निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

सुदुपार
सुदुपार

जागू, तरी म्हणत होतो, कुठे
जागू, तरी म्हणत होतो, कुठे गायब झाली ?
००००००००००००
दुसर्या एका बीबी वर आंबा या सभासदाने लिहिले आहे कि आफ्रिकेत गेलो असतो तर आफ्रिकन भाषा शिकलोच असतो. वाईट वाटलं. या खंडाबद्दल इतके गैरसमज अजूनही असावेत याचे.
आफ्रिकन अशी कुठलीच भाषा नाही ( आफ्रिकाना आहे, दक्षिण आफ्रिकेत बोलली जाते. ) तशीच चायनीज, नेपाली आणि मणिपुरी हीदेखील भाषांची नावे नाहीत.
आफ्रिका म्हंटले कि साधारण सबसहारन म्हणजे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडचेच देश आठवतात. पण इजिप्त, मोरोक्को, लिबिया सारखे देशही या खंडातच आहेत, याचा विसर पडतो.
बुर्कीना फासो, चाड, नायजर, मॉरिशियाना, घाना, अंगोला, काँगो ( दोन भाग ) इरिट्रिया, बेनिन, टोगो, सेनेगल, ट्यूनिशिया, गेबॉन, रवांडा, आयव्हरी कोस्ट, स्वाझिलँड असे कितीतरी देश आहेत इथे, ज्यांची नावे पण आपल्याला माहीत नसतात.
नायगारापेक्षा मोठा धबधबा इथे आहे, जगातील दुसर्या क्रमांकाचे गोडे पाण्याचे सरोवर इथे आहे ( दुर्दैवाने दोन्हीला व्हिक्टोरिया असे नाव आहे )
खनिजे, हिरे, खनिज तेल तर आहेच पण अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. यूरपमधील शेतजमीन कमी पडल्याने, ते लोक या खंडात जमिनी विकत घेऊ लागले आहेत.
झांबिजी नदीवरचे प्रचंड मोठे धरण आहे. आणि हे धरण बांधताना पाण्याखाली आलेल्या, जमिनीवरच्या जंगली जनावरांचेदेखील पुनर्वसन करण्यात आले होते.
चांगली बाब अशी कि आज अनेक देशांत भारतीय लोक नोकरीसाठी जायला लागले आहेत, तेवढ्या संधी इथे उपलब्ध आहेत.
असो, नि,ग. वर जरा अवांतर झाले.
असे कितीतरी देश आहेत इथे,
असे कितीतरी देश आहेत इथे, ज्यांची नावे पण आपल्याला माहीत नसतात. >>> खरं आहे तुम्ही म्हणता ते - यातील बरीच नावे मलाही आताच कळली.... आणि अजून अशाच कितीतरी न कळलेल्या गोष्टी आहेत.....
दिनेशदा घरचे नेटच बंद पडले
दिनेशदा घरचे नेटच बंद पडले होते. काल रात्री पासून सुरु झाले.
आज ऑफिसच्या आवारात एक फुलोरा
आज ऑफिसच्या आवारात एक फुलोरा दिसला. हा त्याच झाडाचा फुलोरा आहे असे वाटते जो मधु-मकरंदने दाखवला आहे.
त्या हिरव्या पानाआडून हा शुभ्र फुलोरा खूपच छान दिसला.
त्या मोहक फुलोरयासाठी ह्या चारोळी.
फुलांनी फुलत जाव ,
झाडावरती झुलत जाव,
ती स्वछंदी फुले पाहता,
मन माझ मोहरून जाव .....!!!!!!
आपण जी चॉकलेट्स खातो, जी खास
आपण जी चॉकलेट्स खातो, जी खास करुन युरपमधे तयार होतात, त्यांना लागणारा बहुतेक कोको, नायजेरिया, घाना या भागात होतो. त्यासाठी बुर्किना फासो देशातील बाल कामगार कष्ट करतात. बहुतांशी व्हॅनिला पण याच भागातून येतो, कारण या दोन्ही पिकांसाठी युरपचे हवामान योग्य नाही. ( पण स्विस आणि फ्रान्स, या देशांचे नाव कधीच घेत नाहीत. ) अगदी अलिकडे घाना मधल्या कोकोचा उल्लेख एका जाहिरातीत बघितला.
जगातील बहुतांश हिरे, आता याच खंडात सापडतात. मानवजातीचा उगम इथेच झाला. इथियोपियात अजूनही
अवशेष सापडतात. इजिप्तमधले सोने ( सध्या तिथे असणारे आणि जगभरच्या संग्रहालयांची शोभा वाढवणारे ) जास्त करुन, सुदान मधेच सापडलेले आहे.
एका नदीच्या समोरासमोरच्या किनार्यावर, दोन देशांच्या राजधान्या असे फक्त इथेच आहे.
युगांडामधे, सेंद्रीय शेतीची चळवळ जोरात चालू आहे. झांजिबार बेट, अजुनही उत्तम मसाले पिकवते. ( काही मायबोलीकरांनी तिथल्या वेलचीचा सुगंध अनुभवला आहे. ) चहा / कॉफीसाठी पण इथल्या काही देशांतले
हवामान योग्य आहे. इथिओपियातल्याच, काफ्का या गावी कॉफिचा उगम झाला असे मानतात. कॉफी / काहवा ही नावे, त्याच गावावरून पडली आहेत.
वा अनुप, कुणालाही कविताच
वा अनुप, कुणालाही कविताच सुचेल, हे बघून. "गंध" असणार याला.
अनुप - या फुलांना काही
अनुप - या फुलांना काही विशिष्ट वास होता का - बटाटे / रताळे उकडल्याचा वगैरे...
दिनेशदा, आणि आपण वास कसा घेतो
दिनेशदा,
आणि आपण वास कसा घेतो याबाबतीत एक प्रयोग करण्यासारखा आहे, डोळे बांधून, नाकाजवळ एक वास, आणि जिभेवर दुसर्या स्वादाचे काहीतरी ठेवून बघा ! >>>> नक्की करून पाहीन.
शांकली,
आणि याला अजून एक गमतीशीर नाव आहे - 'मजनू' >>>>> फारच छान नाव.
याची पानं मागच्या बाजूने थोडी पांढरट किंवा चंदेरी झाक असलेली आणि खूप मुलायम असतील. >>>> लक्षात नाही आले. पाने फार वर आहे. जे खाली पडलेले मिळाले ते काही मुलायम नव्हते.
कुत्रा - कुत्रा चावणे --- अगदी संग्राह्य चर्चा.
शांकली, कर्वे रोडवर कुठे आहे
शांकली, कर्वे रोडवर कुठे आहे ते (बटाटे / रताळे उकडल्याचा वास येणारे) झाड ?
अनुप, सुस्वागतम! अगदी असेच
अनुप, सुस्वागतम!
अगदी असेच झाड आहे माझ्या ऑफिस जवळ. मला हा गंधित फुलोरा खुप उंच वाटला, तुम्हाला तर कविता सुचली. धन्यवाद.
निग वर मला उत्तर मिळणार याची खात्री होती.
जागू, कशी आहेस? खुप दिवसांनी.
शांकली, कर्वे रोडवर कुठे आहे
शांकली, कर्वे रोडवर कुठे आहे ते (बटाटे / रताळे उकडल्याचा वास येणारे) झाड ?
>>> शांकलीच्या (अंजूच्या) वतीने मी उत्तर देतोय - कर्वे रोडकडून पूना हॉस्पि कडे जाणारा जो छोटा पूल आहे त्या पुलाच्या उजव्या बाजूला (पूना हॉस्पिकडे जाताना) कर्वे रोडला लागून हे झाड आहे - कालच शांकली व मी ते पहायला गेलो होतो - पण अजून त्याला फुलोरा आलेला नाहीये.....
निसर्गाशी संबंधीत नाहिये...
निसर्गाशी संबंधीत नाहिये... पण तरीही हे बघाच - सगळे लेगोचे ब्लॉक्स वापरून केले आहे.
छान आहे, माधव ती क्लीप.
छान आहे, माधव ती क्लीप. यावरुन आठवले. हि सगळी मेकॅनिकल प्रोसेस आहे, पण सुरवातीला लॉटरीचे नंबर्स काढण्यासाठी एक मोठा गोल वापरत असत आणि तो फिरवून, नंबर्स काढत.. असा एक गोल गोव्याला पणजीला म्यूझियम मधे ठेवलेला आहे. वाईट बाब म्हणजे, छोटे तरीही सुंदर असलेले हे संग्रहालय, पर्यटकांना माहीत देखील नसते.
अनुप छान फुलोरा आहे. वेड्या
अनुप छान फुलोरा आहे. वेड्या बाभुळची पाने पण अशीच असतात.
मधू मी एकदम ठिक.
जागु नवीन गप्पांचं पान चालु
जागु नवीन गप्पांचं पान चालु कर आता आलीच आहेस तर
आज रात्री किंवा उद्या करते
आज रात्री किंवा उद्या करते चिमुरी.
धन्स शशांक. उद्या बहुतेक
धन्स शशांक. उद्या बहुतेक जाईन तिकडे , तेव्हा बघते मला ओळखता येतय का ते.
माधव >>> लिंक दिसत नाही.
माधव >>> लिंक दिसत नाही.
दिनेशदा, तुम्ही लिहिलेली
दिनेशदा,
तुम्ही लिहिलेली माहिती वाचत असताना मी पुण्यातच आहे याचा कधी कधी विसर पडतो,तुम्ही हे सगळं जग अगदी डोळ्यांसमोर उभ करता..
राज्यातल्या ग्रामीण भागात सरकारकडून मुख्यतः वनीकरणामधुन,सरकारी शाळांभोवती या निलिगिरीची खुप लागवड झालेली दिसते,निदान दुष्काळी भागात तरी.
१००० प्रतिसादांबद्दल अभिनंदन!
१००० प्रतिसादांबद्दल अभिनंदन!

शांकलीच्या (अंजूच्या) वतीने
शांकलीच्या (अंजूच्या) वतीने मी उत्तर देतोय - कर्वे रोडकडून पूना हॉस्पि कडे जाणारा जो छोटा पूल आहे त्या पुलाच्या उजव्या बाजूला (पूना हॉस्पिकडे जाताना) कर्वे रोडला लागून हे झाड आहे - कालच शांकली व मी ते पहायला गेलो होतो - पण अजून त्याला फुलोरा आलेला नाहीये.....>>>>>>>>>>.आता मी बसने जाता-येता नेहमी लक्ष ठेवीन.
शांकलीच्या (अंजूच्या) वतीने
शांकलीच्या (अंजूच्या) वतीने मी उत्तर देतोय - कर्वे रोडकडून पूना हॉस्पि कडे जाणारा जो छोटा पूल आहे त्या पुलाच्या उजव्या बाजूला (पूना हॉस्पिकडे जाताना) कर्वे रोडला लागून हे झाड आहे - कालच शांकली व मी ते पहायला गेलो होतो - पण अजून त्याला फुलोरा आलेला नाहीये.....>>>>>>>>>>.आता मी बसने जाता-येता नेहमी लक्ष ठेवीन. >>> बसमधून दिसणार नाही ते झाड - ते बघायला थोडेसे पुलावर जावे लागतेच .....
बसमधून दिसणार नाही ते झाड -
बसमधून दिसणार नाही ते झाड - ते बघायला थोडेसे पुलावर जावे लागतेच .....हो का?
शोभे, १००० नाही गं, १० गुणिले
शोभे, १००० नाही गं, १० गुणिले १००० असे १०,००० प्रतिसाद आहेत.
अनिल, मला पण इथे सगळे आपण एका रम्य स्थानी, झाडाखाली बसून गप्पा मारतो आहोत, असेच वाटत राहते.
०००००००००००
रोमन साम्राज्याचा अंत नेमका कशाने झाला याची एक थिअरी, डॉ इयाम स्टेवर्ट मांडतात. त्यांच्या मते या विनाशाला कारणीभूत झाले ते शिसे. प्राचीन काळी रोममधे ते भरपूर सापडत असे. पाण्याचे पाईप ( रोममधे लागणारे पाणी ८० किमी वरून, पाईपने आणत असत ) सार्वजनिक न्हाणीघरे, कारंजी अशा सगळ्याच ठिकाणी
शिसे वापरत असत. पाण्याच्या पाईप्सना नैसर्गिक रित्या, पाण्यातील कॅल्शियमचे अस्तर बनत असे, आणि शिसे असलेल्या पाण्याने अंघोळ करणे, तेवढे धोकादायक नाही, तरिही या धातूचा वापर, इतपतच नव्हता.
त्याकाळी बायका चेहर्यावर जे रोगण थापत असत त्यात शिसे असे. तिथे सापा नावाचा एक पदार्थ करतात. पुर्वी तो लाल द्राक्षाचा रस न आंबवता, शिश्याच्या भांड्यात आटवून करत असत. हा रस रंगाने लाल आणि चवीला गोड असे.
पण द्राक्षातील नैसर्गिक आम्लाने, त्यात भांड्यातील शिसे भरपूर उतरत असे. हा सापा, वाईन्स तो रंग देण्यासाठी, तसेच जेवणाला गोडवा आणण्यासाठी वापरत. (साखर नव्हती ) रोमन लोक, दिवसाला किमान २ लिटर ते ५ लिटर वाईन पित असत.
या शिश्याचा परिणाम इतका वाईट झाला कि त्याकाळात प्रजननक्षमताच घटली, शिवाय लोकांच्या मेंदूवर
परिणाम व्हायला लागले ( नीरो सारखे सणकी लोक, या काळातलेच ) अखेर ते साम्राज्यच लयाला गेले.
खरे तर हा फक्त कयासच आहे, पण त्यासाठी डॉ इयाम जी कारणे आणि पुरावे सादर करतात, त्यामूळे आपला
विश्वास बसू लागतो. हे सगळे वरील माहितीपटात आहे.
अरे वा.. नि ग. च्या अकराव्या
अरे वा.. नि ग. च्या अकराव्या भागाची वाट पाहतेय..
नि.ग. च्या अनमोल खजिन्यात उत्तरोत्तर बढोतरी व्हावी हीच शुभेच्छा!!! ..
दिनेश दा.. विविध देश आणी तेथील बोलीभाषांबद्दल जे म्हटलंत त्याला +१०००० अनुमोदन!!!!
नि ग वर १००००+ प्रतिक्रिया
नि ग वर १००००+ प्रतिक्रिया ... सर्व निगप्रेमींचं अभिनंदन!
११व्या भागाच्या प्रतिक्षेत.
Hi, I am new here. Now-a-days
Hi, I am new here. Now-a-days in Thane, I see some trees which have blossmed with small white flowers. There are bunches of these flowers. Smell is very strong. Does anybody knows about these trees?
regards!
निर्मल ती सप्तपर्णी आहे.
निर्मल ती सप्तपर्णी आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
Pages