उपासाची दही बटाटा पुरी

Submitted by श्यामली on 30 June, 2012 - 07:07
uapasachi dahi batata puri
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केळ्याचे वेफर्स
उकडलेला बटाटा
जिरंपूड
मीठ
तिखट
दही
साखर
खजूर चटणी
बटाटा शेव

क्रमवार पाककृती: 

उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात थोडंस मीठ, जीरंपूड घालून नीट मिसळून घ्यावा.
दही फेटून त्यात थोडी साखर मीठ घालून घ्यावं
आता केळ्याचे वेफर्स एका ताटलीत मांडून घ्यावेत.
त्यावर वर मिक्स करुन घेतलेला बटाटा मावेल एवढा ठेवावा त्यावर सारखं केलेलं दही घालावं त्यावर खजूर चटणी घालावी त्यावर बटाटा शेव घालावी.
दही बटाटा पुरी तयार Happy

वाढणी/प्रमाण: 
माणशी ७-८ तरी
अधिक टिपा: 

उपासचं गोड खाऊन वैताग आल्यामुळे लेकीनी केलेला उद्योग.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त रेसिपीच्या आय्ड्येची कल्प्ना !! Happy
ज्याना अमुक तमुक चालत नाहि त्यांनी उपवास नसताना खायला काही हरकत नाही Happy

>>>>>गूळ चालतो. दाणे आणि गूळ एकत्र मिक्सरला लावून तूपाशिवाय लाडू होतात. >>> केश्वी ताई Uhoh मला आत्त्ताच करायला हवे ते लाडु Proud एकदम तोंपासु Happy

मस्त पाककृती..श्यामली लेकीला सांग आवडली म्हणून :)...
ए दाण्याचा लाडू कसा करायचा? सांगा ना कुणीतरी..फक्त दाणे आणि गूळ एकत्र मिक्सरला लावायचे का?

dbp1.JPGdbp2.JPG

आमची शेव बटाट्याची नाही. Wink
मस्त चव आहे. धन्यवाद.
खमंग काकडीबरोबरही या चिप्स चांगल्या लागल्या.

अहाहा.......... लोला मस्त एक्दम तोंपासु फोटो Happy

ए दाण्याचा लाडू कसा करायचा? सांगा ना कुणीतरी..फक्त दाणे आणि गूळ एकत्र मिक्सरला लावायचे का?>>>
पूर्वा ... शेंगदाणे मस्त खमंग भाजुन कुट करुन घ्यायचा. त्यात चवीप्रमाणे आवडेल तितका गुळ बारिक चिरुन / करुन घालायचा आणि लाडु वळायचे. झालंच तर साजुक तुप टाकायचं. बस्स्स्स....... Happy

ए नाही ! तुपाची गरज नाही. भाजून सोललेले दाणे आणि चिरलेला मऊसर गूळ मिक्सरच्या भांड्यात फिरवायचा. मिक्सरमध्ये दाणे आणि गुळाचा एकजीव मऊ भुगा होतो. तो बाहेर काढून वेलची टाकून वळायचा.

पिठीसाखरेचे करायचे असतील तर दाणे आणि साखर एकत्र फिरवायची किंवा दा.कू व पि.सा. मिसळायचे. ताटलीत काढून थोडं तूप टाकून वळायचे.

छान रेसीपी आहे श्यामली. मुलीला आयडीया मस्त आहे म्हणून सांग.

आमच्या मुलीचा afternoon experiment . Happy डॅडची हेल्प ती म्हणेल ते सगळं साहित्य देण्यापुरती आणि उपवास म्हणजे काय हे सांगण्यापुरती. यात तिने पायनॅपल, काकडी पण वापरले आहे. तिला शार्प नसलेली सुरी वापरायला शिकविले आहे.

मस्तच कल्पक आणि सोप्पी रेसिपी की! छान. शाब्बास देविका. Happy

लोला, सीमा कसले खंग्री फोटो टाकता गं. साबुदाण्याच्या पापड्यांची कल्पनाही आवडली.

लोला, तुझ्याकडून 'खाद्यपदार्थांचे फोटू कसे काढावेत' या विषयावरचा बाफ अपेक्षित आहे. Happy

सीमा, बटाटा वेफर्सच्या जागी साबुदाण्याच्या फेण्या आहेत का? नसल्या, तर माझ्याकडून आणखी एक व्हेरिएशन समजा Happy

सीमा, लोला ऑस्सम. कालच सर्व रॉ मटेरिअल आणण्यात आले आहे. फॅक्ट्रीचालू आहेच. Happy खजूर चटनी खूप वर्शात केलेली नव्हती. करीन आता. दाण्यचा लाडू मला पण जामच आवडतो. वो भी करको देखेंगा.

लोला, सीमा भारीयेत फोटो Happy

सगळ्यांना मनःपूर्वक धन्यवाद मंडळी:)
तिचे बरेच प्रयोग चालू असतात, अर्थात, गॅसजवळ काम करताना काळजी घेणे , शार्प ऑब्जेक्ट्स हाताळणे तसेच पदार्थांच्या हेल्दी असण्या नसण्याबद्दल वेळो वेळी तिला आवश्यक ती माहिती पुरवली जातेच. Happy

लोला आणि सीमा, दोन्ही फोटो मस्तच आलेयत.
साबुदाण्याच्या फेण्या भारीच दिसतायत.
सीमाच्या फोटोतल्या प्लेटस पण मस्त आहेत.

वा एकदम हटके कृती आहे लेकीची. Happy अभिनंदन तिचे. Happy माझ्या पोरीला वाचायला दिली पाहिजे - उपासाच्या नावावर / एरवी कधी सुध्दा बटाटा-केळे वेफर्स पूर्ण पुडा फस्त करते. त्यापेक्षा हे बरे. Happy

तोंपासु रेसिपी....चाट प्रकार भयंकर आवडतात. हे करून बघणार नक्की.
श्यामली, लेकीला शाब्बासकी.
लोला, सीमा, फोटो सहीच.

आईशप्पथ अस काही करता येईल हे लक्शातच नाही आलं .. मस्त रेसिपी श्यामली..लेकीला शाबासकी Happy
हा धागा शनिवारी पाहिला नाही म्हणुन आता रुखरुख लागली आहे..
जाउद्या आता लोला सारखे 'अर्धवट उपासाची' दबशेपु करावी म्हणत्येय Happy

लोला, सीमा फोटो मस्तच.
साबुदाण्याच्या पापड्या वापरता येतील हे लक्षातच आले नाही. सीमा, लेकीला धन्यवाद कळव ग आमचे. Happy

Pages