विंबल्डन - २०१२

Submitted by Adm on 21 June, 2012 - 01:17

यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.

पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.

महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.

यंदा व्हिनस आणि किम ह्यांना मानांकन मिळालेले नाही. १९९७ नंतर पहिल्यांदाच व्हिनसचा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे!

हा धागा ह्या स्पर्धेची चर्चा करण्यासाठी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१००% अचूक forehand असणे हि अगदीच खुल्लक गोष्ट असल्यासारखे लिहिलेले वाटतेय बाबा हे. >> क्षुल्लक नाहीच आहे, म्हणूनच ईथे ऊल्लेख केला.
आता रिचर्ड क्रॅज्चॅकने विम्बल्डनमध्ये सॅम्प्रासला (खास करून मॅच पॉईंटवाला बघाच) हरवतांना मारलेले सर्विस रिटर्न्स बघाल तर ते एवढे अफलातून आहेत की हा कोणी तरी ऑल टाईम ग्रेटच प्लेअर आहे अशी बघणार्‍याची खात्रीच पटेल. पण म्हणून क्रॅज्चॅक सॅम्प्रासपेक्षा ग्रेट आहे असे होत नाही. सर्विस रिटर्न्सच्या जोरावरच तो ती स्लॅम जिंकला. पण एकदा समोरच्याने त्याच्या ह्या स्ट्राँग पॉईंटला ऊत्तर शोधले आणि संपलाच की त्याचा खेळ.

लोला>> तुम्ही त्या He can’t cook. चा शब्दशः अर्थ घेतलात? Uhoh

हे अ‍ॅनालिसीस वगैरे ची गरज फक्त फेडरर ला जेतेपदापासून दूर राखणार्‍या खेळाडूंपुरतीच आहे >> टॉप लोकांच्याच गुणांचं अ‍ॅनालिसिस करतात ना सशल. १०वीला ९५ टक्के पडलेल्याच विचारतात गणितात पैकी च्या पैकी पडले का? शास्त्रात पण ९५ का? वावा! म्हणजे सायन्स साईडला जाणार दिसतंय. की आयायटी देणार?
६१.२७ % पडलेल्या मराठीत किती आणि गणितात किती असं अ‍ॅनालिसिस करून काय करणार?

रिझल्ट्स महत्वाचे आहेत पण म्हणून स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस दुय्यम होतं का?
जेरेमी लिन बद्दल वाचलंत का? नसेल तर वाचा. मनीबॉल बघितलात का? नसेल तर बघा.

>>शब्दशः अर्थ घेतलात?
न्हाई. Proud
मनीबॉल बघितला. Happy

>>स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस दुय्यम होतं का?
छे,छे! अजिबात नाही.
२२ स्ट्रेट semis..

आज अझारेन्का आणि तमायराची म्~अच पण जोरदार झाली.पण अझारेन्का आक्रमक खेळतेय...मला वाटतं पुढच्या व्हिनसबरोबरच्या म्~अचसाठी ही बरी आहे...तिशीच्या मानाने व्हिनसपण सॉलिड आक्रमकपणा दाखवते आहे...

अवांतर - मध्येच एक चर्चा सुरू होती खेळाडूंचं grunting याबद्दल...ती पूर्ण ऐकली/पाहिलीका कुणी? त्यत मा र्टिनाने म्हटलं तिला एकदा हिंगिसबरोबर अशा आवाजामुळे लक्ष केंद्रित करता आलं नाही आणि तिने शेवटी कंम्प्लेंट केली..अर्त्थात मार्टिना ही सेमी हरली आणि नंतर फायनलला स्टेफीबरोबर हिंगिस अजिबात ग्रंटिंग न करता खेळली ती म्~अय्च स्टेफी जिंकली...:)
आता टेनिस असोशिएशन की कुठली तरी तत्सम गव्हर्निंग बॉडी यावर अंकुश ठेवण्यासाठी आवाज कित्पत केला तर चालेल अशा पद्धतीचं एक यंत्र विकसीत करतंय इतकं कळल.....

उप्स..माझं हे नेहमीचं आहे बब्बा....:) मला काय दोन्ही विल्यम्स म्हणून ध्यानचं देत नाही बघ...

पश्चिम किनारा निदान ऑस्ट्रेलियापेक्षा बरा नाही का विम्बल्डन साठी Wink लंच टायमला थोडं तरी लाइव्ह पाहता येतं...:)

कल फक्त लिसीकी वि. करबर टाय ब्रेक आणि तिसरा सेट बघायला मिळाला.
टाय ब्रेक मधे ३ मॅच पॉइंट वाचवल्या नंतर आणि फायनल सेट मधे १ सर्विस ब्रेक वर असताना लिसीकी ने मॅच घालवली. सेट नं. ३ मधे मोमेंट्म लिसीकी च्या बाजूने होते पण प्लेसमेंट वर भर देण्या ऐवजी जोरकस फटके मारण्याच्या नादात जास्त ओवर हिटींग होउन अनेक अन्फोर्स्ड एरर्स झाल्या आणि सामना गमवावा लगला.

करबर बाजु धरून होती ,म्हणा लिसीकी च्या जोरदार खेळा पुढे हाच उत्तम उपाय होता. लिसीली चे फटके इतके जोरदार होते की करबर कडे फार कमी वेळ होता रीटर्न शॉर्ट मारण्या करता.

काल म्हणे सेरेना बाईंनी १३ एसेस आणि २५ विनर टाकले किवीतोवा विरुद्ध मॅच मधे.

क्विटोव्हा बरोबरच्या मॅच मध्ये शेवटचा गेम सेरेनानी एसेस वरच जिंकला.
१. एस १५-०
२. १५ - १५
३. एस ३० - १५
४. ३० -३०
५. एस ४० - ३०
६. एस गेम सेट मॅच.

पराग ... माफ कर.. तुझा हा विंबल्डन २०१२ चा धागा जरा हायजॅक होत आहे खरा.. थोड टेनिस विषयी अवांतर बोलत असल्यामुळे.. पण समजुन घे..:)

चमन व युरो.. तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती वाचुन जर कोणी टेनिस आत्ताच बघायला लागला असेल त्याला वाटेल की नादाल व जाकोव्हिक फक्त अपोनंट त्यांच्यापेक्षा जास्त एरर्स करण्याचीच वाट बघत असतात व त्याच्याच जोरावर ते मॅचेस जिंकतात! पण जी लोक सातत्याने त्यांच्या मॅचेस बघतात ते कदापिही तसल्या अनुमानाला पोहोचणार नाहीत. किंबहुना मी तर असे म्हणेन की बाकी ९९% प्रतिस्पर्ध्यांपुढे जे शॉट्स हमखास विनर्स असले असते तसल्या विनर्सच्या लायकीच्या शॉट्सना परतवुन लावुन हे दोघे (व फेडररही !) त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे विनर्सचे प्रमाण कमी करतात! हे सत्य नाही असे म्हणणे म्हणजे दिवसा ढवळ्या लक्ख सुर्यप्रकाश असुनही डोळे गच्च बंद करुन घेउन रात्र आहे असे म्हटल्यासारखेच होईल.

खर म्हणजे मीसुद्धा कडवा फेडरर चाहताच आहे.. पण त्याही पेक्षा जास्त मी टेनिस चाहता आहे म्हणुन मी नादाल व जाकोव्हिकच्या खेळाकडे एका निरपेक्ष चष्म्यातुन बघतो . तुम्हीही थोडे निरपेक्षतेने त्या दोघांच्या खेळाकडे बघीतलेत तर तुम्हालाही त्यांचा डिफेन्सच नाही तर त्यांच्या खेळात असलेले सगळे पैलु दिसुन येतील याची मला खात्री आहे.

पण चमन म्हणतो तेही खरच की की फेडररचा खेळ या दोघांपेक्षा जास्त अष्टपैलु व गिफ्टेड आहे. पण तरीही नादाल हॅज हिज नंबर! नादाल डावखुरा असल्यामुळे तो त्याच्या शॉट्समधे जे अँगल्स निर्माण करतो त्याचा फेडररला खुप त्रास होतो हे जाणवत राहते पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे नादालचे (व सध्या गेल्या २ वर्षात जाकोव्हिकचे पण!) जबरदस्त कोर्ट कव्हरेज व नेव्हर गिव्ह अप अ‍ॅटिट्युड! च्यायला.. फेडररने मारलेला शॉट( नुस्ता फेडररने मरलेला तसा शॉटच नाही तर नादाल्-जाकोव्हिक एकमेकांविरुद्ध खेळतानाही एकमेकांचे तसे शॉट!) जो आपल्यासारख्या टीव्ही वर बघणार्‍याला देखील वाटतो की हा हमखास विनर आहे.. तसे कित्येक विनर्स हे दोघे त्यांच्या जबरदस्त कोर्ट कव्हरेजने व नेव्हर से डाय अ‍ॅटिट्युडने रिटर्न करतात व आपण फक्त मान शेक करत बघत राहतो व म्हणतो की अन्...!...बिलिव्हेबल!... तसे रिटर्न्स फेडररसारख्याला फ्रस्ट्रेट करतात तर बाकींच्यांची गोष्टच सोडा... जबरदस्त डिमोरलायझींग फिलिंग येत असेल त्या सगळ्यांना या दोघांविरुद्ध.. काय करु तरी काय या दोघांविरुद्ध विनर्स मारायला... असे त्यांच्या डोक्यात राहुन राहुन येत असेल असेच आपल्याला वाटत राहते.. व त्या फ्रस्ट्रेशनची परिणती मग त्यांच्या ढेपाळलेल्या खेळामधे होते व ते मग विनर्स निर्माण करायला डेस्परेट झाल्यामुळे ते डेस्परेट शॉट्स ट्राय करायला जातात व जास्तच एरर्स करायला लागतात. मग युरो सारखे लोक म्हणायला लागतात की नादाल्-जाकोव्हिकचे अपोनंट्स जास्त अनफोर्स्ड एरर्स करतात म्हणुन जाकोव्हिक्-नादाल जिंकतात!:)

चमन तु माझ्या फेडरर्-नादाल क्वचितच सर्व्ह अँड व्हॉली करतात या विधानाशी असहमत आहे असे म्हणालास. पण माझे असे निरिक्षण आहे की २००२ ते २००६ पर्यंत फेडरर सुद्धा विंबल्डनला सर्व्ह अँड व्हॉली करुनच खेळत असे व जिंकतही असे.. पण नादाल आल्यापासुन त्याने त्याचा सर्व्ह अ‍ॅन्ड व्हॉली खेळ क्लॉजेट मधे का ठेवुन दिला याचा कधी तु विचार केला आहेस? त्याने तसे का केले य प्रश्नाचे उत्तर मी वर नादालच्या (व गेल्या २ वर्षातल्या जाकोव्हिकच्या) खेळाच्या केलेल्या उहापोहात दिसेल.. नुसते टेनिस रॅकेट अधिक हलक्या झाल्या व टेनिस खेळ अधिक वेगवान झाला म्हणून आता सर्व्ह अँड व्हॉली करता येत नाही हे कारण अगदी न पटण्यासारखे आहे. असो..

हे सगळे लिहुनही मी इथे स्पष्ट करु इच्छितो की जर यंदाचे विंबल्डन फेडरर जिंकला तर माझा आनंद युरो व चमनच्या आनंदापेक्षा काकणभरही कमी नसेल..:)

मुकूंद माफी कसली मागतोस ?? आणि माझा कसला धागा ? टेनिसविषयी धाग्यावर टेनिसबद्दलच चर्चा होणार ना?

१००% अचूक forehand असणे हि अगदीच खुल्लक गोष्ट असल्यासारखे लिहिलेले वाटतेय बाबा हे. >>> असाम्या अगदी अगदी !

चमन, क्रॅज्चॅक बद्दल काय बोलला काही कळलं नाही ! आणि एकंदरीत परिपूर्ण टेनिस वगैरे काही नसतं! प्रत्येक जण सर्व्हिस करतो, प्रत्येक जण बॅकहँड, फोरहँड्स, ड्रॉप्स, लॉब्स मारू शकतो. प्रत्यक्ष मॅच मध्ये खेळताना जो ज्याचं शक्तिस्थान आहे त्याचा पुरेपुर वापर करणार, प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे हेरून त्यावर हल्ले चढवणार..
'परिपूर्ण' टेनिस खेळायचं म्हणून राफा आणि ज्योको आपली शैली सोडून कशाला खेळतील ?? आणि नवीन शॉट्स आत्मसात करणे म्हणजे काय हे ही मला कळलं नाही.. नंबर १,२ ,३ च्या टेनिस प्लेयर्सना सगळे शॉट्स मारता येतच असतात. प्रत्यक्ष खेळताना त्याचा वापर ते कमी अधिक करतात इतकच.

अजून एक उदाहरण द्यायचं तर स्टेफी ग्राफचा बॅकहँड अतिशय कच्चा होता.. म्हणून ती बर्‍याचदा फोरहँड कन्वर्ट करून मारायची... आजकालच्या बर्‍याच महिलांचा बॅकहँड, फोरहँड, सर्व्हिस (कालच्या लिसिकीचच बघा) सगळं खूप स्ट्राँग असत... म्हणून स्टेफीला अपरीपूर्ण म्हणणार का??

रिझल्ट्स महत्वाचे आहेत पण म्हणून स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस दुय्यम होतं का? >>>> नाही. पण म्हणून स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस महत्त्वाचे मानून रिझल्ट्ना दुय्यम स्थान देऊ नका..
युरो म्हणतात तसं डिफेंसिव्ह किंवा अचुकतेवर भर देणारी शैली तुम्हांला आवडत नसेल तर तसं म्हणा.. पण ती शैली आज रिझल्ट्स देतेच आहे. त्यामुळे तिला कमी लेखू नका..

जोरात विश्लेषण चालू आहे यंदा...

आज पुरुष विभागातील उपांत्य पूर्व फेरीचे सामने...
डोको(१) - मेयर(३१), फेडेक्स(३) - युझ्नी(२६), फेरर(७) - मरे(४), त्सोंगा(५) - कोलश्रायबर(२७)

आधीच्या फेरीत युझ्नी वगळता बाकीचे तसे सहज जिंकले आहेत.. उपांत्य फेरीत १,३,४,५ यायची शक्यता जास्त आहे.
फेररचा फॉर्म बघता मरे ला मॅच अवघड जाऊ शकते.. (५-५ जिंकणारा फार कष्ट न घेता जिंकलाय अपवाद त्यांच्यातील पहिल्या मॅचचा)
डोको, त्सोंगा सरळ सेट मध्येच जिंकण्याची शक्यता जास्त आहे.. डोको - मेयर एकच मॅच झाली आहे आणि ती डोको सरळ जिंकला आहे. त्सोंगानी कोलश्रायबरला ५ वेळा हारवले आणि एकदाच हारला आहे.
फेडेक्स मधूनच अंगात आल्यासारखा ढेपाळतोय.. पण त्याचा युझ्नी विरुद्धचा रेकॉर्ड बघता (१३-० जिंकताना फारसा त्रास झालेला नाही १३ पैकी फक्त एकदा डिसायडर सेट खेळावा लागला आहे) फेडेक्स पण सरळ सेट मध्ये जिंकेल असे वाटते आहे.

दुहेरी मध्ये काल भूपती - बोपण्णा, आणि पेस-स्टेपनेक ५ सेट खेळून हारले आहे.. मिर्झा बाईंची मॅच आज विल्यम्स भगिनींविरुद्ध होऊ शकते तसे झाल्यास त्यापण बाहेर पडतील बहुतेक.. बोपण्णाची मिश्र दुहेरीची मॅच अजून बाकी आहे.

कालची लिसिकी वि करबर मॅच मस्त झाली एकदम ! लिसिकी शेवटच्या सेटमध्ये १ गेम वाईट खेळली आणि हरली. करबरने खूप संयमी खेळ केला.. लिसिकीने जोरदार क्रॉसकोर्टचे फटके मारले. पण नंतर चुकाही केल्या...

आज उपांत्यपूर्व फेर्‍यांना मजा येणार

माझे घोडे... जोको आणि सेरेना.

महिलांमधे सेरेनाला थांबवायची ताकद असलेली कुणीच शिल्लक नाही.

मुकुंद काही तरी गैर समज होतो आहे. मी अस कोठेही म्हणलेलो नाही की राफा आणि जोको वाईट खेळाडु आहेत किंवा त्यांच्या खेळामुळे टेनिसचं नुकसन झालं आहे. त्यांचा डीफेंस समोरच्याला फ्रस्ट्रेट करतो आणि चुका करायला भाग पाड्तो हेच मी सुद्धा लिहीले आहे. हे त्यांच स्किल आहे आणि ते दुय्यम दर्जाचे आहे असे सुध्दा मी म्ह्टलेले नाही. तुम्ही त्यांचे टॉप १० सीडेड बरोबर्चे मॅच स्टॅट्स बघा , त्यांचे एक मेका बरोबरचे स्टॅट्स बघा. त्यांचे आणि प्रतिस्पर्ध्याचे विनर आणि अन्फोर्स्ड एरर मधिल तफावत बघा. स्टॅट्स हेच सांगेल त्यानी कमीत कमी एरर करून सामना जिंकलेला आहे जस्तिजास्त विनर मारुन नाही. फोर्सिग एरर ऑन अपोनंट इझ एक्वली हाय स्किल. हेच स्टॅट्स फेडरर किंवा इतर नॉन डीफेंसीव खेळाडु आणि प्रतिस्पर्ध्याचे बघा त्यातिल विनर मधला फरक बघा. .
याचा अर्थ मझा परीने इतकाच आहे की त्यांची स्टईल डीफेंसिव आहे.मला ती आवड्त नाही म्हण्जे मी त्याना वाई म्हटले असा होत नाही.
परीपूर्ण किंवा अष्ट्पैलु खेळ आहे की नाही या पेक्षा या दोघच्या खेळा मधे फेडररच्या खेळातील सहजता नाही असे मला वाटते. प्रचंड मेहेनत करून सामना जिंकल्याचा फील येतो.
व्यक्तीशः राफा वा जोको जिंकला तरी मला वाईट वाटत नाही किंवा फेडरर हरला म्हणून दु:ख होत नाही पण हे खरे की फेडरर चा खेळ बघताना जास्त आनंद मिळतो.
आणि नेव्हर से डाय अटिट्युड बद्द्ल म्हणाल तर माला मायकेल चँग सुध्धा आवड्त नाही. त्याने तर लेंडला वैतागवला होता.

चमन, क्रॅज्चॅक बद्दल काय बोलला काही कळलं नाही ! आणि एकंदरीत परिपूर्ण टेनिस वगैरे काही नसतं! >> पराग +१. चमन १००% अचूक forehands मारणे तू ज्या तर्‍हेने लिहिले आहेस ते एकदा फेडररचा चष्मा बाजूला ठेवून वाचून बघ नि मग सांग त्यातून काय अर्थ वाटतोय तो. जर क्रॅज्चॅक तसे १००% अचूक forehands प्रत्येक गेममधे मारत असेल तर तुझ्या नंतरच्या पोस्टला अर्थ आहे बाबा, फक्त एका मॅचमधे मारले, तर अशी उदाहरणे पैशापासरी सापडतील. अगदी फेडररविरुद्ध पण Happy

तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती वाचुन जर कोणी टेनिस आत्ताच बघायला लागला असेल त्याला वाटेल की नादाल व जाकोव्हिक फक्त अपोनंट त्यांच्यापेक्षा जास्त एरर्स करण्याचीच वाट बघत असतात व त्याच्याच जोरावर ते मॅचेस जिंकतात! >> मुकुंद खर तर हा गेम प्लॅन सुद्धा तेव्हढाच कठीण आहे (कारण त्याला फक्त स्किल्स नाहि तर स्टॅमिना, court coverage, concentration लागते). त्यातला हुनर कळला कि मग लेक्षात येते कि ह्यालाही तेव्हढेच स्किल्स लागते आणी ते ही offensive खेळाएव्हढे Enjoy करता येते.

नाही. पण म्हणून स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस महत्त्वाचे मानून रिझल्ट्ना दुय्यम स्थान देऊ नका..>> +1

रिझल्ट्स महत्वाचे आहेत पण म्हणून स्टॅट्स/अ‍ॅनालिसिस दुय्यम होतं का? >> I beg to differ here. In first place, stats and analysis are 2 different things. stats are and will always be secondary to results (and analysis). Analysis IS important but ask any sports player, and he/she will prefer result over it. (e.g. 2007 Superball Lol )

गो मरे!

दुसर्‍या सेटचा टायब्रेकर चांगला फिरवला! Happy

राजकुमार आणि राजकुमारी अजूनही आहेत .. फारच प्रेशर!

मुकुंद तुमच्या पोस्टशी सहमत.

तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये फेडररच्या सर्व्ह/व्हॉली आणि राफा/जोकोच्या गेमबद्दल जे लिहिलं तेच मी माझ्या आधीच्या पोस्टमध्ये एकाच वाक्यात लिहिलं होतं >>>>>पण तो सर्व्ह/व्हॉली अताश्या करत नाही हे मान्य कारण नदाल्/जोकोच्या खेळाच्या वेगाशी कीप अप करतांना त्याला ते करणं पहिल्यासारखे जमत नाही<<<< Happy

वरवर पाहता वापरलेल्या शब्दांमुळे वेगवेगळा अर्थ निघत असला तरी मतितार्थाने आपण एकच गोष्टं सांगत आहोत. फक्त मी ती फेडररप्रेमाच्या अतिरेकामुळे ती जास्त रेटून सांगत आहे एवढंच. Happy

ईसपीनवरचं आजचं ताजं आर्टीकल आपण सगळे जे बोलत आहोत तेच सांगतंय.
आणि त्या आर्टीकलच टायटल पण कसलं अ‍ॅप्ट आहे "Beyond the scoreboard for Federer" जणू लिहिणार्‍याने ईथली चर्चा वाचूनच लिहायला घेतलंय. असामी, पराग, सशल वाचा बरं हे.
त्यातले काही मुद्दे ईथे देण्याचा मोह प्रयत्नकरूनही आवरता येत नाहीये.

The truth about Federer, of course, goes far beyond the instant narrative. It goes beyond the scoreboard. He is his own aesthetic, both demigod and alien to anyone who has ever tried to play the game or played it well enough to have the fortune to play against him. He is a marvel and a genius at his profession.

Over the past couple of years, as the muscle of Nadal and the willpower and defense of Djokovic have dominated the Grand Slam events, there is an easy tendency to overlook Federer's gifts. He is still a marvel to watch simply because of his mastery of every aspect of the sport. He has every shot for every surface in every situation. Unlike Nadal, he does not often run around his backhand. Unlike Djokovic, he did not need years to construct himself Slam capable.

असामी पराग,

क्रॅज्चॅकचं ऊदाहरण ह्यासाठी दिलं की केवळ एका स्कीलच्या जोरावर त्याने पूर्ण स्लॅम मारून नेली पण जेव्हा हे स्कील काऊंटर झालं तेव्हा त्याच्याकडे बाकी गेम नसल्याने त्याच्या घोडदौडीला अचानक खीळ बसली. अजूनही कारणं आहेतच त्याला का थांबावं लागलं ह्याची.

फेडी आणि जोको व नदाल ह्यांच्या खेळाचं थोडक्यात विश्लेषण मांडायचं झालं तर मला असं वाटतं की
नदाल, जोकोचा खेळ ८०% (पॉवर + स्टॅमिना) + २०% (युनिक स्कील्स) असा आहे
तर फेडीचा खेळ ६०% (पॉवर + स्टॅमिना) + ४०% (वरायटी स्कील्स) असा आहे.

पॉवर/ स्टॅमिना वाढवणे टिकवून ठेवणे एका मर्यादेपर्यंतच शक्य आहे आणि तुम्हाला प्रत्येकवेळी ताज्या दमाच्या खेळाडूला पुरून ऊरणे जमणार नाही. ह्याऊलट मुळातच तुमच्याकडे भरपूर गेम स्कील्स असतील आणि सततच्या सराव/अनुभवातून तुम्हाला ती शार्प ठेवणे जमत असेल तरच तुम्ही तुमचा खेळ आणि सीड ऊंचावत नेऊ शकाल.
६०% वर (पॉवर + स्टॅमिना) टिकवून ठेवणेही पर्यायाने ८०% पेक्षा सोपे आहे. म्हणूनच फेडरर, सॅम्प्रास एवढी वर्षे मेजर ईंजूरी न होता सलग सगळे स्लॅम्स खेळत आणि जिंकत (सेमीपर्यंत का असेना Wink ) राहू शकतात. नदाल आणि जोकोच्या बाबतीत काय होईल ते येणारा काळच सांगेल आणि आपण सगळे ते पाहणारच आहोत.

फक्त ऑफसाईडला १००% अचूकतेने खेळणारा गांगूली आणि चौफेर तंत्रशुद्ध फलंदाची करणारा द्रविड ह्यात जो फरक आहे तोच फरक नदाल-जोको आणि फेडी मध्ये आहे. तुम्ही त्यांच्या वनडेतली शतकं, सरासरी आणि स्ट्राईकरेट बघून म्हणाल की गांगूली द्रविडपेक्षा चांगला क्रिकेटर होता पण ते खरे नाही.

ऑन अ सिरिअस नोट,
जोको किंवा नदालची थट्टा करणं वगैरे विनोदाचा भाग आहे 'मे द बेस्ट प्लेअर विन' हेच मलाही नेहमी वाटतं आणि फेडररचा सध्याचा गेम पाहून वैतागही येतो पण त्याची जबरदस्त पुण्याई तो खेळतोय तो पर्यंत दुसर्‍या कुणा खेळाडूला 'हा आपला घोडा' असे म्हणू देत नाही. Proud

हे वाईट वाटणे/ राग येणे वगैरे टेनीस बीबीवर कशाला व्हायला हवे? तसले काही होत नाही. बिनधास्त लिहा सगळे.

छे! त्या गतकाळच्या चौफेर खेळाच्या आणि फेडरर एके फेडरर प्रेमाच्या टेररीझममुळे मला तर बुवा इथे ज्योको ला चीअर करणार्‍या किंवा त्याची कौतुकं करणार्‍या पोस्ट्स टाकण्याची भिती वाटते! :p Happy

मी तर म्हणते प्रत्येक टेनीस स्लॅम चा एक बीबी काढण्यापेक्षा दोन काढावेत .. एकावर फेडरर प्रेमींनीं त्याच्या कौतुकाचे गोडवे आणि अ‍ॅनलिसीस् करावं म्हणजे दुसर्‍यावर आम्ही आमच्या फेडररेतर टेनीस खेळाडूंविषयी बोलू शकू! :p

(बॉलीवूडच्या प्रत्येक अ‍ॅवार्ड सेरेमॉनी ला कसं किमान एकदा तरी अमिताभ-रेखावर कॅमेरे नेऊन गतकाळच्या स्मृतींनां उजाळा देतात तसंच काहिसं ..:p)

छे! त्या गतकाळच्या चौफेर खेळाच्या आणि फेडरर एके फेडरर प्रेमाच्या टेररीझममुळे मला तर बुवा इथे ज्योको ला चीअर करणार्‍या किंवा त्याची कौतुकं करणार्‍या पोस्ट्स टाकण्याची भिती वाटते! >>>
तो जोको तिथे फेडरर आणि नदालच्या खर्‍याखुर्‍या टेररीझमला न डगमगता तोंड देतोय आणि तुला ईथल्या शाब्दिक चकमकींची भिती वाटते .... You don't deserve to be a fan of Djokovic Period!! Proud

मी तर म्हणते प्रत्येक टेनीस स्लॅम चा एक बीबी काढण्यापेक्षा दोन काढावेत .. एकावर फेडरर प्रेमींनीं त्याच्या कौतुकाचे गोडवे आणि अ‍ॅनलिसीस् करावं म्हणजे दुसर्‍यावर आम्ही आमच्या फेडररेतर टेनीस खेळाडूंविषयी बोलू शकू! >>> म्हणजे 'गो अमुक गो तमुक' आणि 'पहिला सेट घेतला बरं, आता दुसरा ही घेतला बरं. मग तिसराही घेतोच आहोत बरं' एवढंच लिहायला नवा बीबी हवा ना! Wink Proud

आणि त्या आर्टीकलच टायटल पण कसलं अ‍ॅप्ट आहे "Beyond the scoreboard for Federer" जणू लिहिणार्‍याने ईथली चर्चा वाचूनच लिहायला घेतलंय. असामी, पराग, सशल वाचा बरं हे. >> चमन, मूळात मी काय किंवा पराग काय, आम्ही दोघेही तुझ्या १००% वाल्या comments बद्दल बोललो होतो, फेडररबद्दल नाहि. म्हणूनच "तुला फेडररप्रेमाचा चष्मा बाजूला काढ नि परत वाच" असे मी वर म्हटले होते.

फेडी आणि जोको व नदाल ह्यांच्या खेळाचं थोडक्यात विश्लेषण मांडायचं झालं तर मला असं वाटतं की
नदाल, जोकोचा खेळ ८०% (पॉवर + स्टॅमिना) + २०% (युनिक स्कील्स) असा आहे
तर फेडीचा खेळ ६०% (पॉवर + स्टॅमिना) + ४०% (वरायटी स्कील्स) असा आहे.>> जोवर " ८०% (पॉवर + स्टॅमिना) + २०% (युनिक स्कील्स) " "६०% (पॉवर + स्टॅमिना) + ४०% (वरायटी स्कील्स)" ला बरेचदा तोडीस तोड ठरतेय तोवर ते दुय्यम हे कशाच्या जोरावर ठरवणार ? मूळात दोन्हीचा skill set तेव्हढाच कौतुकास्पद आहे.

फक्त ऑफसाईडला १००% अचूकतेने खेळणारा गांगूली आणि चौफेर तंत्रशुद्ध फलंदाची करणारा द्रविड ह्यात जो फरक आहे तोच फरक नदाल-जोको आणि फेडी मध्ये आहे. तुम्ही त्यांच्या वनडेतली शतकं, सरासरी आणि स्ट्राईकरेट बघून म्हणाल की गांगूली द्रविडपेक्षा चांगला क्रिकेटर होता पण ते खरे नाही.>> ह्याएव्हढे चूकीचे उदाहरण होउ शकत नाहि. ह्यात वनडे हे मूळात दुय्यम आहे हे अतिशय चूकीचे ग्रुहितक आहे. दोन वेगवेगळ्या formats मधील उत्क्रुष्ट खेळाडूंची एकमेकांशी तुलना कशी होउ शकते ? नदाल-जोको आणि फेडी एकच खेळ नि एकच format खेळतात. ते जर singles नि doubles खेळत असते तरी समजू शकलो असतो.

अरे बाबा तू कुठल्या जादुगाराच्या पोतडीतून 'वन-डे दुय्यम आहेत' हे माझ्या प्रमेयामागचे गृहीतक होते असे अनुमान काढले. वन्-डे-टेस्ट असें तुलना करणारं कुठलंही विधान मी केले नाही रे.
माझं म्हणणं असं(च) आहे की गांगुली आणि द्रविडच्या वन-डे स्टॅट्सची (टेस्ट मुद्दामच नाही म्हणालो कारण टेस्टचे स्टॅट्स द्रविडच्या बाजूने एकतर्फी निकाल देतात Happy ) तुलना केल्यास कोणीही म्हणेल गांगुली हा द्रविडपेक्षा चांगला बॅट्समन आहे (जास्त सरासरी, जास्त शतकं) पण क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये, कोणत्याही प्रकारच्या पीचवर आणि कुठल्याही प्रकारची बोलींग खेळण्यासाठी लागणार्‍या तंत्राच्या बाबतीत द्रविड नक्कीच गांगुलीपेक्षा वेल-वर्स्ड आहे आहे आणि हे त्याने प्रत्येकवेळी दाखवून दिलंय हे तरी तू मान्य करशील की नाही ?
तेच मला फेडी आणि जोको-राफा च्या बाबतीत म्हणायचं होतं. त्यात वन्-डे-टेस्ट, ग्रास्-क्ले असं काही गृहीत नव्हतं धरलं. त्या ग्रास्-क्लेच्या मुद्द्याला पुन्हा न शिवता ईथेच सोडून देऊयात कारण त्यावर आधीच खूप बोलून झालंय. Happy

फेडररप्रेमाचा चष्मा आहेच पण ते प्रेम डोळस आहे आंधळं नाही Proud (च्यायला काय पण तद्दन फिल्मी रद्दड वाक्य सुचलंय)

सेमी फायनल चा पेपर फेडरर साठी कठीण आहे. जोको आपल्या खेळात वर सरकला आहे आणि फेडरर खाली. ही गॅप कोण कसा भरतो त्यावर रीझल्ट अवलंबुन असेल्.काही नाही तरी एक जबरद्स्त मॅच बघायला मिळावी अस expectation आहे. कोणीही जिंकला तरी दोघांनी स्ट्रेट सेट्स मधे सरंडर करू नये अस वाटत.

यंदा पहिल्यांदाच विंबल्डनचा धागा स्फोटक होतो आहे.... Lol

कालचे निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले... जोको, फेडेक्स सरळ सेट मध्ये जिंकले.. त्सोंगाला जरा कष्ट पडले. आणि मरेला जरा जास्तच कष्ट पडले.. पण अखेर तो जिंकलाच... मरे - फेरर मॅच मध्ये काही सर्व्ह अ‍ॅण्ड व्हॉली पॉईंट्स मस्त झाले.. त्सोंगा पण चांगला खेळला..

आज महिलांच्या उपांत्य लढती... सेरेना विजेती होण्याचे चान्सेस फारच आहेत... तिला कोणी हरवू शकेल असे वाटत नाहीये..

क्रॅज्चॅकचं ऊदाहरण ह्यासाठी दिलं की केवळ एका स्कीलच्या जोरावर त्याने पूर्ण स्लॅम मारून नेली पण जेव्हा हे स्कील काऊंटर झालं तेव्हा त्याच्याकडे बाकी गेम नसल्याने त्याच्या घोडदौडीला अचानक खीळ बसली. अजूनही कारणं आहेतच त्याला का थांबावं लागलं ह्याची. >>>>>> फेडरर, राफा, ज्योको ह्यांच्याबद्दल बोलताना क्रॅज्चॅकच्या एका ग्रॅडस्लॅम विजेतेपदाला 'घोडदौड' म्हणणं हेच मुळात विनोदी आहे !! त्यामुळे ती खंडीत होण्याचा प्रश्नच येत नाही.. Proud

ह्याऊलट मुळातच तुमच्याकडे भरपूर गेम स्कील्स असतील आणि सततच्या सराव/अनुभवातून तुम्हाला ती शार्प ठेवणे जमत असेल तरच तुम्ही तुमचा खेळ आणि सीड ऊंचावत नेऊ शकाल. >>>>> पुन्हा तेच ! त्यांच्याकडे गेम स्कील्स नाहीत असं तू कसं म्हणू शकतोस ?? गेम स्कील नसती किंवा कमी असती तर त्यांची 'घोडदौड' क्रॅज्चॅक इतकीच झाली असती.. त्यांची खेळायची स्टाईल / शैली वेगळी असू शकत नाही का?? ती वेगळी आहे आणि तुला आवडत नाही म्हणून तू ती दुय्यम होत नाही. (युरोनी हेच मंजूला दिलेल्या उत्तरात स्पष्ट लिहिलं आहे.)

स्टॅट्स द्रविडच्या बाजूने एकतर्फी निकाल देतात स्मित ) तुलना केल्यास कोणीही म्हणेल गांगुली हा द्रविडपेक्षा चांगला बॅट्समन आहे (जास्त सरासरी, जास्त शतकं) पण क्रिकेटच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये, कोणत्याही प्रकारच्या पीचवर आणि कुठल्याही प्रकारची बोलींग खेळण्यासाठी लागणार्‍या तंत्राच्या बाबतीत द्रविड नक्कीच गांगुलीपेक्षा वेल-वर्स्ड आहे आहे आणि हे त्याने प्रत्येकवेळी दाखवून दिलंय हे असा तरी तू मान्य करशील की नाही ? >>>>> तरीही चुकीचच उदाहरण. तंत्र कम्पेअर करायचं असेल तर द्रविड आणि गांगुली एखादा फटका कसा मारतात ते पहा.. वन डे (किंवा टी-२०) ह्या प्रकारात तंत्रशुद्दतेपेक्षा असणार्‍या परिस्थित सामना जिंकण्यासाठी कसा खेळ करतात हे महत्त्वाचं. त्यामुळे वन डे मधली आकडेवारी पाहून तुम्ही एखाद्या खेळाडूची तंत्रशुद्धता ठरवूच शकत नाही.

हिम्या ती अझारेंका पण बर्‍यापैकी ताकदवान खेळते ! त्यामुळे तिची आणि सेरेनाची मॅच चांगली होईल असं वाटते.

काल फेरर चांगला खेळला पण मोक्याच्या क्षणी संधी साधता आली नाही त्याला..

पराग 'घोडदौड' असे एकेक शब्द वेगळे काढून त्याच्या अर्थावर चर्वितचर्वण करून काय साध्य होणार आहे. तो शब्द कुठल्या कंटेक्स्ट मध्ये लिहिला आहे ते ध्यानात घेशील की नाही.

पुन्हा तेच ! त्यांच्याकडे गेम स्कील्स नाहीत असं तू कसं म्हणू शकतोस ?? गेम स्कील नसती किंवा कमी असती तर त्यांची 'घोडदौड' क्रॅज्चॅक इतकीच झाली असती.. त्यांची खेळायची स्टाईल / शैली वेगळी असू शकत नाही का?? ती वेगळी आहे आणि तुला आवडत नाही म्हणून तू ती दुय्यम होत नाही. (युरोनी हेच मंजूला दिलेल्या उत्तरात स्पष्ट लिहिलं आहे.) >>>
ती वेगळी आहे आणि तुला आवडत नाही म्हणून तू ती दुय्यम होत नाही.
हे तुझंच वाक्य मी अशा प्रकारे लिहितो.
ती वेगळी आहे आणि (अपूर्णही आणि म्हणून) मला आवडत नाही म्हणून(च) मी तिला 'दुय्यम' न म्हणता 'परिपूर्ण नाही' म्हणालो.

चांगले आणि युनिक गेम स्कील्स नक्कीच आहेत पण ते लिमिटेड आहेत आणि ते फेडररच्या स्कील्सएवढे वर्साटाईल नाहीत (हे पुन्हा एकदा). फेडररकडे गेमस्कील आहे म्हणून तो काही वयाच्या पन्नाशीपर्यंत स्लॅम्स खेळू शकतो असेही नाही. त्याचं करीयर ऊतरणीला लागलं आहे हेही मान्य. पण ते स्कील कमी असल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे नाही तर राफा-जोकोच्या तुलनेत फिटनेस (वेग+ पॉवर +स्टॅमिना आणि पर्यायाने कोर्टकवरेज व पोझिशनिंग) कमी पडत असल्यामुळे.

नुसते बॉल रिटर्न केले आणि त्यालाच टेनिस म्हणायचं असेल तर आपल्याला कोर्टाच्या एका कोपर्‍यातून दुसर्‍या कोपर्‍यापर्यंत धावत दंडातला जोर लावत बॉल ढकलणारे स्प्रिंटर्स एवढंच टेनिस दिसणार. नदाल जोकोने जे पीअर प्रेशर आणलं आहे त्याला तोंड देण्यासाठी दुसरा पर्यायही नाही दिसत आहे म्हणा, पण मला तरी त्यातला कोणीही फेडररचा-सॅम्प्रासचा वारसदार वाटत नाही मग त्यांनी जिंकलेल्या ग्रँडस्लॅमचे आकडे काहीही सांगोत. ठीक आहे येईलही कोणीतरी नंतर ज्याच्याकडे गेमही असेल आणि फिटनेसही किंवा ह्यांच्यापैकी कोणीतरी 'मला सगळे शॉटस आणि ह्या खेळाची प्रत्येक शैली आत्मसात करून खेळायची आहे' असं म्हणत खेळू लागला तर आनंदच आहे पण पुन्हा तेच, पीअर प्रेशर त्यांना त्यांच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येऊ देणार नाही हेही तिकतेच खरे.
वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. अगदी एकानेच सत्ता गाजवायला हवी असंही काही नाही किंवा एकाकडेच १०० % गुणवत्ता असेल असेही काही नाही. फक्त खेळात एकसुरीपणा नसून गुणवत्ता आणि वैविध्य हवं एवढंच म्हणणं आहे.

जाऊदेत आता, सेमीज आणि फायनल यन्जॉय माडी.
आपण सगळे "Tennis- Survival of the fittest" ह्या स्पर्धेचा आनंद लुटूयात Sad .

Over the past couple of years, as the muscle of Nadal and the willpower and defense of Djokovic have dominated the Grand Slam events, there is an easy tendency to overlook Federer's gifts. He is still a marvel to watch simply because of his mastery of every aspect of the sport. He has every shot for every surface in every situation. Unlike Nadal, he does not often run around his backhand. Unlike Djokovic, he did not need years to construct himself Slam capable.

मला आधीपासून जे काही म्हणायचं होतं ते ह्या वरच्या ऊतार्‍यात नेमकं आणि स्पष्टं लिहिलेलं आहे. तुम्ही ते कितीही अमान्य केलंत तरी तेच त्रिकलाबाधित सत्य. Proud

Pages