Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17
यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.
पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.
महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.
यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!
हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह्! ते जँकोविक आहे होय ..
ओह्! ते जँकोविक आहे होय .. मला (जळी, स्थळी ..) ज्योकोविकच दिसतो .. >>> ज्योको च्या खेळाबद्दलच्या तीन्-चार तांत्रिक 'युनिक' गोष्टी सांग बरं ज्या तुला फेडररच्या किंवा ईतरांच्या खेळात दिसत नाहीत किंवा दिसत असल्या तरी आवडत नाहीत, आणि फक्त त्या गोष्टींमुळेच तुला जोको जास्त आवडतो.

जोकोच्या खेळापेक्षा जोकोच आवडत असेल तर मग काही सांगायची गरज नाही.
जाऊदे रे चमन. तो टेनिस खेळतो
जाऊदे रे चमन. तो टेनिस खेळतो एवढे माहीत आहे ना तिला.
चमन आणि लोला, अशा तांत्रिक
चमन आणि लोला, अशा तांत्रिक युनिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर त्याने काय होणार? तुम्ही लगेच फेडरर सोडून ज्योको ला पाठींबा देणार का? :p
(तळटीपः मी कधीही असं म्हंटलेलं नाही की फेडरर पेक्षा ज्योको/ नादाल सरस आहेत .. फक्त आता फेडरर चे दिवस भरले आहेत एव्हढंच .. फेडरर तुफान फॉर्मात असताना मी टेनीस बघत नव्हते त्यामुळे मला तेव्हढा काही जिव्हाळा नाही वाटत त्याच्याविषयी.. :p तसंच मी टेनीस समजणारी फार मोठी तज्ज्ञ आहे आहे अशीही माझी समजूत नाही .. पण मला आवडणारा खेळाडू सध्या नं. १ आहे तो काय फक्त टेनीस खेळतो म्हणून असंच तुम्हाला वाटत असेल तर काय बोलायचं .. मला तुमच्या मतांविषयी आदरच आहे .. :p)
मी नाही, चमन विचारतोय...
मी नाही, चमन विचारतोय...
फेडरर तुफान फॉर्मात असताना मी
फेडरर तुफान फॉर्मात असताना मी टेनीस बघत नव्हते >>> अरेरेरेरेरेरेरे !
भरले की सरले ?
टेनीस करीयर मधले दिवस .. भरले
टेनीस करीयर मधले दिवस .. भरले नी सरले, दोन्ही एकच ..
तर असो!
गो ज्योको! :p
छ्या!!! तू पण काय लगेच 'आदर
छ्या!!! तू पण काय लगेच 'आदर आहे' वगैरे सांगायला लागलीस.
निर्लज्यपणे असे ठासून सांगायचे
१)त्याची रॅकेट फेडीच्या रॅकेटपेक्षा जास्त कलरफुल असते.
२)त्याचे शूज नदालच्या शूजपेक्षा जास्त स्टायलिश असतात.
३)त्याचे कपडे वीनसपेक्षा जास्त फॅशनेबल असतात.
४)त्याच्या मुव्ज शारापोवाच्या मुव्जपेक्षा जास्त बघण्यासारख्या असतात.
५)त्याला मॅकेन्रो (आणि वीनसपेक्षा सुद्धा) जास्त राग येतो.
६)त्याची गर्लफ्रेंड वोझ्नियाकीपेक्षाही सुंदर आहे.
अश्या अजून दहा तरी तांत्रिक गोष्टी सांगता येतील.
* एकदा तरी केसांची पोनी ठेवल्याशिवाय जगज्येता होता येत नाही. (हे त्याला कधी कळणार)
>> निर्लज्यपणे असे ठासून
>> निर्लज्यपणे असे ठासून सांगायचे>/em>
अरेरे! आपला डाव प्रीएम्प्ट झाला त्याबद्दल सॉरी बरं का! :p
त्याचे कपडे वीनसपेक्षा जास्त
त्याचे कपडे वीनसपेक्षा जास्त फॅशनेबल असतात.>>
राफा जिंकला.
राफा जिंकला.
चमन लोला अगं तेव्हा एकीक्डे
चमन
लोला अगं तेव्हा एकीक्डे इएस्पीएन सुरु होतं न म्हणुन पटापट विंग्रे़जी
व्हिनसचा आजचा फॉर्म चांगला होता.... (जरी मला त्या दोघी तशा कधी सपोर्ट करण्याइतक्या आवड्ल्या नाहित म्हणा)
बरं...जोको मागच्या तीन
बरं...जोको मागच्या तीन स्लॅम्स जिंकला तेव्हा झालेला आनंद तू कसा सेलिब्रेट केलास ते तरी सांग आम्हाला.
चौथा जिंकल्यावर एकदमच करणार
चौथा जिंकल्यावर एकदमच करणार होती ती, पण ते काही झालंच नाही.
लंच टायम वसुल होणार रॉडिक
लंच टायम वसुल होणार रॉडिक खेळ्तोय आणि अपोनंट ब्रिटिश आहे...फुल्टू ठसन स्टाईलने सुरु आहे....
>> चौथा जिंकल्यावर एकदमच
>> चौथा जिंकल्यावर एकदमच करणार होती ती, पण ते काही झालंच नाही.
दुखती नस ठुसठुसतेय अजून .. :p
>> जोको मागच्या तीन स्लॅम्स जिंकला तेव्हा झालेला आनंद तू कसा सेलिब्रेट केलास ते तरी सांग आम्हाला.
तो आनंद आम्ही ज्योको ला पाठींबा असणार्या लोकांशीच शेअर करतो .. उगीच कुण्याही ऐर्यागैर्याशी नाही .. :p
अरेरे... किती भांडता.. खर
अरेरे... किती भांडता..
खर म्हणजे मॅकेन्रो-कॉनर्स्-लेंडल इरा संपल्यावर गेल्या ५-६ वर्षात जगातल्या पहिल्या ३ खेळाडुंमधल्या इतक्या रंगतदार व चुरशीच्या लढती बघण्याचे भाग्य आपल्याला मिळत आहे याचाच मला खुप आनंद होत आहे. मला जर विचारलेत तर खर म्हणजे जाकोव्हिक्-राफा व फेडरर या तिघांपैकी त्यांचा दु:स्वास करण्यासारखे कोणीच नाही.. त्यांच्या तिघांच्या पर्सनॅलिटीज लाइकेबलच आहेत. जसे आपण म्हणतो ना ...विद्या विनयेन शोभते.. तसेच या तिघांच्या टेनिस खेळाच्या बाबतीत आहे. त्यामुळे या तिघांपैकी कोणीही जिंकला तरी मला आनंदच होतो.
सशल.. तु फेडरर ऐन उमेदीत असताना टेनीस बघत नव्हतीस? किती दुर्भाग्य तुझे... ऐन उमेदीतल्या फेडररचा खेळ बघताना मी इथे टेनिस बीबीवर नेहमी म्हणायचो.. एंजॉय द राइड! आता ती राइड संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे मला खुप वाइट वाटते.
मला वाटते याही ग्रँड स्लॅममधे राफा-जाकोव्हिक फायनल! बट..फेडरर माइट डु वन लास्ट हुर्रा! लेट्स सी!
बाय द वे.. यंदा जुन -जुलै-ऑगस्ट मधे इंग्लंडमधल्या स्पोर्ट्सप्रेमींसाठी पर्वणीच आहे.. सॉकर युरोपियन चँपिअनशिपमधे त्यांची टिम क्वार्टरफायनलपर्यंत गेली.. सध्या चालु असलेले विंबल्डन व ऑस्ट्रेलिया बरोबरची क्रिकेटमधली वन डे सिरीज.. पुढच्या महिन्यातले ब्रिटिश ओपन गॉल्फ व मग लंडन ऑलिंपिक्स! वॉव.. काय मजा आहे तिथल्या लोकांची!:)
मुकूंद भांडण नाही रे.. त्याला
मुकूंद भांडण नाही रे.. त्याला घोडे दामटवणं असं म्हणतात !
राफाची मॅच चांगली झाली काल. पहिला सेट ठिक ठिक खेळला नंतरच्या दोन मध्ये व्हॉलीज चांगल्या मारल्या..
क्विटोव्हा जेमतेम जिंकली. तिची कोंचिता मार्टीनेझ होणार आहे असं मला फार वाटतं !
ठोसर बाई हरल्या.. चांगली
ठोसर बाई हरल्या..
चांगली खेळता खेळता एकदम ढेपाळते.
वॉझनियाकी चांगली खेळते आहे. १ सेट अप आहे.
गेला दुसरा! ती तमिराबाई जोरात
गेला दुसरा!
ती तमिराबाई जोरात खेळते. गेल्यावर्षी पाहिली होती.
तमायराने वोजिला चांगलंच
तमायराने वोजिला चांगलंच दमवायला घेतलंय..ही जिंकली तर मी हिला पण मैदानात आणणार...;) :
: नव्या घोडीवर पैसे लावायाचे का हा विचार करणारी बाहुली :
गो नवी घोडी!
गो नवी घोडी!
जिंकली नवी घोडी. छान खेळली!
जिंकली नवी घोडी.
छान खेळली!
चांगभलं...... चला लावायलाच
चांगभलं......:)
चला लावायलाच हवेत नवीवर पैसे.....
तमायरा जिंकली.......
वोझनियाकि बरंच डिफेन्सिव खेळत
वोझनियाकि बरंच डिफेन्सिव खेळत होती.. तमिरा फार पुढं जाइल असं मात्र वाटत नाही, तेव्हढं टेंपरामेंट वाटत नाहिये तिच्याकडं..
आता किमनं पहिला सेटतर आरामात घेतलाय..
टेंपरामेंट ?? समोरच्याकडून
टेंपरामेंट ?? समोरच्याकडून म्~अच पॉइंटवरून म्~अच काढलीय राव....देऊया की थोडं क्रेडीट......:)
नदालला जड जातंय आज.... पाच
नदालला जड जातंय आज....;)
पाच सेट्स होतील का?
नादाल ज्यांचा बाळ्या त्यांचे
नादाल ज्यांचा बाळ्या त्यांचे देव पाण्यात का?
टोट्ल Go Rosol नवे घोडे
टोट्ल
Go Rosol
नवे घोडे जिंदाबाद
गेला नदाल दुसर्ञा राउंडलाच
गेला नदाल दुसर्ञा राउंडलाच गारद झाला...गवत मानवलं नाही जणू ...;)
OMG! डेंजर दिसतो की हा रोसोल!
OMG! डेंजर दिसतो की हा रोसोल!
Pages