Submitted by शेवगा on 12 August, 2012 - 23:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
बटाटे -४/५ उकडलेले.
पोहे- १ वाटी भिजवलेले
जिरे- १/२ चमचा
मिरची- चवीनुसार( मी ३/४ लहान घेतल्या होत्या.)
आलं-लसूण पेस्ट -१/२ चमचा
मीठ - चवीनुसार
हळद- १/४ चमचा
तेल - तळण्यासाठी.
क्रमवार पाककृती:
१. प्रथम उकडलेले बटाटे आणि पोहे एकत्र एकजीव मळून घ्या.
२. नतंर त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची बारीक चिरून अणि हळद घालून नीट मिक्स करा. आणि नंतर त्याचे ८-१० छोटे- छोटे बारी़क गोळे बनवून अणि थोडे चपटे करुन घ्या.
३.गरम तेलात डीप फ्राय करावेत. मस्त कुरकुरत लागतात.
वाढणी/प्रमाण:
८/१० वडे होतात,
अधिक टिपा:
टोमॅटो सॉस, चिंचेची चटणी किंवा कोणत्याही चटणीबरोबर चांगले लागतात.
माहितीचा स्रोत:
माझी सुगरण स़खी - कल्याणी
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान पाकृ पण पोहे भिजवुन
छान पाकृ
पण पोहे भिजवुन तळल्यावर वडे तेलकट नाही का होणार?
आणि फोटो कुठ्येय??
नाही होत गं... आणि फोटो
नाही होत गं...
आणि फोटो काढण्या आधीच आमचे वडे सपंले..
परत केले कि फोटो नक्कि टाकते...
मस्त आहे पाककृती ! मी फार
मस्त आहे पाककृती ! मी फार वर्षांपुर्वी केले होते पोह्याचे वडे. पण नंतर विसरुन गेले. यात कोथींबीर टाकली तर चांगली लागेल. मी नक्की करुन पाहीन.
हे घ्या..
हे घ्या..
मस्तच
मस्तच
धन्यवाद kalajivahu फोटो
धन्यवाद kalajivahu फोटो टाकल्याबद्द्ल. तुझे वडे मस्त दिसत आहेत....