आनंदयात्री - नचिकेत जोशी यांचे अभिनंदन...

Submitted by सेनापती... on 13 July, 2012 - 04:57

मायबोलीवरील प्रसिद्ध भटकेश्वर श्री. आनंदयात्री उर्फ नचिकेत जोशी यांना त्यांच्या आनंदयात्रा या ब्लॉगसाठी गिरिमित्र संमेलनाने आयोजित केलेल्या पहिल्या-वहिल्या ट्रेकर्स ब्लॉग स्पर्धेत तृतिय पारितोषिक मिळाले आहे.

उत्तेजनार्थ पारितोषिक आपले अजुन एक माबोकर 'हेम' याच्या बॉर्न पीएचडी या ब्लॉगला जाहीर झाले आहे..
परवा म्हणजे १५ जुलै रोजी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे होणार्‍या सोहळ्यात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

मायबोलीकर म्हणुन आपण सर्व आनंदयात्री याचे मनःपुर्वक अभिनंदन करुया...

अवांतर माहिती :

स्पर्धेत प्रथम बक्षिस हे पंकज झारेकर यांच्या ब्लॉगला मिळालेले असुन द्वितिय बक्षिस देवेंद्र चुरी यांच्या दवबिंदु या ब्लॉगला मिळालेले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे मन:पूर्वक आभार!

नुकत्याच केलेल्या एक ट्रेकबद्दल लिखाण करतोय. लवकरच पोस्टेन..

Pages