वेबमास्तरांना भेटण्यासाठी विलेपार्ले, मुंबई येथे गटग

Submitted by नीधप on 29 July, 2012 - 03:22
ठिकाण/पत्ता: 
द शॅक रेस्टॉरंट, संगीता'ज नेस्ट, ग्राउंड फ्लोअर, ऑफ प्रार्थनासमाज रोड. गजाली पासून २ मिन चालत.

अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.

द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.

सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)

विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक

भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, August 5, 2012 - 09:00 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेमका ललीने डेकोरेट केलेल्या ग्रिल्ड सँडविचचाच फोटो वगळला <<<<<<<<< सुजाच्या कॄपेने प्रसादाएवढा सिझलर प्लेटमध्ये मिळाला होता, त्यामुळे आधी पॅटीस मग फोटो असा सुज्ञ विचार केला Proud

नेमका ललीने डेकोरेट केलेल्या ग्रिल्ड सँडविचचाच फोटो वगळला <<<<<<<<< सुजाच्या कॄपेने प्रसादाएवढा सिझलर प्लेटमध्ये मिळाला होता, त्यामुळे आधी पॅटीस मग फोटो असा सुज्ञ विचार केला >>>

विमानप्रवासाने तोष्दा ग्रस्त झाले आहेत का?

लले, मुद्देसूद वृ...>>>... तुम्हां दोघांच्यात 'मोठं' कोण...???...
(आता दोघिही 'गप्प' बसतील बहूतेक... Proud ...)

मी नीला समस केला होता. Wink त्याचा अनुल्लेख करण्यात आला आहे, याची नोंद करण्यात आली आहे, याची नोंद घेऊन आता याचा अनुल्लेख करू नये. Proud

लले,
एक अजून अ‍ॅड करतोय...
आपल्या गोंधळामुळे वेतागलेला शॅकचा संपुर्ण स्टाफ...

प्रथमतः ललीने प्रथमच लिहिलेला मुद्देसुद वृ मस्तय.. Happy
आणि दुसरं म्हण्जे प्रत्येकी १ सिझलर मागवलं होतं क्काय?? Uhoh Wink Proud Biggrin :एभाप्रः

मस्त फोटो ,प्रतिक्रिया.
नीलचं
लले,
एक अजून अ‍ॅड करतोय...
आपल्या गोंधळामुळे वेतागलेला शॅकचा संपुर्ण स्टाफ...
पटलं :))

सिझलरचे फोटो बघून सिझलर जसं जळजळतं तशी जळजळ होत आहे... त्यात सध्या आरोही लहान असल्यामुळे सिझलर खायला जाता पण येत नाही त्यामुळे.. असे फोटू टाकल्याबद्दल णिशेध..

ह्या नंतर टाकलेल्या फोटूत सगळे जण दिसत आहेत..

मस्तच आलेत फोटोज. खरंच शॅकमध्ये बसल्यासारखं वाटलं Happy
नीरजा, तुला ओळखलंच नाही मी पहिल्यांदा Happy

Pages