आनंदयात्री - नचिकेत जोशी यांचे अभिनंदन...

Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57

मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
परवा म्हणजे १५ जुलै रोजी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे होणार्‍या सोहळ्यात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

मायबोलीकर म्हणुन आपण सर्व आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन करुया...

अवांतर माहिती :

स्पर्धेत प्रथम बक्षिस हे पंकज झारेकर यांच्या ब्लॉगला मिळालेले असुन द्वितिय बक्षिस देवेंद्र चुरी यांच्या दवबिंदु या ब्लॉगला मिळालेले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे आभार दोस्तहो!
असाच लोभ राहूद्यात...

विवेक सर, Lol
पेशल आभार... मालवणीत कसो लिवाचो? Proud

बागेश्री, क्रेडीट गोज टू सह्याद्री, या भटकंतीमधले समस्त भटके दोस्त आणि मी लिहिलेलं आनंदाने वाचणारे तमाम वाचक!! Happy

सेनाजी, तुम्ही पारितोषिकाच्या पार गेला आहात आता! आमच्यासारख्या नवख्यांना तुम्ही मार्गदर्शन करायचे Happy
धाग्याबद्दल विशेष धन्यवाद रे!

आया, बहोत खूब! असेच वेगवेगळे गड सर करीत राहा! Happy

बाकी तुम्ही म्हणता तसं सेनापती स्पर्धाबिर्धा आणि पारितोषिकांच्या पल्याड पोचले आहेत.

आ.न.,
-गा.पै.

अभिनंदन नचिकेत, ३५० गड माहिती आहेत आणि गड सर केलेली मुलगीही माहिती आहे --- तेव्हा लक्ष्य ते ठेव Happy Happy Happy

सेनापती तुम्हाला धन्यवाद हा धागा काढ्ल्याबद्द्ल आणि स्पर्धेत भाग घेऊन नचिकेतला ट्फ फाईट दिल्याबद्द्ल Happy

रच्याकने...
मी पण होतो स्पर्धेत सहभागी. पण मी निघालो अभागी.. मेरेको बक्षिस नही मिल्या. मिळणारही नव्हते हे मला ठावुक होते..
मी खुश तो बहोत.... वगैरे..

सेम हिअर....:)

नचिकेत तुझे हार्दिक अभिनंदन!!

अभिनंदन नचिकेत.

------------------------------------------------------------------
परवा फोनवर याबद्दल का बोलला नाहीस ??? Angry

धन्यवाद लोकहो! Happy

परवा फोनवर याबद्दल का बोलला नाहीस ???
काका, कारण निकाल मला फोनवर कळला (कारण त्यांना ब्लॉगमधला एक लेख प्रसिद्धीसाठी हवा होता) आणि मग अधिकृतरित्या इमेलवर आला.. Happy

Pages