बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्या, नावनोंदणीत बदल करायची सोय आहे.

ग्लास कधी फोडला? पाणी कधी सांडले? शेजारच्या विविध गुणदर्शनाचा तर हा परिणाम नव्हे? तिकडे लक्ष गेल्यामुळे हे झालं का? मी यायच्या आधीच, म्हणजे गटग सुरू झाल्याक्षणीच ही घटना घडली असावी. अशा रीतीने पद्धतीला धरून सर्व काही झाले आहे हे सर्वांनी आणि अआंनी नोट करावे! Proud

मी फारच कमी वेळ होते गटग ला.. पण सगळ्यांना भेटून फार मजा आली.. Happy

नील फारच गोड आहे.. फुळ्ळ टू आई वर गेलाय..
७.३० ला गटग सुरु होणार होतं , पण मी ऑफिस मधून डायरेक्ट ८.१५ परेंत म.स्प. ला पोचले.. बरिचशी मंडळी येऊन बसली होती..
भजी ऑर्डर केली होती.. जी फार भारी होती.. वांग्याचं भजं पहिल्यांदच बघितलं मी तिकडे..
गेल्या गेल्या मला पुनम नी ना.क ची मगणी केली.. जी मी पूर्ण केली नाही.. Happy

बस्कू नी नील साठी डोसा ऑर्डर केला होता.. पण आम्हा लोकांच सूप आलं तरी त्याचा डोसा काही येइना .. मग नीरजा त्या वेटर वर जाम डाफरली.. पण त्या डाफरण्याचा वेटर वर काहीही इफेच्ट झाला नाही.. डोसा जरा वेळानी आला.. जो बहुतेक बस्के ला संपवावा लागला

सरते शेवटी मी निघता निघता बिल्वा आली.. त्यामुळे तिच्याशी काहिच बोलण झालं नाही..

आशुडी नी मात्र माझ्या कडून आवरा वदवून घेतल्च एकदा.. Happy

पूनम, तू होतीस तेव्हा पण बस्कू आणि अवनीमधे रमली होतीस. त्यादरम्यान केदार आणि साजिराने पाणी-सांडण करून घेतले Happy

Pages