचे संगोपन, घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती सारखी फालतू पुस्तक वाचून ज्ञानेश्वर जन्मले तर झालच ना... गर्भसंस्कार.. चोचले आहेत सगळे. बहीणाबाईची आई गेली होती का गर्भसंस्कार क्लासेस ना..? एकाच घरात वाढलेली भावंड कितीशी सारखी असतात? >>
हा मुद्दाच समजला नाही. जर एखाद्याला या संस्कारात अर्थ वाटत नसेल तर त्याने करु नयेत. तुम्हाला पटत नाहीत म्हणून हे संस्कार अर्थहीन, फालतू आहेत ?
<< कॉपॅटीबिलीटी वगैरे काही नसत, आपापल्या सोई प्रमाणे जो-तो कॉपॅटेबल होतोच. मला समुद्र किनारी आलीशान बंगला हवा, समोर दोन एकरची बाग हवी, १५-२० नोकर हवेत ते पण कॉपॅटेबल अस म्हणुन चालतं का? कॉपॅटीबिलीटी वगैरे फालतूगिरी आहे, काय ऑप्शन्स आहेत हे बघुन सो कॉल्ड कॉपॅटेबिलीटी ठरते. ज्यांच लग्न झाल नाही त्यां लग्नाळूंना विचारा, त्यांच मत असं असेल "आधी लग्न तर होऊ दे मग बघु काय ती कॉपॅटीबिलीटी". >>
यात आपल्याला कॉम्पॅटिबिलीटी या शब्दाचा नक्की कोणता अर्थ अभिप्रेत आहे ? कॉम्पॅटिबिलीटी म्हणजे एकमेकांशी जुळवून घेण्याची क्षमता ? मग अॅडॉप्टीबिलीटीपेक्षा हे काय वेगळे आहे (सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, त्यामुळे मला संदर्भ कळला नसेल)
<<माझ्या मते लग्न लिव्हईन किंवा एकत्र रहाणे हाच पुरोगामी विचारच आहे, सोईस्कर अॅडजेस्टमेंट, एक प्रकारची. विवाह संस्था ही सगळ्या प्रॉब्लेमसच मुळ कारण आहे,लिव्हींग बिईंग चे प्रजनन हे प्रमुख उदीष्ठ (एम) आहे आणि विवाह संस्था ह्या उदीष्ठाचे अनवाँटेड बाय प्रोडक्ट आहे. >>
शेवटच्या वाक्यातले "अनवॉन्टेड बाय प्रॉडक्ट" हे शब्द पटले नाहीत. काहिंकरता हे मोस्ट वॉन्टेड मेन प्रॉडक्ट असू शकत नाही का ?
<<कॉज्यूअल अनॅलिसिस (कारण मिमांसा) खालील प्रमाणे.
१) विवाह म्हंटल की दोन व्यक्ती आल्या, म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आली. (प्रोब्लेम)
२) दोन व्यक्ती आल्या की त्यांची कुटूंब आली, म्हणजे २ पेक्षा जास्त व्यक्ती (मेजर प्रॉब्लेम)
३) त्यांचे नाते वाईक आले की त्यांची कुटूंब आली म्हणजे भरपुर कुटूंब आली (मेजरच्या प्रॉब्लेम)
४) भरपुर कुटूबं म्हणजे समाज झाला, म्हणजे शेवटी ही बाब सामाजिक झाली. (प्रॉब्लेम हाता बाहेर)
५) प्रजनन ह्या एका प्रॉडक्ट साठी, फालतूचे ईमोशन आणि फिसीकल बाय प्रोड्क्ट जास्त आहेत. ( रिजन टू डिस्ट्रॉय इट) >>
मुळात लग्न हे फक्त प्रजननासाठीच केलं जातं ? तसं समजत असाल तर तुम्हाला अजून लग्नाचा अर्थच समजला नाही असं म्हणावं लागेल. मला नाही वाटत एव्हढी वर्ष टिकलेली, जगात सगळ्यांनी अंगिकारलेली लग्नसंस्था रीप्लेस करण्यासाठी तोलामोलाचा पर्याय उपलब्ध आहे.
<<विवाह संस्था ही सगळ्या प्रॉब्लेमसच मुळ कारण हे प्रूव्हड..>>
नॉट रीयली. तसं म्हंणायचं झालं तर जन्माला येणं हेच मृत्यूचं मूळ कारण आहे असं म्हणावं का ? मुळात वरचे सगळे नंबर्स, समाज ह्या गोष्टीला जास्त लागू होतात. तुमचा स्वत:चा विचार करा. हि सिस्टिम नसती तर तुम्ही स्वत: आज जे आहात ते आणि तसेच असता का ? (हे वैयक्तिक वाटत असेल तर विपूत जरुर कळवा, हा भाग उडवून टाकीन)
<<मग कुठल्या प्रकारची संस्था असयला हवी. आता प्रॅक्टीकल विचर करता. >>
तुम्ही मांडलेला विचार किती प्रॅक्टिकल आहे हे परत एकदा तपासा.
<<प्रत्येकाने वेगळ रहाव, नो स्ट्रींगस अटॅच्ड. पण मग त्या सिनेमा सारखं झाल तरं. इमोशनल होणे हा शिक्षा पात्र गुन्हा ठरवावा. (इमोशनलिसम इज रूट कॉस ऑफ ऑल क्राईम्स ) >>
नॉट ऑल. ईमोशन्स आर रूट ऑफ ह्युमॅनिटी. तुम्ही माणूस आणि भावना वेगळे काढूच शकत नाही. एक गोष्ट पक्की ध्यानी घ्या. निव्वळ कायदा तुम्हाला एखादी गोष्ट करण्यापासून थांबवू शकत नाही. तो तुम्हाला फक्त त्याच्या परीणामांची जाणीव करुन देतो. (एखाद्या रुढीसारखेच तर असतात कायदे)
<<(प्रजनन ह्या एकमेव मुळ उद्देशाला धरुन) पण मग पोरं जन्माला कशी घालायची आणि सुप्रजा?
सुरवातिला प्रत्येक स्त्रीने (जिला शक्य आहे तिने) एक मुल जन्माला घालायच. जर टेस्ट ट्यूब बेबी ने मुल जन्माला घालण शक्य असेल तर स्त्रीच्य मागे तिही कटकट नको. पोरांच संगोपन करणारी एक "सामाजिक" संस्था वगैरे काढायची ( आता शाळा आहेत ना तशीच) ती पोर वाढवतील आणि काय ते संस्कार करतिल. कोणाची कोणाला बांधिलकी नाही. मामा , काके, मावशा, आत्या, सासू, सासरे बाहू बहीण अशा सगळ्या लोडेड नात्यांची गरज नाही. हे असले काय नसले काय काही फरक पडत नाही कोणाला हे नातेवाईक नाही म्हणुन तो मरत नाही की जन्माला यायचा रहात नाही. टेस्ट ट्यूब बेबी मग आई-बाप भाऊ बहीण पण लोडेड नातीच, त्यांचीही गरज नाही. >>
सिस्टीम अॅग्रीड. हे शक्य आहे. फक्त एक गोष्ट सांगा. कोणत्याही प्राण्याच्या पूर्ण मानसिक वाढीसाठी सोशलायझेशन नावाची एक गोष्ट आवश्यक असते म्हणतात ती कशी साध्य करायची ? हॅव यू बीन अ पार्ट ऑफ ग्रोईंग चाईल्डज् लाईफ ?
<<तुमच्यातल्या इतरांची लुडबुड नको म्हणणार्यांनी आणि घटस्फोट वाचवा किंवा घटस्फोट घ्या हे म्हणणार्यांना हे पटणार नाहि. >> हे वाक्य गंडलय की माझ्या ध्यानी येत नाहीये ?
<<पण मी मांडलेली इंडीव्हीज्युलिस्टीक सामाजिक संस्थाच बेस्ट आहे आणि नसेल तर कारण सांगा. >>
अॅज अबाव्ह
आता शेवटचं, वरची सगळी पोस्ट हे फक्त तुमची पोस्ट वाचून लिहिली आहे. जर तुम्ही उपरोधिक लिहिले असेल तर क्षमस्व.
''लेकीच्या माहेरासाठी माय
''लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते'' अशी एक उक्ती आठवली.
सुरक्षिततेची ओढ, स्थितीप्रियतेची ओढ, हीसुद्धा असुरक्षिततेच्या भावनेतून पोसलेली अशा मूळ प्रेरणांमुळे आजवर अनेक लग्ने टिकली. अर्थात मुलांच्या हितासाठी हे काही अंशी चांगले असले तरी अशा सक्तीच्या सहजीवनाची झळ त्यांनाही लागतेच.आता पृष्ठभागावर येणारा प्रचंड कौटुंबिक शारिरीक- मानसिक हिंसाचार अनाचार याच अगतिक पर्यायहीन व्यवस्थेत फोफावलेला आहे.
अशा टोकाच्या केसेस साठी घटस्फोट हा संकटसमयी बाहेर पडण्याचा रस्ता आहे..एरवीही 'हे माझे एकमेव आयुष्य आहे आणि ते चुकीच्या दिशेने भरकटत चालले आहे हे मी आता स्वस्थ राहून पहाणार नाही ' या मानसिकतेला पोचल्यावर हा 'स्फोट' जर्दा यांनी म्हटल्याप्रमाणे होतो..
लग्न आणि घटस्फोट या एकाच वेळी अत्यंत व्यक्तीगत अन तरीही सामाजिक अशा घटना आहेत. त्यांचे सामान्यीकरण करणे कठीण तसेच त्यावर सरसकट भाष्य करणेही..आज व्यामिश्र अशा वास्तवात आपण रहातोय म्हटले तर पूर्वी तरी असे काय साधेसोपे होते हा प्रश्न उरतोच.अभिनिवेश घेऊन बोलणे किंवा अभिनिवेशाने बोललेले ऐकणे हे सोपे .
>>>ज्या आईवडीलांनी आपल्याला
>>>ज्या आईवडीलांनी आपल्याला जन्म दिला, सांभाळलं आणि आपल्या पायावर आपल्याला उभं केलं त्यांची सेवा करुन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणं
ज्या धर्मात तुम्ही जन्मलात त्या धर्माचं यथामती यथाशक्ती पालन करणे.
ज्या समाजव्यवस्थेचा तुम्ही भाग आहात, ज्याचे फायदे तुम्ही घेत आहात, तो समाज तसाच चालू रहावा याकरता योग्य मार्गाने संतती जन्मास घालून त्यावर योग्य संस्कार करुन त्यांना जबाबदार नागरीक बनवणे>>><<
माझ्या मताप्रमाणे, लग्न करताना कोणीच 'असा व ह्या प्रकारचा विचार' करून लग्न करत नसतं.
इतरांनी केलं म्हणून आपण सुद्धा म्हणून... .. बाकी काही नाही. नाहितर आयुष्यातला वेळ कसा घालवायचा हा प्रश्ण होइल हि भिती...
झंपी सत्यजितचा प्रतिसाद एकदम
झंपी

सत्यजितचा प्रतिसाद एकदम सायन्स फिक्शन वाटतोय. हळुहळु मॅट्रिक्स तयार होईल त्यातून.
मी लग्न का केले? ...
मी लग्न का केले? ... हम्म!
ज्याच्याशी लग्न केलं तो आवडला होता म्हणून.. मी जशी आहे आणि जशी असणारे.. हे त्याला मान्य होतं म्हणून.. आणि वाईस अ वर्सा.... वयानुसार परिपक्वतेमधुन, बदलणार्या अनुभव विश्वामुळे, हार्मोन्समधून मी आणि तो वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलणार आहोत हे आम्हाला मान्य होतं.. म्हणून.. आम्हाला अपत्य झालंचं (आता झालयं) तर त्याला सुरक्षिततेचे वातावरण लाभावं म्हणून..!
आणि महत्वाचं म्हणजे लग्न न करता एकत्र राहिलो आसतो तर दोघांच्या आईबाबांना झीट आली असती म्हणून!
उद्या घटस्फोट झालाचं.. तर तो कुठच्याही कारणाने होऊ शकतो... कारण आम्ही काळानुसार बदलणार हे गृहीत आहे.. आणि आम्हा दोघान्ना मान्य गृहितक आहे.. लेकीला कठीण जाईल..
पण एक व्यक्ती म्हणून आई किंवा बाबाला न रुचणारी गोष्ट/नातं त्यांनी मनाविरूद्ध ओढत रहावी हे बहुदा तिलाही मान्य नसेल
जाई-जुई, >> उद्या घटस्फोट
जाई-जुई,
>> उद्या घटस्फोट झालाचं.. तर तो कुठच्याही कारणाने होऊ शकतो... कारण आम्ही काळानुसार बदलणार हे
>> गृहीत आहे.. आणि आम्हा दोघान्ना मान्य गृहितक आहे.. लेकीला कठीण जाईल..
पूर्वीही घटस्फोट होत असंत. मात्र त्याला ही संज्ञा नव्हती. वानप्रस्थाश्रम असं म्हणत त्याला. संसारातून लक्ष काढून घेणे म्हणजे एक प्रकारची काडीमोड घेणेच मलातरी वाटते. मुलाला मूल झालं की पुरूष वानप्रस्थ स्वीकारायचे. स्त्रिया प्रामुख्याने घरी असायच्या त्यामुळे त्यांना वानप्रस्थासाठी घर सोडणे शक्य नसे. त्या घरच्या घरीच वानप्रस्थी होत. पुरूष मात्र घरापासून दूर जात.
हल्ली हे कितपत साधेल याची शंका आहे. परंतु हा मुद्दा ध्यानी घेऊन आयुष्य आखणे बरे पडेल. तसेही लेकीला बाळ झाल्यानंतरच हे करायचे असल्याने तिला तितकेसे जड जाणार नाही.
आ.न.,
-गा.पै.
<सौ. गळुन पडले ? हा
<सौ. गळुन पडले ? हा माबो-इफेक्ट तर नाहिना ? >
पेशवाजी,
नाही. अजुनही ते तसेच आहे. आपल्या आशिर्वादाने व माझ्या सुदैवाने ते अखंड राहो हिच प्रार्थना.
सकाळी मुलीला शाळेत पोहोचवायची घाई असते. घाईघाईत ते टंकीत करण्याचे राहून गेले. आपण ते निदर्शनास आणल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. मी ती प्रतिक्रिया संपादित करते.
सौ. वंदना बर्वे
majhya lagnala 7 mahine
majhya lagnala 7 mahine jhalit... aamchi joint family aahe.... ghari aamhi dogh, sasu, sasre , aani dir... 3 room ch rent ch ghar aahe aamch.... mi job karte...
majh lagna matrimonial through jhal...
majhya sasrche lok ghavatle aahe t.. tyanche vichar pan tasech aahet... tanchya mate sun mahnje fakat kam karnari machine.... tini nuste kam karav ... job karat asel ter pagar sasuchya hatat dyava... lagna adhi aamhi dogh jevha bolaycho... tevha navryache vichar mala tase vatle navte ... pan aata to pan sasuch aaikto... majhya gharat fakat sasu ch chalt... mala 2 nanda aahet... tya pan tashyach ahet... nehmi mala tech aiikavtat ki amhi kase divas kadle... aamhi kiti kast kele... vagere....
3 room chya gharat amahala kaslich privacy nahi... room change karaychi mahntla ter parvadt nahi... gharche sarve drink kartat sasra sodun... dir roj piyun yeto... aata aata job karay lagala ... navryach pan madhe madhe suruch ast.... jar kahi program asl kiva nanda ghari aalya ki ... tyanche navre aamchya ghari basun daru pitata... m tyanchi babad shivya den suru hot.... mi ya badal navraya bole.. ter to mahnto ki.. majya javayana kahi mahnaych nahi.. tyana jas vatel tas te vagtil... mi mahntl ki mala he ghari daru pin avadt nahi aani tas hi aapl ghar itak moth nahi... pan to kahi aaikayla tyar nahi... mahnto mi tyana kahi mahnar nahi....
majha navra madhe madhe baher official tour var asto... aata pan madhe to tour var hota tya vedla maji sasu pan baher gavala geli hoti... ghari mi, sasre aani dir hoto.... mi navrala mahntal ki mi yanchyat nahi rahu sakat ek ter maheri jate... nahi ter majya aaila ghari aante ... pan to 2 gosti aaikayla ready navta..... mala samjat navt ki mi tyala kas samjau... ek ter aamchya kholila dar pan nahi aahe...
ashya khup gosti aahet jya sahan karnyachya pali kade aahet... mala pan toch vichar yeto ki divorce gheun takava....
प्रति, हे सर्व सहन करणे खरोखर
प्रति, हे सर्व सहन करणे खरोखर अशक्य आहे. नवरा योग्य-अयोग्य कळण्याच्या पलिकडे असेल, बायकोचा काहीच विचार करत नसेल तर त्याला फार समजवण्यात अर्थ नाही.
Pages