झटपट आंबा लाडू.

Submitted by सुलेखा on 9 June, 2012 - 03:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

जिन्नस घरात असले तर झटपट होणारे लाडू आहेत.बिघडण्याची रिस्क तर अजिबात नाही. आज जास्त प्रमाणात केले आहेत्.ते प्रमाण दिले आहे.प्रमाण कमी घेतले तर वेळ कमी लागेल.इथे मिश्रण थंड होण्याचाही वेळ मोजला आहे.एका वाटी खोबरा बूरा घेवुन केले तर १५ मिनिटात लाडू तयार होतात.
लागणारे जिन्नसः-
६वाट्या खोबरा बूरा.किंवा डेसिकेटेड कोकोनट.
४ वाट्या एव्हरीडे मिल्क पावडर.
१ १/२ वाटी पिठी साखर.
२ वाट्या हापुस आंब्याचा रस.

क्रमवार पाककृती: 

मिक्सर मधुन आमरस फिरवुन घ्यावा.त्यातील गुठळ्या मोडल्या पाहिजेत.
एका मोठ्या मावे.च्या बाऊल मध्ये खोबरा बूरा+मिल्क पावडर+पिठीसाखर हाताने मिक्स करुन घ्या.आता त्यात आमरस थोडा-थोडा टाकत मिश्रण छान कालवुन घ्या.सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
आता मावे.मधे हाय-पॉवर वर २-२-२ मिनिटे असे ३ वेळा ठेवले.प्रत्येक वेळी मिश्रण चमच्याने छान ढवळुन घेतले.मिश्रणाचे लहान गोल गोळी वळुन पाहिली तर ती थोडी बसत होती , मिश्रण थोडेसे ओलसर वाटले म्हणुन शेवटी अजुन एकदा २ मिनिटे ठेवले.आता बाऊल मावे च्या बाहेर काढुन ठेवला.amba ladu 111.JPG
मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर तिळाच्या लाडूच्या आकारचे लाडू वळायला सुरवात केली.एका ताटात लाडू वळुन ठेवले.
amba ladu 222.JPG
पुर्ण गार झाल्यावर आस्वाद घेण्यासाठी एका बाऊल मधे भरुन ठेवले.
amba ladu 333.JPG
२] वरील मोजमापाप्रमाणे आपल्याला पाहिजे असेल तितक्या प्रमाणात डेसिकेटेड खोबरे,मिल्कपावडर्,पिठीसाखर व अगदी थोडेसे दुध किंवा साय घेतली तरी चालेल.[मिश्रण ओलसर होईल इतकेच]हे सगळे एकत्र करुन मावेत शिजवुन घ्या.या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात कोको पावडर मिसळुन ३० सेकंद मावेत ठेवा.मिश्रण थंड झाले कि अगदी लहान मुदाळ्यात किंवा वाटीत दोन्ही मिश्रण अर्धे -अर्धे भरुन त्याच्या वड्या करा.
कोको पावडर मिश्रणाला चॉकलेटी रंग येईल इतकीच घालावी.जास्त घातल्यास कोको चा कडु पणा जाणवेल.त्यासाठी टी स्पून वापरावा व तयार मिश्रणाची चव पहावी.
half-half 002.JPG
चॉकोलेट चवीच्या वड्या चवीला खूप छान लागतात..

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी २ तर हवेतच.
अधिक टिपा: 

१] आंब्याचा नैसर्गिक रंग आणि स्वाद आहे.कोणतेही एसेन्स व तूप अजिबात वापरले नाही.
२]हापुस ऐवजी इतर कोणताही आंबा वापरता येतो.
३]केशरी रंगाचा रस असला तर तयार लाडू ला तळलेल्या गुलाबजाम सारखा सुरेख रंग येतो.
४]आमरसाच्या गोडीवर पिठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करता येते.
५]पिठीसाखर घालताना एव्हरीडे मिल्क पावडर गोड आहे हे लक्षात असु द्यावे.
त्यामुळे सगळे मिश्रण कालवुन चव पहावी.
६]आंब्याप्रमाणे काप्या फणस,अननस.स्ट्राबेरी चा पल्प,ड्रिंकींग-चॉकोलेट घालुन हे लाडू करता येतील.
७]लाडू च्या आत गुलकंद्,काजु-बदाम तुकडा,चॉकोलेट मिश्रण थोडेसे वेगळे शिजवुन त्याची लहान गोळी आत भरुन दोन रंगातले लाडू करता येतील.
८]कोणतेही फळ न घालता फक्त खोबरा बूरा,व मिल्क पावडर,पिठी साखर व हे मिश्रण भिजेल इतपत दुध घालुन तर मावामिश्रीचे अप्रतिम सुंदर पांढरे लाडू तयार होतात.त्यामुळे ऐन वेळी प्रसंग उत्तम साजरा करता येतो.
९] चुकुन कधी मिश्रण सैल रहिले तर-- तर लाडू वळुन एका लहान प्लेट मधे खोबरा बूरा घेवुन त्यात घोळवावे.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी..
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा........कसले सही दिसताहेत गं लाडू....... एकदम सोप्पी रेसिपी Happy

मस्त,मस्त...आवडली, पण डेसिकेटेड कोकोनट ऎवजी खोबरा बुराच वापरावा असे माझे मत आहे

अश्विनी, ओले खोबरेही चालते.फक्त मिश्रण आळायला थोडा जास्त वेळ लागेल इतकेच.खोवलेले खोबरे एकदाच मिक्सरमधुन फिरवुन घे.

किती दिवस टिकतील हे लाडू ( म्हणजे उरले तरः))...
प्रवासात न्यायला सोयीस्कर पडतील का?
फ्रीज मध्ये राहतील की बाहेरही टिकतील??

Pages