निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली,

किटकांना फुले अल्ट्रा व्हायोलेटमधे दिसतात. मध म्हणजेच साखरपाणी असेल / नसेल तर वेगळा रंग दिसतो.
शिवाय परागीवहनाचे काम पूर्ण झाले असेल, तर फुले साखरनिर्मिती ताबडतोब, बंद करतात.

शिवाय परागीवहनाचे काम पूर्ण झाले असेल, तर फुले साखरनिर्मिती ताबडतोब, बंद करतात.

Happy !!!!

( पोरं झाली की बायका नवर्‍यांशी 'अशा' का वागतात, ते समजलं .)

पण म्हणजे कीटकांची दृष्टी तीक्ष्ण असल्यामुळे त्यांना हे चटकन कळतं. एका क्षणार्धात कळतं म्हणजे ती मंडळी खूपच अ‍ॅडव्हान्स आहेत नै!!

हो शांकली, त्यांचे डोळे आपल्यापेक्षा खुपच तीक्ष्ण असतात. त्यात भिंगेही जास्त असतात. नाकही तीक्ष्ण असते.
किंचीतसा गंध त्यांना दूरवर येतो.

झेंडूच्या बाबतीत एक विरोधाभास आहे. फुलांचा तो भडक केशरी पिवळा रंग आपल्याला खुप आवडतो पण तो फक्त फुलातच. तो रंग कपड्यात आला, कि आपण त्याला वैराग्याचे प्रतीक मानतो. त्याचा तो उग्र गंध देखील, आपल्याला आवडतो ( निदान असह्य तरी होत नाही. )

बॉटनी ऑफ डिझायर मधे एक वाक्य आहे, झाडांच्या विचारशक्तीबद्दल नेहमीच शंका घेतली जाते, पण झाडांनी
मानवाची विचारशक्ती वापरून घेतली, असे नक्कीच म्हणता येईल.

आपण झेंडूची शेती करतो, नवरात्रात तर त्याशिवाय चालतच नाही. बरेच दिवस फुल टिकते आणि सुकल्यावर रंगही तसाच राहतो, या गुणधर्मावर आपण त्याला माळेचा / तोरणाचा मान दिलाय.

बी वाचले परिक्षण, आवडले.

जामोप्या, अपवाद असतातच. सुरंगीच्या गजर्‍यावर देखील मधमाश्या तुटून पडतात !

दिनेशदा, आत्ताच अ‍ॅनिमल प्लॅनेटवर इक्वेटोर हा प्रोग्रॅम बघितला. गॅलॅपॅगोस बेटांवर रहाणारे इग्वाना,रेड आणि ब्लू फूटेड बूबीज,फ्रिगेटस्,अल्बेट्रॉस आणि कॉर्मोरंट्स यांचं सहजीवन दाखवलं. आम्हा दोघांनाही तुमची आठवण झाली. बूबीजना पिल्लं वाढवताना येणार्‍या खूप सार्‍या अडचणी आणि त्यात फ्रिगेट्सनी त्यांना दिलेला त्रास,मोठ्या लाल खेकड्यांनी त्यांची (बूबीजची) पिल्लं खाणे, इग्वानांना शेवाळांच्या शेतात चरताना आणि सूर्योदयानंतर बराच काळ अंग गरम झाल्यानंतर पाण्यात (जवळ जवळ २ डिग्री इतक्या थंड पाण्यात) उतरणे, अल्बेट्रॉसची जोडीदार मिळवण्याची गमतीशीर पद्धत....सारं काही खूप सुंदर टिपलंय या फिल्म मधे. मुख्य म्हणजे कॉमेंटरी पण खूप सोप्या भाषेत होती. तुमच्याकडच्या खजिन्यात ही फिल्म नक्की असणार!!

गेले काही दिवस आमच्या तगरीच्या रोपावर कीड पडली होती. तशी ती दरवर्षीच या दिवसांत पडते. पण यावेळी एक गमतीशीर अनुभव मला आला. बुलबुलाच्या ३/४ जोड्यांनी बागेत निरनिराळ्या ठिकाणी जागा मिळवल्या,घरटी थाटून,पिल्लं जगवली आणि त्यांच्या पिल्लांना भरवायला या तगरीवरची कीड उपयोगी पडली. अगदी रांगेत उभे राहून, न भांडता, एकेक बुलबुल (आई किंवा बाबा) तगरीचे एकेक वळलेले पान तोडून भिंतीच्या कडेवर आपटायचे. आळी बाहेर पडली की पिल्लाला भरवायची. नाही बाहेर पडली तर पान खाली फेकून द्यायचे. हा उद्योग त्यांनी पिल्लं चांगली मोठी होईपर्यंत केला. (किडलेली तगर एकदम ६/७ दिवसांत उजाड झाली!) पण आता छान फूट येतीये तिला.
अन्नसाखळी घरबसल्या बघायला मिळाली! या वर्षी पिल्लांची संख्या वाढली होती; तर आमच्या शेजार्‍यांच्या बोक्याने काही पिल्लांची शिकार केली तर काही पिल्लं कावळ्यांनी खाल्ली. आणि शेवटी मला वाटतं ३ ते ४ च पिल्लं जगली असतील. हा आहे निसर्ग!! इथे सगळे त्यांच्या त्यांच्या नियमानुसार वागतात. कोणी क्रूर नसते. जास्त प्रजा झाली तर आपसूकच त्यावर नियंत्रण राखले जाते. (बट व्हॉट अबाउट ह्युमन बीईंग?????)

मंडळी, आज सक्काळी सक्काळी बागूल बागेत जाण्याचा योग आला! कारणही तसंच होतं. तिथे पीच अ‍ॅपल नावाचा छोटेखानी वृक्ष आहे. पीच आणि अ‍ॅपल अशा दोन दोन फळांच्या नावाने स्वत:चं नाव घेणार्‍या या वृक्षाला नक्की कोणती फळं येतात ते माहिती नाही.. पण हा फुलतो मात्र या दिवसांत. पुण्यात अजून १/२ ठिकाणीच हा असेल. तसा दुर्मिळ म्हणावा इतक्या कमी संख्येनी हा लावला गेलाय.
पहिल्यांदा बघताच काजूच्या झाडाशी खूप साधर्म्य वाटतं. पण हा जरा जास्त उंच असतो, आणि काजूच्या पानांवरच्या शिरा खूप उठावदार किंवा स्पष्ट दिसतात तशा ह्याच्या नाही दिसत. मला वाटलं होतं की आज कदाचित ३/४ फुलं तरी फुललेली असतील! पण छे! कळ्यांची अळीमिळी गुपचिळी काही सुटायला तयार नाही!
मग त्यांचंच फोटोसेशन केलं (अर्थात मोबाईलवरून!)..............

ही सदाहरित पानं..

Image1059.jpg

या छोटुकल्या कळ्या....(आकाराने मटाराच्या दाण्या इतक्याच आहेत.)

Image1063.jpg

ही जरा मोठी झालेली.....गालातल्या गालात हसणारी...

Image1058.jpg

आणि आज फुलेल असं वाटलेली;....... पण हुप्प बसलेली (कदाचित २/३ दिवसांत फुलेल!)...

Image1060.jpg

खरंतर अजून थंडीला सुरुवात झाली नाहीये, पण ही मात्र पाकळ्यांचं पांघरूण अगदी घट्ट पांघरून बसलीये!!.. Happy

हा आहे निसर्ग!! इथे सगळे त्यांच्या त्यांच्या नियमानुसार वागतात. कोणी क्रूर नसते. जास्त प्रजा झाली तर आपसूकच त्यावर नियंत्रण राखले जाते. >>>>>>>>शांकली Happy

हे पॅशनफ्रुटचे फुल.
तळमजल्याहुन हि वेळ पिंपळाच्या झाडावर अगदी वरपर्यंत पसरली आहे. माझ्या दुसर्‍या मजल्यावरच्या गॅलरीतुन जवळ दिसते. २ फ्रुटही लागले आहे. Happy पण काढता येत नाही.

फुल लांब असल्याने डिटेल्स टिपता नाही आले. प्रचि १८-१३५ ने काढला असुन थोडा क्रॉप केलाय.

कसला सुंदर फोटो आलाय पॅशनफ्रूटचा!!...मला वाटतं ही पांढरी फुलं आपल्या नेहेमीच्या जांभळ्या फुलांपेक्षा आकाराने थोडी लहान असतात ना?
दिनेशदा, तुम्ही मागे पॅशनफ्रूटच्या बिया दिल्या होत्या, त्या रुजल्या नाहीत Sad

शांकली,पीच अ‍ॅपलच्या कळ्या कित्ती गोडूल्या आहेत ग. फूलांचापण टाकशीलच ना फोटो.
वेका गुलाब मस्तच.
जिप्सी, पॅशनफ्रूट्च्या बिया बघ ना मिळतात का. मिळाल्यातर मलापण दे.

उजू, मला खूप वाईट वाटतंय की मी तुझ्याकडून ही पिवळ्या आणि पांढर्‍या कांचनाची रोपं नेऊ शकले नाही..:अरेरे:
काश....मी मुंबईत रहात असते....
पाहुणे छान(!!) आहेत..:स्मित:

वा सगळ्यांचे फोटो मस्तच आहेत.

माझ्या दिरांच्या हॉलच्या झुंबरावर सध्या बाळंतपण झाले आहे. ३ पिल्ले दिसतात.

बुलबुल भरवतेय पिल्लांना.

हा फोटो जरा फसला. परत काढेन.

जागु.. किती गोड पिल्लावळ आहे.. !!
शांकली, पीचअ‍ॅपल ट्री.. खूपच गमतीदार नाव आहे..आता तुझ्याबरोबर आम्हीही या कळ्या उमलायची वाट पाहतोय.. Happy

पॅशनफ्रूट्,कांचन्..खूप सुंदर..
आणी वरील सगळी माहिती पण फार इन्टरेस्टिंग!!!

वा बरीच फुले फुललीयेत मा बो वर, जागूकडचे बुलबुलचे घरटेही बरेच दिवसांनी चिवचिवताना दिस्तेय......
सगळे फोटो सुंदर, माहितीही छानच......

शांकली वेगळ्याच आहेत कळ्या. बहुतेक सकाळीच उमलत असाव्यात. एकदा ठिय्या देऊन बसावं लागेल तिथे.

जागू, बुलबुल तूझी खरी मैत्रिण ! वॉटर लिली पण मस्तच.

जिप्स्या, पॅशनफ्रूट पूर्ण पिकले कि गळून पडेल. खुप आंबट असल्याने, पक्षी खात नाहीत, ते.
माकडे नसावीत, तूमच्या परीसरात.

उजू, पिवळा कांचन फार दुर्मिळ असतो. मस्त दिसतात ती फुले.

छान फुललीय गं.

इथे लिहायचे राहुनच गेले.

माझ्याकडे पण सेम जागुचीच लिली आहे. तिच्यात गप्पी मासे सोडायला हवेत असे कितीतरी दिवस नुसते बोलत होते. कॉलनी येणा-या म्युन्सिपाल्टीच्या लोकांकडे चौकशी केली. त्यानी दवाखान्यात या, डोक्टरांना भेटा, ते देतील मासे म्हणुन दोन्चारचा सांगितलेही . पण माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही.

गेल्या आठवड्यात लिलीच्या पाण्यात खुपच डास दिसायला लागले म्हणुन शेवटी सकाळी ९ वाजता ते ग्रेट डॉक्टर आणि त्यांचे मासे शोधायला बाहेर पडले. मासे देणारे कोण दिव्य डॉक्टर असा विचार चाललेला पण अर्थात तरीही डोक्यात काहीच ट्युब पेटत नव्हती.

शोधत शोधत एकदाची पोचले दवाखान्यात. बाहेर डॉ. आनंदीबाई जोशी ..... असा बोर्ड बघुन हा बोर्ड कुठेतरी आधी पाहिलाय हे असे वाटत होते तोच झटक्यात माझी ट्युब पेटली. हा फोटो तर आपल्या डॉ. कैलास गायकवाडांनी टाकलेला. मग आठवले, डॉक्टरांनी मागे माझी कॉलनीही त्यांच्या अधिपत्याखाली आहे, काही लागले तर सांगा असे आवर्जुन सांगितलेले..... आपलेच डॉक्टर आत बॉस आहेत हे लक्षात येतात धावतच आत गेले. डॉक्टर एका बाजुला पेशंट तपासत होते आणि समोर मॉनिटरवर मायबोली उघडलेली Happy

डॉक्टरांनी अगत्याने स्वागत केले. तिथल्या मावशींच्या हातचा सुंदर चहा प्यायला घातला आणि सोबत मासेही दिले.. आता ते मासे माझ्या लिलींबरोबर खेळताहेत आनंदाने... Happy

दोन-चार दिवसांपुर्वी पंकजच्या मुलाला ताप आलेला तेव्हा त्याला धाडुन दिले डॉक्टरांकडे. म्हटले मुनिसिपालिटी असली तर डॉक्टर भरवशाचे आहेत, बिंदास जा. डॉक्टरांचे औषध अगदी मस्त लागु पडले. त्याला कांजण्यासारख्या पुळ्या आल्या पण थोडक्यावरच गेल्या... दुसरीकडे गेला असता तर हजारपाचशेला तरी फोडणी पडली असती.

.. त्यांच्याकडे इतक्या गोष्टींचे भांडार आहे की बस्स... ते हिमनगाचे असते ना तसे आहेत ते - आपल्याला तर पाण्याच्या वरचाच भाग दिसतो आहे पाण्याखालील केवढा मोठा भाग झाकलेलाच आहे ....... त्यांचे आणिक एक वैशिष्ट्य म्हणजे - एवढे ज्ञानाचे भांडार असूनही ते अतिशय विनम्र आहेत, समोरच्या व्यक्तिच्या छोट्याशा गुणाचेही कौतुक करतात.... अशाच किती तरी गुणांनी समृद्ध.>>>>>>>>>>>>>>>>१००% खरं आहे. Happy
आता मला सांगा हे काय आहे? Happy
DSCN4096.jpg

Pages