विचार ,आठवणी - सगळा नुस्ता पसारा!

Submitted by बस्के on 11 September, 2012 - 06:49

खूप दिवसांनी मस्त पुस्तक हाती लागलंय! पण ते वाचण्यासाठी अजुन ३-४ तास वाट पाहावी लागेल. स्वयपाक, लेकाचे खाणं, त्याच्याशी खेळणं-गाणी म्हणणं फार महत्वाची कामं! नंतर नॅपटाईम. नेहेमीप्रमाणे त्याने झोपायचे ते नाईलाजाने, आता डोळे उघडे राहातच नाहीयेत म्हणून खेळ बंद करायचा. आता दोन तास मिळाले! गुड. पुस्तक कुठाय? अं.. अ‍ॅक्चुअल पुस्तक नाहीये म्हणा. आयपॅडच्या किंडल अ‍ॅपवर मिळालेले इबुक. पहिले पान. दोन ओळी वाचतीय तोवर मनाने आरोळी ठोकली! कमॉन पुस्तक वाचतेयस आणि कॉफीचा कप नाही? कधीतरी तू पूर्वी त्याशिवाय पुस्तक वाचले आहेस? हा.. गुड ओल्ड डेज! काही चिंता नाहीत, जबाबदार्‍या नाहीत. व्हा पुस्तकी कीडा! कोण टोकतंय.. 
ओके, ये परत वर्तमानकाळात. कॉफी आणली करून. आता वाचू. अंहं.. नाही लक्ष लागत आहे.. जरा मायबोलीवर चक्कर टाकून येऊ.. मग तिकडे अर्धा तास.. मग आपोआप रूटीन असल्यासारखे फेसबुक. तिथे मिनिमम २० मिनिट्स. कोणी ऑनलाईन भेटले की झालंच. पुस्तक(आयपॅड) बाजूला..

मिळालेल्या दोन शांत तासांपैकी जेव्हा दिड तास निघून जातो तेव्हा मग सुरू होते चिडचिड. ते पुस्तक किती मस्त इंटरेस्टिंग वाटले होते. कशाला जायचे मायबोलीवर, फेसबुकवर. गप बसून वाचलं असतंस तर मार्क झुकरबर्ग शिक्षा करणार होता का? का नाही जमत बाई तुला सेल्फ़ कंट्रोल? इतकं कसं या गोष्टींमध्ये वाहवून जायचे. इतकं कसं टेक्नॉलॉजीचे अ‍ॅडीक्शन? कॉन्संट्रेशनचा वाजलेला बोर्‍या दिसतोय ना? अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर होण्याइतपत मन घुटमळतंय इथेतिथे! घुसमट. घुसमट नुसती! का कशाला कोण जाणे. हा जो उगीच ताण जाणावतो कधी कधी, तो काय आहे? कशाचा आहे.. काही लोकं नक्कीच सुख बोचते वगैरे टर्म्स वापरू शकतात. Happy पण खरंच मला माहितीच्या विस्फोटाचा ताण खूप जाणवतो.

आमच्या पिढीने(80s) प्रचंड प्रमाणात काळाचा वेग अनुभवला. आमचं लहानपण बरंचसं सिधेसाधे गेले. शाळा,अभ्यास, खेळ, दंगा मस्ती.. अधून मधून घरच्या आईसक्रिमपार्ट्या, कधीतरी सिनेमा. भाषा कळत नसताना बघितलेल्या स्मॉल वंडर, डिफरंट स्ट्रोक्स सारख्या सिरीयल्स. दूरदर्शन फक्त होते तेही दिवस आठवतायत मला. इतकंच काय, खूप पूर्वी एक जैन टीव्ही म्हणून चॅनल असायचा केबलवर. तोही आठवतोय मला.. काहीही गोष्टी. इतक्या साध्या व सुंदर होत्या ना. आणि तितक्याच खूप क्षुल्लक. इतक्या क्षुल्लक की आणखी ४-५ वर्षात कदाचित मी पार विसरून जाईन त्यांना - जर त्या आठवणी जागत्या ठेवल्या नाहीत तर. कारण. काळ. मागच्या पिढीत काळ ज्या वेगाने धावला त्यापेक्षा प्रचंड फास्ट काळ धावतोय आता. वर्ष दोन वर्षात सगळ्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी गोष्टींचे नवीन मॉडेल्स/अपग्रेड होऊन आपल्याकडची गोष्ट मागे पडते. ५ वर्षापूर्वी आम्ही डिजिटल कॅमेरा घेतला. खूप सर्च करून, डिल्स मिळवून. १५०डॉ ला ८मेगापिक्सलचा ६एक्स ऑप्टीकलझूमचा कॅनन. पुढील २ वर्षात कॅमेरा म्हणजे खेळणं होणं बाकी होतं. लॅपटॉप बद्दल बोलायलाच नको.

किती धावणार आपण? आणि कुठे निघालो आहोत? भस्मासूरासारखे सगळं घाईघाईने गिळंकृत करून नक्की काय हवंय आपल्याला? गुगल पूर्वीचे दिवस काय होते ते आठवले तर our version of Arabian nights असावे इतकी सुरस वाटेल. एखादी गोष्ट माहीत नसेल तर चक्क आपण त्या तश्या अज्ञानात झोपायचो? झोप लागायची आणि? हो हो ! कितीतरी शांत लागायची.
मग आता काय अडलंय .. नाही कळलं अर्धाच घसा का दुखतोय. नाही कळले थायरॉईड, फॉर दॅट मॅटर जगातल्या प्रत्येक कंडीशनचे सिम्प्टम्स आणि मी नाही स्वत:ला त्यात बसवून पाहीले. नाही कळते पोटातल्या बाळाचे प्रत्येक दिवसाचे माईलस्टोन्स. नाही मी शोधली घरातील यच्चयावत प्लंबिंग/कुकींग/फायनान्स-बजेटींग आणि व्हॉट नॉट अडचणींवरची उत्तरं.. नाही कळ्लं ज्या व्यक्तींबरोबर आपण शाळेत एक अक्षरही नाही बोललो त्यांनी लॉंग विकेंडला काय केलं ..   नाही आत्ताच्या आत्ता कळलं आत्ता झालेला भूकंप किती रिश्च्टर स्केलचा होता. काय बिघडतं? नाही.. खरंच माणसाने क्युरिअस असावे किंवा ज्ञान मिळवावे वगैरे सगळं ठिक आहे. पण खरंच किती गोष्टी आपण वाचतो/वाचायला जातो ज्याची खरंच गरज असते. की आपण डोक्यात अनावश्यक कचरा निर्माण करतोय. कारण ती प्रत्येक गोष्ट कधीनाकधीतरी डोकं वर काढून आपलं (आपल्या डोक्यातले) अस्तित्व दाखवून देतेच. ताण ! ताण येतो मला माझ्या मनातल्या विचारांचा. माहितीच्या स्फोटाचा ताण येतो. आई बाबा पिढीचे बरं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगातले बर्‍याच टेक्निकल गोष्टी टेक्निकली चॅलेंज्ड असल्यास स्किपच होतात. आपलं नाही ना तसं. मुद्दमहून शिक्षण घेतलंय या सगळ्याचं..कळतंच बरचसं. नाही कळलं तर कळून घेण्याची धडपड सुरू. कधी कधी वाटतं कम्प्लेसंट असावं ब्वॉ माणसाने. निदान आपल्याला आपल्या जिज्ञासेचा त्रास होतोय हे जाणवलं तरी कम्प्लेसंट व्हायला शिकावे. पैसा काय, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काय नि ज्ञान काय. किती हवंय, झेपतंय हे पाहूनच झोळीत घ्यावं.

अमेझॉन किंडलवर खूप मस्त पुस्तकं फ्री किंवा अगदी मामुली किंमतीत मिळतात. आयट्युन यु मध्ये अनेक उत्तम युनिव्हर्सिटीजमधले कोर्सेस फुकटात मिळतात. सुरवातीला मी एक पुस्तक/कोर्स घ्यायचे, वाचून काढायचे. आता तसं नाही. किंडलवर अधून मधून चेक करत राहीले की पुस्तकं फ्री मिळतात अगदी १५डॉ. ची सुद्धा! त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण. Happy
पुस्तकं जाऊद्या! ती निदान प्रत्यक्ष दिसतात तरी! या आठवणींचे काय करायचे? कधी कधी त्या उगीचच दातात अडकलेल्या कणासारख्या डोक्यात फिट्ट बसलेल्या असतात. त्यांचे काय काम ? त्या आठवून दोन क्षण आनंदात जाऊन तुम्ही परत जोमाने कामाला लागता का? नाही! बर्‍याचदा त्या आठवणी आपल्या खिन्न्च करून टाकतात. ते जुने दिवस आठवतात. मन पण असं येडचॅप असते, त्याच्यासाठी जुने  सगळे सोनेच! मग कसं त्या मेमरीज वाईप आउट करणार. राहूदे मग.. कपड्यांच्या कप्प्यासारखे  मन आवरायला काढता आले पाहीजे. आज फक्त शाळेचा कप्पा आवरायचा मनातला. जे जे काही आठवतंय त्यातले उपयोगाचे ठेवायचे. ही मात्र अवघड स्टेप. मन हे जात्याच होर्डर प्रवृत्तीचे. सगळं ठेवू पाहणार. नो वेज! हे नाही केले तर मग कपाट ओसंडून वाहणार. आत्ता रिसेंट साईझ ८ असताना साईझ ४ ची जीन्स समोर येणार. मग मी कशी साईझ ४ची जीन्स वापरू शकत होते म्हणून सॅड व्हायचे.. हेच सगळं मनातील आठवणींबरोबर. डिमेन्शिया झालेला ब्रेन जसा कुठल्या तरी भलत्याच काळात रमतो, तीच गत. मनाने गपचुप वर्तमानकाळात राहणे का बरं इतकं अवघड? आहे म्हणा अवघड. जिवंत असण्याचे प्रतीक म्हणजे श्वासोच्छ्वास. आपण बाळ असताना श्वास नीट पोटापासून घेत असतो. आता तसा श्वास घ्यायला योगा/ध्यान करावे लागते! :।  कधी वरच्यावर श्वास घेणे सुरू झाले? मला वाटते जेव्हा मागे तो अदृश्य वाघ मागे लावून घेतला आपण तेव्हाच. डॉ. बंगाच्या पुस्तकातील क्षणस्थ होणे म्हणजे .. डोक्यावरून पाणी. मला तरी वाटतेय की ते शक्यच होत नाही. निदान पूर्वीच्या काळात शक्य असावे. या आताच्या गुगलच्या जमान्यात ? nope, nada!!   Happy

मी काही माहीती तंत्रद्न्द्यानाच्या/गुगलच्या विरोधात नाहीये. मी माणसाच्या जिद्न्यासेमुळे त्या  असमाधानीपणाकडे झुकणार्‍या मनस्थितीबद्दल बोलत आहे. कधी कधी मला वाटतं, मला जास्तच उगीच प्रश्न पडत आहेत. (हीच बरं ती जास्तीची , खरं म्हणजे नकोच असलेली जिद्न्यासा!) आता काय करायचे? सगळ्या मटेरिअलिस्टीक जगाची हाव सोडून, मिनिमलिस्ट लाईफस्टाईल जरी तुम्ही एक्झिबिट केलीत तरी त्यानंतर तुम्हाला निर्गुणत्वाचा, मी म्हणजे काय, माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय इत्यादी विचारांची हाव पडली तर काय?! ती हाव तर फारच वाईट हो. प्रश्नांच्या गराड्यात पडू, त्या मार्‍यात थपडा खाऊ पण उत्तरं मिळत नाहीतच वरून स्पिरिचुअल असमाधान. थोडक्यात अवघड आहे! कदाचित अती तिथे माती हेच खरं. असतील अशा असामी ज्यांना मटेरिअलिस्टीक व स्पिरिचुअल जग याचा पर्फेक्ट तोल साधता आला असेल. तीच खरी सुखी लोकं! माझ्यासारख्यांनी काय करायचे? जाऊदे अवघड आहे हा शोध!  गुगलच करावे. मिळेल उत्तर! Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला कळत्या वयात फोन,कँम्पूटर इ. उपकरणे,इंटरनेट ह्या गोष्टी वापरायला मिळाल्या आहेत.आपण कसा वापर करतोय,नको तेवढा करतोय,कमी करायला पाहिजे ह्या गोष्टी कळत आहेत.पण आपली मुले जी जन्मापासून ह्या गोष्टी हाताळत आहेत किंवा आपल्याला वापरताना बघत आहेत त्यांच्या डोक्यात किती कचरा साठत आहे ह्याची आपल्याला जाणिव आहे का? नविन आयपॅड आला घ्या,नविन आयफोन आला घ्या (उदाहरण आहे. कृपया अ‍ॅपल फॅन्सनी समजून घ्या ;)) ह्यामुळे आपण मुलांसुद्धा नकळत त्या भोवर्‍यात खेचत आहोत.मला स्वतःपेक्षा पुढच्या पिढीची काळजी वाटते.

बस्के फार्फार आवडलं.. इत्कं सुंदर तू लिहिलंस आणी मग आज मी माबो वर पडिक नस्ते तर मिस झालं अस्तं ना.. Happy
किंडलवर अधून मधून चेक करत राहीले की पुस्तकं फ्री मिळतात अगदी १५डॉ. ची सुद्धा! त्यामुळे सतत डील्स पाहणे सुरू. अरे खरंच हवी आहेत का पण... हे आवडलं अगदी..

मला स्वतःपेक्षा पुढच्या पिढीची काळजी वाटते.>>>>>>>> +१. मला भितीहि वाटते. नको तेवढ्या लवकर ईंटरनेट हाताळायला मिळणार, Sad

धन्यवाद सर्वांना! Happy

आगाउ मस्त कमेंट.
पूर्वा, मला बर्‍याचदा वाटते, नीलला किती वेगळंच चाइल्डहूड मिळतय. पण नंतर वाटते त्यांचे आख्खे आयुष्यच वेगळच असणारे. मेबी तो त्याच्या मुलांना म्हणेल आमच्या काळात सुगंध घेण्यासाठी फुल प्रत्यक्ष समोर असणे गरजेचे होते. आतासारखे नाही, हळक्षज्ञ वापरून हवा तो सुगंध हजर! Proud

बी, तुला काय कळले आहे ती लिहीतोस का मग? म्हणजे कळेल नीट.

बस्के, चला शेवटी विषय विचारातून लिखाणात उतरला की Happy
इतर कोणाला काय वाटेल ते सोड.. पण निदान एक विषय सलग लिहून काढण्याइतकी एकाग्रता तुला मिळाली याचं तुला कसं वाटतंय ते सांग.

मी अनेकदा वापरते ही टर्म.. पण दर २-३ महिन्यांनी माझी 'मनातला विचारांचा पसारा आवरायचाय' ही अवस्था होते आणि मी तो आवरते (आणि त्या आवरण्याने जास्त पसारा करायला नव्याने जागा होते का... माहित नाही .. कदाचित असेलही) किंवा तसा आवरायचा प्रयत्न करते.

मला स्वतःला 'इनफॉरमेशन' जास्त झाली आणि मुख्य म्हणजे त्याचं 'क्नॉलेज' मधे रुपांतर झालं नाही, की अशी अस्वस्थता येते. आजूबा़जूची अनेक लोकं नुसत्या हेडलाईन्स बोलतात असं वाटतं अनेकदा. त्या बातमीचा अर्थ काय, त्याची व्हॅल्यु काय आणि त्याची व्हॅल्यु अ‍ॅडिशन काय? असे विचार माझ्या मनात लगेच चालू होतात.
फेसबुक आणि सोशल मिडिया हा एक वेगळाच चर्चेचा विषय आहे. चाळीतून आधी घरात कोणी डोकावणार नाही अश्या बंद वातावरणात यायचं आणि मग चाळीतच राहात असल्यासारखं 'स्वयंपाकापासून ते मुलं, कपडे, चपला, बूट ते विचार, हौस, यश अपयश, दिनचर्या' वाट्टेल ते लोकांना दाखवत राहायचं... एका अर्थाने नव्या युगाचं हे 'इगो मसाजिंग' आहे असं मला वाटतं....शिवाय कुठेतरी 'इनसिक्युअर' फीलींग असल्यामुळे असं सोशल मिडिया च्या आहारी जायला होतं असं अनेकदा वाटतं.

मला गाणी, सिनेमे, पुस्तकं याबाबत होतं असं... किती पाहणार, किती ऐकणार, किती वाचणार.
कधी कधी युट्युब चक्क नको वाटतं...
ऐकलंय ते, पाहिलंय ते, वाचलंय ते आधी पचवू दे, त्यावर विचार होऊदे.. मग नवीन काही असं होतं.. आणि असं झालं तर मी काही काळ नवीन काही पाहायला, वाचायला, ऐकायला जात नाही.
उदा. रेहमानचा विषय निघाला तेव्हा इतक्या लिंक दिल्या गेल्या. किंवा सिनेमाबद्दल नुकतंच इतकं लिहिलं गेलं... ते सगळं चर्चा करता यावी, किंवा लोकं सध्या ऐकताहेत ना - आपण पण ऐ़कू, पाहू म्हणूण ऐकायचा, पहायचा मोह झाला होता.. पण टाळला मी.
कारण मुळात मेंदूची इतकी माहिती पचवायची तयारी आहे का? याचाही विचार करयला हवा.
कारण माहिती उत्पादन करणार्‍या, डेटा जनरेट करणार्‍या गोष्टींची, उपकरणांची संख्या, कपॅसिटी दिवसागणीक वाढते आहे, पण मेंदूची हा डेटा प्रोसेस करायची कपॅसिटी त्या प्रमाणात वाढत नाही.. त्याला लिमिटेशन्स आहेत याचा विचार करायलाच हवा असं मला वाटतं.
मी ते सगळं पाहणार, वाचणार आहे - पण मेंदूत त्यावर विचार करायला जागा करून.
नाहीतर नुसतं पाहण्यात, ऐकण्यात काही अर्थ नाही असं मला माझ्यासाठी वाटतं.
ह्या प्रोसेस मधे 'हॉट टॉपीकवर किंवा सध्याच्या इन थिंग विषयांवर' मत मांडायची माझी संधी जाते अनेकदा. किंवा मी अनेकदा उशीरा मत देते.
पण केवळ 'पीयर प्रेशर' म्हणून मत द्यावं या विचारांची मी आता राहिले नाही. ज्या गोष्टी आवडीसाठी करायच्या त्या मनापासून, फुरसतमे कराव्या असं मला वाटतं.

अनेकदा मी हा प्रश्न मांडला की लोकं 'कप्पे करायचे' असं उत्तर देतात. अजून असे कप्पे करायला मला जमलेलं नाही, किंवा ते कसे करायचे हे ही समजलेलं नाही.. पण काही गोष्टींचा मोह टाळून मी हा विचारांचा पसारा आवरायचा प्रयत्न करते. मुळात प्रत्येक विषयातलं मला कळायला हवं आणि त्यावर माझं मत असायला हवं असं मला वाटत नाही.
केवळ इंटरनेट किंवा कोणत्याही सोअर्समुळे माहिती उपलब्ध आहे म्हणुन मी साहित्यावर पण बोलणार, चित्रांवरही मत देणार, इतिहास, टेकनॉलीजी, समाज, सिनेमा, स्टॉकस, फिटनेस, सायन्स..... इ. इ. इ. इ. ह्या सगळ्यावर बोलणार, मत मांडणार हेच मुळात मला योग्य वाटत नाही. कारण प्रत्येक मेंदूची तितकी क्षमता नसते... निदान माझ्या मेंदूची तरी नक्कीच नाही हे मला समजलंय. त्यामुळे आता मी माझ्या आवडीच्या गोष्टींत जास्त मन आणि काळ घालवते.
यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातील आयुष्यात.. पण त्याला इलाज नाही.. शेवटी 'वो जिंदगीही क्या जिसमे कोई अधुरा सपना ना हो' Happy

रार, अमेझिंग पोस्ट!! Happy

एक विषय सलग लिहून काढण्याइतकी एकाग्रता तुला मिळाली याचं तुला कसं वाटतंय ते सांग.>>> मस्तच वाटतय!! Happy Happy

रार, मस्त पोस्ट आहे..
ह्याच विचारातून मला न्युज वाचणं आवडत नाही.. आयुष्यात करायला बाकी काहीच नसेल तरी मी शक्यतोवर न्युज वाचण्या/बघण्याच्या फंदात पडत नाही. तसही काही महत्त्वाचं असेल तर लोकं चर्चा करतात, आपल्या इन्टरेस्टची गोष्ट असेल तर डिटेल मधे जाऊन वाचता येतं..

नेट, टीव्ही किंवा तत्सम गोष्टींच्या आहारी जातोय/गेलोय असं वाटणार्‍यांसाठी प्रश्नः
when we chase such things, I feel many a times we are lacking something in our lives (lacking something that is fulfilling.. may be emotions, may be experience, may be thoughts, may be actioning our thoughts)..
मला वाटतं, when we cant confront our fears (आपल्याला आत जे वाटतय) or dont want to evaluate what is it that is lacking or even when we understand we want to hide it from ourselves, when we want to avoid the conflict, thoughts etc - किंव आपल्याला आत जी पोकळी जाणवतेय, तिच्यावर आपल्याला पर्मनंट इलाज करायचा नाहिये (at least not for now) अशा situations मधे आपण टीव्ही, नेट किंवा स्वतःपासून पळून जाण्याचे इतर मार्ग अवलंबतो..
तुम्हाला विचार केल्यावर हे बरोबर आहे असं वाटतं का?

म्हणजे ही व्याधी आहे का व्याधीचं लक्षण आहे?
लक्षणांवरचा उपाय तात्पुरता, पण व्याधीवरती कायमस्वरुपी उपाय करायला/करत रहायला पाहिजे

तुझ्या लेखातल्या स्क्रीन व्यसनाला प्रचंड अनुमोदन. ह्या व्यसनामुळे जी वाचनाची आवड आत्ता आत्तापर्यंत होती ती एकदम नाहिशी झाल्यासारखी वाटतेय. ऑर्कुट ९९% बंद झालंय, फेसबुक व्यसन ७०% बाकी आहे अजून. मायबोली मात्र अजूनही तेवढंच ताजं आहे. पण माझ्याकरता तरी हे सोशलायजिंग दिवसाचा अविभाज्य भाग आहे.थोडं कमी करता येईल पण बंद नाही.

रार, >>उदा. रेहमानचा विषय निघाला तेव्हा इतक्या लिंक दिल्या गेल्या. किंवा सिनेमाबद्दल नुकतंच इतकं लिहिलं गेलं... ते सगळं चर्चा करता यावी, किंवा लोकं सध्या ऐकताहेत ना - आपण पण ऐ़कू, पाहू म्हणूण ऐकायचा, पहायचा मोह झाला होता.. पण टाळला मी.
कारण मुळात मेंदूची इतकी माहिती पचवायची तयारी आहे का? याचाही विचार करयला हवा.>>>
रेहमान बीबी वाचून मलाही असा मोह झाला होता पण सर्च करण्यापूर्वीच तेवढा इंटरेस्ट नाही हे लक्षात आलं त्यामुळे मेंदूच्या माहिती पचवण्याच्या कपॅसिटीपेक्षाही इंटरेस्टचा भाग अधिक आहे असं वाटतं.

सशल,

माणसाला जे करावंसं वाटतं तेच तो करत असतो आणि तेच करणे त्याला आणि इतरांनाही (अनेकदा) तत्परिस्थितीत समर्थनीय वाटत असते, हे या लेखात विस्मृतीत गेलेले आहे. आपण जे करत नाही आहोत, करत आहोत, करायला हवे होते, करत आलो, कधीच केले नाही त्याबद्दलचा संदिग्ध पश्चात्तापरुपी भावनिक 'चनाचोरगरम' आहे या लेखात. त्यामुळे पहिलंच काय, मी सगळंच बदललं माझ्या प्रतिसादातलं.

धन्यवाद

रार, तुमची विचार प्रक्रियेमधली स्पष्टता किंवा विचार ज्या प्रक्रियेतून जात आहेत त्याप्रक्रियेबद्दलची स्पष्ट जाणीव दिसून आली आणि आवडली, पण तुमचे दोन्ही परीच्छेद कॉन्ट्राडिक्टींग होत आहेत असं वाटलं.
ऊदा. खालील वाक्ये.

मी ते सगळं पाहणार, वाचणार आहे - पण मेंदूत त्यावर विचार करायला जागा करून.
आणि
अनेकदा मी हा प्रश्न मांडला की लोकं 'कप्पे करायचे' असं उत्तर देतात. अजून असे कप्पे करायला मला जमलेलं नाही, किंवा ते कसे करायचे हे ही समजलेलं नाही.

मेंदुत मुद्दाम जागा कशी करणार? माहिती डोळ्यांसमोर समोर ऊपलब्ध आहे, कानांवर आदळत आहे तिला मेंदूत जागा नाही म्हणून कसं नाकारणार?
रेहमानचं संगीत निवांत वेळ काढून ऐकणं त्यातला आनंद घेणं, आपल्या मेंदुत संगीताबद्दलची जी काही माहिती आहे त्याच्याशी पडताळून त्याच्या संगीतातल्या सुरांनी भरलेल्या जागा ओळखून 'वाह' म्हणणं ही वेगळी अनुभुतीची गोष्टं आहे. त्याचा माहितीशी कसा संबंध जोडता येईल? पोट भरलेले आहे म्हणून खाई खायचं नाही हे कळणे सोपे आहे. पण पोट रिकामे असतांना काय खावे हे ठरवायचे आहे.
डोक्याची मंडई होतेय म्हणून मी आता हिमालयात जाऊन राहतो असे काही केले तरच ह्यातून सुटका झाली असे काहीसे वाटेल.
खर्‍याखुर्‍या माणसांच्या जगात तुम्ही माहितीपासून सुटका कशी करून घेऊ शकता?

पुन्हा माहिती असणं आणि त्याविषयी बोलणं, मत मांडणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत नाही का? तुमचा स्वभाव, आवडही बरेच काही ठरवते.

कारण मुळात मेंदूची इतकी माहिती पचवायची तयारी आहे का? याचाही विचार करयला हवा. >> हे कसं करणार. ऊदा. लॉयर्स, काऊंसिलर्स, डॉक्टर्स किती केसेस, किती लोकं, किती माहिती एकाच वेळी हाताळतात आणि तेही वर्षानुवर्षे करत राहतात. पण आता नवीन माहितीसाठी मेंदूत जागा नाही असे काही होत नाही. कंटाळा, सॅच्युरेशन येऊ शकतं, नव्हे येतंच पण सुटी/बदल करून घेतल्यास तेही निवळतं.
जुनी हवी ती माहिती टिकवून पुन्हा पोत्याने नवीन माहिती घेण्यासाठी मेंदु तयार असतोच, त्याची कॅपेसिटी काही कमी होत नाही, बाकी शरीर निरोगी असल्यास ती कॅपॅसिटी वाढतंच राहते. रेहमानने हजारो ट्यून्स निर्मिल्या, ऐकल्या, काही तो विसरलाही असेल पण आता स्टॉक संपला नवीन करता येणार नाही असे होत नाही.

तुम्ही म्हणता तसे ठरवून, फॉरमॅटींग होत नाही. दुसरे लोक म्हणतात तसे कप्पेही ठरवून करता येत नाहीत. मनाची संरचना माहिती आपल्या ईद्रियांवर आदळताक्षणी ते सॉर्टींग आपोआपच घडवून आणते.

कुठल्या गोष्टीने काही फरक पडत असेल तर तुमचा 'सेल्फ' किती जागरूक/तत्पर/संयमी/आज्ञाधारक आणि प्रामाणिक आहे आणि तो एकाच जागी/आठवणीवर/काळात/केसमध्ये/व्यक्तीमध्ये अडकून तर नाही ना.
हे नसले की आपोआप पुढे मार्गाक्रमण होत राहते. नवीन माहिती आत्मसात होत राहते, त्यातल्या अनावश्यक भागाची लागलीच किंवा काही काळातच विल्हेवाट लावली जाते. मनाची चाळणी आधी भरमसाठ रिजेक्शन आणि नंतर मोजकेच सिलेक्शन घडवून आणते. त्याला रिजेक्शन/सिलेक्शन करणे जमले नाही की गोंधळ ऊडतो, निराशा वाढते.

मला माझा ईनवेस्टमेंट बँकर क्लायंट 'यू पीस ऑफ शिट' म्हणून सोमवारी शिव्या घालतो आणि शुक्रवारी स्टेट थेटरमधल्या शोची तिकिटं हसतमुखाने देऊन जातो. जर मी माझा आठवडा मनात त्याच्या शिव्या ठेऊनच घालवला तर महिन्याभरात मी माझं मानसिक स्वास्थ्य आणि आत्मविश्वास हरवून बसेन. माहितीचेही तसेच, तिच्यात अडकून पडले की पुढे जाता येत नाही आणि मग निराशा वाढत राहते.
जे नकोय ते सोडून देणे जे हवे आहे ते जवळ ठेवणे हे मनाला चांगले जमते. आपण फक्त आपल्या 'स्व'शी मनाची असलेली नाळ मजबूत ठेवायची, मग रेहमानच्या संगीताबद्दलची माहिती असो नाही तर लिबियाच्या युद्धाबद्दलची.
त्यात फेसबूक, स्मार्टफोन, टीवी ही फक्त माध्यमे आहेत, हाच परिणाम पुस्तकांमुळे होणार नाही असे काही नाही. कुणाला एकही माध्यम न वापरता केवळ आजूबाजूच्या माणसांमुळेच वैताग वाटू शकतो मग त्याने काय करावे? माणसं सोडून निसर्गाकडे जावे, निसर्गातल्या शांततेचा कंटाळा आला तर कुत्री, मांजरं आहेतच प्रेम देण्यासाठी, घेण्यासाठी. बोलावेसे वाटले तर पुन्हा माणसं जोडावीत. बुद्धीला खाद्य हवे असेल तर पुन्हा माध्यमे आहेतच. चक्र चालूच राहते, जो-तो वेगळ्या गतीने फिरतो आहे ईतकेच.

बेफिकीर, मला नाही वाटत तुम्ही लिहिलं होतं ते चुकीचं होतं. २+२=४ मला तुम्हाला माहित आहे पण दुसरा माणूस वेगळ्या विवंचनेतून ते बघतो त्याला ४ लगेच ऊमगत नाहीत म्हणून त्याचा बुधीवाद चुकीचा असे होत नाही. कदाचित त्याला २+२=४ बरोबरच २*२=४ एकदमच ऊमगेल, जे तुम्हालाही कदाचित अपेक्षित नसावं. तुम्ही लिहा पुन्हा.

हा लिहिणारा मला शिकवायलाच निघाला आहे, अश्या दृष्टीकोनातून जर बघितले तर समोरची लग्नाची मिरवणूक दरवाजा बंद करून पीप्-होल मधनं बघण्यासारखं आहे. मला नवरदेवाचा ऐटबाज घोडा बघायचा आहे मी तेच बघीन दारू पिऊन लोकं नाचत आहेत मला काही फरक पडत नाही कारण मला ते दिसतंच नाही.

बेफिकीर, मला नाही वाटत तुम्ही लिहिलं होतं ते चुकीचं होतं. २+२=४ मला तुम्हाला माहित आहे पण दुसरा माणूस वेगळ्या विवंचनेतून ते बघतो त्याला ४ लगेच ऊमगत नाहीत म्हणून त्याचा बुधीवाद चुकीचा असे होत नाही. कदाचित त्याला २+२=४ बरोबरच २*२=४ एकदमच ऊमगेल, जे तुम्हालाही कदाचित अपेक्षित नसावं. तुम्ही लिहा पुन्हा.<<<<<<

चमन, तुम्ही वरचे प्रतिसाद ज्या पोट (मेंदू) तिडकीने देताय त्या पात्रतेचा हा लेख नाही.

हां! आता तुमचे जरः

"I don't care if it hurts, I want to have control"

असे असेल

तर गोष्ट वेगळी.

दुसरा कोणत्या फॉर्म्युल्याने तेथे पोचतो किंवा कोणत्या फॉर्म्युल्याने कोठे पोचतो हे बघताना त्या दुसर्‍याने अनेक घटक दुर्दैवीरीत्या दुर्लक्षित केलेले असतात आणि फोर डिव्हाइडेड बाय फोर की फोर मायनस फोर या फॉर्म्युल्याने उत्तरापर्यंत पोचायचे हे बघताना फोर प्लस टू इज मोर दॅन फोर हेच विसरून जातो.

-'बेफिकीर'!

रार यांना मूळ लेखच समजलेला नाही. त्यांना अनुमोदन देणारे रुणुझुणु आणि नानबा हे डिरेल्ड झालेले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रतिसादात. बस्केंनी रार यांना अनुमोदन देणे हे राज ठाकरेंनी नितीशकुमारांना 'आम्ही ठाकरेही बिहारी आहोत' यावर अनुमोदन देण्यासारखे आहे

रार यांचा प्रतिसाद रार यांनी एक स्वतंत्र लेखाचा विषय म्हणून लिहायला हवा आहे.

त्यांचा प्रतिसाद या लेखापुरता कैच्याकै आहे

इथे विषयांतर नको म्हणून "वाहत्या" बीबी वर लिहीले होते ..

पण बेफिकीर, दुसर्‍यांवर हल्ले न करता स्वतःचे विचार का लिहीत नाही? ह्यावर चर्चाही इथे योग्य होणार नाही पण विचारल्याशिवाय रहावलं नाही ..

बेफिकीर हे तुम्ही माझ्या भिक्कार लेखावर लिहून प्रतिसाद का उगीच वाढवत आहात? तुम्हाला लेख आवडला नाहीये तर यु कॅन (शुड) इग्नोर.
ज्यांचे प्रतिसाद आवडले आहेत त्यांना तुम्ही विचारपुस करू शकता.

पण बेफिकीर, दुसर्‍यांवर हल्ले न करता स्वतःचे विचार का लिहीत नाही? ह्यावर चर्चाही इथे योग्य होणार नाही पण विचारल्याशिवाय रहावलं नाही ..<<<<<<

सशल, मायबोलीवर हल्ले कसले आले आहेत? ज्याला जे बोलायचे ते बोलता येते आणि चुकीचे असले तर उडवले जाते. हल्ल्यांचा काय संबंध? मला लेख लिहिताना केलेला स्वतःचा अभ्यास भावला नाही आणि फारच अपुरा वाटला, म्हणून तसे लिहिले होते.

बेफिकीर हे तुम्ही माझ्या भिक्कार लेखावर लिहून प्रतिसाद का उगीच वाढवत आहात?<<<<<<

भिक्कार हा शब्द मी वापरला नव्हता. मी दिशाहीन निर्बुद्ध लेख म्हणालो होतो. पण हा लेख भिक्कार नाही. हा लेख मी गेले अनेक तास पुन्हा पुन्हा वाचत आहे. एका ठिकाणी तर ३७८०४ कोटही केले. मी वेडा नाही, वेडा आहे असे वाटले तर माहीत नाही.

तुम्हाला लेख आवडला नाहीये तर यु कॅन (शुड) इग्नोर.<<<<<<

हे सांगणार्‍या तुम्ही कोण? Uhoh

ज्यांचे प्रतिसाद आवडले आहेत त्यांना तुम्ही विचारपुस करू शकता.<<<<<<

हेही सांगणार्‍या तुम्ही कोण? तुम्हाला फक्त 'व्वा व्वा, उत्तम' असे प्रतिसाद हवे आहेत?

बेफिकीर हे तुम्ही माझ्या भिक्कार लेखावर लिहून प्रतिसाद का उगीच वाढवत आहात? तुम्हाला लेख आवडला नाहीये तर यु कॅन (शुड) इग्नोर.
ज्यांचे प्रतिसाद आवडले आहेत त्यांना तुम्ही विचारपुस करू शकता.<<<<<<

मग लेखच आपापल्या आवडत्या प्रतिसादकांच्या विपूत लिहायचात ना?

मी असं अजिबात म्हटलेलें नाही . पण तुम्ही लेखाबद्दल एकही ओळ लिहील्याचे मी वाचले नाहीये. ते पश्चातापदग्ध चनाचोर काही कळले नाहीये मला. तुम्ही लेखावर लिहा, काय नाही आवडले ते लिहा. इतर प्रतिसादकांना लेख कळलाच नाहीये,इतक्या डेडीकेशनने इथे लिहीत बसण्यासारखा हा लेख नाही इत्यादी इथे लिहीत बसण्याचे कारण नाही कळत मला, खरंच.

(भिक्कर मीच लिहीले आहे. तुम्ही नाही लिहीलेले ते, माहीतीय मला)

चमन, उत्तर द्यायचा प्रयत्न करते.

रहमानची गाणी हे मी एक उदाहरण दिलं आणि ते देखील माझ्या बाबतीत. कारण गाणं नुसतं ऐकून, वाह म्हणून सोडून द्यावं असं आता माझं आणि गाण्याचं नातं उरलेलं नाही. मला त्या गाण्याची जितकी दिसेल तितकी ब्लू प्रिंट पहायाला आवडते, शोधायला आवडते, माझा तो छंद आहे, व्यसन म्हणायलाही हरकत नाही. दरवेळी ते शक्य होतं असं नाही.. आणि तसं जमलं नाही तर माझीच अस्वस्थता वाढते.
अश्या वेळी मोह कमी करुन 'योग्य संधीची' वाट पाहणं हा मार्ग मला माझ्यासाठी योग्य आहे असं मी अनेक मार्ग ट्राय करून ठरवलं आहे. कदाचित पुढे अजून एखादा उपाय सापडेल, पण सध्या तरी ह्या उपायाने मी माझी अस्वस्थता नियंत्रणात ठेवू शकते.

आणि मेंदूत जागा करता येते.. हे फॉरमॅटींग करता येतं.
शेवटी कोणत्या एका क्षणी बाजूबाजुचे विचार फेड आऊट करून हव्या त्या विचारावर लक्ष एकाग्र करणं हे जमवता येऊ शकतं. मला अजून नीट जमलं नाहीये, पण प्रयत्नात आहे.
म्हणजे एखादी बातमी, लेख, रिसर्च पेपर वाचत असताना मधे कितीही गोष्टी 'हायपरलिंक' केल्या असल्या तरी मी त्यावर क्लीक न करता बातमी शेवटपर्यंत वाचते... खूप प्रयत्न लागतात यालाही, पण आता जमतं. असं लहान लहान गोष्टीत फॉरमॅटिंग जमवायचा प्रयत्न करते.

मेंदूची कपॅसिटी असं जेव्हा मी म्ह्णते तेव्हा टेक्नॉलॉजी, किंवा माहितीपुरवणार्‍या घटनांच्या वेगाचा 'स्लोप' (खूप स्टीप स्लोप आहे) आणि मेंदूच्या आकलनशक्तीचा 'स्लोप' (खूप फ्लॅट स्लोप आहे) यात खूप तफावत आहे हे मला जाणवतं. आपण हे दोन्ही 'स्लोप आपण जुळवायला जातोय आणि मग ओढाताण सुरु होतेय असं मला माझ्याबाबतीत जाणवलं.
अनेकांना हे यशस्वीरित्या जमत असेल. मला जमत नाही. एका अर्थाने मी 'सिंड्रेला सिंड्रोम' ची बळी होतेय की काय याबाबतीत असं मला वाटायला लागलं.

आणि परत एकदा माहितीची, विषयांची, आयुष्याची प्रत्येकाची भूक वेगळी... मी जे लिहिलं ते मी माझ्याबाबतीत, माझ्या कपॅसिटीची अंदाज घेत घेत मी जे शिकले त्याबद्दल लिहिलं. दुसर्‍या कोणी ते तसंच करावं असा माझा आग्रह नाही. हा माझा मार्ग आहे. इतरांचा असा असावा, किंवा असं नसल्यास ते बरोबर नाही असं म्हणणं, आग्रह अजिबातच नाहीये माझा.

मी असं अजिबात म्हटलेलें नाही . पण तुम्ही लेखाबद्दल एकही ओळ लिहील्याचे मी वाचले नाहीये. ते पश्चातापदग्ध चनाचोर काही कळले नाहीये मला. तुम्ही लेखावर लिहा, काय नाही आवडले ते लिहा. इतर प्रतिसादकांना लेख कळलाच नाहीये,इतक्या डेडीकेशनने इथे लिहीत बसण्यासारखा हा लेख नाही इत्यादी इथे लिहीत बसण्याचे कारण नाही कळत मला, खरंच.

(भिक्कर मीच लिहीले आहे. तुम्ही नाही लिहीलेले ते, माहीतीय मला)<<<<<<

लेखाबद्दल मी असे लिहिले होते की लेख निर्बुद्ध आणि दिशाहीन आहे, पण सशल म्हणाल्या की तेवढे सोडून लिहा.

आता रार यांनी चमन यांना दिलेला प्रतिसाद वाचण्याचे बेमतलब कष्ट घेतो

रार यांचा आणखीन एक महत्वपूर्ण असंबद्ध प्रतिसाद वाचला. रार यांनी त्यांची मते स्वतंत्र लेख म्हणून द्यायला हवीत. येथे त्यांच्या मतावर चर्चा करणे हे ' सगळा नुस्ता पसारा ' केल्यासारखे होईल

बरं बेफिकिर आम्हाला लेख कशाबद्दल आहे ते कळलं नाही तर तुम्ही सांगा ना प्लीज समजाऊन!

दिशाहीन आणि निर्बुद्ध नसलेलं म्हणजे आपण जे करतो ते चुकीचं आहे हे जेव्हा आपल्याला पक्कं माहित असतं तेव्हा त्याच्या समर्थनार्थ वाट्टेल ते (खरतर सोयीचं) तत्वज्ञान कसबसं जुळवून आणणं का?

तुम्हाला लेख समजला असेल तर त्यावर कन्स्ट्रक्टिव लिहा.. प्रतिसाद टाकणारा लोकाला शहाणपण शिकवायलाच ते टाकत असतो आणि ते पर्फेक्टच असावेत असा विचार करत असतो असं काही नाही.. त्या अनुषंगानं होणारं चिंतन असतं ते. thinking aloud म्हणतात तसं...
आणि प्रत्येक कलाकृती वाचणारा त्याचा कलाकृती तयार करणार्‍यापेक्षा वेगळाच अर्थ काढू शकतो आणि तो अर्थ त्याच्याकरता खरा,प्रामाणिक आणि रिलेवंट असू शकतो.

सॉरी बस्के, तुझ्या लेखावरची चर्चा माझ्या प्रतिसादानं वहावतेय ना! थांबते इथेच!

सॉरी बस्के, तुझ्या लेखावरची चर्चा माझ्या प्रतिसादानं वहावतेय ना! थांबते इथेच!<<<

आहाहाहाहाहा! काय पण लाडीक थांबा गाठलात!

सौ प्रतिसाद देके बिल्ली टी आर पी खा रही है Sad

तुम्हाला लेख समजला असेल तर त्यावर कन्स्ट्रक्टिव लिहा.<<< मला एक समजत नाही, लेख आवडला नाही हे कन्स्ट्रक्टिव्ह विधान का नाही म्हणे? मग मी त्याला भिक्कार, टुक्कार, दिशाहीन, निर्बुद्ध, काहीही म्हणो, पण आवडला नाही हे कन्स्ट्रक्टिव्ह विधान कसे काय नाही?

Pages