अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.
द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.
सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)
विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक
भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.
11 chi post 22:32 la kashi
11 chi post 22:32 la kashi padali?
कार्य उत्तम पार पडले.
कार्य उत्तम पार पडले. वृत्तांताची जबाबदारी नवीन लोकांवर असते या नियमाप्रमाणे जाई साहित्ययात्री आणि भारती बिर्जे डिग्गीकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यांनी ती पार पाडावी ही इणंती.

इतरही कोणाला वृत्तांत लिहावासा वाटल्यास अत्यंत येल्कम बर्का..
आता टांगारूंची यादी....
मामी
ठमादेवी
विनय भिडे
हेकायनितेकाय
भुंगा
खूप मज्जा आली काल! मैत्री
खूप मज्जा आली काल! मैत्री दिवस मस्त साजरा झाला. वेबमास्तरना भेटून खूप आनंद झाला. ते ''मास्तरांसारखे'' जरा सुद्धा वाटले नाहीत! आमच्यातलेच एक झाले होते!
नी सोडून बाकी सर्वांना प्रथमच भेटले पण खूप आधीपासूनची ओळख असल्यासारखे सगळे भेटलो.
सर्वांत आधी भेटली रोमन मनी. तिच्याशी लगेच गट्टी झाली. मग हळूहळू सगळ्या मन्या आणि बोके यायला सुरूवात झाली.
क्रमशः
रोमन मनी
रोमन मनी :d
टांगारूंची यादी वाचली. मी
टांगारूंची यादी वाचली. मी बराचवेळ गो-या फोटोग्राफरना विनय भिडे समजत होते. ते आशुतोष होते का? मी चांगलीच चकले! दोघेजण बिच्चारे फोटोग्राफर फोटो काढत राहिले...आणि मग लग्नाच्या पंगतीत शेवटी जेवायला बसावं लागतं तसं झालं त्यांचं!! इति न पसरलेला नील.
सेनापतीची एंट्री झाल्या झाल्या त्याला ओळखू शकले कारण भुंग्याने केलेलं त्याचं वर्णन वाचलं होतं!
आता लवकर खादडीचे फोटो येऊ देत...
Webmaster aani itaranna
Webmaster aani itaranna bhetun khup majaa aali.
Baryaach varshanni GTG attend kela.
Indra.. Hasu nakos. Ektar aala nahis kaal.
Anitatai, tumachya kaaju katali ne kaal vaachaval ho mala
>> ते ''मास्तरांसारखे'' जरा
>> ते ''मास्तरांसारखे'' जरा सुद्धा वाटले नाहीत! आमच्यातलेच एक झाले होते!>> अगदी अनिताताई. वेब मास्तरांनी प्रत्येकाची आवर्जून चौकशी केली हेही भावले

नवीन ओळखी झाल्या. एकूण काल मज्जाच आली.
वृ लिहण्याची जबाबदारी किरु घेणार आहे
मजा आली काल
मजा आली काल
काल अगदी वेळेवर बेटर हाफ व
काल अगदी वेळेवर बेटर हाफ व हाफ तिकीट यांना मागे ठेवुन गटग ला जाणे केले. धन्स मनीषा. तु रद्द केलेस त्यामुळी आशुतोष यांच्या गाडीत मी घुसले.

निम्या तरी पब्लीकला आधीहि भेटली असल्याने तसे दडपण नव्हतेच. त्यातच अजय यांनी अगदी हसतमुखाने सगळ्यांना स्वतःची ओळख करुन दिली व सर्वांची करुन घेतलि. दोन्ही टेबलवर आलटुन पालटुन फिरत सगळ्यांच्या प्रश्नांची छान उत्तरे दिली. काही आठवणींमधुन नव्या-जुन्याची सांगड पण घातली जात होती.
एकुणच जळाउ (थांबा जळलेल्या अशा अर्थाने नाही, तर आले नसलेल्यांसाठी जळाउ) पदार्थांचा स्वाद घेत (नाहीतर नी मारेल मला धरून :डोमा:), चॉकलेट वा काजु कथलीने सुरु झालेल्या गटगची, वाहनावर आरुढ असलेल्या काही पार्लेकरांच्या त्रस्त चेहेर्यांच्या साथीने सांगता झाली.
मोनाली माझं अगदी ऐन्वेळी रद्द
मोनाली माझं अगदी ऐन्वेळी रद्द झालं
म्हणजे करावं लागल. 

नी मी टांगारु नाय गो. मी फोनद्वारे आले होते आणि वेमाना भेटलेही. विचार त्याना.
विचार त्याना...>>> वेमा बसले
विचार त्याना...>>> वेमा बसले आता विमानात. त्यांना कसं विचारायचं आता मनीषा
फोटो टाका रे लवकर.
आणि हे काय विनयने टांग मारली काल. विन्या, शो. ना. हो. अ. वा.
नी मी टांगारु नाय गो. >>> अग
नी मी टांगारु नाय गो. >>> अग मी कुठे काय म्हटले?
उलट मी तुझे आभारच मानले
अग मी कुठे काय म्हटले?..>>>
अग मी कुठे काय म्हटले?..>>> मोनाली तू नीरजा आहेस?

मनीषा,म्हणुन योग्य ठिकाणी स्वल्पविराम दयावा वाक्यात
मयुरेश विमानातुन
मयुरेश
विमानातुन उतरल्यावर. 
लैच भाबड पब्लिक बुवा इथे. एक स्वल्पविराम काय राहुन गेला तर .........
नीने नुसतीच टांगारुंची यादी
नीने नुसतीच टांगारुंची यादी टाकली. ही उपस्थितांची यादी:
अनिताताई भारती बिर्जे डिग्गीकर, सुजा, जाई.साहित्ययात्री, बागुलबुवा, सेनापती, _नील_, आनंदमैत्री, आशूतोष०७११, ललिता_प्रीति, अश्विनी के, नीलू, मोनालीपी, किरू, आयडू, दोन अजय, दोन नीरजा, दोन मंजिरी
मोनाली तू नीरजा आहेस? >>> व
मोनाली तू नीरजा आहेस? >>> व लैच भाबड पब्लिक बुवा इथे. एक स्वल्पविराम काय राहुन गेला तर ......>>>
अरे हो, तो नी त्या नीरजाचा व्हय ग मने.
असो तु मला भाबडी म्हणालीस (कसचं कसचं :इश्श:), लईच भारी वाटल बघ.
हे क्काय! अजून एक पण फोटो
हे क्काय! अजून एक पण फोटो नाही? पुण्याच्या गटग चे तर लग्गेच आले होते दुसर्या दिवशी सक्काळी सक्काळी
एक फोटोग्राफर अमेरिकेस रवाना
एक फोटोग्राफर अमेरिकेस रवाना होतो आहे, दुसरा दिल्लीस प्रयाण करतो आहे आणि तिसरा पुण्यास जातो आहे. धन्यवाद!!!
हे क्काय! अजून एक पण फोटो
हे क्काय! अजून एक पण फोटो नाही? पुण्याच्या गटग चे तर लग्गेच आले होते दुसर्या दिवशी सक्काळी सक्काळी
>>>> मंजी + १
एक फोटोग्राफर अमेरिकेस रवाना
एक फोटोग्राफर अमेरिकेस रवाना होतो आहे, दुसरा दिल्लीस प्रयाण करतो आहे आणि तिसरा पुण्यास जातो आहे...>>> बरं मग? :). फोटो कधी येणार पण?
तिसरा पुण्यास जातो
तिसरा पुण्यास जातो आहे.>>>>>>>>>> म्हणजे आम्ही प्रत्यक्ष त्या माणसाला भेटून फोटो बघणे अपेक्षित आहे कॉय??
बरं मग? . फोटो कधी येणार पण?
बरं मग? . फोटो कधी येणार पण? >>> वाट बघा
बदली फोटोग्राफर ड्यु आय ची
बदली फोटोग्राफर ड्यु आय ची काल फोटो काढताना झालेली त्रेधातिरपिट पाहण्या सारखी होती....
ए नी, मी पण टांगारू नाईय्ये.
ए नी, मी पण टांगारू नाईय्ये. मी आधीच तुला सांगितलं होतं की. जर्रा मेलं गटगऐवजी एखादं फॅमिली फंक्शन अटेंड करू म्हटलं तर किती टोचून बोलतात!
वेमाना भेटायला आता त्यांच्या घरीच जावं म्हणतेय.
Neel, anumodan! Shraawanaat
Neel, anumodan!
Shraawanaat diwali aali :p
- वेमा, भारती
- वेमा, भारती बिर्जे-डिग्गीकर, मनी, जाई.साहित्ययात्री, अनिताताई, अजय पाटील या मंडळींची प्रथमच पडलेली गाठ

- पार्ल्यात प्रथमच अटेण्ड केलेलं माबो-गटग
- प्रथमच खाल्लेला सिझलर नामक खाद्यप्रकार (आणि तो प्रकार समोर आल्यावर 'हे कसं खायचं?' या विचारात पडलेले मी आणि अश्विनीचे चेहरे :हाहा:)
- मंजूच्या हाफ तिकिटानं प्रथमच माझ्याशी मारलेल्या गप्पा
- (माझ्या आठवणीत) विनयनं प्रथमच गटगला मारलेली टांग
- प्रथमच कॅमेरा हातात धरलेला असल्याप्रमाणे डुआयने उडवलेले डझनभर फ्लॅशेस
- प्रथमच कॅमेरा हातात धरलेला असावा याची शंकाही येऊ नये अशा पध्दतीने मंजूच्या हाफ तिकिटानं काढलेले (स्वतःच्या आईचे) फोटो..... आणि त्यावरची भारी टिप्पणी
कालच्या गटगचे
कालच्या गटगचे फोटो.










असली पिक्चर्स बाकी है
साताक्रा, चटणीचे ग्रीन-डॉटस्
साताक्रा, चटणीचे ग्रीन-डॉटस् टाकलेल्या सॅण्डविचचा फोटू टाकायचास की !!
छान वृतांत वेमाना आणि
छान वृतांत
वेमाना आणि माबोकरांना भेटून खूपच मजा आली
नी चे यासाठी आभार
शँक सापडायला अडचण नव्हती
सुपरमँनचा किस्सा भारी होता
धमाल केली
शेवटी फोटो काढण्याच्या वेळी जाम मजा आली
०७११, यातली लली कुठली? लले,
०७११, यातली लली कुठली?
लले, मुद्देसूद वृ
Pages