मिरचीचे रुचकर लोणचे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2012 - 14:04
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) पाव किलो मिरच्या
२) २ चमचे धणे
३) २ चमचे जिरे
४) २ चमचे बडीशेप
५) १ चमचा राई ची डाळ
६) अर्धा चमचा हळद
७) पाऊण वाटी मिठ
८) अर्धी वाटी तेल
९) ३ लिंबू

क्रमवार पाककृती: 

१) मिरच्या धुवुन, पुसून घ्याव्यात. एका मिरचीचे तिन तुकडे करुन ते मधून चिरावेत.

२) धणे, जिरे, बडीशेप, राईची डाळ वेगवेगळी थोडी तव्यावर परतून घ्यायची. हे सगळे थंड झाले की एकत्र करून मिक्सरमध्ये पूड करायची.

३) हळद थोड्या तेलावर परतायची.

४) एका ताटात मिक्सरमधून काढलेली पूड, मिठ, हळद एकत्र करून हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे.

५) त्या एकजीव केलेल्या मिश्रणात लिंबांचा रस, गरम करून थंड केलेले तेल ओतायचे.

६) सगळ्यात शेवटी ह्या मिश्रणात मिरच्या ओतायच्या आणि चमच्याने ढवळून एकत्र करायचे.

हे लोणचे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे. ५-६ दिवसांनी मुरल्यावर खायला काढायचे.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळि २०-३० माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

हे लोणचे टिकावू असते. जर वरून तेल कमी वाटले तर अजुन तेल गरम करून ते थंड करुन वाटलीत ओतायचे. लोणचे पुर्ण बुडू द्यायचे त्यामुळे ते जास्त टिकते.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, तुझ्या रेसिप्या तर छान असतातच, पण फोटोही एकदम कलरफुल, आकर्षक असतात. रेसिपीला चार चांद लागतात फोटोमुळे Happy

मस्त रेसेपी, मिरचीच्या लोणच्यात लिंबांचा रस टाकायलाच हवा का? मार्केटमधे जे लिंबाचे लोणचे मिळते त्यात तिखट कमी आंबटच जास्त टेस्ट असते

प्रसिक लिंबामुळे लोणच्याची चव येऊन मिरचीचा तिखटपणाही काही प्रमाणात कमी होतो.

अनु, बेफी, मो, मृण्मयी, स्वाती,सशल, पल्लवी, बिल्वा, वत्सला, दिपा, साती धन्यवाद.

बघूनच तोंडाला पाणी सुटले.
बडीशेप घालून करतात हे माहित नव्हते. आता करून बघेन.
जागू फोटो खूप सुंदर, नेहमीप्रमाणेच.

मला शोप आवडत नाही. बाकी आमच्याही घरचीच रेसिपी.
ओली हळद अथवा लिंबाच्या फोडीही मिक्स लोणचे करता येते.

मस्त रेसिपी! फोटो तर एकदम झकास!!

करून बघते लगेचच. सासुबाई पन असेच बनवतात पण त्या बडिशोप घालत नाहित आणी हिन्ग घालतात.

मस्त आणि सोपी रेसिपी.. तोंपासु एकदम.
जागु, तुझ्या फोटो च्या चार चांद बद्दल मो ला अनुमोदन Happy

मंजूडी, सस्मित, शमा, अखि, चिन्नु, धनश्री, अमि, शांकली, लाजो, संघमित्रा, इब्लिस, नीशी, माधुरी धन्यवाद.

अहा......एकदम रसरशीत दिसतंय गं.. बडीशोपेची वेगळीच चव लागत असेल ना.... तोंडाला सुटलेलं पाणी आवरणं कठीण आहे Happy

Pages