Submitted by अश्विनी के on 27 August, 2012 - 11:48
रांगोळी पोर्ट्रेट्स काढायला लागले तेव्हाच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रांगोळ्या.
१) बाबा आले.....
हे पोर्ट्रेट माझे रांगोळी प्रकारातील पहिले पोर्ट्रेट आहे (कळतंच आहे ते ) टेक्निकल बाबी काहिच माहित नसल्याने डायरेक्ट जमिनीवर आणि तेही चौरस न आखता काढलं होतं साध्या फळ्यावरच्या खडूने काढून मग रंगवलं होतं. प्रोफेशनल कलर्स वापरले नव्हते. फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली गेली आहे. तरी गोड मानून घ्या जुन्या मायबोलीवर काही दिवस टाकली होती.
२) स्वामी विवेकानंद -
यातही प्रोफेशनल कलर्स वापरलेले नाहीत. यावेळी खाली ब्राऊन पेपर चिकटवला असल्याने रांगोळी जास्त हलली नाही. चौरस काढून पेन्सिलीने स्केच काढून मग त्यावर रांगोळी घातली आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ऑस्ट्रेलीयात संस्कारभारती
मी ऑस्ट्रेलीयात संस्कारभारती रांगोळीचे शिबिर घेण्याचा विचार करतेय, कॄपया आपल्या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन हवे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न रंगाचे डाग पडण्याचा असतो, पेपर चिकट्वुन त्यावर रांगोळी आखायला {वर्तुळ काढायला वगैरे} अड्चणी येतात, पेपरचे जोड दिसतात आणि छानही दिसत नाही. हवा आली कि पेपरवरचे रंग अल्गद उडुन जातात.
बर्याचदा टिम्बर फ्लोरींग असते किंवा फरशी असेल तरीही डागाचे टेन्शन असतेच, कृपया मार्ग सुचवा, आयोजनासाठीही मार्गदर्शन हवे आहे
-धन्यवाद
मुद्रा रंगोली ग्रुप
सिडनी
केव्वळ अप्रतिम!!!! अक्के, काय
केव्वळ अप्रतिम!!!!
अक्के, काय सुंदर रांगोळ्या काढल्या आहेस गं अजुन बघायला आवडतिल.
कला आहे तुझ्या बोटात आणि कलात्मक नजरही आहे. परत सुरु कर लवकर तुझी सर्व कलाकारी
अप्रतिम !!! केश्वि ताई मला
अप्रतिम !!!
केश्वि ताई मला आठवतेय तुझी मधुबाला अजून फोटो सापडले तर नक्की शेयर कर !
जबरीच... हे फार किचकट आणि
जबरीच...
हे फार किचकट आणि वेळखाऊ प्रकरण आहे.. आमच्या घरी चालूच असते मधून अधून.. त्यामुळे लागणारा संयम आणि वेळ ह्याची पूर्ण कल्पना आहे..
केश्वे.. नवीन रांगोळी काढून त्याचे फोटो टाक की...
सुरेख........
सुरेख........
दोन्ही रांगोळ्या मस्त! अजून
दोन्ही रांगोळ्या मस्त! अजून येऊदे...
अप्रतिम, अप्रतिम........ त्या
अप्रतिम, अप्रतिम........
त्या छोटीच्या चेहर्यावरचे भाव काय सुंदर आलेत - वा वा वा वा.....
अप्रतिम. ती पहिली अजून आठवते.
अप्रतिम. ती पहिली अजून आठवते.
अतिशय सूंदर...........
अतिशय सूंदर...........
सहीच !
सहीच !
दोन्ही पोर्ट्रेट्स अतिशय
दोन्ही पोर्ट्रेट्स अतिशय सुरेख आहेत.
अप्रतिम. ऑस्सम.
अप्रतिम. ऑस्सम.
तुझ्या व्यक्तीमत्वाचा हा पैलु
तुझ्या व्यक्तीमत्वाचा हा पैलु नविन आहे मला तरी
ग्रेट. आम्हाला ठिपक्यांची रांगोळी घालता घालता नाकी नौ येतात
बाकी ती पहिल्या चित्रातील
बाकी ती पहिल्या चित्रातील मुलगी किती गोडुली दिसते>>>
@ व्हिनस +१०००
खुपच छान आहेत.
अप्रतिम... हॅट्स ऑफ
अप्रतिम... हॅट्स ऑफ
व्वा खूप सुंदर रांगोळ्या.
व्वा खूप सुंदर रांगोळ्या. मला मधुबाला आठवते. पहिली बालिका आठवत नाही.
अश्विनी आता नाही का काढत रांगोळ्या? अत्तिशय सुरेख काढल्या आहेस ग तू.. कीप्पीट अप
खूप सुंदर रांगोळ्या आश्विनी
खूप सुंदर रांगोळ्या आश्विनी ताई
वॉव. अप्रतिम. आता कधी काढशील
वॉव. अप्रतिम.
आता कधी काढशील तर टप्प्याटप्प्यानं फोटो काढून टाक. जर ते सीक्रेट असेल तर राहू देत.
सुरेख
सुरेख
जबरी ! काय भारी काढलय्स गं तू
जबरी ! काय भारी काढलय्स गं तू ! __________/\___________
खूपच छान!
खूपच छान!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/6880 हीच ना ती मधुबाला?
अप्रतिम....
अप्रतिम....
अश्वे खुपच मस्त
अश्वे खुपच मस्त
कसल्या ग्रेट रांगोळ्या या!
कसल्या ग्रेट रांगोळ्या या! तुला शरण, अश्विनी.
अप्रतिम ! आणखी येऊ द्या....
अप्रतिम !
आणखी येऊ द्या....
अश्विनी ग्रेट..... कौतूक
अश्विनी ग्रेट.....
कौतूक करावे तेवढे थोडेच्....मस्तच...
अरे व्वा! फारच मस्त आता घालत
अरे व्वा! फारच मस्त
आता घालत नसशील तर पुन्हा घालायला लाग अशा रांगोळ्या. मी यावर्षी येते बघायला
आमच्याकडे मोठे प्लायवुडचे खास रांगोळीसाठी बनवुन घेतलेले बोर्ड आहेत. ( त्यांचा सरफेस खरखरीत ठेवला आहे) अशा रांगोळ्या घालायला तासंतास लागतात म्हणुन मग घरात शांतपणे रांगोळी घालुन नंतर हलकेच उचलुन बाहेर ठेवता येते. एकच रांगोळी दोन तीन दिवस ठेवायची असल्यास रात्री घरात आणुन सेफही ठेवता येते.
सुंदर!
सुंदर!
वा मस्तच अश्वे!
वा मस्तच अश्वे!
Pages