
१. उडदाची डाळ - १ वाटी
२. अर्धा लिटर दूध
३. तळणीसाठी तेल
३. मीठ, साखर चवीनुसार
४. दहीवड्यावर वरून घेण्यासाठी मीरपूड, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर इत्यादी आवडीप्रमाणे
१. उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत घालावी.
२. दूध तापवून विरजण लावून ठेवावे.
३. सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ भिजली की पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ वाटताना पाणी आवश्यक तेवढेच घालावे. आवडत असल्यास डाळीमध्ये जिरे/ हिरवी मिरची वाटताना घालू शकता. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाची कन्सिस्टन्सी भज्यांप्रमाणे, केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको. डोश्याप्रमाणे तर अजिबातच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच कौशल्याचे काम आहे. त्यात तुमचा मिक्सर पॉवरबाज असेल तर काम अगदीच सोपं होऊन जातं.
४. वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी झाकून ठेवून द्या.
५. विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ, साखर आणि भाजलेल्या जिर्याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत होईपर्यंत घुसळून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्यास दह्याला मस्त चव येते. दह्यात बहुतेकवेळा पाणी घालावे लागत नाही. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही खूपच घट्ट वाटले तर पाणी मिसळून दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.
६. अर्ध्या-पाऊण तासानंतर उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत चॉकलेटी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.
७. तळलेले सगळे वडे एका पसरट भांड्यात किंवा परातीत घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.
८. मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या डब्यात फ्रिजमधे ठेवले तर (मुंबईच्या हवेत) दोन दिवस चांगले राहतात. पण नंतर मात्र खराब (म्हणजे वड्यांना बुळबुळीतपणा येतो) व्हायला सुरूवात होते.
९. दहीवडे देताना प्लेटमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार दही घालून आवडीप्रमाणे मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर भुरभुरवून द्यावे.
१. पूर्ण उडदाची डाळ घ्यायची नसेल तर मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेता येते. मुगाच्या डाळीमुळे वड्यांना छान रंगही येतो.
२. एक वाटी डाळीसाठी अर्धा लिटर दुधाचे विरजलेले दही जास्त होते. अर्ध्या लिटरमधले साधारण कपभर (चहाचा कप) दूध वगळले तरी चालेल.
३. दहीवडे करायला घेण्याआधी हा अख्खा बाफ पूर्णपणे वाचून काढा. प्रतिसादांत जास्त आणि मस्त टीपा आहेत. 
कँपातलं कॉफी हाऊस आहे ना,
कँपातलं कॉफी हाऊस आहे ना, नेहरु मेमोरियलच्या समोरचं.. तिथला दहीवडा !!! बोटांना पाणी सुटलंय
घरात वडे तळले जात असताना
घरात वडे तळले जात असताना दह्यात बुडण्याआधीच दोन चार गायब करण्यात जी मजा असते ती औरच !
मलाही दहीवडे फार आवडतात.
मलाही दहीवडे फार आवडतात. बटरचे कधी ट्राय नाही केले.
वर दिलेल्या कृतीने मीही करायचे पण एकीने दिलेल्या सल्ल्यानुसार थोडा खवलेला ओला नारळ घातल्यास जाणवण्याइतका फरक पडला चवित. वडे खूपच चवदार झाले व मऊही. मी ते तळून झाल्यावर नुसत्या पाण्यात टाकण्याऐवजी पाणी + ताक्+साखर्+मीठ अश्या मिश्रणात टाकते. थोडी मूगडाळ वापरल्याने हलकेपण वाढतो असे वर्षभरापूर्वी केलेल्या प्रयोगात समजले.
धन्यवाद.
फॅनक्लबमध्ये माझे नाव
फॅनक्लबमध्ये माझे नाव सुवर्णाक्षरांनी लिहा हो कोणीतरी...
आज दुपारी जेवताना मोबाईलवर मंजुची रेसिपी वाचुन अस्से काही मनी दाटुन आले की सरळ एक प्लेट दहिवडा घेतला फुडकोर्टअतुन आणि मन लावुन खाल्ला. आमच्या फुडकोर्टात अगदी ए-वन दहिवडे मिळतात... ह्या आठवड्यात माझे दोनदा खाऊन झाले.... (आणि आता परत तोंपासु झाले
)
मस्त रेसिपी आणि बाकीच्यांच्या
मस्त रेसिपी आणि बाकीच्यांच्या टिपाही छान.
तळलेले वडे पाण्यातून काढल्यावर पाणचट होऊ नये म्हणून मी पाण्याऐवजी अगदी पातळ ताक वापरते. त्यात तळलेले वडे टाकून मग काहीवेळाने ते पिळून घ्यायचे. तेलाचा तवंग आलेले ताक टाकून द्यायचे. काहीवेळा वरुन टाकलेले दही वडे स्पॉन्जी झाले नसतील तर आतपर्यंत पोचत नाही. अशावेळीही हा उपाय उपयोगी पडतो.
दीपांजली- दहीवड्याचं गार्निशिंग मस्तच झालय. यम्मी..
तळलेले वडे पाण्यातून
तळलेले वडे पाण्यातून काढल्यावर पाणचट होऊ नये म्हणून मी पाण्याऐवजी अगदी पातळ ताक वापरते
<< मी पण ताक च वापरते.
थँक्स सगळ्यांना.
तळलेले वडे पाण्यातून
तळलेले वडे पाण्यातून काढल्यावर पाणचट होऊ नये म्हणून मी पाण्याऐवजी अगदी पातळ ताक वापरते
हे मी कुठेतरी वाचलेले.. गेल्या वे़ळी घरी केलेले वडे तेव्हा ताकातच टाकलेले. मस्त चव येते.
इब्लिस लई भारी
इब्लिस लई भारी
मस्त धागा. रेसिपी, तो फोटो
मस्त धागा.
रेसिपी, तो फोटो आणि इतर प्रतिसाद वाचून तोंपासु हेवेसांनल
सातारकरांना 'सुपनेकर' आठवतील हे नक्की!
ताकातच टाकावे, थोडेसे मीठ व
ताकातच टाकावे, थोडेसे मीठ व चाट मसाला घातलेल्या ताकात.
छान! डीजे फोटो मस्त .. (सगळे
छान!
डीजे फोटो मस्त .. (सगळे जण दहिवड्यांचा फोटो मस्त म्हणत आहेत पण मला वडे दिसत नाहीत .. p)
मला वडे तळून पाण्यात किंवा आणखी कशात भिजवलेले अजिबात आवडत नाहीत .. नुसत्याच कुरकुरीत वड्यांवर दही, चटण्या वगैरे वगैरे घातलेले आवडते ..
मला ही प्रचंड आवडतात वरचा
मला ही प्रचंड आवडतात
वरचा फोटो तोपांसु
मी जेव्हा पहिल्या वेळेस केले होते आनि ते वडे न सुटता न पसरता मस्त तळ्ले गेले तेव्हा मी किचन मधे उडया मारुन माझा आनंद व्यकत केला होता
मला ही पाण्यात न भिजवता तसेच कुरकुरीत भरपुर दही आनि चिरलेली कोथींबीर घालुन खायला आवडतात ...यम्म्मीईईई..
छान कृती. मी नाहीये फॅन. घरी
छान कृती.
मी नाहीये फॅन. घरी आवडतात त्यामुळे करते. सोपा प्रकार. म्हणूनही.
मस्त
मस्त
शब्दखुणा भारी आहेत. आत्ता
शब्दखुणा भारी आहेत. आत्ता वाचल्या.
प्राची +१
प्राची +१
दही वडे तर मस्तच लागतात. पण
दही वडे तर मस्तच लागतात. पण त्या दह्यात फरसाण, तळलेल्या पोह्यांचा चिवडा, शेव इत्यादी पदार्थ घालून ( वड्यांशिवाय) तोंपासू लागते. (सिस्टिमची आणि डायटची वाट लागू शकते पण ती नंतर.. )
प्राची +१

मंजुडी या विषयावरचा सखोल अभ्यास आणि कळकळच शब्दखुणांतून दिसून येत आहे.
हो की हो कि, प्राची प्राचि +
हो की हो कि, प्राची प्राचि + १
मंजुडी या विषयावरचा सखोल
मंजुडी या विषयावरचा सखोल अभ्यास आणि कळकळच शब्दखुणांतून दिसून येत आहे. >>>दहीवड्यांवरचा अभ्यास नाही, माबोचा सखोल अभ्यास दिसून येतो आहे.
उडदाच्या डाळीऐवजी हिरव्या
उडदाच्या डाळीऐवजी हिरव्या मूगडाळीचे वडे पण मस्त लागतात..
मला त्या शब्दखुणा लिहिताना
मला त्या शब्दखुणा लिहिताना मंगळागौरीतला 'दहीssवडा बटाटेssवडा' खेळ खेळत असल्यासारखं वाटत होतं
हिरवी मूगडाळ ही अॅडीशन मस्त
हिरवी मूगडाळ ही अॅडीशन मस्त वाटातेय.
बाकी मं. ना भिजकट वडे. 
मंजू, लहान साईज असल्याने गिच्च होत नसावेत. अन मी रूणू प्रमाणे कोरडा वडा अन वरून दहीवाली
मला दहिवाडे अवाडतात
मला दहिवाडे अवाडतात
माझंही नाव घाला फॅन
माझंही नाव घाला फॅन क्लबात.
इथली चर्चा वाचून वीकेन्डला केलेच.
मीही पातळ ताकात घालते तळून झालेले वडे आणि नंतर दह्यात आलं, मिरची, मीठ आणि साखर घालते. वरून जिरेपूड, लाल तिखट आणि कोथिंबीर.
माझ्या साबा, दह्याला वरुन
माझ्या साबा, दह्याला वरुन तुप, जिरे, लाल मिरची अशी फोडणी देतात...मस्तं लागते
एक वेरीएशन !! दहीवड्यासाठी
एक वेरीएशन !!
दहीवड्यासाठी केलेल्या दह्यात इडली घालुन दही ईडली करतात, छान लागते !!
पुर्वी मुंबईत ऊडीपी हॉटेल मध्ये मिळत असे दहीईड्ली.
दहीहीहीहीहीही
दहीहीहीहीहीही वडेएएएएएएए
;(
तोंडाला नळ सुटलाय....
मस्तंच फोटो मंजुडे.... आणि रेसिपीही अर्थात.
आम्ही पण आहोत बरं का या
आम्ही पण आहोत बरं का या क्लबाचे मेंबर
दीप्स.....काय मस्त फोटो टाकला आहेस गं !!
सगळे प्रतिसाद वाचले... आता
सगळे प्रतिसाद वाचले... आता खावाच लागणारे. आज फूड्कोर्टात खाईन.
अजून एक, दही छान गुळगुळीत होण्याकरता कोणी काही नाही लिहिलंत ते.
ही एक टीप (संजीव कपूर वाली पण एका झटक्यात परफेक्ट काम करणारी) - दही सरळ मलमलच्या कापडातून स्क्वीझ करून घ्यावं. ए वन गुळगुळीत दही ५ मिनिटात तयार होतं.
मी पण या क्लब मधे... छान
मी पण या क्लब मधे... छान रेसिपी मंजुडी ..
या वीकान्ताला तुझ्या रेसिपी प्रमाणे करेन .. खुप दिवसात केले नाहीयेत.
Pages