वेबमास्तरांना भेटण्यासाठी विलेपार्ले, मुंबई येथे गटग

Submitted by नीधप on 29 July, 2012 - 03:22
ठिकाण/पत्ता: 
द शॅक रेस्टॉरंट, संगीता'ज नेस्ट, ग्राउंड फ्लोअर, ऑफ प्रार्थनासमाज रोड. गजाली पासून २ मिन चालत.

अधिक माहिती:
मुंबईकरांच्या विनंतीला मान देऊन वेबमास्तरांनी मुंबईत गटगसाठी रूकार कळवला आहे. बोस्टनकडे हवाईमार्गे कूच करायच्या आधी ते आपल्याला भेटणार आहेत. तेवढ्यासाठी ते काही तास लवकर पुण्यनगरीचा निरोप घेणार आहेत.
पुढे विमानतळावर जाण्यासाठी त्यांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे गटग पार्ल्यात करण्यात येत आहे. तेव्हा वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर, टाऊन असे कुठलेही जातिभेद मनात न ठेवता ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता पार्ल्यात येणेचे करावे.

द शॅक ही जागा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे सोडून पार्ल्यात शिरल्यावर गाडीने वा ट्रेन स्टेशनला इस्टने बाहेर पडल्यावर रिक्षाने सव्वासात मिनिटांवर आहे.

सचित्र रस्ताखुणा
सायन वा बांद्र्याकडून येताना वे ए हायवे पासून शॅक
बोरिवली कडून येताना वे ए हायवे पासून शॅक (फ्लायओव्हरच्या खाली, अंधेरी फ्लायओव्हरकडे जाणारा रस्ता घेणे. गरवारेच्या इथे हायवेवरून उजवीकडे वळता येत नाही.)

विलेपार्ले स्टेशन (इस्ट) ते शॅक

भेटू ५ ऑगस्टला संध्याकाळी ६:३० वाजता.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, August 5, 2012 - 09:00 to 11:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दगडू ऑर्डरी घेतोयस का आत्तापास्नं? Wink

तेवढं त्यांच इमान चुकवु नगासा <<< म्हणून तर संपायची वेळ ८:३० लिहिलीये ना Wink

खादाडीची ऑर्डर पण नावनोंदणीबरोबरच द्यायची का? <<<
ओव्हर टू दगडू हां..
आपापल्या जबाबदारीवर ऑर्डर द्या.. घोळ झाल्यास संयोजक जबाबदार नाही.
दगडू उडीमारकरांना धरावे Proud

खादाडीची ऑर्डर पण नावनोंदणीबरोबरच >>> सीट बुकिंगचीही नावनोंदणीबरोबरच द्यायची का? Wink तोषा ?

सीट बुकिंगचीही नावनोंदणीबरोबरच द्यायची का?<<<<<<<<<< डुआया,रुमाल टाकून ठेव Wink

आशूतोष, हा बाफ चालू व्हायच्याही आधी तुझ्या गाडीत मी नी ललीने नोंदणी केलेली आहे, विसरू नकोस Wink
माझं हाफतिकिट असेल माझ्याबरोबर, पण ते मांडीवर बसेल, का. न. Wink

ग्राउंड फ्लोअर ऑफ प्रार्थनासमाज रोड>>>> एकच नंबर.... प्रार्थनासमाज रोडला पण मजले आहेत.. आणि हे हॉटेल त्याच्या ग्राऊंडफ्लोअरला आहे... जेब्बात... Lol

तोषाच्या गाडीत किती माबोकर असतील
माबोकर असतील माबोकर असतील हो

एक तरी दोन तरी तीन तरी असतील
चार तरी पाच तरी सहा तरी असतील
सात तरी आठ तरी नऊ तरी असतील
दहा तरी असतील हो....

चालः यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील (स्काउट-गाइडच्या पुस्तकात हे गाणे असे!)

पत्ता ठिकाण टाकताना एकाखाली एक लिहितो तेव्हा कॉमा टाकत नाही आपण.
इथेही तसंच लिहिलंय पण सेव्ह करताना ते एकाच लायनीत येतं.
धन्यवाद.

च्यायला... जोक करतोय की... मला कळालं ते काहीतरी चुकून झालं आहे म्हणून... आता इथे आवराच म्हणायला पाहिजे.. Happy

आपापल्या जबाबदारीवर ऑर्डर द्या.. घोळ झाल्यास संयोजक जबाबदार नाही.
दगडू उडीमारकरांना धरावे >> धरून फायदा नाही...हाती काही लागणार नाही... शॅक लाका बूम बूम.. Proud

तोषादादा नक्की काय घेउन येतोय.. गाडी की बस ? बस असेल तर मी पण ठाण्यातून येणार.. ववि मिसणार्‍यांसाठी मज्जाच होईल.. Wink

bad luck एकदम वाईट आहे. इच्छा असून पण येता येणार नाही. सेम डे संध्याकाळी एक family function आहे. ववी ला नसलेल्या अनेक माबोकराना भेटता आले असते. संध्याकाळी गटग ठेवल्याबद्दल निषेध Sad . (माबोवर चा पहिला जाहीर निषेध )

Pages