बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी पुण्यात गटग (शुक्रवार, १४ डिसेंबर सं. ७:३०)

Submitted by पराग on 11 November, 2012 - 10:53
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस

शुक्रवार १४ डिसेंबर संध्याकाळी ७:३०. मल्टीस्पाईस..
बस्के, बिल्वा ह्यांना भेटण्यासाठी हे गटग आहे...

रैना, शेवगा, लाजो, सशल ह्यांना भेटण्यासाठी डिसेंबर सेकंड हाफमध्ये करू गटग. पूर्वा डिसेंबरात आहे इथे. ती दोन्ही गटगांना येईल...

मंजिरी कधी येणार आहे?

माहितीचा स्रोत: 
-
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, December 14, 2012 - 09:00 to 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो.. मल्टीस्पाईसमध्ये बुकिंग झालेलं आहे.
जर कोणी माझ्याआधी पोचलात (बहुतेक पोचालच Happy ) तर माझ्या नावाने आहे बुकिंग..

हां हे बरं झालं. चला रे परागच्या आधी पोहोचून त्याच्यासाठी बिल ठेवून जाऊ.
थॅंक्स पराग. Proud

वृत्तांत कोण लिहिणार आहे हे आधीच ठरवा. म्.स्पा. त्यावरून बुद्धिबळ खेळत बसू नका. बाकी विषयांवर रसभरीत चर्चा करा. फोटो काढा. आम्हाला पाठवा.

अरुण Lol

मंजू, आत्तापर्यंत म.स्पा माबोप्रूफ झालेलं असावं. कितीही आचरट अचाट दंगा केला तरी मॅनेजमेन्ट स्थितप्रज्ञ असतेय.

अ.आ. Lol

मजा करा लोकहो! शुक्रवारी गटग असल्याने मिसलं गेलं आहे.
केदार/ श्यामली तुमच्यापैकी कोणाला तरी फोन करेन. उत्सवमूर्तींशी बोलायला.

मजा आली. नीळू गोड आहे. कोणालाही भाव देत नाही, आपल्याच नादात असतो आणि अगदी आई-वेडा आहे Happy बिल्वा फारच कमी वेळ येऊ शकली, तरी पग्याने त्यातल्यात्यात तिच्याशी गॉसिप केलेच Proud

बाकी वृ अवनी लिहिणार आहे.

अवनी किती कमी वेळ होती! पग्या, नी, पौर्णिमा तुम्हीसुद्धा लिहा वृत्तांत!

मला खूप मजा आली! पण अधून्मधून नील मुळे व मुख्यतः लेटेस्ट मायबोलीवरचे काही न वाचल्यामुळे गॉसिपिंगमध्ये सहभाग नाही घेता आला. पण धमाल आली ! गटगला मी,नीधप,पौर्णिमा,पराग, केदार जोशी,साजिरा,आशूडी,अवनी, बिल्वा, बेफिकीर, विक्रमकाका व घारूआण्णा(मला तुमचा हाच आयडी वाटत होता बरका. बोलले नाही फक्त.. Happy ) होते.. सर्वांना भेटून मस्त वाटले! शैलजा,मामी यांच्याशी फोनवर गप्पा झाल्या.. विकडे व सवाईमुळे बर्‍याच जणांना जमले नाही.. इथे आहे तोवर अजुन गटगं नक्की करुयात. प्राची, फेब्रुवारीपर्यंत तुला नीलला भेटता येईल. कधी येतेस?

थोडक्यात पण महत्त्वाचे :

१. गटगला मजा आली.. विकडे आणि सवाई असूनही बरेच जण आले.
२. मल्टी स्पाईसच्या शेजारी लॉनवर काहितरी नाच गाण्यांचा कार्यक्रम सुरु होता. त्याचा आवाज मोठा होता पण पौ त्यालाही हार मानत नव्हत्या.
३. पौ, नीरजा आणि आशुडी मिळून मध्येच हास्याचे फवारे सोडत होत्या. (नीने ह्याही गटगला पारतंत्र्याच्या बेड्या घातल्याच होत्या.. Wink )
४. अवनीने बरीच 'आवरा आवरी' केली... Proud
५. मायबोलीचा आता कोथरूड चॅप्टर काढावा कारण कोथरूडमध्ये मायबोलीवरचे बरेच चॅप्टर लोकं रहातात असा प्रस्ताव केदारने (बेफिकिरांकडे पहात) मांडला.
६. त्रिविक्रमांनी अचानक हजेरी लावल्यामुळे मजा आली. मी राफा आणि फेडररचा विषय काढतात ते घाईत असल्याचं सांगून निघून गेले.
७. बिल्वा कमी वेळ उपस्थित असल्याने ती खरच हार्मलेस आहे का नाही हे कळले नाही.. (सिंडी प्लीज नोट.. Wink )
८. नीलला मी उचलायचा प्रयत्न केल्यावर त्याने माझ्याशी मारामारी केली. (खर तर मी बस्केशी कधीच वाकड्यात शिरलो नाहीये.. Proud ).. बस्के मायबोलीवर जेव्हडं बोलते त्यापेक्षा प्रत्यक्षात फारच शांत वाटली. Happy
९. घारूअण्णांनी अचानक हजेरी लावल्याने त्यांचीही भेट झाली.
१०. ( मनिषच्या अनुपस्थित) साजिर्‍याने पाणी सांडून आणि केदारने ग्लास फोडून परंपरा, प्रथा, पद्धती चालू ठेवल्या.
११. वर नाव नोंदवून न आलेल्यांचा निषेध !

नीने ह्याही गटगला पारतंत्र्याच्या बेड्या घातल्याच होत्या. <<
पग्याच्या बेसिकमधे घोळ आहे.
पग्या, जाचक बाफ वाचून ये Wink

वा! मस्त.
खादाडी काय केली ते समजले नाही. पाणी कोणी आणि कसं सांडवलं याचा रसभरीत वृत्तांत अजून आला नाहीये.

प्राची, तू बस्के आणि नीलला भेटायला ठाण्याला ये. ठाणे तुला जवळ आणि सोईस्कर पडतं. Happy

पग्या.. मी आधीच क्लियर केलेलं होतं की.. विकडे असल्याने मला शक्य होणार नाही.. त्यामुळे निषेढ स्विकारला जाणार नाही....

Pages