विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडररला चांगली संधी आहे ह्या वेळेस...>>>ज्योको असेल ना पण सेमीजमध्ये.त्याला पार करून जायचे कठीण काम फेडीला करावे लागेल.अर्थात गेले दोन सामने तरी फेडी फॉर्मात खेळला आहे. गो फेडी गो. Happy

त्या मरेबाबाला मात्र फायनलला जायची चांगली संधी उपलब्ध झाली आहे आता.:)अर्थात हा रोसोल असाच खेळत राहिला तर तो अजुन काही मानांकितांना नक्कीच गारद करेल.

रोसोल सहीच खेळला पण काल. मी पहिले चार सेट पाहिले.त्यातले पहिले तीन सेट त्याच्या सर्विसला राफाकडे काही उत्तरच नव्हते. खर तर रोसोल सरळ सेट्मध्ये जिंकला असता. पण पहिला सेट टायब्रेकरमध्ये थोडक्यात गेला त्याचा.चौथ्या सेटमध्ये तो ढेपाळला होता तेव्हा वाट्ले होते राफा घेणार आता पाचवा सेट.पण नेमका इंडोर गेम चालू करण्यासाठी अर्ध्या तासाचा ब्रेक घेतला गेला आणि रोसोलने त्याचा फायदा करून घेतला असावा.पाचवा सेटही ६-४ ने जिंकला त्याने.खर तर काल राफाने एका मॅचमधील त्याच्या सर्वात जास्त एसेस मारल्या असतील. पण रोसोलकडे त्याच्या तोडीस तोड उत्तर होते.

राफाचे दुसर्‍याच फेरीत गारद होणे तेही १००व्या स्थानावरील खेळाडुकडुन म्हणजे विंबल्डनमधील `वन ऑफ द ग्रेटेस्ट अपसेट' असेच म्हणावे लागेल.

काल शारापोव्हाला पण चांगलीच जड गेली मॅच.. तिसर्‍या सेट मध्ये पिरोंकोव्हा फारच ढेपाळलली.. अन्यथा वेगळा निकाल दिसला असता...

आपला घोडा फेडेक्सच आहे..

लेडिज मध्ये किम, सेरेना, मारिया ह्यांच्यात मारामारी आहे..

राफाच्या जाण्याने दु:ख झालेल्यांचं सांत्वन ..

गो ज्योको!

स्वाती, माझं लक्ष ज्योको कडे आहे .. सर्बिया कडे लक्ष दिलं तर पुढच्या मॅचला नक्की कोणासाठी चीअर करू असा गोंधळ उडेल ..

किम पुढे गेलीय म्हणजे बहुदा किम आणि शेरापोव्हा होणारसं दिसतंय......

ज्योको फेडरर झाली तरी आमचा फेडेक्स आणि जर इकडून ज्योकोची गाडी पुढे गेली तरच गो ज्योको....:)

मध्ये मधे नवे घोडे मैदानात आणावेच लागतात पण नदाल मात्र अकालीच बसला....सांत्वन सांत्वन...;)

फेडेक्ससाठी पण द्येव पाण्यात घालायचे की कय??? ओ नो...पहिला सेट गेलाय... Sad
हायला रूफ क्लोज असलं की काय बिनसतंय काय माहित दिग्गज लोकांचं.... Sad

फेडेक्स पहिले दोन सेट खरच वाईट खेळत होता की सेंटर कोर्ट वाल्यांचे पैसे वसुल करून देत होता? पहीले दोन सेट तर ना धड पहिली सर्विस ना फूटवर्क. सेट नं ४ आणि ५ जबरद्स्त सर्विस होत्या.

श्रीयूत रोसोल तिसर्‍या फेरीत सरळ सेटमध्ये पराभूत.. :|

सेरेना चांगली खेळली.. तिचाही शॉट मारल्यानंतरचा रिकव्हरी टाईम बराच वाढला आहे. झेंगने बॅकहँड रिटर्न मस्त मारले.

निशिकोरी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मस्त खेळला होता.. आत्ता डेलपोट्रोच्या विरूद्ध बर्‍यापैकी बोअर खेळतोय.

Pages