मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@@ मामी
<<<एक मुलगी झाल्यावर आम्ही दुसरी मुलगी दत्तक घेण्याचा विचार करत होतो. नवरा तयार होता, पण मला माझ्या मनाची खात्री नव्हती. मूल झालंच नसतं तर मी सहजपणे दत्तक घेऊ शकले असते. पण एक मुलगी स्वत:ची असताना, दत्तक घेतलेल्या बाळाला वाढवताना जर चुकुनही माझ्या मनात कधी "ही माझी नाही म्हणून ...." असा विचार आला असता तर मी स्वतःला माफ करू शकले नसते.>>>
सध्या आम्हा दोघांची हीच अवस्था आहे. आम्हाला एक मुलगी आहे 2.5 वर्षाची आणि एक मुलगीच दत्तक घ्यायचा विचार चालूये.

दुसरं मूल असावं की नसावं,, यावर काही धागा आहे का माबोवर?
कारण खूप आधीपासून एकच मूल असावं आणि तेही दत्तक , असं माझं मत होतं. पण लग्नानंतर, सर्वांच्या मताने निर्णय घ्यावे लागतात याची जाणीव झाली.
माझी मुलगी ३ वर्षाची आहे आता. दुसरं अपत्य नकोच, असा आमचा दोघांचाही ठाम निर्णय आहे. तरीही नातेवाईक बोलायला लागले की मनात विचारप्रक्रिया सुरु होतेच.
त्यामुळे माझे ठाम विचार डळमळीत होतात, कधीतरी.

पण दुसरं मूल दत्तक घेणं हा विचार कोणालाही पटणार नाही असंच वाटतंय. नवऱ्याला तर दुसरं मूल नको, असंच वाटतंय.
हा धागा वाचून मी उगाचच अस्वस्थ झालेय.

Pages