निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधु,
इरावती कर्व्यांच्या लेखात, पावसाळ्यापुर्वी चतूर दिसतात असा संदर्भ आहे. पावसाची चाहूल देण्यासाठी !

आपल्याला साधासुधा वाटणारा हा जीव, पण यांचे मिलन आणि अंडी घालण्यासाठी पाण्यातली नेमकी जागा
बळकावण्यासाठीची धडपड विलक्षण असते.

आता इवलासा राहिलेला हा जीव, पुर्वी फार मोठा म्हणजे २ मीटर्स लांबीचा होता, त्याचे जीवाश्म मिळालेले आहेत.

पावसाळ्यानंतर येणारे म्हणजे कोषातून बाहेर पडणारे, नवे जीव असावेत.

मी टिवीवर मागे एक फिल्म पाहिलेली, अ‍ॅटनबरोसाहेबांचीच असावी. नदीच्या पाण्याखाली वाढलेले की जन्माला आलेले.. देवाला नी अ‍ॅटनबरोसाहेबांनाच ठावके नक्की काय ते, मला काही आठवत नाही.. पण भराभर एकेक चतुर पाण्याबाहेर यायला लागला आणि थोड्याच वेळात नदीचा काठ, वरचा भाग सगळे काही चतुरांनी भरुन गेले.

तुनळीवर चतुरांचा जन्म पाहात असताना ही लिंक दिसली. शीर्षक गप्पी फिशिंग होते, म्हटले १ सेमी लांबीच्या गप्पीची अजुन वेगळी फिशिंग कशी करतात ती तरी पाहु म्हणुन उघडुन पाहिले. आधी क्लिप पाहिली आणि गप्पी कुठे म्हणुन विचारात पडले. कमेंटमध्ये काहीतरी लिहिले असेल असे वाटून कमेंट पाहायला लागले.... पहिली कमेंट वाचल्यावर हसु आवरेना, मग पुढे पुढे वाचत गेले आणि हसुन हसुन मेले Happy

http://www.youtube.com/watch?v=dVTqXPcBNJY&feature=player_detailpage

खालची कमेंट सगळ्यात बेस्ट.. Proud

if that's a guppy then i'm the hulk

आता इवलासा राहिलेला हा जीव, पुर्वी फार मोठा म्हणजे २ मीटर्स लांबीचा होता>>>

आत्ता असतात त्या संखेत आले ते तर ..बापरे कल्पनेनेच शहारा आला.

आता इवलासा राहिलेला हा जीव, पुर्वी फार मोठा म्हणजे २ मीटर्स लांबीचा होता>>>

आत्ता असतात त्या संखेत आले ते तर ..बापरे कल्पनेनेच शहारा आला. >>> मग तो एकटाच "चतुर" आणि त्याच्यापुढे आपण सगळे "थातुर मातुर" झालो / दिसलो असतो.

झाडे आणि सजीव यांच्यात नेहमीच स्पर्धा होत आलीय.

वातावरणात आधी ऑक्सीजन नव्हता, तो हिरव्या अल्गीने निर्माण केला, मग त्यांचीच झाडे झाली, पण
त्यांना, पाने / मुळे / खोड असे अवयव नव्हते. पुढे त्यांच्यातच स्पर्धा झाल्याने ऑक्सीजन कमी पडू लागला, मग झाडांनी पाने निर्माण केली आणि ती जास्तीत जास्त लांब पसरायला सुरवात केली, पाने वाढल्याने डायनॉसोर सोकावले ( हो त्यातले बरेचसे शाकाहारीच होते ) मग झाडांनी खोडे निर्माण केली आणि पाने आणखी वर नेऊन ठेवली..... मग मात्र त्यांनी नवस सायास केले असावेत कारण त्यांचे मोठे शत्रू, डायनॉसोर्स, एका फटक्यात नष्ट झाले................... धडा काय घ्यायचा, आपण ?

साधना ते चतूर नव्हेत. बदामी रंगाची वेगळी पाखरे असतात ती. चतूर तेवढ्या संख्येने नाही जन्माला येत.

ओह्ह, तरी मला वाटलेले की चतुर पाण्यातुन बाहेर आले तर पंख ओले नाही का होणार? पण ते बहुतेक मोठ्या किटकांसारखे दिसत होते, आता निटसे आठवत नाही..

रात्रीच्या अंधारात नदीवर लाईट टाकलेला आणि त्या प्रकाशात पाण्यावर हजारो चांदण्या चमकताना दिसत होत्या... खुपच सुंदर दृष्य होते ते

लेक मालावी मधे पण अबोली रंगाची अशी पाखरे अचानक येतात. अगदी प्रचंड संख्येने. त्यांची संख्या इतकी असते कि त्या लेकवर ज्वाला उठल्यासारख्या दिसतात. ती पाखरे खायला माश्यांची संख्या अतोनात वाढते.
आणि अर्थातच तिथली माणसे दिवसरात्र झटून ते मासे पकडतात. मालावीमधला वैराण प्रदेश बघता, ते मासे
सुकवूनच ठेवावे लागतात, पण त्या परीसरातील २० लाख लोकांचा, प्रथिने मिळवायचा तो एकमेव मार्ग आहे.

हे लेक मालावी नितांत सुंदर आहे. तिथे आढळणारे बहुतांशी जीव, जगात इतरत्र कुठेच आढळत नाहीत.

मग तो एकटाच "चतुर" आणि त्याच्यापुढे आपण सगळे "थातुर मातुर" झालो / दिसलो असतो.>>>>:) Happy Happy

चतुरः
इथे लगेच उत्तर मिळेल हे माहीतच होते. दिनेशदा, खरोखर नविनच जीव असावेत. त्याशिवाय असे तजेलदार / फ्रेश दिसत नाहीत.

माझ्या ऑफिसच्या मेन-गेटपाशी ४-५ मजली उंच झाड आहे. आत्ता पुर्ण फुलोरयावर आहे. पांढरी फुले घोसाने लगडलेली आहेत. लांबून पहाताना झाड पांढुरके दिसते. झाडा जवळपास असले कि घमघमाट असतो. असे वाटते कि हा वास बटाटे उकड्ल्यावर थोड्यावेळाने येइल असा आहे. किंवा सुकत आलेल्या बटाटा किसा सारखा आहे.

खाली पडलेला एक घोस पानांसकट मिळाला. फुले कोमेजली होती पण त्यांना वास होता. ऑफिस मधल्या ७-८ जणांना वास ओळखायला सांगितला. वेगवेगळी उत्तरे मिळाली. "उग्र वास" , "सडका घाण वास", "ओळखिचा वाटतो, पण सांगता येणार नाही", "रताळे उकडल्यासारखा", "उकडलेल्या बटाट्यासारखा".

रताळे किंवा बटाटा हि उत्तरे बायकांची तर इतर उत्तरे पुरुषांची होती. वास ओळखायला सांगितला तर वास मनातून ओळखतात कि नाकातून हा प्रश्न मला पडला. बाकी झाड निलगिरीचे (?) असावे. जाणकार सांगतीलच!!

Photo0079.jpgPhoto0080.jpg

मला निलगीरीच्या झाडाजवळ कायम फक्त निलगीरीचाच वास आलाय Happy

याची पाने चुरगळली तरी निलगिरी तेलाचा वास येतो. पाने पहा चुरगळुन.... पण याची पाने थोडीशी वेगळी वाटताहेत. हिरवी दिसताहेत.

अर्थात आपली तेलवाली निलगीरी... Eucalyptus polybractea याची पाने वरच्यासारखी हिरवी कधीच पाहिली नाहीत मी. कायम निळसर झाक असलेली पाहिलीय... तशा इतरही Eucalyptus खुप आहेत म्हणा..

गुगलवर निलगीरीच्या फुलांचे फोटो पाहिले, थोडेफार वरच्या फुलांसारखे आहेत. वरच्या फुलांचे बुडखे अगदी गोल दिसताहेत पण तेलवाल्या निलगीरी फुलांचे बुडखे शंकाकृती पाहिल्याचे आठवतेय.. निलगिरीची पांढरट हिरवी फळेही शंकाकृती असतात पण माझ्या आठवणीप्रमाणे त्याना मात्र अजिबात वास येत नाही निलगिरी तेलाचा.... माझ्या शाळेच्या आवारात खुप झाडे होती. पिटीच्या तासाला उगीच पाने तोडत बसायचे, उगीच फळे तोडुन फळांचा वास घेत 'वासच नाही यांना' म्हणत फेकुन द्याय्चे इत्यादी उद्योग चालायचे, पिटी कधी केलीच नाही, कुणी करुन घ्यायच्या भानगडीतही पडले नाही.. Happy

(वर माझ्या आठवणीप्रमाणे हा शब्द लिहिताना एकदम फस्सकन हसु आले... माझ्या बाबतीत किती विरोधाभास आहे ह्या शब्दात.. Happy )

मला हा वास " उकडलेल्या रताळ्यासारखा" वाटला. तुमची माहिती वाचून माझी ज्ञानेद्रीये जागृत आहेत असे वाटले.
आपल्या आजू-बाजूला आश्या अनेक गोष्टी असतात पण मनुष्य स्वभाव हा असा " आतीपारीचयात अवज्ञा."
तुमची माहिती खूपच आवडली. धन्यवाद.......!!!!!

हि वेड्या बाभळीची एक जात दिसतेय. ( पिवळ्या जातीने उच्छाद मांडलाच आहे, आता ही.. )

आणि आपण वास कसा घेतो याबाबतीत एक प्रयोग करण्यासारखा आहे, डोळे बांधून, नाकाजवळ एक वास, आणि जिभेवर दुसर्‍या स्वादाचे काहीतरी ठेवून बघा !

खूप वाचायचं राहिलं होतं ! आता पुर्ण केलं ! बापरे किती महत्त्वाचि माहिती मिळतेय !
शशांकजी तुमच्या लिखाणातले नर्म-विनोद सुद्धा खूप मजेशीर वाटतात.

<<<<<कुत्र्यासारखे भुंकणे शक्यच नसावे, मला लहानपणी कुत्रा चावला होता, मी कुठे भुंकतो ? !!!>>>>
दिनेशदा Rofl

सासुरवाशीण सिनेमाच्या हिंदी रिमेकात हेमामालिनी होती. सासू कोण होती?

त्यात पालही होती आणि सापही होता. बरोबर ना?

आणि मासेही होते -फिश टँक ... कित्ती कित्ती प्राणी ते!!!

Proud तोच हा षिणेमा ना?

"रताळे उकडल्यासारखा", "उकडलेल्या बटाट्यासारखा".>>>> मधु फोटो टाकलास ते बर झालं. ह्या उकडलेल्या बटाट्यासारख्या वासाबद्द्ल मी मागे निग वर लिहील होत. आणि माझ्या ऑफीसला जाण्या येण्याच्या वाटेत एका जागी आता पुन्हा तोच वास यायला सुरवात झाली आहे. तुझ्या फोटोतल्या सारखे झाड तिथे जवळ पास आहे का ते पहाते. सापडल तर सगळ्यांना सांगेनच Happy

आंबा,,

दोन्हीत सासू ललिता पवार होती. मराठीत सूना आशा काळे आणि रंजना होत्या तर हिंदीत आशा पारेख आणि रिना रॉय होत्या..

नेहमी जेवण शिजवणार्‍यांनाच हा बटाटा / रताळे शिजवताना जो वास येतो तो कळेल, बाकिचे म्हणतील, बटाट्याला कुठे वास येतो ?

अरे वा ... उकडलेल्या बटाट्याचं झाड सापडलं तर! याच वासाविषयी मागे गप्पा झाल्या होत्या आपल्या! पण मला ज्या भागात हा वास आला होता, तिथे कुठलं मोठं झाड बघितलेलं आठवत नाही. आता अश्या पानांचं झाड दिसतंय का ते बघते तिथे.

मधुरा, तू दिलेला फोटो वाळुंज (Salix tetrasperma) चा आहे. याची पानं मागच्या बाजूने थोडी पांढरट किंवा चंदेरी झाक असलेली आणि खूप मुलायम असतील. ह्याचा फुलण्याचा हंगाम याच दिवसांत असतो. आणि याला अजून एक गमतीशीर नाव आहे - 'मजनू' Happy

प्रचलित नाव Indian willow........ म्हणजे थोडक्यात रडवा(का)!! आणि याला जो विशिष्ट वास येतोय तो ह्यातल्या नर फुलांचा येतोय.

दिनेशदा, आपण हा मागच्या वर्षी कर्वेरोडला बघितला होता. तेव्हा हा फुलावर नव्हता. मी आता बघून येईन. कदाचित त्यालाही आत्ता फुलं आली असतील; किंवा येऊ घातली असतील.

गौरी, असा वास अनेक ठिकाणी येतो. आमच्या बागेत बर्‍याचदा कापराचा वास येतो. काही झुडपांमधे असा उकडलेल्या बटाट्याचा वास येतो. बहुधा काही बॅक्टेरियांमुळे येत असावा असा अंदाज आहे.

<<<<<कुत्र्यासारखे भुंकणे शक्यच नसावे, मला लहानपणी कुत्रा चावला होता, मी कुठे भुंकतो ? !!!>>>>:हहगलो:

हो शांकली, पण वरच्या फोटोतली पाने जरा आखुड वाटताहेत.

बाकी आपण बघितलेले झाड जर फुलावर असेल, तर पुणेकरांना वाटेल, खाली बटाटेवड्याची गाडी लागली आहे कि काय !

<<<<बाकी आपण बघितलेले झाड जर फुलावर असेल, तर पुणेकरांना वाटेल, खाली बटाटेवड्याची गाडी लागली आहे कि काय !>>>>आणि जर आजुबाजूला बटाटेवड्याची गाडी नसेल तर भुताटकीच वाटेल !

कुत्र्यासारखे भुंकणे शक्यच नसावे, मला लहानपणी कुत्रा चावला होता, मी कुठे भुंकतो ? !!!>>>> Rofl
काय हे दिनेशदा, कोणि म्हणेल का तुम्ही भुंकता असे? त्यातही जर तुम्ही जी मस्त माहिती सांगतात / लिहितात त्याला भुंकणे म्हणत असले तर माहित नाहि ब्वॉ!!! Wink

रच्याकने, माझ्या साबा सांगतात त्यांच्या कळत्या वयात त्यांच्या बाजुच्या घरातील एका मुलाला कुत्रा चावला होता तर तो तसेच व्हिवळायचा / दारुण भुंकल्यासारखा ओरडायचा. तो मुलगा म्हणे ८-१० दिवसात गेला. Sad

तर मला वाटते वर (बहुदा) शशांक यांनी लिहिलेय तसे मसल्स / नसा सैल पडल्यामुळे व्यक्तीचा आवाज तसा येत असावा.

Pages