मुल दत्तक घ्यावे की नाही?

Submitted by सख्या on 2 July, 2012 - 04:44

मित्रहो, मला लग्नानंतर मुलगी झाली होती पण जन्मल्यापासून ती आजारीच होती, चार महीन्यांची असताना गेली. माझ्या लग्नाला ३ वर्षे झाल्येत. दोन वर्षापासुन प्रयत्न करत आहोत. मिसेसला हृदयविकाराचा त्रास आहे. तेंव्हा चान्स घेण्याची पण भिती वाटते. बहुतेक आता घेणारच नाही.
मला मुल दत्तक घ्यायचं आहे. ६ महिन्याच्या आतलं बाळ मिळेल का? कुठे? कसे? काय कायदे आहेत त्यासाठी? इथे कुणी अनुभवी लोक आहेत का? घरचे बाकीचे लोक तयार होतील का? खुप प्रश्न आहेत.
मी,मिसेस फार डेस्प आहोत बाळासाठी. काय करावे? मुलीच्या आठवणीतुन अजुन बाहेर पडलो नाहीओत. शक्य असल्यास मुलगीच दत्तक हवी आहे.क्रुपया हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धारा.. मी वाचलेत ते नियम.. आणि जवळच्या संस्थेत जाऊन प्राथमिक चौकशी करून झाली.

ऑक्टोबरमध्ये काही वैद्यकीय अपघातामूळे पुढे विशेष हालचाल झाली नाही. पण नियम आता लागू नाही हे पक्के झालेय.

>>> मुलगी दत्तक हवी आहे ???

मानल रावं! मानल तुम्हाला.....मस्त!!!!
फार अभिमान वाटतो.... तुमच्या सारखी लोक जगात आहेत याचा!!!
अभिनंदन!!!!! आणि शुभेच्छ्या!!! <<< ही मनापासूनची प्रतिक्रिया असेल अशी अपेक्षा करते.. खासकरून ह्या धाग्यावर! Uhoh

?

?

राया, आज शनिवार असल्याने इथे वर्दळ थोडी कमी आहे म्हणून लगेच उत्तर मिळण्याची शक्यता थोडी.

पण कुणीना कुनी तुमच्या प्रश्नाला उत्तर अवश्य देईल.

ठिक आहे. धन्यावाद. मि विकेंड्ला रिकामि असते जरा. मुलगा एरवि साधा पेपर वाचु देत नाहि. मायबोलि तर दुरच. Happy

.

जाईजुई, मी प्रतिक्रिया मनापासूनच देते. आत एक आणि बाहेर एक अस का करेन मी? नवीन आहे ग अजुन मायबोलीवर.......

नवीन नियमांनुसार आता दत्तक प्रक्रियेसाठी online नोंदणी करावी लागते. online च आपल्याला मुलांचे फोटो दाखवतात व निवड करावी लागते.
म्हणजे आपल्याला प्रत्यक्श मुलं बघता येत नाहीत का निवड करायच्या आधी?

अतरंगी, आपल्याला दत्तक घेण्यापूर्वी एकापेक्षा जास्त मुलं सुचवली जातात (एकावेळी एकच), त्यापैकी एक मूल आपण निवडतो. त्यानंतर पुढची दत्तकची प्रक्रिया होते.

gauri, एकावेळी ६ मुला\मुलींचे फोटो दाखवले जातात, त्यातुन १ निवडायचा. असं CARA च्या वेबसाईटवर लिहीलंय..
cara.nic.in

चैत्राली, हे माहित नव्हतं मला. मला सोशल वर्करनी २०१२ मध्ये वरची माहिती सांगितली होती. (तेंव्हा २ वर्षं वेटिंग होतं पुण्यात. फॉर्मसुद्धा स्वीकारत नव्हते. सुदैवाने त्याच वेळी दुसरीकडून अनपेक्षितरित्या मला दत्तक बाळ मिळालं आणि इतकं थांबायची आणि नंतर ही सगळी प्रोसेस करायची वेळ आली नाही! Happy )

Hi,
Whatever Gauri mentioned is not possible now.
You have to go through a process which is central in India and which agency you choose does not matter.
End to end time is approximately 1.5 yrs currently, which includes registration, home study, waiting list, identification of babies and you getting the baby.
Earlier, since adoption was handled by agency - they used to give more choice and used to match baby with you (also considering physical features etc). Now since its central that doesn't happen. 6-7 months post your home study, You get to see details and photos of 3 babies (choice of gender is there)- you choose one of them, do the visit and finalize. if you like none of the babies then you go to bottom of the waiting list again (which means another 6 months) and get a chance to choose the baby from 3 babies available that time.
For first 3 months till all legalities are completed you are foster parent for the kid/baby.
Once formalities are completed, baby will be yours.
Still home visits will happen to ensure that baby is in safe hands.

Please visit CARA website for more information on rules and regulations and talk to someone who has adopted in last one year for procedural aspect since things have changed a lot in last 2 yrs.

नानबा, पुन्हा वाचल्यावर जाणवलं, मी वर नीट सविस्तर नाही लिहिलं पुरेसं. ते वाचून प्रक्रियेविषयी गोंधळ होण्याची शक्यता आहे बरीच. Thanks for the clarification.
मी दत्तकसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता केली, फॉर्म भरला. आणि दोन वर्षं वाट बघण्याची मनाची तयारी करायला लागले.
मला दुसरीकडून बाळ मिळालं म्हणजे दुसर्‍या संस्थेतून नाही. एका परिचितांच्या पाहण्यात आईविनाचं, सांभाळायला कुणी नाही असं तान्हं बाळ होतं, त्याचे नातेवाईक दत्तक देण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे वाट बघणं, होम स्टडी, फॉस्टर पेरेंट आणि मग दत्तक या पायर्‍या अचानक बाळाचे मेडिकल रिपोर्ट बघणं, बाळाला भेटणं - ताब्यात घेणं आणि थेट दत्तक घेण्यासाठीची कागदपत्रं अशा थोडक्यात आटोपल्या. या योगायोगाला काय म्हणायचं मला माहित नाही. आधी घरच्यांना पटवण्यात माझी खूप शक्ती आणि वेळ खर्च झाला होता. त्यातच पुण्यातल्या काही संस्थांच्या अनुभवानंतर तर माझा धीर खरंच संपला होता या वेळेपर्यंत. दोन वर्षं मी कशी वाट बघणार होते माहित नाही. I was just damn lucky!!!

दीप्स, हो, खूपच लकी ... एक तर सगळ्या आशा संपलेल्या असतांना नशीबाने झटपट लेक मिळाली, आणि तिने हे वाट बघणं आणि मनस्ताप सार्थ ठरवला! Happy

लग्नाला 6 वर्ष झाली. दोघांनाही मुलांची प्रचंड आवड असल्याने मूल हवच होतं. 3 वर्षांनी ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर वेळोवेळी बदलून बघितले. पण शारीरिक दृष्ट्या दोघांमध्येही प्रॉब्लेम नाहीय. ह्या बाबतीत सगळे डॉक्टर शुअर आहेत. बऱ्याचदा रिपोर्ट काढले गेले, पण कोणताही प्रॉब्लेम डिटेक्ट झाला नसताना कधी दिवस ही राहिले नाहीत . 6 महिन्यांपासून IVF साठी तयारी करतो. Embryo freeze करून ठेवलेत. एक cycle पण झालं, पण गर्भाची वाढ होत नाही हे 6 व्या 7 व्या आठवड्यात लक्षात आलय. आता गर्भपात करायचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. 2-5 दिवसात ते करेल पण बाळ दत्तक घ्यावं का हा विचार मनात येतोय. नवरा आणि कुटुंबीय नेहेमीच तयार होते पण आई पनाच्या 9 महिन्यांच्या हव्याश्या वाटणाऱ्या त्रासाची माझीच इच्छा आहे. आपल्यात physical disability डिटेक्ट झालेली नाहीय मग अजून वाट पाहायला हवी का पण त्याच वेळेला बाळासाठी कमालीची आतुरता जाणवतेय. ह्या गोंधळामुळे निर्णयाप्रत येत येत नाही. काय करावे??

सीमी,अशा लोकांचा एक wa group आहे.
दत्तक मुल घ्यावं की नाही याचा विचार करणारे, रजि. केलेले, दत्तक मुल घरी आलेले असे सगळे पालक त्यात आहेत. आमच्या मिटिंग्ज, यासंबंधीचे प्रोग्रेम्स, गेट-टुगेदर्स होत असतं.
तुम्ही आलात, सहभाग घेतलात तर निर्णय घ्यायला तुम्हाला कदाचित मदत होईल.
तुम्हाला सहभाग घ्यायचा असल्यास मला ईथे माबोवर विपु मधे नंबर द्या.

छान चर्चा झालीये अन माहिती देखिल चांगली आहे ह्या धाग्यात.

ईकडे माबोवर कुणी सिंगल मदर आहे का जिने एकटीने बाळ दत्तक घेतले आहे?
असेल तर अनुभव लिहाल का कृपया, तसे त्यासाठीची प्रोसेस अन डॉक्युमेंटेशन , ईतर माहिती कुणी ईथे दिली तर बरे होइल.

धन्यवाद ___/\___

vb, माझ्या ओळखीत अेकजण आहे.non mabokar.
तुमचा नंबर विपुतुन कळवलात तर माी तिला विचारुन तिचा नंबर शेअर करेन.

खरे तर दत्तक मुले घेऊ नये तर बालसंगोपन किंवा परेंतींग च आनंद एखाद्या मुलाला त्याचे नाव आयडेंटिटी न बदलता त्याला आई वडील म्हणून जे देवू इच्छित आहे ते सर्व काही द्यावे, कारण दत्तक घेणे म्हणजे त्या व्यक्तीची त्याची ओरिजनल आयडेंटिटी पूर्ण पने पुसून नष्ट करून त्याला दिलेल्या सुखासोई बदल्यात गोंडस नावाखाली प्रत्यक्षात दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे मुलाला हवी तशी रंगरांगोटी करून केलेली देवघेव Barter transaction आहे असे वाटते

मला ही माहिती हवी होती, हा धागा योगायोगाने वर आला म्हणावं लागेल. काही दिवसापूर्वी हर्पेन यांच्या धाग्यावर माहिती विचारली होती मी.

Pages