उपासाची दही बटाटा पुरी

Submitted by श्यामली on 30 June, 2012 - 07:07
uapasachi dahi batata puri
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केळ्याचे वेफर्स
उकडलेला बटाटा
जिरंपूड
मीठ
तिखट
दही
साखर
खजूर चटणी
बटाटा शेव

क्रमवार पाककृती: 

उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात थोडंस मीठ, जीरंपूड घालून नीट मिसळून घ्यावा.
दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावं
आता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.
त्यावर वर मिक्स करुन घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी त्यावर बटाटा शेव घालावी.
दही बटाटा पुरी तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
माणशी ७-८ तरी
अधिक टिपा: 

उपासचं गोड खाऊन वैताग आल्यामुळे लेकीनी केलेला उद्योग.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शामली धन्यवाद गं बाई. मी पण उपासाला सतत साबुदाणा, शेंगदाणे आणी बटाटा खाऊन कंटाळलेय. गोड म्हणजे कुठलीही खीर घशाखाली उतरत नाही. आणी सोमवार उपासाला भगर चालत नाही त्यामुळे भाजणी पण चालत नाही. आता हा प्रकार जरुर करेन, पण करण्या आधीच धन्यवाद तुला आणी तुझ्या लेकीला.

साती काय म्हणावे तुमच्या कडवट प्रतीसादाला? तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती.:अरेरे:

श्यामली या रेसीपीबद्दल खुप खुप धन्यवाद..
मी सखी मंच ने आयोजीत केलेल्या 'उपवासाचे व्यंजन' स्पर्धेत ही रेसीपी थोडे इन्होवेशन करून सादर केली..
पहिला क्रमांक आला.. Happy
पुन्हा एकदा खुप खुप धन्स..

Pages