वाचन कट्टा

Submitted by योडी on 31 October, 2012 - 05:53

वाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..

काय वाचताय?कसं आहे?कुठे मिळेल? हे सगळं बोलण्यासाठी..
-परागची संकल्पना..

कृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.
-अ‍ॅडमीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कै मंगेश पाडगावकर
अंत्यदर्शन आज दुपारी 12 ते 3.
पत्ता: 125ए, साईप्रसाद, जैन सोसायटी, सायन (प).
अंत्यसंस्कार: दु. 4 वाजता सायन विद्युतदाहिनीत.

माझ्या पन्जाबी मित्राने पु.ल.देशपान्ड्यान्च्या व्यक्ति आणि वल्ली आणि असा मी असामी चा इन्ग्लिश अनुवाद आहे का ते विचारले आहे. कुणाला काही माहित आहे का?

धागा परत वर काढते आहे.
वाचन चालू असलेल्या पुस्तकांवर बोलण्यासाठी हा धावता धागा चांगला वाटतो.

सध्या मी प्रतिभा रानडे यांचं 'अफगाण डायरी: काल आणि आज' हे पुस्तक वाचत आहे. अगदी गुंतवून ठेवणारं, वैयक्तिक अनुभवांवर आधारित असलं, तरी व्यापक दृष्टिकोन देणारं असं हे पुस्तक आहे. खान अब्दुल गफार खान ऊर्फ बादशहाखान यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा प्रसंग रोमांचक आहे.

सध्या मी ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांचं पुस्तक वाचतोय. २५ वर्षे उम्म खद्रा या सौदीतील खेड्यात वैदकीय सेवा देतानाचे खूप विलक्षण अनुभव मांडले आहेत. यात सौदीतील संस्कृती, समाजजीवन यावर कोणतीही टीका न करता खूपच ओघवतं लिहिलं आहे. आताच्या आणि २५ वर्षांपूर्वीच्या सौदीचे स्थित्यंतर या पुस्तकातून दिसून येते.

‘सोन्याच्या धुराचे ठसके’ - हे पुस्तक मलाही आवडलं होतं........छान पुस्तक आहे.

वावे,tumhI वाचलीही असतील फिरोझ रानडे नची पुस्तके. त्यांनीही सुरेख लिहिलं आहे अफगाणिस्तानवर.
त्यांचे नाव मुकुंद रानडे होय. इंदिरा गांधीचे पती फिरोझ गांधी,आपल्या पत्नी मुळे ओळखले जात असे प्रवाद होता. तसे पत्नी प्रतिभा रानडे या साहित्यिक होत्या म्हणून मिस्किल पणे फिरोझ रानडे ह्या नावाने लेखन केलं.
Avantarababat क्षमस्व!

हो देवकी, ऐकलंय खूप रानडे कुटुंब आणि अफगाणिस्तान यावर. पण हे पहिलंच पुस्तक वाचतेय मी. त्यांच्या मुलाने एक माहितीपटही काढलाय ना अफगाणिस्तानवर?
प्रतिभा रानड्यांचं ' ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंंशी' हे पुस्तक वाचलं आहे आधी.

'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंंशी' मस्त आहे. दुर्गाबाईंच्या नावाशी निगडीत असे काही झरझर वाचता आले याचाच खूप आनंद झाला होता मला - लिखाण बाईंचे नाहीये हे माहित असूनही Happy

सध्या एस् एल् भैरप्पांच्या 'उत्तरकांड' या मूळ कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद (अर्थात उमा कुलकर्णी) वाचत आहे.
सीतेच्या नजरेतून रामायणाची कथा असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. भैरप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे ते या व्यक्तिरेखांंना शुद्ध माणसं बनवून समोर ठेवतात. 'पर्व' सुद्धा याच कारणाने मला आवडलं होतं. अवतार, चमत्कार वगैरे गोष्टी चार हात लांबच ठेवतात. उत्तरकांडही तसंच लिहिलं आहे. अर्धं वाचून झालंय.

वावे, भैरप्पा म्हणजे भारीच.
कालच उमा कुलकर्णी यांच संवादु अनुवादु हे पुस्तक पाहिलं, त्यांनी त्यांच्या या आत्मकथनात लेखन , अनुवाद यावर व जीवनप्रवासविषयी भन्नाट लिहिलंय. वाचायचय

इथे बऱ्याच जणांनी लिहिलं होतं म्हणून मी पर्व वाचायला घेतलं होतं पण काही पकड घेईना. सुरुवातीची बरीच पानं खूप निगेटिव्ह टोनमध्ये वाटली. पुन्हा वाचायचा प्रयत्न करेन

इथे बऱ्याच जणांनी लिहिलं होतं म्हणून मी पर्व वाचायला घेतलं होतं पण काही पकड घेईना.
>>
मी पर्वबद्दल लिहिलेलं वाचलं असतास तर ही वेळ आली नसती Proud

'आवरण' वाचताना माझं असं झालं... सतत 'मजा नहीं आ रहा' असंच वाटत राहिलं. कादंबरीचा विषय खूप छान आहे, पण कादंबरी हा फॉर्म म्हणून गंडलाय असं माझं मत झालं. तरी संपूर्ण पुस्तक वाचलं.
अनुवाद म्हणून मात्र फारच छान, पुस्तक मुळातून मराठीतच लिहिलं गेलं असावं असं.

भैरप्पांना कादंबरीचा फॉर्म जास्त सोयीस्कर वाटतो म्हणून त्यांनी 'आवरण' कादंबरीच्या फॉर्ममध्ये लिहिलंय. नाही तर नॉनफिक्शन पुस्तकही चांगलं झालं असतं.

मी सध्या स्टोरीटेल ॲपवर संदीप खरेच्या आवाजात व्यंकटेश माडगूळकरांचं 'कोवळे दिवस' ऐकायला घेतलंय. फारच छान वाटतोय अनुभव!

आजच्या लोकसत्ताची महिला दिनविशेष चतुरंग पुरवणी चांगली आहे वाचायला.
आईने ने इरावती कर्वेंवरचे उषा कोटबागी यांचे एक पुस्तक दिले होते वाचायला ते आज सुरु करावे म्हणतोय.