वाचन कट्टा

Submitted by योडी on 31 October, 2012 - 05:53

वाचनाचा भस्म्या जडलेल्यांसाठी, पुस्तकांच्या गप्पा मारण्यासाठी..

काय वाचताय?कसं आहे?कुठे मिळेल? हे सगळं बोलण्यासाठी..
-परागची संकल्पना..

कृपया इथे बेकायदेशीर/ प्रताधिकारांचं उल्लंघन करणारे दुवे अथवा माहिती देऊ नये.
-अ‍ॅडमीन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. माझी २०२० म्हणजे कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळातली "पर्व" बद्दलची पोस्ट आहे. तेव्हा पर्व वाचणं डिप्रेसिंग होतं खरं!

'नो स्क्रीन डे'ची आयडीया भारी आहेत. ह्याचा अजेंडा ठरवायला हवा. म्हणजे स्मार्ट वॉच हा स्क्रीन धरायचा की नाही ? अश्या प्रश्नांची उत्तरं आधीच ठरवून ठेवायला हवी. Wink

माझं वाचन सध्या पूर्ण बंद पडलं आहे! ह्या धाग्याच्या निमित्ताने काहीतरी वाचायला हवं आता.

'गोठण्यातल्या गोष्टी' छान आहे. एक विशिष्ट कालखंड डोळ्यांसमोर उभा रहातो. आणि प्रथा परंपराही.
हे सगळं हरवून गेल्याची, हरवत चालल्याची खंत काही काळ मनात दाटून येते. मुस्लिम व्यक्तिरेखाही छान उभ्या केल्यायत.

ह्याचा अजेंडा ठरवायला हवा >>> हो, अगदी!
आधी माझ्या डोक्यात 'नो स्क्रीन' म्हणजे फोन, ओटीटी बघायचं नाही, इतकंच होतं.

गणेश मतकरींचे 'खिडक्या अर्ध्या उघड्या' वाचले नुकतेच. आवडले.

राजदीप सरदेसाईचे २०२४ निवडणुकांवरचे पुस्तक वाचतोय. त्याचे २०१४ वरचे आवडले होते, २०१९ चे जरा कमी आवडले, हे अजूनच कमी.

ह्यु हॉवीची सायलो ट्रिलॉजी मधले दुसरे पुस्तक वाचतोय. पहिले वूल वाचून झाले. दुसरे डस्ट वाचतोय. मला आवडली ही सिरीज. सायन्स फिक्शन / फँटसी म्हणजे काहितरी दुय्यम दर्जाचे साहित्य असे उगाचच अनेक वर्ष डोक्यात होते. त्याला छेद देत हळू हळू या प्रकारातली पुस्तके वाचत आहे. थ्री बॉडी प्रॉब्लेम बर्षाच्या सुरुवातीला वाचले. त्यातली पुढची दोन वाचायची आहेत.

अभिषेक धनगरच्या वाल्डन प्रकाशनाने प्रकाशित केलेली तीन पुस्तके हाती पडली आहेत. अगदी छोटेखानी आहेत. त्यातले झोरान झिवकोविचचे द लायब्ररी हे वाचतोय हळुहळू. संप्रतिने त्याची चांगली ओळख करून दिली आहे इथे https://www.maayboli.com/node/86161

ह्यु हॉवीची सायलो ट्रिलॉजी मधले दुसरे पुस्तक वाचतोय >>>

टवणे सर, सिरीज वाचून झाली का? त्याबद्दल सविस्तर लिही.

---

'गोठण्यातल्या गोष्टी' संपत आलंय. थोडं थोडं करत वाचतेय. त्याचवेळी किंडलवर एक वॉर स्टोरी वाचली. नंतर एम्पायर्स ऑफ द इंडस वाचलं.
एकाच वेळी ३-४ पुस्तकं वाचायची ही माझी वाचन-फॅन्टसी आहे. Proud

मी सध्या हार्ट लँप हे इंटरनॅशनल बुकर पुरस्कार मिळालेलं पुस्तक वाचतेय. चांगलं आहे.

मी रवी आमलेंचं 'रॉ' वरचं पुस्तक वाचते आहे. फारसं आवडलं नाहीये. पण संपवणार आहे. >>>> अर् हो का ?
मी इथेच त्याबद्दल वाचून मागवायचा विचार करत होतो.

हार्ट लँपमधल्या कथा कंटाळवाण्या वाटायला लागल्यात आता मला! Uhoh किती तरी मोठं वर्णन, पण शेवटी ते कशासाठी केलंय, असा प्रश्न पडतो बऱ्याच वेळा. शेवटच्या दोन की तीन राहिल्या आहेत वाचायच्या. त्या वाचून टाकणार आहे.

दूरदर्शनवर पण चांगले कार्यक्रम असतात. माहितीच नसतं.
वाचू आनंदे या कार्यक्रमात आचार्य function at() { [native code] }रे यांच्या साहित्याचे वाचन झालेले आहे.
स्तुत्य उपक्रम आहे.
https://www.youtube.com/watch?v=IhHwcvf03eY

क्षुधाशांती भुवन (किरण गुरव) आणि दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार) ही पुस्तकं नुकतीच लागोपाठ वाचली.
ग्रामीण पार्श्वभूमी, ग्रामीण व्यक्तिरेखा, खेडी आणि शहरं यांचे सोशल क्लॅशेस, आर्थिक उदारीकरणाचे परिणाम - या गोष्टी दोन्हींत आहेत.
त्यामुळे तुलना झालीच.

क्षुधाशांती कमाल आहे! त्यावर सविस्तर लेख लिहिण्याची इच्छा आहे.

नोंदी पुस्तक - एक एक नोंद स्वतंत्रपणे वाचायला छानच आहे. इट हिट्स यू हार्ड अशा अर्थाने छान. पण पुस्तक म्हणून एकत्रित परिणाम मला ओके वाटला.