मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूल साधारणत# १ वर्षात मिळते. माझ्या मित्राने घेतले आहे.
औरंगाबाद येथुन. पहील्यादा २ ते ३ महिने आपल्याला दिल्यानंतर परत ते पाहतात कि तुम्ही त्या मुलाला खरच आई-वडिलांचे प्रेम देता की नाही. मग एकदा २ वर्षाचा झाला कि मग त्यावर पुर्ण हक्क आपला असतो

http://www.maayboli.com/node/27696?page=1

हे पण वाचा

टेल मी अगेन अबाउट द नाइट आय वॉज बॉर्न हे छोट्या मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक पण फार भारी आहे.

मैना, रैना, तुमचं अभिनंदन. खूप छान पोस्ट्स आहेत तुमच्या.
बेफिकीर, तुमच्या दोन्हीही पोस्ट्स दुसरी बाजू खूप व्यवस्थित समजावून सांगतात.
साती, तुझीही पोस्ट मस्त!
मेधा, वरच्या लिंक बद्दल धन्यवाद. शिल्पा आणि श्रीपादची मुलाखत दत्तक घेण्यासाठी उत्सूक असलेल्या सगळ्याच जोडप्यांसाठी खूप उपयोगी आहे. मनीमाऊने चांगले प्रश्न विचारले आहेत.

वत्सला +१. साती उत्तम पोस्ट.
You saved my breath. Adoption FAQ's मधल्या प्रमुख प्रश्नांची उत्तरे आहेत ती. बरे झाले लिहीलेस.
वाटणारी भीती भावनिक असते, तिला शास्त्रीय आधार फारसा नाही. तरीही ती वाटते काहींना. त्यांनी काय करावे? सोपे असे उत्तर देणे शक्य नाही, पण प्रामाणिक रहावे असे म्हणेन. Your fears are real for you.

बेफिकीर, फारसे पटले नाही. भूमिका समजली. मूल असणे हे काही अनिवार्य नाही हेही आयुष्यात समजायला वेळ लागतो हे पटले.

बाळाचं हे अमकं तुझ्यावर/ तुझ्या नवर्‍यावर / सासरच्यांवर माहेरच्यांवर गेलंय अश्या छान छान काँप्लिमेंट्स ज्यांनाहे मूल दत्तक आहे हे माहिती नाही त्यांच्याकडून मिळाल्या असतील. >>
खरं आहे. पुन्हा तू म्हणतेस तसे शब्दात सांगता येत नाही.

लोकहो प्लीज लाजवू नका. Sad

मैना, रैना अतिशय उत्तम, सहज पोस्ट्स ! तुम्ही स्वतः ह्या मार्गावरुन गेल्या असल्यामुळे त्यातील प्रामाणिकता जाणवते. अभिनंदन !!!
रैना पुढील पोस्टच्या प्रतिक्षेत... !

छान चर्चा.
बेफ़िकीर कंप्लिट वेगळा पर्स्पेच्टीव. म्हणजे मुल का असावस वाटन्यामागे काय काय कारण असु शकतात. एकदम भारी वाटलं वाचुन.
पण ते पाहिजे त्यावेळी ते नसतात ... ही कारणं काही पटली नाहेत. (वै. मत). म्हणजे ती अपेक्षा ठेवुन मुलं जन्माला घालणं, त्यांना मोठी करणं असे होत नाही... नसावे असे मला तरी वाटते. आपण ज्यांची मुलं आहोत त्यांना तसे वाटलेय का ? विचार करुन बघा. पण तुमच्या पहिल्या पोष्ट आवडल्या.

कौतुक केलेल्या सर्वांचे आभार.
सख्या, आपण सध्या पुण्यात आहात व मनात अनेक प्रश्न आहेत हे समजले. आपल्या सगळ्याच प्रशांची उत्तरे मिळत नाहीत. जास्तीत जास्त आणि योग्य शंका समाधान संस्थेचे कार्यकर्ते करतात. तरीही ज्या शंका राहतील त्या आपण मूल वाढवता वाढवता निरसन होतात. आपल्या पत्नीचे आरोग्य जास्तीत जास्त चांगले राहील याचीही दक्षता घेणे भाग आहे. आम्ही बाळाच्या सगळ्या तपासण्या आधी करून घेतल्या होत्या तरी काही कारणाने बाळास दम्याचा विकार सुरु झाला. याचा दोष मी कोणालाही देणार नाही. सतत सात वर्षे औषधोपचार, जागरणे व पथ्याचे खाणेपिणे करावे लागले, माझे करीयर सोडून द्यावे लागले. आता मुलगा टीनेजर असण्याच्याच्या जवळ आलाय. मागचे कष्ट नेहमीच विसरायला जमत नाही पण तसे सर्वच मातापित्यांच्या बाबतीत असते. आपल्या मुलासाठी भरपूर आणि भरपूर कष्ट, त्याग याला पर्याय नाही. आपल्या हातात बाळ येते तेंव्हा बरेचदा जाहिरातीतल्यासारखे गोड वगैरे नसते. आमचे नव्हते. आजारातून कसेबसे सावरलेले होते. त्याची गाडी रुळावर आणण्यासाठी राबावे लागतेच पण मानसिक तयारी महत्वाची. माझ्या सासूबाई आणि नणदेनी अतिशय योग्य मार्गदर्शन केले. त्याचवेळी नणदेचे दुसरे बाळंतपण होते. दोन्ही गोरीपान, गुटगुटीत मुले आणि आपले काळे सावळे, खुरटलेले मूल बाजूला बघताना मनाची झालेली तडफड, यातना सोसल्या. मला घरात मात्र असे बोलून कोणीही दाखवले नाही. भेटायला येणारे मात्र बोलून जात. यातूनच आपल्या मुलाला वाढवण्याची जिद्द निर्माण झाली ती झालीच. मोठा फायदाच म्हणायचा. Happy

>>>>ग लहानपणापासून आपण आपल्यासोबत प्रेमाने आणि विचारपूर्वक(हे खास कारण बायॉलॉजिकल मूल आपण विचारपूर्वक, काही एक भूमिका ठेवून वाढवूच असं नाही,पण दत्तक मूल नक्कीच) वाढवलेले मूल नक्कीच आपले ट्रेटस्,सवयी काही प्रमाणात घ>>>><<

+१०००

ह्या विषयीचा मजहा अनुभव नंतर लिहिते. पण मूल जसे वाढते त्याचा परीणाम ज्यास्त असतो ह्याला दुमत. जेनेटीक दृष्ट्या काही गुणधर्म येतात खरे असले तरी सभोवलताचे वातावरण हे मुलांवर परीणाम असतो.

वरील विषयावर एक अनुभव नक्कीच आहे, सवडीने लिहिते.

मैना,रैना दोघींचेही खूप कौतुक...
दोघिंनाही यावर पुर्ण माहीती देणारा (दत्तक घेण्याच्या विचारा पासून ते दत्तक घेतल्या नंतरचे काही अनुभव) लेख लिहावात हि विनंती.
मलाही एक मुल दत्तक घेण्याची इच्छा आहे. पण अजुन नवरा तितकासा तयार होत नाहीये. तुमचे सगळे अनुभव वाचता आले तर कदाचित आम्हाला चर्चा करुन निर्णय घ्यायला मदत होईल.

प्लीज लोक्स लिहा ह्यावर. ट्वीन प्रेग्नंसी राहून बायकोची प्रिमॅच्युअर डीलीवरी झाली, त्यातून बायको सही सलामत बाहेर आली हेच उपकार म्हणावे. प्रेग्नंसीच्या काळातलं दोघांना मिळालेलं सुख अवर्णनीय होतं. आता आपण आई बाबा होणार ह्या कल्पनेनंच खूप छान वाटत होतं पण ते पुर्णत्वास गेलं नाही. असो.

अनुभवी लोकांच्या लिखाणाच्या प्रतिक्षेत आहे.

मानसिक तयारी काहीशी जरी झाल्यासारखी वाटली की कायदेशीर दत्तक पालकत्वासाठी पहिली पायरी संस्था शोधणे.
सुयोग्य वर शोधण्याइतकेच सोपे/अवघड आहे हे, पण CARA चे पान यासाठी फॉलो करा. निदान संस्था अधिकृत आहे की नाही ते तरी समजते.
http://www.adoptionindia.nic.in/agencies/roles.html
हे पान पूर्ण वाचा कृपया.

१) कितीही नामांकित संस्था असली तरी चौकशीला पर्याय नाही
प्रत्येक (चांगल्या) संस्थेसाठी एक सोशलवर्कर/काऊंसेलर असायला हवा. काही संस्थांमध्ये नसतो, किंवा कामचलाऊ असतो. (नियम आणि वस्तुस्थिती यातील अपवाद. नेहमीचेच)

संस्थांचे अनुभव खाडकन डोळे उघडवणारे, डोकं फिरवणारे, किंवा खूप चांगले.. कसेही असु शकतात.
आम्हाला 'सुयोग्य' अशी संस्था मिळायला साडेतीन वर्षे लागली. त्याचे एक कारण आम्ही काहीकाळ परदेशात रहात होतो हेही आहे. काही जणांना अगदी लवकरही योग्य संस्था मिळु शकते.
पुण्यामुंबईतल्या मोठ्या संस्थांमध्ये प्रतीक्षा यादि मोठी असु शकते. कधीकधी २-३ वर्षे एवढीही.
आंतरराष्ट्रीय पालकांना अजून जास्त वेळ लागू शकतो.

२) अर्थकारण
वर काही नावे लिहीली गेली आहेत. त्यापैकी पुण्यातील एका मोठ्या नामांकित संस्थेत आम्हाला मुल घेतल्यावर दोघं नोकरीत असाल तर दोघांचा एकेक महिन्याचा पगार संस्थेला द्यावा लागेल असे पहिल्याप्रथम सांगीतले. त्यांची एकंदरितच पद्धत आम्हाला आवडली नाही.
तसेच मुंबईतील एक नामांकित संस्थेने फोनवर पगार विचारुन आम्ही त्यांच्या इन्कम ब्रॅकेटमध्ये बसत नसल्याचे सांगीतले.
मुंबईत सेंट्रल/ वेस्टर्न असे करत एका संस्थेने खोखो खेळवला. वगैरे.
साधारणपणे महिन्याचा पगार (एकाचा तरी) मागणे हे दिसून आले.

असे मागणे योग्य आहे का, मूल येणार आहे ना घरी मग पैसे दिले तर काय होते, अनुदान, वाढती महागाई, औषधोपचाराचा खर्च, ऑडिटेड अकाउंटस, ट्रस्टीजचे रेप्युटेशन, मुलांना ज्या प्रकारे सांभाळतात ती वृत्ती, ही अधिकृत 'मागणी', मग याच्या काही पट देणार्‍या लोकांना प्रतीक्षायादित पुढे सरकता येते का इ.इ.इ
आपली उत्तरे आपण शोधा. बहुत काय सांगावे?

अनेक टक्के टोणपे खात आम्ही 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' कडे पोचलो. अक्षरश: प्रोसेसिंग फीज व्यतिरिक्त त्यांनी काहीही मागीतले नाही. आपल्या इच्छेने आपण जे द्याल ते. आजतागायत आमच्या घरगुती अर्थसंकल्पात (आणि आमच्या मनात) त्यांचा वाटा ठेवला आहे.

३) प्रतीक्षायादी
परदेशात स्थायिक असलेल्यांनी कृपया हे लक्षात घ्या की संस्थांना निवासी भारतीय पालकांना प्रायॉरिटी देणे अनिवार्य असते. हा बदल गेल्या दशकातला आहे. (त्या आधीची उदाहरणे इथे गैरलागू आहेत).
ट्रॅफिकिंगने उग्र रुप धारण केल्यापासून कायदे बदलले.
भारतातील Domicile prove करायला सगळे documentation लागते. परदेशात राहणारी भारतीय बाई येते, काही महिने भारतात राहते, नवरा परदेशात, बर्‍याच संस्था पालथ्या घालून 'योग्य' ती संस्था निवडते, बाळ मिळाल्यावर, कागदपत्र झाल्यावर काही महिन्यातच निघुन जाते- हे असे होते, नाही असे नाही, पण हे कायदेशीर नाही.

वर दिलेल्या मुलाखतीत आणि CARA च्या पानावर परदेशात स्थायिक भारतीय नागरिकांसाठीचे नियम, अटी आणि प्रक्रिया नीट लिहीलेली आहे. ती कृपया लक्षात घेणे.

अनुभव:
२००४ मध्ये आम्ही सुदुरपूर्वेच्या एका देशात रहात होतो. तिथे प्राथमिक चौकशी करायला घेतली तेव्हा भारतातील संस्थांशी संलग्न अशी home study etc करणारी intermediary संस्था मिळाली नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की सगळीकडेच intermediary संस्था सहज मिळेलच असे नाही.

(अवांतर: अँजेलिनाताईंना एवढी देशोदेशीची मुलं, एवढ्या कमी कालावधीत कशी मिळाली हा प्रश्न मला नेहमी पडतो. असोच.)

आमच्या परिचयाच्या एका ५००+ मुलांच्या दत्तक जाण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या समुपदेशकांचे म्हणणे असे आहे की खरं म्हणजे भारतात निवास करणार्‍याच पालकांना अग्रक्रम द्यायला हवा आणि त्यांनी जर नकार दिला आणि काही कारणाने ते मूल दत्तक जात नसेल तर ते अनिवासी भारतीय किंवा परदेशी नागरिक यांना दिले जाते असे आताशा नियम आहेत. काही संस्था पाळतात, काही पाळल्याचे दाखवतात, काही नाही.

४) संस्थेच्या बाबतीत 'ओळख' असणे हा चमत्कार ठरतो काहीजणांसाठी. प्रतीक्षायादी छोटी होते. कायदेशीर प्रक्रिया अग्रक्रमाने पूर्ण होते. वगैरे. एका सहकार्‍याच्या बाबतीत असे झाले.
हे खूप बेसिक आहे, पण संस्थेच्या रेप्युटेशनबाबत डोळस रहावे. पुण्यातील 'प्रीतमंदिर' च्या बाबतीत जे झाले वगैरे..
http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-05-18/pune/28313442_1_p...

काही संस्थांमध्ये मुलांची खूप काळजी घेतली जाते. काही संस्थामध्ये मुलं थोडी आजारी असणे/ malnutrition/ sedatives दिले जाणे/ lung वर निमोनियाचा हलकासा पॅच असणे/ anemic असणे इतर गोष्टी... हे संभाव्य धोके असतात. आता यातल्या सगळ्याच गोष्टींना वैद्यकीय उपचार आहेत, आपण ते करुच, पण deprivation चे काय?
बरं ते जाऊ दे, बायोलॉजिकल बाळांनाही हे सगळे नेहमीचे आजार असु शकतातच की. त्यामुळे प्रत्येक वेळेस संस्थेच्या हलगर्जीपणामुळेच असे झाले असावे हे जसे खरे नाही, तसेच हलगर्जीपणा होतच नसावा असेही खरे नाहीच.

बाळाच्या लसीकरणारचे रिपोर्ट आहेत की नाही ते नीट पहावे. HIV + टेस्ट झाली नसली तर करुन घ्यावी हवी असल्यास. बाकी सातीने लिहीले आहेच.
शक्य असेल तर निदान २-३ दा आधी संस्थेत जाउन यावे. मुलांशी खेळावे. एकंदरित तिथली परिस्थिती लक्षात येते.

मला कोणीतरी विचारले, नाहीतरी abandon केलेली मुलं असतात, मग थोड्याश्या सिडेटीव्हने काय बिघडले एवढे? निदान अ‍ॅब्युज पेक्षा बरे. Sad

(माझ्या पहिल्या पोस्टीतील तळटीप कंटिन्युड.)

दीप्स, अनु,
काही प्रश्न असतील तर विचारा. यथाशक्ती उत्तर द्यायचा प्रयत्न करेन.
Convince वगैरे नाही करणार.

बरं वरती हे लिहायचं राहिलं पण बरंच झालं.
त्या काळात नवीन संस्थेशी बोलायचे म्हणले की रडायलाच यायचे. नवरा आणि मी जे काय शहाणपण शिकलोय. मोठी नणंद आम्हाला म्हणाली 'तुम्ही काय सिस्टीम बदलायला निघाला आहात का?' 'तुम्हाला काय करायचेय त्यांच्या पद्धतीशी'. त्यांचेही म्हणणे चूक नव्हतेच.

एकेकदा असे वाटे की 'मरु दे ना. आपण सगळे चांगलेच करणार आहोत. बाळ मिळाल्याशी कारण. संस्था कशी का असेना', पण टिकला मनोनिग्रह.
तो न टिकलेले लोकं मला माहित आहेत. त्याबद्दल नंतर लिहीन वाटले तर. आज ते आणि त्यांची मुलेही आनंदातच आहेत.
आपण जरी काही गोष्टी करुच शकत नसलो तरी माणसांवर सरसकट फुल्या मारु शकत नाही आपण हे उमगले ते तेव्हा.

छान धागा. वाचते आहे.
मैना , मस्त पोस्ट.
<< दोन्ही गोरीपान, गुटगुटीत मुले आणि आपले काळे सावळे, खुरटलेले मूल बाजूला बघताना मनाची झालेली तडफड, यातना सोसल्या. >>
हे आवडले.
रैना , उत्तम पोस्ट

दत्तक या विषयाबद्दल मी काहीच लिहू शकत नाही पण मूलाबद्दल मात्र लिहू शकते Happy
<<
मुलांचे सर्व काही केल्यानंतर ती लांब निघून जाऊ शकतात. वेळेला उपलब्ध नाहीत असेही होऊ शकते. आणि त्यांच्या सर्व जडणघडणीच्यावेळी आपण मात्र स्वतःचा ऐन उमेदीचा काळ घालवतो. >>

मूल अजीबात नसणे आणि मूल फिजीकली जवळ नसणे यात जमिन अस्मानाचा फरक आहे.
मुलांच्या जडण घडणीत आपला जो वेळ जातो तो 'वाया' जातो का आपल्या आयुष्यातला सुन्दर आठवणींचा , अनुभवांचा ठेवा देऊन जातो याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे.

बाकी अत्तच्या पीढीत मूल स्वतःचे असो वा दत्तक , मुलगा असो वा मुलगी , फिजीकली ते आपल्या जवळ राहू शकणारच नाहीत अशी खात्री पालकांनी स्वतःच बाळगावी. माझी मुलगी मोठेपणी माझ्याजवळ रहाणारच नाही बहुतकरून ती परदेशीच असेल , याची मला पूर्ण खात्री आहे. पण म्हणुन तिच्या असण्याने मला मिळणारा आनंद कुठेही कमी होत नाही.

दत्तक मूल काय किन्वा स्वतःचे मूल काय . पालक होताना पालकांनी हे लक्षात घेतलेच पाहिजे की -
मुले म्हणजे भविष्यासाठी केलेली investment नव्हे. उद्या ती अपल्याजवळ असतील , नसतील. कदाचित आपले आणि त्यांचे पटणारही नाही. अगदी हेही शक्य आहे की मुलांचे आणि पालकांचे संबंधही तुटतील. मुले चांगली निघतील किन्वा अगदी वायाही जाऊ शकतील. अगदी दुर्दैवी म्हण्जे मुलांनी आपला आधार बनण्याएवेजी मुलांच्या बाबतीत काही अघटीत ( अपघात , आजार ई) घडले तर आपल्यालाच त्यांचा आधार बनून रहावे लागेल.

भविष्यात चांगले घडेल की वाईट यापेक्षा मला मूल हवे आहे आणि त्याच्यासाठी बर्‍या वाईट भविष्याला तोंड द्यायची तयारी आहे असे वाटत असेल तर उत्तम.

बाकी अत्तच्या पीढीत मूल स्वतःचे असो वा दत्तक , मुलगा असो वा मुलगी , फिजीकली ते आपल्या जवळ राहू शकणारच नाहीत अशी खात्री पालकांनी स्वतःच बाळगावी >>

मुले म्हणजे भविष्यासाठी केलेली investment नव्हे. >>

छान पोस्ट डेलिया. वरील दोन वाक्ये विशेष आवडली. Happy

नात्यांमध्ये येणार्‍या विसंवादाच्या मुळाशी बर्‍याचदा पालकांच्या मुलांकडून 'आम्ही तुमच्यासाठी केलं, आता तुम्ही करायला हवं ' अशा अपेक्षा हे कारण असू शकते. (स्वतःच्या आणि दत्तक अशा दोन्ही मुलांबाबत हे लागू होत असावं.)

मी माझी मुलगी ३ महिन्यांची असताना दत्तक घेतली, आता ती ६ व. आहे. ती घरी आल्यानंतर २ ब नंतर मला बाय. मुलगी झाली. आता दोघिही छान खेळतात, भाडतात, शाळेत जातात . सगळं अगदि सख्या बहिंणींप्रमाणेच करतात. आमच्या मनातही कधि येत नाही. काही माहिती लागल्यास जरुर सांगा.

५० वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या काकांनी बाळ दत्तक घेतले अन सगळ्या नातेवाईकांना त्याला आपले म्हणणार असाल तर संबंध ठेवा असे सांगितले. सग्ळ्यांनी ठेवलेच. माझ्या दुस-या १ नातेवाईकांनी आपल्याच कुटुंबातली मुले दत्तक घेण्याचा असफल प्रयत्न केला,

सगळ्यांच्या पोस्टी विचार प्रवर्तक आहेत. माहिती वर्धक आहेत. वाचतीये.

माझ्या बहिणीने तीन वर्षांपूर्वी एक मुलगी दत्तक घेतली. ती घरी आल्यावर घरातले वातावरण एकदम बदलून गेले. मस्त धमाल सुरु झाली.

अगो +१. उत्तम मार्गदर्शक माहिती रैना, मैना.

>>मुले म्हणजे भविष्यासाठी केलेली investment नव्हे.
एकदम सहमत.

खुप छान आहे ही चर्चा.
मला असे वाटतय तुम्ही सगळेजण बेफिकिर यांची एक/दोनच वाक्य out of context काढुन वाचताय .त्यांच्या दोन्ही पोष्ट सलग वाचल्या तर मुल नसणे हा अनुभवही वर्थ आहे ह्या स्थितीपर्यंत ते कसे गेले हे व्यवस्थित मांडलय्.आणि ही दुसरी बाजु पण पुढे येतीये हे पण छान नाही का? कारण बर्‍याच जोडप्यांना आजकाल मी बघते inefertility treatment घेउन कंटाळलेले असतात्,मुल दत्तक नको असते, पण मुल नसणे म्हणजे काहीतरी भयंकर हे conditioning इतके पक्के असते की वेळ पैसा उपचारांवर खर्च करत राहतात. ह्यात बायकांचे तर फार हाल होतात. कारण जी औषधे पोटात जात असतात त्यांचे दुष्परीणाम दुरगामी असतात्.बाकी उपास-तापासांमुले होणारे हाल वेगळेच.
बाकी कुणी infertilty treatment घेत असेल तर एक सल्ला. dcotor treatmentचा success rate सांगतात पण उपचार थांबवा असे फार क्वचितच म्हणतात.अशा वेळेस आपणच आपल्याला deadline द्यावीं.
नाहीतरी होते असे की उपचार थांबवुन दत्तक घ्यायच्या निर्णयापर्यंत येइपर्यंत वय खुप वाढलेले असते,मग अरे उगीचच वेळ वाया घालवला असे वाटु शकते.
माझ्या जुन्या नोकरीच्या ठिकाणी एकजण होत्या, त्यांच्या कुटुंबात बर्‍याचजणांनी ठरवुन पहिला biological मुलगा/मुलगी असेल तर दुसरी मुलगी/मुलगा दत्तक घेतले होते.त्यांना कुणालाच काही त्रास झाला नव्हता.अर्थात ते कुटुंब फारच पुरोगामी होते त्यामुळे खुप सोपे गेले असणार सगळे.

Pages