मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे खर तर ईथे उत्तम पोष्टीच पडत आहेत.
लेखीका याबर ब्र काढत नाही आहे.
लेखीकेला खरच घ्यायचे की निव्वळ टाईमपास
कॄ.गै स. नसावा

छान पोस्ट arc.

<< बाकी कुणी infertilty treatment घेत असेल तर एक सल्ला. dcotor treatmentचा success rate सांगतात पण उपचार थांबवा असे फार क्वचितच म्हणतात.>> +१ Happy

करिअर करताना मूल उशिरा होऊ देण्याचा निर्णय वैयक्तिक आहे यात शंकाच नाही.
कुठल्याही वयात असिस्टेड रिप्रोडक्शनने (ART) आरामात मूल होऊ शकतं, अशी एक चुकीची समजूत ह्या निर्णयाचा आधार बर्‍याचदा असू शकतो.
(ही चुकीची समजूत करून देण्यात वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग आहे. पण तो विषय इथे नको.)

पण वय वाढलेल्या जोडप्यांमध्ये ART चा सक्सेस रेट योग्य वयातील जोडप्यांपेक्षा कमी असतो.
शिवाय सगळ्या उपचारांचे, गर्भावस्थेचे धोकेही तुलनेने जास्त असतात.

ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही लिहिलेलं वाक्य अगदी योग्य Happy

धाग्यावरची पूर्ण चर्चा वाचलेली नाहीये अजुन.. पाने डाऊनलोड केली आहेत. माझ्या प्रश्णांना कोणी उत्तर दिली असल्यास आधीच धन्स.. मग येऊन हा प्रतिसाद उडवेन.

माझे दोन प्रश्ण -
१. मला ऑलरेडी १ मुलगी आहे. तिला सोबतीची/साथीची/भावंडांची ओढ आहे. त्यामुळे दुसरे अपत्य हवे आहे. आता पुन्हा स्वतः ह्या प्रोसेसमधून जाण्यास उमेद नाही. त्यामुळे मूल दत्तक घ्यावे नि आपल्या कुटुंबात भर घालावी असा विचार आहे. आम्हाला आणि लेकीला "बहीण" बाळ हवे आहे :). मी ह्याबद्दल माहिती काढताना मला कळले की कुठच्यातरी नियमानुसार तुम्हाला मुलगी असेल तर दत्तक बाळ मुलगी घेता येणार नाही. (:अओ: सुशला का आहेत मग २ मुली?) असे खरेच आहे का? ही माहिती चूकीची असल्यास आनंद होईल. आम्हाला शक्यतोवर मुलगा नको आहे.

२. आजी आजोबांपैकी एका सेटला कदाचित ही कल्पना मान्य होणार नाही. (त्याने आम्हाला फरक पडणार नाही, पण कार्यप्रसंगी बाळीवर अन्याय होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊ). सामाजिक संस्थेला ह्याने फरक पडेल काय? मी उद्या नोकरी सोडणार असेन (पण त्याने आर्थिक स्थिती मोडून जाणर नसेल) तर त्याने फरक पडेल काय?

सुंदर चर्चा. खूप उपयोगी पडेल नक्की !
माझ्या मनातली कन्फ्युजनं - म्हणजे माझी मुलगी आज असती तर कदाचित मी असा विचार केला नसता, पण बेफीकीर यांच्या पोस्टस, एआरसी यांची पोस्ट विचार करायला लावण्यासारखी आहेत.
खालच्या विचारांत मिसेसची मतं घेतलेली नाहीत. तिच्याशी सविस्तर चर्चा झालीये पण बहुतेक ती पण गोंधळलेली असावी म्हणून स्पष्ट मत अजून तरी देउ शकली नाही. बघु!! थिंकिंग प्रोसेस तरी सुरु झाली.
तर - मला मुल का पाहीजे ?
- समाजात मला पुरुष म्हणून मान्यता मिळेल म्हणून्?का?
- मिसेसला वाटते म्हणून??
- की अजून सर्वांना होतात न आपल्यालाच नाही ह्या फिलींगमधून?
- वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे- फ्युचर आधार-इनवेस्टमेंट म्हणून?
- वंश (!) वाढावा म्हणून? मुलगी, मुलगा काही फरक पडत नाही. पण जे काही हवं ते माझं- माझ्यातुन आलेलं !!
- मला मुलाला (कुठल्याही,कोणाच्याही) जवळ घेतले, त्याच्याशी खेळले की खुप स्ट्रेस्डफ्री वाटते. ते समाधान शब्दात सांगता येणार नाही. जर दुसर्‍या कुणाच्या मुलांबद्दल ही फिलींग असेल तर स्वतःच्या मुलाबद्दल मला नेमके काय वाटेल? ते अनुभवायच आहे. माझी मुलगी झाली तशी आजारीच होती कदाचित त्यामुळे!!!

हे सर्व विचार डोक्यात आहेत. मुल तर पाहीजेच पण का? ह्याचे उत्तर स्वतःशी कन्फर्म करु शकत नाहीये गेले दोन तीन दिवस विचार करुनही. अशातुनच काही तरी मार्ग निघेल अशी आशा करतो.
मिसेस सध्या फीट आहे. पण तरी चान्स घेणार नाही. माझा जेनेटीक्,जीन्स अस्ल्या गोष्टींवर विश्वास नाही. त्यामुळे कदाचित सोपे जाईल अजून्च. होप लवकर मार्ग मिळो.

मुक्तेश्वर, माझा प्रोफाएल पहा.

मुल तर पाहीजेच पण का? ह्याचे उत्तर स्वतःशी कन्फर्म करु शकत नाहीये गेले दोन तीन दिवस विचार करुनही. अशातुनच काही तरी मार्ग निघेल अशी आशा करतो.>>>

हा अतिशय प्रामाणिक विचार आहे आणि समहाऊ मला येथपर्यंत यायची इच्छा होती. पण आपण तो स्वतःच मांडलात म्हणून नव्याने धाडस करतो.

बरेचदा (बर्‍याच अंशी) मूल हे पालकांना खालील कारणासाठी हवे असते असे 'मला वाटते'.

१. आपल्याला मूल असायला हवे, एक समज, एक समाजाची, नातेवाईकांची अपेक्षा आणि एक पूर्णत्वाचा स्वयंघोषित, समाजघोषित निकष

२. आपल्याकडे पाहायला कोणीतरी हक्काचे असायला हवे

३. स्त्रीच्या बाबतीत - पुन्हा पूर्णत्वाचा निकष आणि एक नैसर्गीक वात्सल्य जे व्यक्त करायला एक हक्काचे अस्तित्व असणे आवश्यक वाटू शकते

येथपर्यंत पटत असल्यास हे मत मांडत आहे:

स्त्रीला 'वात्सल्यभावना संप्रेषित करण्यासाठी' स्वतःच्या अपत्याची एक नैसर्गीक जरूर भासणे हा एक घटक सोडला तर बाकीची कारणे ही समाजनिर्मीती, संस्कृतीनिर्मीत आहेत (असे माझे मत आहे). (म्हणजे वरील मुद्यांपैकी मुद्दा क्रमांक तीन सोडला तर बाकीची कारणे ही 'कारणे भासतात', कारणे असतातच असे म्हणता येणार नाही.)

(पुन्हा) येथपर्यंत पटले असले तर मुद्दा क्रमांक तीनमधील वात्सल्यभावना ही स्वतःच्या अपत्यावर आणि दत्तक अपत्त्यावर तितक्याच प्रभावीपणे यक्त करता येणे स्त्रीस शक्य होईलच. त्यामुळे दत्तक घेणे हे जर दोघांनाही मान्य असले तर उत्तम पर्याय म्हणजे ती कल्पना प्रत्यक्षात आणणे.

मात्र यात एक अगदी नक्की (ज्यात बहुधा व पुन्हा माझ्यामते ) की वैद्यकीय कारणांपलीकडेही एक काँपोनन्ट असतो ज्याला 'मनाच्या खालील थरावरची जाणीव' असे सध्या म्हणता येईल जो हे सांगत राहतो की ही वात्सल्यभावना तुझ्या स्वतळ्च्या निर्मीतीवर तू व्यक्त करत नाही आहेस. हा घटक कालांतराने बोथट होत असला तरी पालकांपुरता अस्तित्वात राहात असेल असे मला तरी वाटते. त्याने 'किंचितही फरक' पडणार नाही हे खरे असले तरी जन्म काढून झाल्यानंतरही मनात ही जाणीव तशीच राहील की 'माझे स्वतःचे मूल गेले, त्यामुळे मी हे काहीसे कृत्रिम (कृपया कृत्रिम या शब्दावर वाद होऊ नयेत, त्यापेक्षा अधिक सुयोग्य शब्द सापडला नाही इतकेच) प्रेम करत आले / आलो.

================================

सख्या, आपण मी व्यक्त केलेल्या विचारांनाही काही महत्व आहे असे म्हणालात त्याबद्दल आभार

================================

ए आर सी - आपले विशेष आभार

================================

माझ्यामते 'मूल ही इन्व्हेस्टमेन्टच' आहे. (फक्त स्वत:च्या भविष्यासाठीच असे नाही, तरे स्वतःच्या नावलौकीकासाठी, स्वतःच्या 'पालकत्वाच्या क्षमतेसाठी' इत्यादी)

हे कारण नसले तर मूल (हेतूपुरस्परपणे) जन्माला घालण्याचे कोणतेच कारण नसते असे मला वाटते.

मुलासाठी कोणी मूल जन्माला घालत नाही. (म्हणजे मुलाला हवे असते म्हणून).

मूल पालकांनाच हवे असते आणि ते हवे असण्याची इतर कारणे कोणती त्यावर (येथे अस्थानी वाटत असल्यास) कोठेतरी अवश्य चर्चा व्हावी

-'बेफिकीर'!

भूषण, उत्तम विचार.

मला असं वाटतं की मूल झाल्याशिवाय माणसाची 'वाढ' पूर्ण होतं नाही. Happy

बाप / आई बनल्याखेरीज ती समज येणं खूप कठीण आहे असं माझं मत आहे. (मान्य आहे की हे अत्यंत स्फोटक विधान आहे).

शिवाय कोणत्याही प्राण्याचा पृथ्वीवरची सर्व धडपड ही आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हीच असते. मग त्यात वंशरुपाने टिकणंही आलच. हीच आदिम प्रेरणा आपल्याला मूल व्हावसं वाटण्यामागे आहे.

मग त्यात वंशरुपाने टिकणंही आलच. हीच आदिम प्रेरणा आपल्याला मूल व्हावसं वाटण्यामागे आहे.
>>>

सुंदर विचार अमित, धन्यवाद

ही पेरेंट ट्री या साईट वरील माहिती.

Adoption Rules in India

Are you considering adopting a child? Here are some of the basic rules you need to know about this process.

Who is allowed to adopt a child?

In India, an Indian, Non Resident Indian (NRI), or a foreign citizen may adopt a child. There are specific guidelines and documentation for each group of prospective adoptive parents. A single female or a married couple can adopt a child. In India, a single male is usually not eligible to be an adoptive parent. An exception to this rule is the noted dance instructor Sandip Soparrkar, who has recently adopted a young boy. This is a special case rather than the norm. A single man desiring to adopt a child may be eligible if he applies through a registered agency. However, he will still only be able to adopt a male child.

What are the conditions to be fulfilled by an adoptive parent?

An adoptive parent should be medically fit and financially able to care for a child. A person wishing to adopt a child must be at least 21 years old. There is no legal upper age limit for parents but most adoptive agencies set their own benchmarks with regard to age. For a child who is less than a year old, the adoptive parents can have a maximum combined age of 90 years. Also, neither parent must be older than 45 years.

In the case of adoption of older children, the age of the parents may be relaxed accordingly. For example, for a one-year-old child, the age limit is 46 years, for a two-year-old child, it is 47 years and so on. The upper age limit for an adopted child is 12 years while for an adoptive parent it is 55 years. In the case of an adopted child with special needs, the age limit may be relaxed marginally by the state government, depending on the evaluation of the case. However, in all cases, the age of the parent cannot exceed 55 years.

What are the laws governing adoption?

Indian citizens who are Hindus, Jains, Sikhs, or Buddhists are allowed to formally adopt a child. The adoption is under the Hindu Adoption and Maintenance Act of 1956. Under this act, a single parent or married couple are not permitted to adopt more than one child of the same sex. Foreign citizens, NRIs, and those Indian nationals who are Muslims, Parsis, Christians or Jews are subject to the Guardian and Wards Act of 1890. Under this act, the adoptive parent is only the guardian of the child until she reaches 18 years of age.

Foreign citizens and NRIs are supposed to formally adopt their child according to the adoption laws and procedures in the country of their residence. This must be carried out within two years of the individual becoming a child's guardian. There is also a Juvenile Justice Act of 2000, a part of which deals with adoption of children by non-Hindu parents. However, this act is applicable only to children who have been abandoned or abused and not to those children who have been voluntarily put up for adoption.

Can a parent ask for a specific child?

An adoptive parent is allowed to ask for a child, as per her preferences. For example a parent may ask for a child of a certain age, gender (if it is the first child in the family), skin colour, religion, special features, health condition, etc. However, greater the specifications, more difficult it is to find a child who conforms to them. This restricts the pool of children available for adoption.

Depending on the adoptive parent's desired details, children are scrutinised to find a suitable match. When a child with the desired characteristics is found, she is shown to the prospective parents. In case the parents are unhappy with the selection, about two more children with the same characteristics may be presented to the parents.

The entire adoption process takes some months to complete. However, when all the hurdles are cleared, you are ready to welcome your new child to the family.

अरे वा!
धाग्यावर पहिल्याच पानावर पोस्ट टाकली अन बाहेरगावी गेलो होतो. परत आलो तर चर्चा सुंदर झालेली दिसते आहे.

माझ्या बहिणिने १-२ महीन्याची मुलगी दत्तक म्हणुन घेतली आहे. माझी भाची मुक्ता आता ५ वर्षाची आहे. मुल दत्तक घेण हे आमच्या घरात पहिलच असल्याने सुरुवातीला माझ्या बहिणी-तीचे मिस्टर यांच्यापेक्षा ईतरांनाच जास्त प्रश्न पडला होता की हे सगळ कस जुळुन येणार. पण मुक्ताला पहिल्यांदा बघितल आणि आम्हा सागळ्यांची तहान-भुकच भागल्या सारख झाल. एका ईमेल मधुन आलेल्या सुंदर अ‍ॅडमधुन दत्तक घेण्यासंबंधीचा मेसेज सुरेख व्यक्त केला आहे. अगदी तसच आम्हालासुद्धा वाटत.
Krishna.jpg

माझ्यामते 'मूल ही इन्व्हेस्टमेन्टच' आहे. (फक्त स्वत:च्या भविष्यासाठीच असे नाही, तरे स्वतःच्या नावलौकीकासाठी, स्वतःच्या 'पालकत्वाच्या क्षमतेसाठी' इत्यादी)

हे कारण नसले तर मूल (हेतूपुरस्परपणे) जन्माला घालण्याचे कोणतेच कारण नसते असे मला वाटते.

मुलासाठी कोणी मूल जन्माला घालत नाही. (म्हणजे मुलाला हवे असते म्हणून).

मूल पालकांनाच हवे असते आणि ते हवे असण्याची इतर कारणे कोणती त्यावर (येथे अस्थानी वाटत असल्यास) कोठेतरी अवश्य चर्चा व्हावी
>>>>.

+१

एक प्रकारे भावनिक, मानसिक, स्त्रीत्वाचा अनुभव, सामाजिक विचारांचा प्रभाव, घराण्याचा दिवा/पणती... वगैरे म्हणतात ह्या व अश्या कितीतरी गरजेतून मूल जन्माला घालायचे पालक ठरवतात.

भले प्रत्येकाची गरज वेगळी असु शकते व असेल ह्या गुंतवणूकीची. पण एकदम असा शब्द वापरला म्हणून काही ती वाईट आहे असे काही होत नाही लगेच.
शेवटी ह्या अश्या स्वतःच्या गरजेतूनच व गरजेकरताच तर मूल होते कारण मनुष्याला अशी गुंतवणूक (भावनिक, मानसिक वगैरे) करायची असते व हवी सुद्धा असते.
भले जन्माला घालताना अगदी ते उद्या आपल्याला सांभाळेलच असा विचार नसला तरी भावनिक दृष्ट्या एक समाधान असते की आहे आपले कोणीतरी उद्याला हि भावना नक्कीच असते व साहजिकच रहाते.

कित्येक वेळा काही जोडप्यांना त्यांच्या निर्णयनुसार मूल नको सुद्धा असते पण आई-वडील, सासू-सासरे.. होवु दे एक मूल, असू दे एक तरी.. पुढे मनाला आधार होइल, जीवाला जीव, उद्याला नवरा/बायको नसेल(काही का कारणाने)तर कोण बघणार ह्या भितीने सुद्धा म्हणून मूल घालतात जन्माला.

अलीकडेच आताच्या काळातील आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असलेल्या मुलीच्या नवर्‍याचे निधन झाले तरी तिने मृत नवर्‍याचे बाळ( प्रेग्नासी टर्मिनेट करायची संधी असताना.. दोनच महीने झाले होते व घरचे सांगत होते की कशाला हवेय आता हे मूल.. तरूण आहेस ...) जन्माला घातलेले उदाहरण पाहिलेय. कारण काय सांगितले, आपल्याला मानसिक आधार असेल, पुन्हा लग्न करायची इच्छा नाही, हेच मूल आता सोबत ह्या कारणाखाली. ती तिची कारणं होती व तिची गरज होती.

पण ही सुद्धा गुंतवणूकच आहे ना? (मला तरी वाटली). .. चूक वा वाईट ह्याचा मुद्दाच नाही पण पुढे मूल नक्की काय करेल व कसे असेल त्या आईबरोबर ते कोणाला माहीत. पण हीच आशा तर लावून तिने जन्म दिला ना... असेच वाटले मला. त्यामुळे मला तरी मूल ही एक "स्वतःसाठी" केलेली गुंतवणूकच वाटते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
विषयांतरः आमच्या ऑफीसमधील एका टॉयलेट व ट्रॅश काम करणारीला चार मुले व पाचव्यांदा गरोदर.. सहज बोलतना कळले की नुकताच तिचा नवरा दुसरीसाठी सोडून गेला हिला व त्या आधी तिला पुन्हा गरोदर करून गेला तरी हे मूल तिला हवेय. का विचारले तर? हसली.. नवरा मुलांसाठी परत येइल कधीतरी. उत्तर विचित्र वाटले मला तिचे पण ते तिचे उत्तर होते.

हि अशी तिची कमी पगारातील नोकरी करून पाच मूले? मला नाही माहीती की इथले सरकार काय मदत करते लो इन्कम वाल्यांना. पण मला तर प्रचंड आश्चर्य वाटलेले की, ही गरीब लोकं इतकी मुलं का होवु देतात? (कुठल्याही उपहासाने नाही पण काळजी वाटलेले की काय होते पुढे ह्या मुलांचे.. बाप नाही वगैरे वगैरे... का ह्या दुनियेत आणतात? त्यांची आवड(?) व गरज(?) काहीही असो पण मुलांवर तो अन्याय वाटला व अश्या आई-वडीलांचा स्वार्थीपणा. )असो.
विषयांतर बद्दल माफी.

जाई-जुई, तुम्ही मुलगी कायदेशीर दत्तक घेवु शकत नाही. foster care मधे घेवु शकता. तिला तुम्चे नाव देता येत नाही.
मुलगीच वाढवायची आसेल तर, काही option मिळेल का ते पहावे लागेल.

पण अश्या अपत्याला आम्ही परदेशी गेलो तर आमच्याबरोबर नेऊ शकणार का आमची कुटुंबीय म्हणून? Uhoh

ओके , पण तुम्ही जेवढ्या पोटतिडकीने लिहीले तेवढेच पोटतिडकीने हे लोक पतिसाद देत आहे. तुम्ही चकार शब्द बोलत नव्हते म्हणुन म्हटले
चांगल्या संस्थेतुन चांगले मुल तुम्हाला भेटो शुभेच्छा !

हो. नक्कीच. पण property inheritance etc. चा प्रश्न राहिलच. biological child and foster care child यात फरक असतोच. तांत्रिक फरक असेल तो.

हो. नक्कीच. पण property inheritance etc. चा प्रश्न राहिलच. biological child and foster care child यात फरक असतोच. तांत्रिक फरक असेल तो.>> त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. माझ्या आईबाबांनी ती करून मग विल बनवून त्यात मला वारस हक्क दिले होते.

biological child and foster care child यात फरक असतोच. तांत्रिक फरक असेल तो.<<<
फॉस्टर केअर आणि मूल अ‍ॅडॉप्ट करणे यातही फरक आहेना?
कायदेशीररित्या आणि परिस्थितीनुरूप सुद्धा?
फॉस्टर केअर म्हणजे तात्पुरते मुलाला आपल्या घरात सांभाळणे ना?
की हा माझा गैरसमज आहे?

property inheritance etc. चा प्रश्न राहिलच. biological child and foster care child यात फरक असतोच. तांत्रिक फरक असेल तो.>> हे नक्की काय असत. म्हणजे मला काहीच माहीत नाही यातला फरक.

Foster care is the term used for a system in which a minor who has been made a ward is placed in an institution, group home, or private home of a state certified caregiver referred to as a "foster parent". The placement of the child is usually arranged through the government or a social-service agency. ***The institution, group home or foster parent is provided compensation for expenses***

....मागील पानावरुन पुढे चालू....

योग्य संस्था मिळणे बर्‍यापैकी कठिण आहे हे लक्षात आले असेलच आधीच्या पोस्टीवरुन. एकीकडुन दुसरीकडे 'टरकामाईसीन'चा अनुभव घेताना निराश होऊ नये एवढेच म्हणेन.

Domicile ची ही एक भानगड असते. नियम CARA वर वाचा किंवा अधिक चौकशी करा.
सहसा तुम्ही राहता तिथल्या जवळच्या संस्थेत/ त्या शहरातल्या संस्थेत अर्ज करावा अशी अपेक्षा असते. मर्फीच्या उलट्याकाळीज न्यायाने ती अत्यंत 'महान' संस्था निघते. तरी अर्ज टाकुन ठेवायचा. कारण दुसर्‍या संस्थांना सांगता येते की तिथेही केले आहे नियमानुसार.

छोट्या गावांमध्ये प्रतीक्षायादी कमी असते. पुणे आणि मुंबई इथे ओळख असल्याशिवाय किंवा दुसरी कुठलीतरी मेख असल्याशिवाय दोन-तिन वर्षांची किमान प्रतीक्षायादि गृहित धरणे. त्यामुळे अजून निर्णयाबाबत तळ्यात मळ्यात असाल तरी अर्ज करुन ठेवा असे सुचवेन. तळ्यात मळ्यात असल्याचे मुलाखतीत लक्षात येते जर चांगले काउंसेलर असतील तर पण यादीच इतकी मोठी असते की तेही तसे समजून घेतात.

आता महारष्ट्राच्या दक्षिणेकडे राहणार्‍यांनी लोकांना/ कुटुंबातील इतरांना कळु नये म्हणुन पार विदर्भातील संस्थेतून दत्तक घेतात वगैरे पाहिले आहे. एकतर हा 'कळु नये' फंडा बरोबर नाही. (त्याबाबत नंतर लिहीते) पण काही विस्तारीत कुटुंबातील परिस्थिती फार बिकट असते, त्यांना कदाचित तोच एक मार्ग असतो. वगैरे. जे लिहीले नाही ते महत्त्वाचे असून वाचकाला समजते आहे अशी आशा करते.

छोट्या गावांमध्ये प्रतीक्षा यादी कमी असते हे खरे पण त्या संस्था मान्यताप्राप्त असतात का याचा विचार जरुर् करा. जे संभाव्य धोके लिहीले होते, ते काही पटींने वाढु शकतात (वाढतातच असे नाही. वाढु शकतात) हेही लक्षात घेणे कृपया. काही संस्थांमध्ये मुलांचे लसीकरण बरोबर झालेले नसु शकते, काही ठिकाणी समुपदेशकच नसतो, कधी ते बाळ कोणत्यातरी बड्या धेंडाचे अनौरस संतती असु शकते (तशी ती कोणाचीही असू शकतेच पण मुद्दा नंतरच्या दबावाचा आहे.) आणि नंतर त्यांचे मन बदलते, मग ते मूल परत द्यायला राजकीय दबाव आणू शकतात (ही खूप खूप अपवादात्मक केस आहे हे लक्षात घ्या. फक्त कल्पना यावी म्हणुन लिहीले.)
Paperwork ज्या संस्था cut करतात, त्या तेव्हा चांगल्या वाटल्या तरी त्यातील धोके जरुर आणि कृपया लक्षात घ्या.

तात्पर्य जवळची/ लांबची/ ओळखीतली/ नामांकित अशा सर्व संस्थांचे due diligence करावेच/ अनुभव गाठीला असावे.कुठल्याही संस्थेच्या सखोल चौकशीला पर्याय नाही.
निदान दोनतिन संस्थांमध्ये तरी अर्ज करुन ठेवतात लोकं हेही लक्षात घेणे.

कधी दांपत्य पुण्यामुंबईत असते आणि त्यांचे आईवडिल एका दुसर्‍या लहान गावात असतात. आणि त्यांचा निर्णयाला (एकवेळ फारसा सक्रीय नसला तरी थोडा जरी) पाठिंबा असला तर दुसर्‍या गावातील संस्थेत अर्ज करता येतो.

पर्याय: यातले काहीही न करता फक्त एकाच जवळच्या संस्थेत अर्ज करणे आणि प्रतीक्षायादीत आपला क्रमांक यायची वाट पाहणे.

क्रमश:
तळटीपा जारी.
________

डेलिया/ झंपी +१.
आर्क/ रुणुझुणु अगदी खरंय.
ART च्या अटेम्प्टस ना सीमारेखा दांपत्याने स्वत: घालायला हवी. प्रत्येकाची वेगळी असणार अर्थातच पण नाहीतर त्या आशानिराशेच्या खेळाला अंत नाही.

सुंदर धागा. योग्य दिशेने चर्चा. रैना, मैना, साती, बेफिकीर, आर्क, डेलिया, रुणूझुणू, सगळ्यांच्याच पोस्ट्स मार्गदर्शक आहेत.

रैना, पुढची पोस्ट कधी?

[१] आपल्याला मूल हवं अथवा नसलं तरी चालेल याचा विचार सर्वप्रथम व्हावा. काहीही झालं तरी आपल्याला मूल हवंच आहे हा विचार पक्का असेल आणि नैसर्गिक अपत्य होउ शकत नसेल तर दत्तक [adoption] हा एक चांगला पर्याय आहे. [खरं म्हणजे सर्वोत्तम पर्याय].
[२] आपल्याला नैसर्गिक मूल [biological child] असावं असं वाटणं ही सहज प्रवृत्ती आहे पण, झालं तर नैसर्गिकच व्हावं, नाही तर मूलच नको हा थोडा अतिरेकी विचार झाला.
[३] अनुवंशिकतेमुळे मुलाला पुढे उद्भवू शकणारे आजार ही शंका स्वाभाविक असली तरी रास्त वाटत नाही. प्रेम-विवाह किंवा अगदी जुळवलेलं लग्न करताना हा विचार सहसा होत नाही. एकाहून अधिक मुलं झाली तर त्यातलं एक मूल अगदी उत्तम प्रकृतीचं आणि एक मूल मतिमंद [किंवा इतर काही जन्मजात विकार] अशी खूप उदाहरणं दिसतात. 'अनुवंशिकतेमुळे जडणारे विकार' याला अगदी भक्कम शास्त्रीय आधार आहे अशातला काही भाग नाही. मधुमेहासारख्या विकारात तो एक घटक [factor] असू शकतो पण हमखास घटक नसतो. इतर बरीच आणि जास्त महत्वाची कारणं असतात.
[४] मला स्वतःला एक नैसर्गिक मुलगी आहे पण दुसरं मूल होताना खूप वैद्यकीय समस्या आल्या. मला स्वतःला एक मुलगी पुरे असं वाटत असलं तरी पत्नीनं मात्र दुसर्‍या मुलाचा ध्यास घेतला होता. अनेक उपाययोजना करूनही दुसर्‍या अपत्याची शक्यता दुरावत गेली आणि पत्नीवर त्याचे काही मानसिक दुष्परीणाम होताना दिसले. त्यामुळे कृत्रिम गर्भधारणेचाही [in vitro fertilization] विचार झाला परंतु तोही उपाय खडतर असल्याचं तिला पटलं आणि आम्ही मुंबईच्या 'बाल आशा' या संस्थेतून एक मुलगा दत्तक घेतला. [दोन्ही बाजूच्या आजी-आजोबांनी आणि इतर बहुतेक नातेवाईकांनी त्याला पाठिंबा दिला त्यामुळे आमचा मर्ग सुकर झाला]. त्या घटनेला आता सहवीस बर्षं झाली. आपलं एक मूल नैसर्गिक आहे आणि दुसरं नाही हे आम्ही केंव्हाच विसरून गेलो. दत्तक मुलाला वस्तुस्थितीची बोचक पद्धतीने अन्य कोणी जाणीव करून देण्याआधीच, तो थोड्या कळत्या वयाचा होताच, आम्ही त्याला सगळं काही समजावून सांगीतल्यामुळे एक संभाव्य गुंतागुंत [complication] टळली. आमच्या 'दत्तक' मुलाच्या डोक्यात, आपले जन्मदाते आई-बाप कोण हे जाणून घेण्याचा विचारही [अद्याप तरी] आलेला नाही त्यामुळे तीही एक संभाव्य गुंतागुंत टळली आहे. थोडक्यात म्हणजे, आम्ही मूल दत्तक घेण्यामुळे आमच्या कुटुंबात कसलेही ताण-तणाव निर्माण झालेले नाहीत.
[५] त्याकाळी फारसे कायदेकानू झालेले नव्हते आता खूप नियम [आणि सोयीसुद्धा] प्रचलीत झाले आहेत. यासाठी Hindu Adoption & Maintenance Act किवा Indian Adoption & Court of Wards अशा दोन कायद्यात आवश्यक त्या तरतुदी आहेत आणि वेळोवेळी न्यायालयांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना [guidelines] ही आहेत. adoption च्या नावाखाली मूलांची 'विक्री' होऊ नये यासाठी बर्‍यापैकी कडक नियम झाले आहेत. Adoptionचं काम करणार्‍या कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत गेलं तर सगळी माहिती सहज मिळू शकते. मात्र, संस्थेची निवड करतेवेळी थोडी काळजी घेणं [म्हणजे विचार-पूस वगैरे] आवश्यक आहे.
[6] अलीकडे संस्थेतून मूल दत्तक घेणार्‍या पालकांची संख्या बरीच वाढली आहे. याविषयीच्या अनेक शंका-कुशंकांच्या बाबतीत चांगलं समाज-प्रबोधनही झालेलं आहे. याचं स्वागतच करायला हवं.
[७] या पर्यायाचा स्वीकार करू इच्छिणार्‍या पालकांना माझ्या हार्दीक शुभेच्छा!
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

मुग्धानंद, तुम्ही <<<जाई-जुई, तुम्ही मुलगी कायदेशीर दत्तक घेवु शकत नाही. foster care मधे घेवु शकता. तिला तुम्चे नाव देता येत नाही. मुलगीच वाढवायची आसेल तर, काही option मिळेल का ते पहावे लागेल.>>>> असं जे लिहीलंय, ते आता आता अंमलात आणलं जातंय का? कारण ज्यांनी बायलॉजिकल मुलगी असताना दुसरी मुलगी दत्तक घेतली आहे, असे लोक पाहिले/ऐकले आहेत.
शिवाय, इथेही अशी काही पात्रता लिहिलेली नाहीये.

<<जाईजुई
मला वाटते आता असे बंधन नाहिए.पहिली मुलगी असतान दुसरी मुलगी दत्तक घेता येते.
आधी हे शक्य नव्हते, सुश्मिता सेनने या कायद्या विरोधात लढा देवुन दुसरि मुलगीच दत्तक घेतली आहे.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-01-15/news-interviews/2...

मुलगी दत्तक हवी आहे ???

मानल रावं! मानल तुम्हाला.....मस्त!!!!
फार अभिमान वाटतो.... तुमच्या सारखी लोक जगात आहेत याचा!!!
अभिनंदन!!!!! आणि शुभेच्छ्या!!!

Pages