विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक आहे माझ्या पोष्टीत अजूनही बरेच काही होते आणि ते नेहमीप्रंमाणे दूर्लिक्षित होऊन केवळ विरोधासाठी विरोध होतोय असेच दिसते >>>>
चमन, "तुझ्या प्रत्येक पोस्टमधे हे असे काहि snippet असतेच जे दर वेळी तुझ्या पोस्टचा अर्थ संपूर्ण बदलते." असामी जे म्हणाला ते वरच्या पोस्टलाही लागू आहे. त्यामुळे त्या पोस्टमधल्या बाकी गोष्टींबद्दल मला काहीच बोलायचे नाही... Happy आणि बरेच काही सारखं सारखं दूर्लिक्षित होत आहे असं वाटत असेल तर फक्त मुद्द्याचं लिही.. Wink

ऑलिंपिकचा धागा काढला आहे ऑलरेडी... खेळाच्या मैदानात ग्रुपमध्ये आहे बघ...

लालूचे अभिनंदन.. !

आणि बरेच काही सारखं सारखं दूर्लिक्षित होत आहे असं वाटत असेल तर फक्त मुद्द्याचं लिही.. >>> हो म्हणजे फेडरर, सर्व्ह-व्हॉली, जोको-नदालच्या लिमिटेशन्स, पोस्ट मॅच स्टॅट्स/ अ‍ॅनालिसिस आणि मुख्य म्हणजे जोर लावत बॉल तडकावण्यापलिकडे जे काय टेनिस आहे, ते सोडून बाकी सगळं जे काही मुद्द्याचं चं आहे तेच आणि तेवढंच बोल. असंच ना Proud ठीक आहे प्रयत्न करतो.

लोला>>> माझ्या पोष्टींमुळे आपल्या माबो मालकांची महागामोलाची डिस्कस्पेस वाया जाण्यापलिकडे काही होत नाही हे मला पक्के माहित आहे Proud कशानेका होईना 'झालेना' ते महत्वाचे (रिझल्ट महत्वाचा) Proud
तू अजून रिझल्ट सांगणारी क्रूर पोस्ट नाही टाकलीस. Proud

अभिनंदन हो तुझे.

आज गो रॉजर म्हणावे की गो अँडी असा कायम पेच होता. शेवटी दोघांना प्रोत्साहन देत देत मॅच पाहिली. Happy शेजार्‍यांचा टीव्ही वेगळ्या मजल्यावर असल्याने आवाजाची जुगलबंदी झाली नाही.

रॉजरने जास्त चुका केल्या असे फार वाटले. पण तसेच अँडी दमला आहे असेही वाटत होते. दोघांची खेळायची स्टाइल सारखीच आहे की काय असेही मधूनच वाटले.

दोघंही मीडिऑकरच खेळले. मरे जास्त. दोघंही यापेक्षा उपांत्य फेर्‍यांत कितीतरी चांगले खेळले होते. फेडररने किती अनफोर्स्ड एरर्स कराव्यात? शेवटी फेडररचा अनुभव जिंकला.

अर्थात फेडररच्याच बाजूने असल्याने 'जो जीता वही सिकंदर' Proud

>> दोघंही मीडिऑकरच खेळले.
Uhoh

>>रॉजरने जास्त चुका केल्या असे फार वाटले.
चुका होत असल्या तरी बेधडक शॉट मारायची त्याची वृत्ती आहे. ते चांगलं आहे. शॉट बसत नाहीत म्हणून उगीच दुसर्‍याच्या चुकीची वाट बघत टुकूटुकू खेळलं तर हरण्याची शक्यताच जास्त असते असं मला वाटतं. फ्रेंच ओपन मधे तो हरत होता तरी बिनधास्त मारत होता. मला तेव्हाच जाणवलं होतं की याचे शॉट्स लवकरच बसायला लागणार! आज पण चुका झाल्या तरी मरेला ऑफ-बॅलन्स करणारे बरेच शॉट्स बसले.

रॉजरने जास्त चुका केल्या असे फार वाटले..>>>वरदा,बरोबर आहे.पण चिमण म्हणतोय तसं जेव्हा फेडरर ओपनली खेळत बेधडक शॉटस मारतो तेव्हा त्याच्या विनर्सवर तो त्याच्या अन्फोर्स्ड एरर्स कव्हर करतो. आणि कालही तसेच झाले.
पण हे नक्की की तो उपांत्य फेरीत जास्त चांगला खेळला.

अपेक्षे प्रमाणे मरेने फेडरर च्या बॅकहँड वर हल्ला चढवला होता पण खरे तर फेडरर फोरहँड मधे चुकंचा पाऊस पाड्त होता आणि बॅकहँड त्याला वाचवत होता.मरेने पहिल्या दोन सेट मधे फोरहँड वर दबाव वाढवला असता तर कदाचित जास्त फुकट पॉइंट मिळाले असते. बर झाल पाऊस पडल्या मंतर फेडररचा फोरहँड जोरात चालयला लगला.

मरे मनाने आधी हरला आणि नंतर मॅच हरला. पहिल्या दोन सेट मधे फेडररचा लीथल फोरहँडचा फटका चालत नसताना फेडरर शांत होता.

मयूरेश, तुझं आणि चिमणचं म्हणणं बरोबर आहे. पण कालचा खेळ नक्कीच फेडररचा क्लासिक खेळ नव्हता. मधनंमधनं फक्त त्या झलकी दिसत होत्या. पण जोकोविचबरोबर खेळताना एकूणच जी खेळाची पातळी होती, किंवा २००९ मधे नदालविरुद्ध अंतिम सामना खेळताना तो जसा खेळत होता त्याच्या काही शतांशानेच तो काल खेळला.

मरे चांगला खेळतो पण मला कधीच फेडरर-नादाल-सॅम्प्रस इ.च्या पातळीवरचा आहे असं वाटलं नाहीये. वयाच्या पंचविशीत तुम्हाला स्टॅमिना-जिगर दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते. पण वाढत्या वयाबरोबर स्वतःच्या खेळाला जास्त परिणामकारक करत तिशी-बत्तीशीपर्यंत कन्सिस्टन्सी राखून खेळणं-जिंकणं-ग्रँड स्लॅम च्या आव्हानांत कायम असणं हे ज्यांना जमतं ते ग्रेटच...

पण कालचा खेळ नक्कीच फेडररचा क्लासिक खेळ नव्हता.>>> पहिल्या सेटमध्ये मरेने पहिल्या आणि नवव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक करून फेडररवर प्रेशर आणल अस वाटल, मरेचे फोरहँड रिटर्न जबरी होते Happy
तरी अनुभवी फेडरर्च जिंकेल अस वाटत होत

ती जराश्शी टायपिंग एरर पडलीये असं म्हणू का? Proud

फेडरर आणि सॅम्प्रसएवढा ग्रेट आहे असं नाही मला म्हणायचं सिंडे पण तो तितक्या कन्सिस्टन्टली खेळू शकेल असं वाटतंय अजून. मला स्वतःला तो फारसा आवडत नाही....

माझा ऑलटाईम फेवरिट मॅकेन्रो.. Happy
http://www.youtube.com/watch?v=ydZ4AuqMjRo

मी या बाफावर सुरुवातीपासूनच होते रे पराग. रोमात. Happy
तुमच्याइतक्या घटपटादि चर्चा मला करता येत नाहीत त्यामुळे भाग घेतला नाही..

चमन.. टेक इट इझी माय फ्रेंड! Happy

फेडरर पुन्हा एकदा न. १! खरच कौतुकास्पद आहे. दोन अडिच वर्षे अजुन एक ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी झुंजत राहीला व त्याने विंबल्डन परत एकदा काबीज केलेच!

ही फायनल बघताना चमन व युरो म्हणतात त्याप्रमाणेच दिसत होते. फेडरर नेहमीप्रमाणे कुठलेच स्ट्रगल करताना वाटत नव्हता. कालचा त्याचा खेळ त्याच्या ऐन उमेदीत होता तितका फ्लुएंट नव्हता तरी त्याच्या खेळातली सहजता परत एकदा विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर लोकांना पाहायला मिळत होती. खर म्हणजे पहिला सेट तो जरी हरला तरी त्या सेटमधे मरेच खर म्हणजे खुप स्ट्रगल करताना दिसत होता. इ एस पि न वरचे ब्रिटिश कॉमेंट्रेटर्स निरपेक्षतेचा खुप आव आणत होते पण त्यांची होणारी चरफड ते लपवु शकत नव्हते.

मरेच्या रडण्याविषयी इथे कोणीच कसे लिहीले नाही? खुप दया आली बिचार्‍याची.. सगळ्या देशाच्या अपेक्षेच्या ओझ्याखाली पार दबुन गेला आहे तो.. जोपर्यंत तो त्या ओझ्याचा विचार करायला विसरत नाही तोपर्यंत तो ग्रँड स्लॅम जिंकण अवघड अहे.. त्याविरुद्ध.. फेडरर.. मॅच चालु असताना कधीच तो आपल्या इमोशन्स दाखवत नाही. पिट सँप्रासही असाच होता. नो वंडर दिज आर द टु टॉप विनर्स इन द हिस्टरी ऑफ द गेम!

मॅच बघताना मात्र सुंदर ग्राउंड स्ट्रोक्स बरोबरच बर्‍याच मस्त व्हॉलीज सुद्धा बघायला मिळाल्या ज्या विंबल्डनच्या सेंटर कोर्टवर दुर्मिळ होत चालल्या आहेत. मॅकेन्रो-बोर्ग्-कॉनर्स -बेकर- एडबर्ग-गोरान इव्हेनोव्हिक-सँप्रासच्या काळात तश्या व्हॉलीज व ड्रॉप शॉट्सने भरलेल्या विंबल्डनच्या फायनल्स बघायला काय वेगळीच मजा यायची ... कालच्या मॅचने त्या आठवणींना परत एकदा थोडासा उजाळा मिळाला..

बाय द वे.. मरेचा कोच लेंडल आहे म्हंणे.. वर कोणीतरी टॉप टेनिस प्लेयर्सच्या नावांच्या यादीत लेंडलला मिडिऑकर म्हटले आहे पण फेडरर व सँप्रासच्या खालोखाल १९ ग्रँड स्लॅम फायनल्स खेळुन त्याचा ३ रा नंबर आहे हे विसरु नका.. पण त्याचा शिष्य काल विंबल्डन फायनल हरताना पाहुन त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसुन येत होते की त्याला त्याचे विंबल्डन वरचे स्वतःचे स्ट्रगल आठवत आहे म्हणुन. एक खेळाडु म्हणुन त्याने विंबल्डन जिंकण्याचा कधीच अनुभव घेतला नाही व आता त्याच्या शिष्यालाही त्याच यातनेतुन जाताना पाहुन त्यालाही खुप यातना होत आहेत हे त्याच्या डोळ्यात दिसत होते..:(

आणी जाता जाता शेवटचे... ब्रेकफास्ट अ‍ॅट विंबल्डन हे सदर(अर्थातच विंबल्डन फायनल!)यंदा प्रथमच एन बी सी वर नव्हते त्यामुळे इ एस पि एन वर विंबल्डन फायनल बघताना खुपच वेगळे व कसेतरी वाटले..:(

मॅच चालु असताना कधीच तो आपल्या इमोशन्स दाखवत नाही >>> Happy ह्यातले चालु असताना हे महत्वाचे Happy बहुतेक सगळ्या सरफेसेस वर त्याचे रडुन झाले आहे Wink

या वर्षीच्या कव्हरेजसाठी ESPN चे शतशः आभार! सगळ्या टीव्ही आणि ऑनलाईन लाईव्ह मॅचेसकरता. ABC, NBC या माठांकडून ते काढून घेतले हे बरे झाले. पुरुषांची सेमि/फायनल रविवारी १२, १ नंतर (लोक 'देवळात' जाऊन आल्यावर!) रेकॉर्डिन्ग सुरु करायचे. तोवर तिकडे रिझल्ट लागलेला इन्टरनेट्वर वाचायला मिळायचा!
यंदाची फ्रेन्च ओपन लांबली तर टीव्हीवर दाखवलीच नाही! 'टुडे' शो महत्त्वाचा! 'टेनिस चॅनेल' शिवाय इलाजच नव्हता.

Go ESPN!

हे वाचा- Heroes and Zeros of Wimbledon 2012 Proud

ESPN Tennis Ratings Surged with Live Wimbledon Coverage

बघ न नुस्ती ताकत...;) मला वाट्लेल अझारेंका काय्तरी करेल पण श्या..

आमचा घोडा जिंकलाय न पण Happy

बघ न नुस्ती ताकत...;) मला वाट्लेल अझारेंका काय्तरी करेल पण श्या..

आमचा घोडा जिंकलाय न पण Happy

>> त्याच्या शिष्यालाही त्याच यातनेतुन जाताना पाहुन त्यालाही खुप यातना होत आहेत
हो अगदी अगदी.
मलाही फेडररला प्रोत्साहन देताना मधूनच गिल्टी वाटत होते. Happy मीडीयाने खूपच दबाव आणला होता .. देशाचा हीरो वगैरे म्हणून.

खास चमन सरां साठी

what lendl said in his interview about federer when federer had lost his number one position.

Lendl has a hard time believing Federer is in such a precarious position. “One thing Roger has in his favor is that everything comes so much easier for him,” says Lendl. “He can win points more easily. That’s never the case with Nadal, who’s more like Mats in that he has to get an opponent to miss or come up with a passing shot. Guys like Roger, McEnroe, even myself, we could hit a lot of winners, so there’s not the need to grind as much match after match.”

Says Lendl, “Roger’s on his way to becoming the greatest player ever.” Asked what counsel he’d give Federer now, Lendl spoke with signature bluntness: “Advice? Roger doesn’t need any. Just go and get it.”

Pages