रांगोळी पोर्ट्रेट्स

Submitted by अश्विनी के on 27 August, 2012 - 11:48

रांगोळी पोर्ट्रेट्स काढायला लागले तेव्हाच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रांगोळ्या.

१) बाबा आले.....

हे पोर्ट्रेट माझे रांगोळी प्रकारातील पहिले पोर्ट्रेट आहे (कळतंच आहे ते Proud ) टेक्निकल बाबी काहिच माहित नसल्याने डायरेक्ट जमिनीवर आणि तेही चौरस न आखता काढलं होतं साध्या फळ्यावरच्या खडूने काढून मग रंगवलं होतं. प्रोफेशनल कलर्स वापरले नव्हते. फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली गेली आहे. तरी गोड मानून घ्या Happy जुन्या मायबोलीवर काही दिवस टाकली होती.

BABA AALE.JPG

२) स्वामी विवेकानंद -

यातही प्रोफेशनल कलर्स वापरलेले नाहीत. यावेळी खाली ब्राऊन पेपर चिकटवला असल्याने रांगोळी जास्त हलली नाही. चौरस काढून पेन्सिलीने स्केच काढून मग त्यावर रांगोळी घातली आहे.

SWAMI VIVEKANAND.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऑस्ट्रेलीयात संस्कारभारती रांगोळीचे शिबिर घेण्याचा विचार करतेय, कॄपया आपल्या सर्वांचे अनमोल मार्गदर्शन हवे आहे. सगळ्यात मोठा प्रश्न रंगाचे डाग पडण्याचा असतो, पेपर चिकट्वुन त्यावर रांगोळी आखायला {वर्तुळ काढायला वगैरे} अड्चणी येतात, पेपरचे जोड दिसतात आणि छानही दिसत नाही. हवा आली कि पेपरवरचे रंग अल्गद उडुन जातात.
बर्‍याचदा टिम्बर फ्लोरींग असते किंवा फरशी असेल तरीही डागाचे टेन्शन असतेच, कृपया मार्ग सुचवा, आयोजनासाठीही मार्गदर्शन हवे आहे

-धन्यवाद
मुद्रा रंगोली ग्रुप
सिडनी

केव्वळ अप्रतिम!!!!

अक्के, काय सुंदर रांगोळ्या काढल्या आहेस गं Happy अजुन बघायला आवडतिल.

कला आहे तुझ्या बोटात आणि कलात्मक नजरही आहे. परत सुरु कर लवकर तुझी सर्व कलाकारी Happy

जबरीच...

हे फार किचकट आणि वेळखाऊ प्रकरण आहे.. आमच्या घरी चालूच असते मधून अधून.. त्यामुळे लागणारा संयम आणि वेळ ह्याची पूर्ण कल्पना आहे..

केश्वे.. नवीन रांगोळी काढून त्याचे फोटो टाक की...

व्वा खूप सुंदर रांगोळ्या. Happy मला मधुबाला आठवते. पहिली बालिका आठवत नाही.

अश्विनी आता नाही का काढत रांगोळ्या? अत्तिशय सुरेख काढल्या आहेस ग तू.. कीप्पीट अप Happy

अरे व्वा! फारच मस्त Happy
आता घालत नसशील तर पुन्हा घालायला लाग अशा रांगोळ्या. मी यावर्षी येते बघायला Happy

आमच्याकडे मोठे प्लायवुडचे खास रांगोळीसाठी बनवुन घेतलेले बोर्ड आहेत. ( त्यांचा सरफेस खरखरीत ठेवला आहे) अशा रांगोळ्या घालायला तासंतास लागतात म्हणुन मग घरात शांतपणे रांगोळी घालुन नंतर हलकेच उचलुन बाहेर ठेवता येते. एकच रांगोळी दोन तीन दिवस ठेवायची असल्यास रात्री घरात आणुन सेफही ठेवता येते.

Pages