बीन्स-न-राइस (सौथ्वेस्टर्न+जमेकन चवीचे देसी इम्प्रॉव्ह !)

Submitted by नीधप on 9 July, 2012 - 01:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मुठी लाँगग्रेन तांदूळ
अर्धी मूठ राजमा (छोटे किंवा मोठे)
उभे चिरलेले दोन छोटे कांदे, उभी चिरलेली लाल व हिरवी भोपळी मिरची (छोटा आकार प्रत्येकी एक)
ठेचलेल्या ४-५ लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची (३ छोट्या)
एक वाटी नारळाचे दूध
सुक्या लाल मिरच्या (३ मध्यम), जिरे
तेजपत्ता, ड्राय ओरेगानो पाने
ऑलिव्ह ऑइल

क्रमवार पाककृती: 

राजमा रात्रभर किंवा किमान ३-४ तास भिजत घालणे.
३-४ तासांनी तेजपत्ता आणि ओरेगानो घालून राजमा शिजवून घेणे. शिजल्यावर तेजपत्ता काढून टाकणे व राजमा गाळून घेऊन पाणी वेगळे ठेवणे.
तांदूळ व्यवस्थित मोकळा शिजवून घेणे. हे शिजत असताना नारळाचे दूध काढणे, मिरच्यांचा मसाला करणे या गोष्टी करून घेणे.

मिरच्यांचा मसाला -
सौथ्वेस्टर्न बीन्स न राइसच्या सगळ्या रेस्प्यांच्यात चिपोटल/ चिपोट्ले (अश्या उच्चाराचं) सॉस किंवा पावडर अपेक्षित होती. गुगलल्यावर हालापिनोला थोडी धूरी देऊन ती बनवतात असे कळले. हाबनारो मिरच्यांची पेस्ट पण अपेक्षित होती. हाबनारोच्या ऐवजी भूत ढोलकिया चालेल असेही गुगलमहाराजांनी सांगितले. पण ती आणायला आसामात जाणे परवडणेबल नव्हते. मग मी आपल्या पार्ला मार्केटातून आणलेल्या हिरव्या लवंगी मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या यांनाच संधी दिली.
छोट्या पॅनमधे १ थेंब ऑऑ घेऊन त्यावर या दोन्ही मिरच्या जळकट भाजल्या. हे करताना एक्झॉस्ट फॅन चालू पाहिजे, खिडक्या सताड उघड्या पाहिजेत. गार झाल्यावर मिक्सरमधून भरड अश्या काढल्या. मि म तयार.

मोठ्या पॅन/ कढईमधे ऑऑवर कांदा आणि भो मि खरपूस परतणे.
खरपूस झाल्यावर मिरच्या मसाला, जिरे आणि लसूण टाकणे आणि व्यवस्थित परतणे.
मग गाळून ठेवलेला राजमा घालणे, परतणे.
नंतर राजम्याचे शिजवलेले पाणी आणि नारळाचे दूध दोन्ही घालणे.
तिखट अजून हवे असल्यास लाल तिखट घालणे याने रंग पण छान येईल. पण झेपतंय तेवढंच तिखट घाला. Happy
मीठ घालणे.
ढवळणे, उकळणे, पाणी अर्ध्यापेक्षा कमी होईतो आटवणे.
मग त्यात शिजलेला भात घालून सारखे करणे.
पॅन झाकून एक वाफ काढणे जेणेकरून भाताच्या प्रत्येक शितापर्यंत सगळा मसाला पोचेल.
परत ढवळणे.
सेमी कोरडा ( Wink ) झाला की गॅस बंद.

खायला देताना वरून कोथिंबीर भुरभुरवणे.

वाढणी/प्रमाण: 
वरचे प्रमाण हे जेवणात केवळ राइसच असेल तर दोन जणांना पुरू शकतो.
अधिक टिपा: 

सगळी गंमत मिरच्यांच्या मसाल्यात आहे.
नारळाचे दूध हा जमेकन टच आहे. ते नसल्यासही भात चांगला व्हायला हरकत नाही Happy
ही चव अगदी तंतोतंत नाही पण देशात सहजपणे उपलब्ध असलेल्या वस्तू वापरूनही बरीच ऑथेन्टिकच्या जवळ जाणारी चव मिळते.

ड्राय ओरेगानो च्या ऐवजी फ्रेश शूटस मिळाली तर ती वापरा आणि तेजपत्त्याबरोबर काढून टाका.
तसेच सेजची पाने असल्यास ती पण वापरा.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट + माझे इंप्रॉव्ह... :)
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>थोडे लाल तिखट पण भुरभुरले
पुढच्या वेळी.
नारळाचे दूध कॅनमधले वापरले, ते लिहायचे राहिले.

>> ऑरिगानोच्या पानांबद्दल
इथे बागेत ऑरिगानोचे झुडूप आहे. (साधारण पुदिन्यासारखे.) एकदम हार्डी. म्हणजे थंडीत मरत वगैरे नाही. त्यामुळे कोंब मिळणे सोपे होते.

राजमा साठी भाताच्या प्रकारांची रेसिपी शोधत असताना ही पाकृ सापडली. जरा ओरिगानो, हालापिनो, हाबनारो आणि फ्रेश शूटस म्हणजे नक्की काय ते समजावून द्या प्लीज. Uhoh

ओरेगानो - इटालियन हर्ब असते. पानांचा वाळका भुगा स्वरूपात हे हल्ली बहुतेक ठिकाणी मिळते. डोमिनोज पिझ्झाबरोबर येणार्‍या पुड्यांमधे असते. चव एकदम मस्त.
त्या झाडाचे कोवळे कोंब म्हणजे फ्रेश शूटस.. भाषांतर आहे.

हालापिनो चे स्पेलिंग जालापिनो आहे. ती एक तिखटांबट मिरची आहे. पिझ्झावर मस्त लागते.

हाबनारो ही पण अति जहाल तिखट अशी मिरची असते. वरती मी हाबनारो मिरच्या असे म्हणले आहे. त्यावरून स्पष्ट व्हावे Happy

ओके. समजले. बसिल हा प्रकार मला वाळका भुगा स्वरूपात मिळाला आहे. शिवाय अजून एक मिक्स हर्ब्स नावाची पण बाटली आहे ज्यात वाळका भुगा स्वरूपात हर्ब्स आहेत. त्यात ओरीगानो हा प्रकार असेलच अशी अपेक्षा. बाकी ते मिरच्या प्रकरणासाठी तू जो प्रयोग केला आहेस तेच करू शकते.

बर्‍याच वेळा ही पाककृती करूनही इथं कधीच लिहिलं नाही हे आज ध्यानांत आलंय.

माझी अगदी फेवरेट कृती झालिये. राजमाचावलपेक्षा हाच प्रकार घरात फेवरेट आहे. मी केलेल्या चेंजमध्ये भात आधी शिजवून घेण्यापेक्षा राजमा घातल्यावर तांदूळ घालायचे आणि त्यावर राजमा शिजवलेले पाणी घालून त्यात भात शिजवायचा. आज घरात ओरेगॉनो नसल्यानं घातला नाही. सकाळी कशासाठी तरी कांदा-कोथिंबीर-हिरवीमिरची अशी पेस्ट केली होती. त्यातली उरलेली दोन तीन चमचे पेस्ट आज या भातात घातली. नेहमीच्या मिरची मसालापण घातला. आज जरा वेगळीच पण मस्त टेस्ट आली. Happy

Pages