आज कसाबला फाशी- ऑपरेशन 'एक्स' ओव्हर.

Submitted by साती on 20 November, 2012 - 22:24

आज सकाळी ७.३० मिनिटांनी कसाबला फाशी देण्यात आली.
सरकारचे अभिनंदन.
अज्जिबात गाजावाजा न करता कार्यवाही केल्याबद्दल धन्यवाद.
भारतीय जनतेचेही अभिनंदन. सगळ्यांनीच वेळोवेळी जमेल त्या माध्यमातून मतप्रदर्शन करून सरकारवर ही कार्यवाही करण्याची नैतिक जबाबदारी टाकली.
आता आफ्टर मॅथ पाहायचे.

तातडीने मुंबईहून पुण्याला परवा हलवले होते. पुण्यात येरवड्यात जल्लाद उपलब्ध नव्हता तो उपलब्ध करवला गेला.
'माझी कोणतीही अंतिम इच्छा नाही , माझ्या वस्तू कुणाला द्यायच्या नाहीत ' असे त्याच्याकडून लिखित घेण्यात आले.
मग आज सकाळी फाशी दिली.

आता त्याच्या पार्थिवाचे काय करतात ते पहावे.माझ्यामते तरी सी बरियल करावे.
पाकिस्तानला आधीच फॅक्स पाठवून कळवले होते म्हणे फाशीचं. त्यांनी शव ताब्यात घ्यायची इच्छा दाखवली नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी फाशी देत नव्हते, तर ओरडाआरडा. आता फाशी दिली तर शंकाकुशंका! फेसबुकवर तर लोकांच्या वॉल्स पाहून अचंबित झाले! लोकांना सतत काही ना काहीतरी लागतंच का? कोणाचंच पूर्ण समाधान कसं होऊ शकत नाही?>>>>>>>>>>+१

पण मनात कुठेतरी खुपते की अमेरिकेने परराष्ट्रात म्हणजे पाकिस्तानात जाऊन त्यांच्या शत्रूला म्हणजे लादेनला सम्पवले तर ते करताना त्यामागची गुप्तता नक्कीच समजू शकते, पण भारतातल्या भारतात? ये कुछ हजम नही होता. > +१.
खंबीर निर्णय घ्यायला सरकार सक्षम आणि बांधिल आहे हे उघडपणे दाखवता आले असते.

>>>>> डिपार्टमेंट कडून मायबोलीला सूचना आली आहे. कृपया गांभीर्याने घ्या <<<<<
ओक्के सर. Happy
बर मला कुणी तरी एक सान्गा, की हा "डिपार्टमेण्ट" शब्द वापरलाय, तो एक प्रचलित "कोडवर्ड" म्हणून की "अधिकृत" शब्द म्हणून की "डिपार्टमेण्ट" असे नामाभिदान ["नामादिधान" हा शब्द खोडला] पावलेले काही वेगळेच खाते आहे?

डिपार्टमेन्ट म्हणजे विभाग/ खाते. ह्या परिस्थितीत कोणत्या डिपार्टमेन्ट कडून अशा सूचना येतील हे सूज्ञास समजायला हवे.

लिंबूजींना अनुमोदन, कसाबला पाकिस्तानात परत पाठवून मग तिथे हल्ला चढवून मारायला हवे होते म्हंजे अगदी अमेरिकेसारखे समाधान मिळाले असते आणि नस्त्या शंकाही आल्या नसत्या.

Harshalc | 21 November, 2012 - 13:00 नवीन
<<<मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

एखाद्या माणसाला फासावर लटकवणं, ही कल्पनाच अंगावर येणारी आहे. पण, वेगवेगळ्या कारागृहांमधील जल्लादांना पोटापाण्यासाठी हे काम करावंच लागतं. वास्तविक, गुन्हेगारांना फाशी देऊन ते एकप्रकारे समाजातील विकृतींचाच नाश करत असतात. मात्र, त्यांच्यासाठीही ते ' जीवघेणं ' कामच असतं. त्यासाठी त्यांना प्रचंड मानसिक तयारी करावी लागते आणि सोबतच इतरही ब-याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फासावर चढणा-या गुन्हेगाराला फार त्रास होऊ नये, एकाच प्रयत्नात त्याचा गुदमरून मृत्यू व्हावा, ही जबाबदारी त्यांना चोख पार पाडावी लागते.

जल्लादाला करावी लागणारी तयारी

* फाशी देण्यापूर्वी काही दिवस आधी, जल्लाद कैद्याच्या वजनापेक्षा दीडपट अधिक वजनाचा एक डमी (वाळू आणि दगडांनी भरलेला पुतळा) तयार करतो.

* फाशी देण्यासाठी एक खास दोर तयार केला जातो. या दोराची लांबी ही प्रत्येक गुन्हेगाराच्या वजनावर अवलंबून असतो. जास्त वजनाच्या कैद्याला कमी लांबीचा दोर वापरला जातो.

* या दोराला मऊपणा आणण्यासाठी तूप आणि साबणाचा लेप लावला जातो. तसेच काही वेळा जास्त जाड दोर असल्यास त्या दोराला पिकलेल्या केळ्यांचा लेप दिला जातो.

* हा दोर बनवताना जल्लादाला दोरावर असणा-या लहान वळणांकडे खास लक्ष द्यावे लागते. फाशी देणा-याच्या मानेवर योग्य ठिकाणी दबाव पडून जास्त त्रास न होता त्याचा मृत्यू व्हावा, यादृष्टीनं या गाठींना खास महत्त्व असते.

* फाशी देण्याच्या आधी अनेक वेळा पुतळ्याला फाशी देण्याचा सराव केला जातो आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या जातात.>>>

एवढं सगळं करायला वेळ मिळाला? आधी तर फाशी देणारा जल्लादच मिळाला नव्हता म्हणे, आणि कसाबाला फार कमी लोकांना कळवून येरवड्यात सोमवारी रात्री हलवला होता. मग हे सर्व काहीतरी गौड'बंगाल' असेल ह्या शंकेला वाव आहे.

>>>> हे सूज्ञास समजायला हवे. <<< बरोबर, अन मी तर नक्कीच सूज्ञ म्हणून परिचित नाही. Proud मला नाही कळ्ळे ते.
माझ्यापुढचा प्रश्न असा आहे की मराठी भाषेमधे "डिपार्टमेंण्ट" असा पूर्णतः परकीय शब्द "कोडवर्ड" स्वरुपात की अजुन कशाही अर्थाने, काय कारणे घुसला/घुसडवला गेला? मराठी भाषेसाठी अशा एखाद्या परकीय भाषेतील शब्दाचे सहाय्य घ्यावे लागणे व ते देखिल एका सरकारी, सुरक्षेसाठी असलेल्या सजग विभागाकरता, ही नाचक्कीची बाब नाही वाटत?,मला तरी वाटली बोवा, म्हणून अधिक खात्रीकरता त्या शब्दाच्या वापरामागिल नेमकी कारणमिमांसा समजुन घेण्यासाठी आधीचा मजकुर लिहीला होता.
असो. आहे ते असं आहे, अन अस्सच रहाणार आहे हे मात्र नीट कळ्ळे!
[पुनःश्चः आधीच्या मजकुरामधे "नामादिधान" असा शब्द चूकीचा लिहीला गेलाय, तो "नामानिधान" असा हवा असे वाटते. झाल्या चूकी बद्दल क्षमा असावी ]

>>>> फाशी देणा-याच्या मानेवर योग्य ठिकाणी दबाव पडून जास्त त्रास न होता त्याचा मृत्यू व्हावा, यादृष्टीनं या गाठींना खास महत्त्व असते. <<<<
यास्वरुपाची वर्णने लहानपणापासून वाचलेली आहेत. खास करून हे गाठीचे व दोराच्या तयारीचे वर्णन अन त्यामागिल कारणमिमांसा वाचताना तेव्हापासूनच प्रश्न पडतो की योग्य ठिकाणी दाब पडणे/नपडणे, दोरीची गाठ नीट न बसणे/आवळली जाणे वगैरे बाबीमुळे मरत्या व्यक्तिला त्रास कमी होईल की जास्त होईल हे जित्त्या व्यक्तिला "आपसूक" कसे काय समजत असावे बरे? स्वानुभवाविना कोणते "शास्त्र/विज्ञान" याकामी वापरीत असावेत? कोणत्या प्रयोगशाळेत काय प्रयोगान्नी हे "शास्त्रशुद्ध/विज्ञाननिष्ठ" नियम सिद्ध केले असावेत? Wink
असो. मला माहिती व्हायलाच हवे असे काही नाही. पण सहज कुतुहल म्हणून विचारले असे - आधीच वर सांगितलेले आहेच की मी सूज्ञ नाही. तेव्हा विचारणेबाबत क्षमा असावी. Happy

लिंबूजींना अनुमोदन, कसाबला पाकिस्तानात परत पाठवून मग तिथे हल्ला चढवून मारायला हवे होते म्हंजे अगदी अमेरिकेसारखे समाधान मिळाले असते आणि नस्त्या शंकाही आल्या नसत्या. >> सौ लोहार कि तो एक सोनार कि.

लोकांचे कशानेच समाधान होत नाही हेच शेवटी खरे. प्रत्येक गोष्टीमधे conspiracy दिसते.

'डिपार्टमेन्ट'ह्या शब्दाचा अर्थ शब्दशः खाते /विभाग असला तरी 'डिपार्ट्मेन्ट'हा शब्द खास पोलीस खात्यासाठीच वापरला जातो. विशेष्तः ज्यांचा पोलीसांचा नेहमी संबंध येतो असे छोटे मोठे गुन्हेगार, खबरे, दोन नम्बरचे धन्देवाले इत्यादी. पोलीसांचा उल्लेख डिपारमेन्ट असाच करतात्.म्हणजे असे áaj तिकडे जाऊ नको, आज तिकडं डिपारमेन्ट आहे. वगरे....

खुप दिवसांनी एक चांगली बातमी कानावर पडली. आता, भारत सरकारकडुन एकच अपेक्षा - आम्ही अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांशी समझोता/बोलणी करत नाहि... या धोरणाची घोषणा आणि अंमलबजावणी.

त्या निमित्ताने मराठी वाहिन्यांनी अतिरेक्यांना सोडून आतंकवाद्याना जवळ केले असे लक्षात आलेय.
Happy
जल्लादला मराठीत काय म्ह णतात?

समजा मेलाच असेल कसाब डेंग्युने तर काय?

राजा हरिश्चंद्राच्या संदर्भातील कथांचे 'जल्लाद' संदर्भात अवलोकन केल्यास असे दिसून येईल की पुराण काळात अशा 'वधका' ला डोंब तसेच चांडाळ अशा नावाने ओळखले जात असे. मराठीत हेच नाम नोंदविल्याचे दिसते.

आजही ज्याने ते फाशी देण्याचे काम केले ती व्यक्ती 'पगारी नोकर' नसून 'कामासाठी मोबदला' या तत्वावर नियुक्त केलेला आहे. सर्वसाधारणपणे २ ते ३ हजार इतका मोबदला डोंबाला दिला जातो....मोबदल्या संदर्भात पक्की माहिती या क्षणी तरी माझ्याकडे नाही पण मी इतक्या रकमेबाबत ऐकले आहे जरूर.

अशोक पाटील

>>>आजही ज्याने ते फाशी देण्याचे काम केले ती व्यक्ती 'पगारी नोकर' नसून 'कामासाठी मोबदला' या तत्वावर नियुक्त केलेला आहे. सर्वसाधारणपणे २ ते२३ हजार इतका मोबदला डोंबाला दिला जातो....मोबदल्या संदर्भात पक्की माहिती या क्षणी तरी माझ्याकडे नाही पण मी इतक्या रकमेबाबत ऐकले आहे जरूर.<<<

२ ते २३ हजार? ही काय रेंज आहे का?

२३ हजार मोबदला असला आणि शैक्षणिक पात्रता कळली तर अवश्य येथे लिहावेत अशी विनंती. तसेच वयाची अटही.

उप्प्स.....बेफि....क्षमा करावी.....२ ते ३ हजार असे मला अपेक्षित होते....पण तुम्ही पाहू शकाल की 'ते' शब्दालाच ते जादाचे '२' जोडले गेल्याचे दिसते. '२३ हजार' सर्वस्वी चुकीचा आकडा माझ्याकडून टंकला गेला आहे.

योग्य ते संपादन करीत आहेच.

ह्या वेळच्या जल्लादाला ५ हजार रुपये दिले गेले, असे वाचले.

त्याचे नाव गुप्त राखण्यात आले आहे. इतकेच काय पण त्यालादेखिल आपण नक्की कोणाला फाशी देणार आहोत, ते अगदी शेवटच्या क्षणी सांगितले गेले!

>>>> 'डिपार्टमेन्ट'ह्या शब्दाचा अर्थ शब्दशः खाते /विभाग असला तरी 'डिपार्ट्मेन्ट'हा शब्द खास पोलीस खात्यासाठीच वापरला जातो. विशेष्तः ज्यांचा पोलीसांचा नेहमी संबंध येतो असे छोटे मोठे गुन्हेगार, खबरे, दोन नम्बरचे धन्देवाले इत्यादी. पोलीसांचा उल्लेख डिपारमेन्ट असाच करतात्.म्हणजे असे áaj तिकडे जाऊ नको, आज तिकडं डिपारमेन्ट आहे. वगरे.... <<<<
माहितीबद्दल धन्यवाद पादुकानन्दजी! Happy वर ठळक केलेले पटले/माहिते ते, पण मग मायबोलिवर पोलिसांकरता त्या ठळक केलेल्या छोटे मोठे गुन्हेगार, खबरे, दोन नम्बरचे धन्देवाले इत्यादी सारखा त्यान्चे तोन्डीचा शब्द वापरण्याची गरज काय? अन होते काय की मजसारखी अतिसामान्य माणसे छापिल तेच खरे असे समजुन हे असेच शब्द मराठिमधे रूढ करीत जातात. Sad
पोलिस खाते म्हणजे काय त्या ह्यारीपॉटरच्या कथेतल्यासारखे आहे की काय की "ज्याचे नाव देखिल्ल उच्चारायचे नाही?" अन म्हणून "डिप्पार्टमेण्ट" असा कोडवर्ड वापरावा? ते देखिल आपल्यासारख्या पापभिरू माणसान्नी?
असो. वापरला म्हणून फारसा फरक पडत /पडला नाही.
पण सहज सुचले म्हणून मान्डले इतकेच.

>>> तो शब्द 'नामाभिधान' आहे <<<<
ओह, आता नीट कळला. धन्यवाद दुरुस्ती सुचविल्याबद्दल, नोन्द घेतली आहे.

भारत सरकार इतके कशाला घाबरते? काय कॉतुक चालू आहे Operation चे?
स्वताच्या देशात, एका परकीय देशातील शत्रु अतिरेक्याला फाशी देण्यासाठी ही लपवा छ्पवी करायला लागवी ह्या पेक्षा भेकड पणा नाही.

प्रसाद१९७१

उगी व्हा. बोटे उचलून टंकायला लागण्याआधी थोडं डोकं वापरत जाल तर बरे होईल.

तिथे फाशी द्यायची होती. सर्कस नव्हती चालवायची. इथे कोणत्याही टीनपॉट गुंडाला जेलीत आज जुलाब झाले अन दोन दिवस बद्धकोष्ठ झाले तरी मिन्टामिन्टाच्या बातम्यांसाठी मेडिया जमतो तिथे.

संपूर्ण न्यायप्रक्रीया नीट राबवून, फाशी जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमीका घेऊन, फाशी 'एक्झिक्यूट' केली आहे. फाशी झाली आहे त्यात गुप्तता होती का?

मग कसली जळजळ होतेय तुमची? कोणत्या कारणाने?

अन या गोष्टी कशा करायला हव्यात हे तुम्हाला डिक्टेट करावेसे वाटत असेल, तर निवडून या, तिथे संसदेत बसा, अन मग सांगा प्रत्येक गोष्टीत काय अन कसे करायचे ते? भातुकलीचा खेळ वाटला का देश चालवणे म्हणजे?

>>>> अन या गोष्टी कशा करायला हव्यात हे तुम्हाला डिक्टेट करावेसे वाटत असेल, तर निवडून या, तिथे संसदेत बसा, अन मग सांगा प्रत्येक गोष्टीत काय अन कसे करायचे ते? भातुकलीचा खेळ वाटला का देश चालवणे म्हणजे? <<<<
बाकी सग्ळे कळ्ळे तुमाला काय म्हणाय्चे आहे ते, पण हे वरले वाक्य इथे कशाला? इथे तर अण्णा हजारे येत नसावेत. (म्हण्जे ते वाक्य अण्णा हजारेन्कर्ता नक्कीच नै) Proud
अन अण्णा हजारेन्करता कॉन्गीन्नी वापरुन वापरुन गुळगुळीत झालेले वाक्य जस्सेच्च्या तस्से कॉपीपेस्टुन आम्च्या माथी मार्ता होय हो इब्लिसराव? Wink

गुप्तता पाळण्यामागचे एक कारण - निर्णय जाहिर केल्यानंतर मानवाधिकार संघटना कोर्टात जाऊन स्टे आणू शकतात. असे झाल्यास अंमलबजावणी व्हायला कितीही वेळ लागू शकतो. इतरही कारणे होती.

http://esakal.com/eSakal/20121122/5027823143290505030.htm

लिंबाजीराव,
तुमच्या माथी?
ती डूआयडी आहे का तुमची?
वाटलंच
पण ते वाक्य तुमच्या या आयडीसाठीही तितकेच चपखल बसते. निवडून येण्याचे/चा- दिवे लावा, उजेड पाडा. मग कुणी कशाला काही म्हणेल तुम्हाला?

***

राजकाशाना,
धन्यवाद.
पण याचा फार उपयोग नाही. या गोबेल्सपंथीयांना बोटे घालून पहायची सवय असते. यांना सेन्सिबल उत्तरे देऊन उपयोग नस्तो. तिरसट उत्तरे दिली तरी लिंबाजीरावांनी फोडले तसे फाटे फोडतात.

>>> तिरसट उत्तरे दिली तरी लिंबाजीरावांनी फोडले तसे फाटे फोडतात. <<<<
चला, निदान इत्के तरी मान्य आहे ना तुम्हाला की तुमच्याकडून "तिरसट" उत्तरे येतात्/येऊ शकतात? Wink असो.
पण मी फाटे फोडतो असे म्हणताहात ते मात्र अमान्य बर्का!
बाकी केन्द्रसर्कारी क्रुपेने एकदम ९०० ते १२०० रुपयान्ना घ्याव्या लागणार्‍या ग्यासमुळे जळाऊ लाकडाच्या फाट्या फोडायची वेळ मात्र मजवर आली आहे हे नक्की! काय? Proud अन म्हणे मी फाटे फोडतो.....

कसाबच्या शिक्षेच्या निमित्ताने काँग्रेस भाजपापेक्षा कितीतरी पटीने कार्यक्षम आहे हेच सिद्ध झालेआहे.

काँग्रेसच्या कारकिर्दीत कसाबचा हल्ला झाला. एका परदेशी नागरिकाने केलेल्या हल्ल्याची पूर्ण चौकशी, शिक्षा आणि प्रत्यक्ष फाशी हे सगळं काँग्रेस सरकारने ४ वर्षात पूर्ण करुन प्रकरण संपवलेदेखील.

आणि हे भाजप सरकार! १९९९ ते २००४ हे संसदेत होते. २००१ साली यांच्या बुडाखाली संसदेत अफजलगुरुने- एका भारतीय माणसाने बाँब टाकला. पुढचे तीन वर्षे हेच भाजपावाले सत्तेत होते. पण यांच्या कारकिर्दीत ना तपासणी पूर्ण झाली ना शिक्षा.

पुढे २००६ साली काँग्रेस सरकारच्याच काळात त्याला फाशी सुनावली गेली.

आणि हेच भाजपावाले अफजलला अजून का शिक्षा दिली नाही, म्हणून काँग्रेसच्या नावाने गळे काढून स्फुंदून स्फुंदून रडत असतात.. तुम्ही तीन वर्षात का हो त्याला शिक्षा दिली नाही?

Pages