प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> सशल मस्तझब्बू देत आहेस!!

सगळी कमाल माझ्या घोवाची गो! Happy

Chafa.jpg

सौजन्यः नवरा

पॅसिफिक १ हायवेवरील एक व्हिस्टा पॉईंट. नवर्‍याने आयफोनवरून काढलाय.

1spring.jpg

सेनापती (पहिला फुलाचा, हुडहुडी, सशलच्या फोटोला दिलेला झब्बू), झकास (फुलांचा पहिला), बस्के (सूर्यास्ताचा पहिला, चमचमणारे पाणी, काळ्या चौकटीतल्या नदीचा), स्वरूप (मुरुडचा), चिंगी (जंगलातला सूर्यास्त/सूर्योदय), मामी (दगडांचा, तांबूस झुडपांचा, हिरव्यागार गवतातून वाहणार्‍या ओढ्याचा), दिनेश(मोरपिशी), नीधप (सान्टा फे), रैना (पाखराचा), सशल (सगळेच! ये हँसी वादीयाँ ये खुला आसमाँ पाहून windows XP च्या त्या फेमस वॉलपेपरची आठवण झाली. चाफ्याचा फोटो जुन्या मायबोलीत टाकला होता का?), जिप्सी (ढगांचा)... सगळे जबरी झब्बू आहेत! बघून चांगला विरंगुळा झाला.

ह्यातलं टिल्टेड होरायझन माफ करा ..

Brown.jpg

सौजन्यः माझ्या कपाळीचं कुकू (;))

बस्के, सॉरी, मगाशी उत्तर द्यायचं राहून गेलं ... हो तो इफेक्ट फोटोशॉपमधूनच ..

शापित गंधर्व, ग्रेट फोटो, ग्रेट कॅप्शन .. Happy

puLe.jpg

सौजन्यः बेटर हाफ

(हा फोटो जुन्या मायबोलीत टाकला होता बहुतेक ..)

एक से एक सुंदर फोटो आहेत!

हरतालिका कृपा सशलवर भरभरून वाहते आहे! Proud

सशल,"शालू हिरवा.."खूप आवडला,अजून टाक फोटोज्,फक्त बरेच समानार्थी शब्द शोधावे लागतील.:)

Pages