आज कसाबला फाशी- ऑपरेशन 'एक्स' ओव्हर.

Submitted by साती on 20 November, 2012 - 22:24

आज सकाळी ७.३० मिनिटांनी कसाबला फाशी देण्यात आली.
सरकारचे अभिनंदन.
अज्जिबात गाजावाजा न करता कार्यवाही केल्याबद्दल धन्यवाद.
भारतीय जनतेचेही अभिनंदन. सगळ्यांनीच वेळोवेळी जमेल त्या माध्यमातून मतप्रदर्शन करून सरकारवर ही कार्यवाही करण्याची नैतिक जबाबदारी टाकली.
आता आफ्टर मॅथ पाहायचे.

तातडीने मुंबईहून पुण्याला परवा हलवले होते. पुण्यात येरवड्यात जल्लाद उपलब्ध नव्हता तो उपलब्ध करवला गेला.
'माझी कोणतीही अंतिम इच्छा नाही , माझ्या वस्तू कुणाला द्यायच्या नाहीत ' असे त्याच्याकडून लिखित घेण्यात आले.
मग आज सकाळी फाशी दिली.

आता त्याच्या पार्थिवाचे काय करतात ते पहावे.माझ्यामते तरी सी बरियल करावे.
पाकिस्तानला आधीच फॅक्स पाठवून कळवले होते म्हणे फाशीचं. त्यांनी शव ताब्यात घ्यायची इच्छा दाखवली नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुब्बे, दयेचा अर्ज फेटाळल्यावर काल राष्ट्रपतींनी फाशी देण्यावर निर्णय दिला आणि आज २४ तासाच्या आत लगेच फाशी. खरोखर हा निर्णय कौतुकास्पद आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा असाच क्षण !

आमचे आईबाबा म्हणतायत बाळासाहेबांना जाण्याअगोदर ही बातमी कळली असती तर त्यांना जाताना एक समाधान तरी मिळाले असते. ते वरून पहात असतील तर नक्कीच सुखावले असतील.

कसाबला फाशी....बहुतेक बाळासाहेबांनी यमराजाचा पहिल्याच दिवशी ठाकरी शैलीत खरपुस समाचार घेऊन जीवन-मॄत्यु देण्याच्या न्यायाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेतलेला दिसतोय.
बाळासाहेबांचा यमराजाला पहिलाच आदेश ताबडतोब कसाबची रवानगी नरकात कर Happy

काल दयेचा अर्ज फेटाळला आणि आज २४ तासाच्या आत लगेच फाशी. खरोखर हा निर्णय कौतुकास्पद आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा असाच क्षण >>>>> +१००००

बंर वाटल ऐकून........

दयेचा अर्ज पाच नोवेंबरला फेटाळला गेला. कसाबच्या डेंग्यु वगैरेची भलत्या रेवड्या उठवून त्याचे शिफ्टिंग केले होते वाटतं. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस खाते यांचे खासमखास अभिनंदन.

महाराष्ट्र सरकार आणि पोलिस खाते यांचे खास अभिनंदन. अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे.

अज्जिबात गाजावाजा न करता कार्यवाही केल्याबद्दल मात्र निषेध. भरपूर गाजावाजा करुन गेटवे ऑफ इंडीयाला ते आत घुसले तिथेच त्याला लटकवुन फाशी द्यायला हवी होती म्हणजे परत आतंकवादी हल्ला करताना वचक बसला असता.

आश्चर्य वाटते आहे खरच. अचानक ?? इलेक्शन डिक्लेअर झाल्या की काय? का डेंग्युनेच मेला तो. हे उगाच फाशी दिली म्हणुन क्रेडीट घेत आहेत?

त्या अफजल गुरुचा नंबर आधी आहे त्याला का लटकवले नाही अजून. राष्ट्रपती त्याचा अर्ज अजून का नामंजुर करत नाहीयेत?

बंर वाटल ऐकून........

पण
त्या अफजल गुरुचा नंबर आधी आहे त्याला का लटकवले नाही अजून. राष्ट्रपती त्याचा अर्ज अजून का नामंजुर करत नाहीयेत? >>> अगदी हेच मलाही वाटलं

केप्या, कसं का होईना कसाब मेला हेच पुरेसं आहे की. मग तो डेंग्युने असो किंवा फाशीने. की फर्क पैंदा.. पण खरंच, भारत सरकार आणि त्याहुन जास्त पोलिसांचं अभिनंदन. कुठेही कसलाही गाजावाजा न करता इतक्या लवकर कसाबला फाशी दिली ह्यासाठी.

They asked us this question on a friday, repeated it on tuesday ... We just replied on A WEDNESDAY!!

त्या अफजल गुरुचा नंबर आधी आहे त्याला का लटकवले नाही अजून. राष्ट्रपती त्याचा अर्ज अजून का नामंजुर करत नाहीयेत? वाचा खालील लिंक

http://en.wikipedia.org/wiki/Afzal_Guru

त्या अफजल गुरुचा नंबर आधी आहे त्याला का लटकवले नाही अजून. राष्ट्रपती त्याचा अर्ज अजून का नामंजुर करत नाहीयेत? >>> कारन त्याचा अर्ज राष्ट्रपतींच्या टेबलावर पोचत नाहीये. दिल्ली सरकारच्या गृह मंत्रालयाची ती जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस दोघानीही पाठपुरावा करून अर्ज नामंजूर करून घेतलाय.

गाजावाजा केला असता तर ह्युमन राईट्स्वाले गेटवेवर उपोषणाला बसले असते. मीडीयाची सर्कस चालू झाली असती. अमेरिकेने एखादा फु.स. दिला असता. युरोपने अजूनएखादा सल्ला दिला असता, फाशी देणे हे कसे क्रूर आहे यावर न्युजपेपरचे कॉलम भरले असते. या सर्वांमधे कसाब जगत राहिला असता. त्यापेक्षा हे केलय तेच बरं.

>>बाळासाहेबांचा यमराजाला पहिलाच आदेश ताबडतोब कसाबची रवानगी नरकात कर>>>>> बंडूपंत. Happy

पण सरकारने परिस्थिती चांगली हाताळली. अभिनंदन.

गाजावाजा केला असता तर ह्युमन राईट्स्वाले गेटवेवर उपोषणाला बसले असते. मीडीयाची सर्कस चालू झाली असती. अमेरिकेने एखादा फु.स. दिला असता. युरोपने अजूनएखादा सल्ला दिला असता, फाशी देणे हे कसे क्रूर आहे यावर न्युजपेपरचे कॉलम भरले असते. या सर्वांमधे कसाब जगत राहिला असता. त्यापेक्षा हे केलय तेच बरं.>>>>>> अगदी अगदी..

तिथेच त्याला लटकवुन फाशी द्यायला हवी होती म्हणजे परत आतंकवादी हल्ला करताना वचक बसला असता.>>>> नाही हो असे व्हायचे असते तर ह्युमन बाँब तयारच झाले नसते Sad मुळातच ***के पास जाने के लिये ते हे काम करतात. त्यांना वचक बसणे इतके सोपे नाही.

असो १ केस तर मार्गी लागली. दुसर्‍या केसचे काय आता?

>>बाळासाहेबांचा यमराजाला पहिलाच आदेश ताबडतोब कसाबची रवानगी नरकात कर>>>>> बंडूपंत. एकच नंबर....:)

कसाबला फाशी....बहुतेक बाळासाहेबांनी यमराजाचा पहिल्याच दिवशी ठाकरी शैलीत खरपुस समाचार घेऊन जीवन-मॄत्यु देण्याच्या न्यायाचा रिमोट कंट्रोल आपल्या हातात घेतलेला दिसतोय.
बाळासाहेबांचा यमराजाला पहिलाच आदेश ताबडतोब कसाबची रवानगी नरकात कर
>>>>> +१०००००००० सहमत.

पण आधी झाले असते तर बाळासाहेब समधानाने मॄत्यूला सामोरे गेले असते

महाराष्ट्र आणि भारत सरकारचे अभिनंदन Happy

कसं का होईना कसाब मेला हेच पुरेसं आहे की. मग तो डेंग्युने असो किंवा फाशीने. >>
त्याबद्दल नक्कीच आनंदच आहे. :):) परमानंद. पण काळ सोकावतो.

कारन त्याचा अर्ज राष्ट्रपतींच्या टेबलावर पोचत नाहीये. दिल्ली सरकारच्या गृह मंत्रालयाची ती जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस दोघानीही पाठपुरावा करून अर्ज नामंजूर करून घेतलाय. >>
याबाबत मला प्रचंड शंका आहे. कलामसाहेब जाऊन आता प्रतिभाताईंची सुधा टर्म संपत आली. भारतात सर्वोच्च अधिकार असलेले राष्ट्रपती स्वतः याचा पाठपुरावा का करु शकत नाहीत.

अज्जिबात गाजावाजा न करता कार्यवाही केल्याबद्दल धन्यवाद.>>>> <<<<<< असहमत.
कारवाई इतकी लपुन छपुन केल्यागत का केली? स्वतंत्र भारताला कसली भिती होती अन का? सार्वभौम सत्तेवर आक्रमण केलेल्या परकी दहशतवाद्यास शिक्षा देताना इतकी गुप्तता का पाळावी लागते? लागत असेल, तर ते देखिल शरमेचेच आहे.
असो.
कणखरता दर्शविल्याबद्दल राष्ट्रपतींचे आभार अन अभिनंदनही.

कांपो, का करू शकत नाहीत याचे डिटेल्स माबोवर मागेच कुणीतरी दिलेत. सापडले की लिंक देते.
नंदिनी म्हणते त्याप्रमाणे सरकारने पाठपुरावा केला पाहिजे.

फेसबुकवरची एक पोस्ट

त्या xxxxला इतके दिवस बिर्याणी खात ठेवला होता तर नेमका आजचाच दिवस सापडला त्याला लटकवायला..
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाऊंटन परिसरात कॉंग्रेस सरकारने अमानुष गोळीबार करून ११ वर्षांच्या मिनाक्षी मोरेश्वर पवारसह १५ लोकांचे बळी घेतले होते..त्यांच्यासह सर्व १०६ हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ २१ नोव्हेंबर हा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात ’हुतात्मा दिन’ म्हणून साजरा केला जातो..
परंतु आज नेमक्या याच दिवशी त्या दहशतवाद्याला लटकवल्यामुळे आजच्या दिवसाला ’हुतात्मा दिन’ म्हणण्याचीही चोरी झाली आहे..उद्या हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला तर काही Low IQ वाले लोक आम्ही कसाबला श्रद्धांजली वाहतो असेही बोलायला मागेपुढे बघणार नाहीत.

गुप्तता राखून फाशी दिल्याबद्दल संबंधीत अधिकार्‍यांचे अभिनंदन!

इतका जास्त कालावधी लागला हे आपली न्यायप्रक्रिया बरीच क्लिष्ट असल्याचे निदर्शक आहे. तरीही, ती व्यापकही असणार यात वादच नाही.

काही ठिकाणी 'काँग्रेसने बाळासाहेबांच्या निधनानंतर आलेली लाट' आपल्याकडे वळवण्यासाठी हे अचानक केले असे म्हंटले जात आहे. हे राजकारण आता करू नये, केले जाऊ नये असे मनापासून वाटते. म्हणायचे असल्यास असे म्हणावे की न्याययंत्रणेने व कायद्यायंत्रणेने एका महान हिंदुत्ववादी नेत्याला अर्पण केलेली ही श्रद्धांजली आहे.

-'बेफिकीर'!

तो नक्की मेला की अशीच बातमी दिलेय..सोडून.
खरी असल्यास आनंदच आहे तरीही विश्वास बसत नाहीये...इतक्या गुप्तपणे करायची काय गरज होती ह्याचं समाधानकारक उत्तर मिळत नाहीये

Pages