बटाटा -पोहे वडे

Submitted by शेवगा on 12 August, 2012 - 23:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बटाटे -४/५ उकडलेले.
पोहे- १ वाटी भिजवलेले
जिरे- १/२ चमचा
मिरची- चवीनुसार( मी ३/४ लहान घेतल्या होत्या.)
आलं-लसूण पेस्ट -१/२ चमचा
मीठ - चवीनुसार
हळद- १/४ चमचा
तेल - तळण्यासाठी.

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम उकडलेले बटाटे आणि पोहे एकत्र एकजीव मळून घ्या.
२. नतंर त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची बारीक चिरून अणि हळद घालून नीट मिक्स करा. आणि नंतर त्याचे ८-१० छोटे- छोटे बारी़क गोळे बनवून अणि थोडे चपटे करुन घ्या.
३.गरम तेलात डीप फ्राय करावेत. मस्त कुरकुरत लागतात.

वाढणी/प्रमाण: 
८/१० वडे होतात,
अधिक टिपा: 

टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी किंवा कोणत्याही चटणीबरोबर चांगले लागतात.

माहितीचा स्रोत: 
माझी सुगरण स़खी - कल्याणी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही होत गं...
आणि फोटो काढण्या आधीच आमचे वडे सपंले.. Sad
परत केले कि फोटो नक्कि टाकते...

मस्त आहे पाककृती ! मी फार वर्षांपुर्वी केले होते पोह्याचे वडे. पण नंतर विसरुन गेले. यात कोथींबीर टाकली तर चांगली लागेल. मी नक्की करुन पाहीन.