आज कसाबला फाशी- ऑपरेशन 'एक्स' ओव्हर.

Submitted by साती on 20 November, 2012 - 22:24

आज सकाळी ७.३० मिनिटांनी कसाबला फाशी देण्यात आली.
सरकारचे अभिनंदन.
अज्जिबात गाजावाजा न करता कार्यवाही केल्याबद्दल धन्यवाद.
भारतीय जनतेचेही अभिनंदन. सगळ्यांनीच वेळोवेळी जमेल त्या माध्यमातून मतप्रदर्शन करून सरकारवर ही कार्यवाही करण्याची नैतिक जबाबदारी टाकली.
आता आफ्टर मॅथ पाहायचे.

तातडीने मुंबईहून पुण्याला परवा हलवले होते. पुण्यात येरवड्यात जल्लाद उपलब्ध नव्हता तो उपलब्ध करवला गेला.
'माझी कोणतीही अंतिम इच्छा नाही , माझ्या वस्तू कुणाला द्यायच्या नाहीत ' असे त्याच्याकडून लिखित घेण्यात आले.
मग आज सकाळी फाशी दिली.

आता त्याच्या पार्थिवाचे काय करतात ते पहावे.माझ्यामते तरी सी बरियल करावे.
पाकिस्तानला आधीच फॅक्स पाठवून कळवले होते म्हणे फाशीचं. त्यांनी शव ताब्यात घ्यायची इच्छा दाखवली नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारवाई इतकी लपुन छपुन केल्यागत का केली? स्वतंत्र भारताला कसली भिती होती अन का? सार्वभौम सत्तेवर आक्रमण केलेल्या परकी दहशतवाद्यास शिक्षा देताना इतकी गुप्तता का पाळावी लागते? लागत असेल, तर ते देखिल शरमेचेच आहे.
>> तू म्हणतोस ते एका अर्थाने बरोबर आहे. पण "आम्ही काहीतरी करू" याच्या पोकळ आश्वासनापेक्षा "आम्ही केले" हे वक्यव्य जास्त योग्य वाटतय,, अन्यथा अरूंधती रॉय, प्रफुल बिडवाई लोक आलेच असते की कसाबची पाठराखण करायला.

त्यांच्या प्रतिक्रिया कुठे चॅनलवर अद्याप दिसल्या नाहीत.

बेफिकीर सहमत.
शिवसेनेचे प्रवक्तेही हेच म्हणाले.

हुतात्मा दिनाचं औचित्य साधलं असेल तरी चांगलंच आहे की.
हुतात्म्यानाही मुंबईची काळजी घेतली जात्येय बघून आनंदच वाटेल.

हुतात्मा शब्द कसाबसाठी नाही हे कळण्याइतके पब्लिक शहाणे आहेच.

फाशीपेक्षा अधिक तीव्र शिक्षेच्या लायकीच्या कसाबला शेवटी एकदा लटकवले कारण आपल्या कायद्यात ती सर्वाधिक शिक्षा आहे.
----- फाशी पेक्षाही कठोर शिक्षा आहेत, पण त्या कायद्याला मान्य होणार नाहीत.

येथे कसाब हा अगदी छोटा मासा आहे. तो आला होता तर मरण्याच्या तयारीनेच. आता अशा मरणाच्या तयारीने आलेल्या अतिरेक्याला फाशी मिळाल्याने पाक मधे असलेल्या त्याच्यासारख्या हजारो समविचारीना काडीचाही फरक पडणार नाही आहे. त्याला अशी शिक्षा मिळायला हवी होती जेणे करुन पाक मधे असलेल्या अतिरेक्याना भारतात यायचे धाडसही होणार नाही. अशा कोणती शिक्षा असेल जेणेकरुन कसाब सारख्याना जरब बसेल ?

कारवाई इतकी लपुन छपुन केल्यागत का केली? स्वतंत्र भारताला कसली भिती होती अन का? सार्वभौम सत्तेवर आक्रमण केलेल्या परकी दहशतवाद्यास शिक्षा देताना इतकी गुप्तता का पाळावी लागते? लागत असेल, तर ते देखिल शरमेचेच आहे.
असो.
कणखरता दर्शविल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार अन अभिनंदनही.<<<

लिंबू टिंबू,

गुप्तता राखण्याची अनेक कारणे असू शकतात.

१. माध्यमे विषय पेटवू शकतात. ज्यामुळे भावना दुखावल्या जाऊन ताण निर्माण होऊ शकतो.

२. पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन होऊ शकते. ज्यातून लहानसहान दंगली घडू शकतात. उदाहरणार्थ हा निर्णय सरकारने आत्ता घेतला म्हणून सत्ताबाह्य पक्ष टीका करणार आणि त्यांना प्रत्युत्तर द्यायला सत्ताधारी पक्ष रस्त्यात येणार.

३. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे उगाचच लक्ष वेधले जाऊ शकते. भारत हा देश बराच मोठा आणि शक्तीशाली आहे म्हणून ठीक, अन्यथा लहानसहान देशांना आंतरराष्ट्रीय दबावामुळे पुन्हा उत्तरेही द्यावी लागू शकताअत की 'आम्ही असे का केले' वगैरे!

लिंबुटिंबू, प्रत्येक बाब सरकार अगदी वाईटच करेल असे नाही. अणुचाचणीच्या वेळी तिकडे उपग्रहांचे लक्ष जाऊ नये म्हणून पश्चिम बंगालजवळ एक खोटा व मुद्दाम स्फोट घडवून आणला होता. सगळे उपग्रह तिकडे वळलेले असताना इकडे राजस्थानात खरी चाचणी घेतली. इन्टेलिजन्समधील लोक बराच पुढचा मागचा विचार करून असे निर्णय घेतात.

हुतात्मा शब्द कसाबसाठी नाही हे कळण्याइतके पब्लिक शहाणे आहेच.>>>>>सगळेच नाही. म्हणुन तर त्या पोस्ट्मध्य काही Low IQ वाले लोक लिहिलंय. Wink

(कोणी सांगावे? कडव्या मुस्लिमांनी येरवड्यात आंदोलनही पुकारले असते आधीच समजले असते तर! अशक्य काहीच नाही).
----- हे असे नक्कीच होणार नाही...
हल्ल्यात मेलेल्या अतिरेक्या.न्ना मु.न्बईमधे दफन करण्यासाठी स्थानिक मुस्लिमा.न्नी दफनभुमी नाकारली होती....

भारतात आणि पाक मधे कसाबसाठी कोणीच रडाणारही नाही. पाकसाठी तो केवळ प्यादा होता आणि आता त्याचा उपयोग पुर्णपणे झालेला होता. तो जिव.न्त पकडल्या गेल्याचा खरातर तेथे रागच असणार, प्लॅनि.न्गमधे जिव.न्त रहाणे अशक्यच होते म्हणुन गो.न्धळ झाला होता.

kaalach bharatane UNGA madhye fasheechee shiksha radda karayala virodh kela aahe. Ugaach conspiracy theories nirmaaN karaNa yogya nahi. Kasabla faashee dena, ya ghataneche anek kangore ahet, ani te antararashtreeya rajakaranashi, kayada ani suvyavastheshi sambandhit ahet. Apan kasabla faashee dili, yaat ananda manava.

आधी फाशी देत नव्हते, तर ओरडाआरडा. आता फाशी दिली तर शंकाकुशंका! फेसबुकवर तर लोकांच्या वॉल्स पाहून अचंबित झाले! लोकांना सतत काही ना काहीतरी लागतंच का? कोणाचंच पूर्ण समाधान कसं होऊ शकत नाही?

भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ही फाशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रशासनाच्या ज्या ज्या लोकांचा हातभार लागला त्या सर्वांचे कौतुक!!

आता पाकिस्तानने कांगावा सुरू केला, तर त्याला आणि त्याच्या मार्फत स्वतःचे साध्य बघणार्‍या सर्वांनाही सरकारने असेच ठणकावून उत्तर द्यायला हवे.

प्रोसिजरला चिकटून राहणे अनेक वेळेला नकोसे वाटते. पण प्रोसिजरला चिकटून काम केले की कोणीही बोट वर केले, तरी त्याला पुराव्यानिशी उत्तर देता येते आणि आपली बाजू ठामपणे जस्टिफाय करता येते!

या बातमीनंतर सगळ्यानाच आपल्या भावना अतिशय तीव्रतेने प्रकट कराव्याश्या वाटणार हे समजू शकतो.
पण कृपया कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल लिहू नका

मुस्लीम समाजाबद्दल कुठलेही अपशब्द भावनेच्या भरात लिहू नका.

तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. नाहीतर नाईलाजाने तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे सभासद्त्व दोन्ही काढून टाकावे लागेल.

धन्यवाद वेबमास्तर.
मी हेच आवाहन करायला आले होते.

(कालपासून मायबोलीवर काय लिहायचं म्हणजे मला माझ्या हॉस्पिटलचीच काळजी वाटते. Happy )

डिपार्टमेंट कडून मायबोलीला सूचना आली आहे. कृपया गांभीर्याने घ्या. राज्यात सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करू या.

सरकारला खर तर कसाब डेंग्यूमुळे मेला हे सांगणे जास्ती सोयीस्कर होते. सरकारने ते केले नाही व फाशी दिले व तेच सांगितले. ही गोष्ट अभिनंदनीय आहे.

तसेच काल की परवा यू.एन. मधे फाशीविरूद्धच्या ठरावास भारताने विरोधी मत दिले आहे. हे ही तितकेच अभिनंदनीय आहे.

देशाविरूद्ध केलेल्या कारवाईस फाशी हीच शिक्षा योग्य आहे.

महाराष्ट्र सरकार, भारत सरकार आणि काँग्रेसचे अभिनंदन... काँग्रेस देश हितासाठी सज्ज आहे, हेच दिसून आले. अतिरेक्याच्या शवाला जागा मिळणार नाही, असे त्या धर्मियांकडून आधीच सांगितले गेले आहे.

>>या बातमीनंतर सगळ्यानाच आपल्या भावना अतिशय तीव्रतेने प्रकट कराव्याश्या वाटणार हे समजू शकतो.
पण कृपया कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल लिहू नका>><<

हे केलेत ते बरे केलेत. नाहीतर काही जण अगदी आपल्यालाच सगळी माहीती असते असे करून काहीही पोस्ट करतात , निदान विषयाकडे बघून तरी बोला व स्थिती बघून. दोन दिवसांपुर्वी पण अशीच चर्चा होती एका विषयावर....

आधी फाशी देत नव्हते, तर ओरडाआरडा. आता फाशी दिली तर शंकाकुशंका! फेसबुकवर तर लोकांच्या वॉल्स पाहून अचंबित झाले! लोकांना सतत काही ना काहीतरी लागतंच का? कोणाचंच पूर्ण समाधान कसं होऊ शकत नाही?
भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि ही फाशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात प्रशासनाच्या ज्या ज्या लोकांचा हातभार लागला त्या सर्वांचे कौतुक!! >> +१ वैनी

देशाविरूद्ध केलेल्या कारवाईस फाशी हीच शिक्षा योग्य आहे.
>> अनुमोदन. कसाबवर देशाविरूद्ध युद्ध छेडल्याचा आरोप होता त्यामुळे फाशी हीच योग्य शिक्षा आहे आणि ती झाली याबद्दल समाधान आहे.

अजून इतर देशांच्या काही प्रतिक्रिया आल्या नाहीत का?

बेफिकीर, गुप्तता राखण्याची अनेक कारणे असू शकतात. >> ह्या वाक्यापासून पुढील सर्व मस्त पोस्ट.

आपण ज्या देशात राहतो, ज्या सुरक्षा/ राजकीय यंत्रणेच्या प्रभावाखाली जगतो, थोडक्यात 'सरकार'- ह्यांनी सामोर्‍या आणलेल्या गोष्टीवर (जी की ह्या केसमध्ये अर्थाअर्थी चांगलीच आहे) विश्वास ठेवण्यात गैर काय आहे... ?

कसाबला फाशी देऊन एक क्रुरकर्मा संपवला- तो शासनाच्याच ताब्यात असताना, त्यांनीच योग्य न्यायपद्धत वापरून संपवला- अश्या बातमीला "फेस वॅल्यू" वर घेऊन त्या गोष्टीचा आदर आपण भारतीयांनीच करूयात ना? शंका कुशंका कशाला?

देर आये, दुरुस्त आये... गुप्तचर यंत्रणेच्या प्रत्येक अहवालावार योग्य ती कार्यवाही व्हावी, हे तरी यापुढे घडावे.
असे कट शिजतानाच, त्यांच्या निदर्शनास आल्यावाचून रहात नाहीत.

नन्दिनी, तुझेही मत पटते.
पण मनात कुठेतरी खुपते की अमेरिकेने परराष्ट्रात म्हणजे पाकिस्तानात जाऊन त्यांच्या शत्रूला म्हणजे लादेनला सम्पवले तर ते करताना त्यामागची गुप्तता नक्कीच समजू शकते, पण भारतातल्या भारतात? ये कुछ हजम नही होता. असो.
सरकारने केले ते चांगले केले.

हमे तो ( भारतकी जनता को ) कुछ भी हजम करने की आदत हो गई है !

त्यातल्या त्यात तो मेला हेच एक जखमेवर चे मलम !!

Pages