बीन्स-न-राइस (सौथ्वेस्टर्न+जमेकन चवीचे देसी इम्प्रॉव्ह !)

Submitted by नीधप on 9 July, 2012 - 01:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मुठी लाँगग्रेन तांदूळ
अर्धी मूठ राजमा (छोटे किंवा मोठे)
उभे चिरलेले दोन छोटे कांदे, उभी चिरलेली लाल व हिरवी भोपळी मिरची (छोटा आकार प्रत्येकी एक)
ठेचलेल्या ४-५ लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची (३ छोट्या)
एक वाटी नारळाचे दूध
सुक्या लाल मिरच्या (३ मध्यम), जिरे
तेजपत्ता, ड्राय ओरेगानो पाने
ऑलिव्ह ऑइल

क्रमवार पाककृती: 

राजमा रात्रभर किंवा किमान ३-४ तास भिजत घालणे.
३-४ तासांनी तेजपत्ता आणि ओरेगानो घालून राजमा शिजवून घेणे. शिजल्यावर तेजपत्ता काढून टाकणे व राजमा गाळून घेऊन पाणी वेगळे ठेवणे.
तांदूळ व्यवस्थित मोकळा शिजवून घेणे. हे शिजत असताना नारळाचे दूध काढणे, मिरच्यांचा मसाला करणे या गोष्टी करून घेणे.

मिरच्यांचा मसाला -
सौथ्वेस्टर्न बीन्स न राइसच्या सगळ्या रेस्प्यांच्यात चिपोटल/ चिपोट्ले (अश्या उच्चाराचं) सॉस किंवा पावडर अपेक्षित होती. गुगलल्यावर हालापिनोला थोडी धूरी देऊन ती बनवतात असे कळले. हाबनारो मिरच्यांची पेस्ट पण अपेक्षित होती. हाबनारोच्या ऐवजी भूत ढोलकिया चालेल असेही गुगलमहाराजांनी सांगितले. पण ती आणायला आसामात जाणे परवडणेबल नव्हते. मग मी आपल्या पार्ला मार्केटातून आणलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या यांनाच संधी दिली.
छोट्या पॅनमधे १ थेंब ऑऑ घेऊन त्यावर या दोन्ही मिरच्या जळकट भाजल्या. हे करताना एक्झॉस्ट फॅन चालू पाहिजे, खिडक्या सताड उघड्या पाहिजेत. गार झाल्यावर मिक्सरमधून भरड अश्या काढल्या. मि म तयार.

मोठ्या पॅन/ कढईमधे ऑऑवर कांदा आणि भो मि खरपूस परतणे.
खरपूस झाल्यावर मिरच्या मसाला, जिरे आणि लसूण टाकणे आणि व्यवस्थित परतणे.
मग गाळून ठेवलेला राजमा घालणे, परतणे.
नंतर राजम्याचे शिजवलेले पाणी आणि नारळाचे दूध दोन्ही घालणे.
तिखट अजून हवे असल्यास लाल तिखट घालणे याने रंग पण छान येईल. पण झेपतंय तेवढंच तिखट घाला. Happy
मीठ घालणे.
ढवळणे, उकळणे, पाणी अर्ध्यापेक्षा कमी होईतो आटवणे.
मग त्यात शिजलेला भात घालून सारखे करणे.
पॅन झाकून एक वाफ काढणे जेणेकरून भाताच्या प्रत्येक शितापर्यंत सगळा मसाला पोचेल.
परत ढवळणे.
सेमी कोरडा ( Wink ) झाला की गॅस बंद.

खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरवणे.

वाढणी/प्रमाण: 
वरचे प्रमाण हे जेवणात केवळ राइसच असेल तर दोन जणांना पुरू शकतो.
अधिक टिपा: 

सगळी गंमत मिरच्यांच्या मसाल्यात आहे.
नारळाचे दूध हा जमेकन टच आहे. ते नसल्यासही भात चांगला व्हायला हरकत नाही Happy
ही चव अगदी तंतोतंत नाही पण देशात सहजपणे उपलब्ध असलेल्या वस्तू वापरूनही बरीच ऑथेन्टिकच्या जवळ जाणारी चव मिळते.

ड्राय ओरेगानो च्या ऐवजी फ्रेश शूटस मिळाली तर ती वापरा आणि तेजपत्त्याबरोबर काढून टाका.
तसेच सेजची पाने असल्यास ती पण वापरा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट + माझे इंप्रॉव्ह... :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पक्की भाताडी असल्याने हे नक्की करून बघणार.
साखर घातलेला भात सोडून सगळे शाकाहारी भात आवडतात...
धन्यवाद नी. वेगळी रेस्पी. Happy

मस्त वाटतेय रेसिपी. पण भातात करी घालायची असल्याने माझ्या हातून बिघडेल अशी भिती वाटतेय. फोटो बघायला मिळाला तर कल्पना येईल Happy

वॉव ! वाचुन तर अगदी स्पायसी आणि यम्मी वाटतो आहे. एखाद्या कंटाळवाण्या दिवशी करुन बघायला हरकत नाही. रेसिपी अजुन २-३ वेळा वाचायला लागेल. करायला सोपा वाटत नाहीए. कष्ट फार आहेत आणि कष्टाचं फळ चांगलंच टेष्टी असेलसं वाटतं आहे.

यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि सेवितम् । यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ॥ Proud

अगो, भातात कुठे करी घालायचीये? शेवटी शिजवलेला भात त्या कालवणात घालायचाय. पुलावासारखा मोकळा नको आणि वरणभातासारखा मऊ नकोय... Happy

मनिमाऊ, (आणि अगो सुद्धा) मला जमू शकतं तर जगातल्या नवख्यातल्या नवख्या व्यक्तीलाही जमू शकतं Happy

अगो, भातात कुठे करी घालायचीये? शेवटी शिजवलेला भात त्या कालवणात घालायचाय.>>> अगं तेच. ग्रेव्ही घालून करायचे भात बिघडतात माझे. गोळाभात होतो बरेचदा. पण तरी नक्की करुन बघेन. जमला तर एक मस्त रेसिपी होईल वन डिश मील आणि पार्टीसाठीही Happy

तसे होत असेल तर मग करीतच भात शिजव ना.
तांदूळ आधी थोडेसे थेंबभर तुपावर/ तेलावर परतून घे आणि करी आटवू नकोस, नारळाचे दूध थोडे जास्त ठेव.

उसगावातल्यांना खरंतर या रेस्पीचा उपयोग फारसा नाही. कारण चिपोटले/ चिपोटेल सॉस किंवा पावडर तिथे मिळेलच ना आणि हाबनारो प्युरी पण.

नाही नाही पण बीन्स अँड राइसचं भारतीय व्हर्जन सुद्धा आवडेल की .. (मिरच्या भाजून त्याचं काही करणं मात्र समहाउ जमत नाही मला एव्हढंच ..)

अगं काहीच अवघड नाहीये.
वरती दिलेल्या तांदूळ आणि राजम्याच्या प्रमाणाला ३ बारक्या हिरव्या लवंगी मिरच्या आणि ३ लाल सुक्या मिरच्या पुरेश्या आहेत. ५ मिन मधे काम होते.
अ‍ॅलर्जीक असशील तर गोष्ट वेगळी.

केला आणि खाऊन झाला नुक्ताच. मिरच्या कमी पडल्या (असा खाणार्‍याचा प्रतिसाद आहे. मला असाच आवडला.)
एकूण चव भारतीय आणि जमैकनच्या मधली असावी.

तांदूळ एक थेंब तेलावर परतून बीन्सच्या त्या सरसरीत उसळीत घातला. एकदम व्यवस्थित शिजला. (गोळाभात नाही झाला). शेवटी पुलाव/ फ्राइड राइसची कन्सिस्टन्सी आली.
ऑरिगानोची पाने/ कोंब वापरले. बाकी काही फरक केला नाही.

मृदुला, मिरच्यांचा तिखटपणा आणि आपापला तिखटपणाचा झेपणीय बिंदू यावर मिरच्यांची संख्या ठरेल. तसेच मि म बरोबर उसळीत थोडे लाल तिखट पण भुरभुरले तर अजून मजा Happy

क्रमवार फोटु पुढच्या वेळेला करेन तेव्हा.

पुर्वतयारी चालु झाली होती. एक स्टेप म्हणजे होममेडचं नारळाचं दुध (टेट्रा पॅक) आणलं आहे. पण नीची वरची पोस्ट वाचुन ही पाककृती अचानक होल्डवर टाकली आहे.

उसगावातल्यांना खरंतर या रेस्पीचा उपयोग फारसा नाही. कारण चिपोटले/ चिपोटेल सॉस किंवा पावडर तिथे मिळेलच ना आणि हाबनारो प्युरी पण. >>> 'स्वतः' ला येताना दोन्ही आणायला सांगते, म्हणजे अर्धीमुर्धी तयारी झालीच की. Happy

शाळेत असताना वाटायचं कि साबुदाण्याची शेंग अस॑ते, तसेच काही चित्रविचित्र गैरसमज ऑरिगानोच्या पानांबद्दल अजुनही होते. Happy त्याचे कोंब मिळतात हे आताच कळलं. ते टीन्ड मिळत असतील का? नाही तर आपला नेहमीचा वाळका भुगा आहेच.

अगं मी वाळका भुगाच घातला होता. लिहिलंय की वर. त्यानेही चव येते.

कारण चिपोटले/ चिपोटेल सॉस किंवा पावडर तिथे मिळेलच ना आणि हाबनारो प्युरी पण. << हे प्रकरण काय स्वरूपात मिळतं किंवा त्याचं प्रमाण इत्यादी गुगलणे हां. मी वापरलं नाहीये कधी.

आणि एकदा देसी प्रकारे करून बघ Happy

ह्म्म, असं कोणी ढकलायला असेल तरच माझ्याच्याने काही बनवणं होइल. Happy
खरं तर मलाही कॉन्टीनेन्टल डिशेसचं थोडंसं देशी वर्जनच आवडतं. आता नारळाचं दुध आणलं आहे तर या रविवारी करुनच बघते.

Pages