जिन्नस घरात असले तर झटपट होणारे लाडू आहेत.बिघडण्याची रिस्क तर अजिबात नाही. आज जास्त प्रमाणात केले आहेत्.ते प्रमाण दिले आहे.प्रमाण कमी घेतले तर वेळ कमी लागेल.इथे मिश्रण थंड होण्याचाही वेळ मोजला आहे.एका वाटी खोबरा बूरा घेवुन केले तर १५ मिनिटात लाडू तयार होतात.
लागणारे जिन्नसः-
६वाट्या खोबरा बूरा.किंवा डेसिकेटेड कोकोनट.
४ वाट्या एव्हरीडे मिल्क पावडर.
१ १/२ वाटी पिठी साखर.
२ वाट्या हापुस आंब्याचा रस.
मिक्सर मधुन आमरस फिरवुन घ्यावा.त्यातील गुठळ्या मोडल्या पाहिजेत.
एका मोठ्या मावे.च्या बाऊल मध्ये खोबरा बूरा+मिल्क पावडर+पिठीसाखर हाताने मिक्स करुन घ्या.आता त्यात आमरस थोडा-थोडा टाकत मिश्रण छान कालवुन घ्या.सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे.
आता मावे.मधे हाय-पॉवर वर २-२-२ मिनिटे असे ३ वेळा ठेवले.प्रत्येक वेळी मिश्रण चमच्याने छान ढवळुन घेतले.मिश्रणाचे लहान गोल गोळी वळुन पाहिली तर ती थोडी बसत होती , मिश्रण थोडेसे ओलसर वाटले म्हणुन शेवटी अजुन एकदा २ मिनिटे ठेवले.आता बाऊल मावे च्या बाहेर काढुन ठेवला.
मिश्रण थोडेसे थंड झाल्यावर तिळाच्या लाडूच्या आकारचे लाडू वळायला सुरवात केली.एका ताटात लाडू वळुन ठेवले.
पुर्ण गार झाल्यावर आस्वाद घेण्यासाठी एका बाऊल मधे भरुन ठेवले.
२] वरील मोजमापाप्रमाणे आपल्याला पाहिजे असेल तितक्या प्रमाणात डेसिकेटेड खोबरे,मिल्कपावडर्,पिठीसाखर व अगदी थोडेसे दुध किंवा साय घेतली तरी चालेल.[मिश्रण ओलसर होईल इतकेच]हे सगळे एकत्र करुन मावेत शिजवुन घ्या.या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात कोको पावडर मिसळुन ३० सेकंद मावेत ठेवा.मिश्रण थंड झाले कि अगदी लहान मुदाळ्यात किंवा वाटीत दोन्ही मिश्रण अर्धे -अर्धे भरुन त्याच्या वड्या करा.
कोको पावडर मिश्रणाला चॉकलेटी रंग येईल इतकीच घालावी.जास्त घातल्यास कोको चा कडु पणा जाणवेल.त्यासाठी टी स्पून वापरावा व तयार मिश्रणाची चव पहावी.
चॉकोलेट चवीच्या वड्या चवीला खूप छान लागतात..
१] आंब्याचा नैसर्गिक रंग आणि स्वाद आहे.कोणतेही एसेन्स व तूप अजिबात वापरले नाही.
२]हापुस ऐवजी इतर कोणताही आंबा वापरता येतो.
३]केशरी रंगाचा रस असला तर तयार लाडू ला तळलेल्या गुलाबजाम सारखा सुरेख रंग येतो.
४]आमरसाच्या गोडीवर पिठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करता येते.
५]पिठीसाखर घालताना एव्हरीडे मिल्क पावडर गोड आहे हे लक्षात असु द्यावे.
त्यामुळे सगळे मिश्रण कालवुन चव पहावी.
६]आंब्याप्रमाणे काप्या फणस,अननस.स्ट्राबेरी चा पल्प,ड्रिंकींग-चॉकोलेट घालुन हे लाडू करता येतील.
७]लाडू च्या आत गुलकंद्,काजु-बदाम तुकडा,चॉकोलेट मिश्रण थोडेसे वेगळे शिजवुन त्याची लहान गोळी आत भरुन दोन रंगातले लाडू करता येतील.
८]कोणतेही फळ न घालता फक्त खोबरा बूरा,व मिल्क पावडर,पिठी साखर व हे मिश्रण भिजेल इतपत दुध घालुन तर मावामिश्रीचे अप्रतिम सुंदर पांढरे लाडू तयार होतात.त्यामुळे ऐन वेळी प्रसंग उत्तम साजरा करता येतो.
९] चुकुन कधी मिश्रण सैल रहिले तर-- तर लाडू वळुन एका लहान प्लेट मधे खोबरा बूरा घेवुन त्यात घोळवावे.
मस्त
मस्त
अहाहा........कसले सही
अहाहा........कसले सही दिसताहेत गं लाडू....... एकदम सोप्पी रेसिपी
यम्मी यम्मी !!!.. तुमच्या
यम्मी यम्मी !!!.. तुमच्या रेसिपिज ची मी फॅन आहे.
सुलेखा मी अत्ताच हे लाडु
अनघा,कसले भारी दिसतायेत.
अनघा,कसले भारी दिसतायेत. यम्मी.
सुरेखच! क्रुतीपण सोपी वाटतेय,
सुरेखच! क्रुतीपण सोपी वाटतेय, टिपा आवडल्या..
मस्त
मस्त
सुरेख! दोन्ही लाडूंचे फोटो
सुरेख!
दोन्ही लाडूंचे फोटो झकास!
मस्त,मस्त...आवडली, पण
मस्त,मस्त...आवडली, पण डेसिकेटेड कोकोनट ऎवजी खोबरा बुराच वापरावा असे माझे मत आहे
निवेदिता,दुकानात तयार मिळणारा
निवेदिता,दुकानात तयार मिळणारा पांढरा-शुभ्र खोबरा-बुरा म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट.
ओले खोबरे चालेल का? काही बदल
ओले खोबरे चालेल का? काही बदल करावे लागतील?
सुलेखा, तोंपासु एकदम कधी येऊ
सुलेखा, तोंपासु एकदम
कधी येऊ खायला?
अश्विनी, ओले खोबरेही
अश्विनी, ओले खोबरेही चालते.फक्त मिश्रण आळायला थोडा जास्त वेळ लागेल इतकेच.खोवलेले खोबरे एकदाच मिक्सरमधुन फिरवुन घे.
दक्षिणा,केव्हा येतेस? लौकर
दक्षिणा,केव्हा येतेस? लौकर ये.
काय सुंदर केशरी रंग
काय सुंदर केशरी रंग आलाय......म स्त..
मस्त. तोंपासु..स्ल्ल्ल्ल्
मस्त. तोंपासु..स्ल्ल्ल्ल्
मस्त लगेच करुन बघते
मस्त लगेच करुन बघते
सुपर!!
सुपर!!
मस्तच! अनघा, सुरेख दिसतायेत
मस्तच!
अनघा, सुरेख दिसतायेत लाडू.
किती दिवस टिकतील हे लाडू (
किती दिवस टिकतील हे लाडू ( म्हणजे उरले तरः))...
प्रवासात न्यायला सोयीस्कर पडतील का?
फ्रीज मध्ये राहतील की बाहेरही टिकतील??
धन्यवाद बिल्वा , भान
धन्यवाद बिल्वा , भान
बिनु,बाहेर टिकणार नाहीत ताजा
बिनु,बाहेर टिकणार नाहीत ताजा आमरस आहे ना त्यात.थंड हवामान असेल तरच फ्रिज बाहेर टिकेल.
माझे लाडू एकदम झकास झाले,
माझे लाडू एकदम झकास झाले, धन्यवाद काल चॉकलेट लाडू केले, ते पण एकदम HIT
सुलेखा, हे लाडु खुट्खुटीत
सुलेखा, हे लाडु खुट्खुटीत होतात का?
नका गं वर आणु अशा विथ छान
नका गं वर आणु अशा विथ छान फोटो रेसिपिजना
ऑर्डर द्याय्ची सोय हवीञ 
सुरेख अन चविष्ट
सुरेख अन चविष्ट
झी,अगदी खुटखुटीत होत नाही पण
झी,अगदी खुटखुटीत होत नाही पण मऊसर होतात.
काय झक्कास रंग आलाय... करून
काय झक्कास रंग आलाय... करून बघणारच
भारी आहे रेसिपी.. करुन बघणार
भारी आहे रेसिपी.. करुन बघणार नक्की.
एकदम तोंपासु....गुपचूप लाडू
एकदम तोंपासु....गुपचूप लाडू पण आवडले होते.
Pages