निसर्गाच्या गप्पा (भाग ९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 June, 2012 - 14:36

निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.

सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्‍यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.

एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.

(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

अनुक्रमणीका:
पान १ -

प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.

माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...

माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती

पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय

पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख

पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.

पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new

पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new

पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड

पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा

पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325

पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल

माहीती : बिब्बा

लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html

पान १३

प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित

पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल

पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm

पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन

पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001

पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,

पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता

पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/

पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134

पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090

पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I

पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512

पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,

पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,

पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्‍या-गिधाडे, वारी

पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक

पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/

पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/

पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली

पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली

पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\

पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे लिहायचे विसरुन गेले. या रविवारी ऑफिसमधल्या एका मैत्रिणीला जायची इच्छा होती म्हणुन तिला घेऊन कर्नाळ्याला गेले. तिथे आधी चार पाच पिंजरे लागतात ज्यात अनाथ पक्षी/प्राणी आहेत. त्यात दोन मोर होते, एकाचा पिसारा गळलेला आणि एकाचा अर्धा-पाऊण शाबुत.

त्या अर्ध्या-पाउण शाबुतवाल्या मोराने चक्क कमाल केली. मी लांबुनच त्याला पाहिले, तेव्ह तो पिसारा पुर्ण फुलवुन स्तब्ध उभा होता. मला वाटले खोटा मोर आहे, कारण पिसारा फुलवलेला मोर मी फक्त फोटोत पाहिलाय. तो मोर पिंज-यात बंद होता, तरीही पिसारा फुलवुन उभा होता, ५ मिनिटे स्तब्ध उभा राहिल्यावर तो पिसारा थरथरवे, सिल्कच्या साडीचा जसा सळसळ आवाज होतो तसा त्या पिसा-याचा आवाज होत होता. मग तो तसाच पिसारा थरथरवत स्वतःभोवती हळूहळू गोल फिरायचा. चारीबाजुने त्याचे दर्शन घडले की मग परत ५ मिनिटे स्तब्ध, मग परत पिसारा थरथरवणे, मग परत गोल फेरी... मी बराच वेळ त्याच्याकडे पाहात होते, शेवटी उशीर होतो म्हणुन आम्ही तिथुन निघालो, पण मोराचा पिसारा शो काही संपला नाही. मैत्रिणीचे आजोळ राजस्थानचे. तिथे मोर भरपुर. पण ती म्हणाली की तिच्या आईनेही अजुन पिसारा फुलवलेला मोर पाहिलेला नाहीय. आणि इथे मुंबईचे मोर चक्क पिसारा फुलवुन पोज देताहेत. किल्ल्यावरुन खालि आलो तेव्हा परत गेलो मोर पाहायला. शो संपलेला, मोर पिसारा मिटुन दाणे टिपत होता, आमच्याकडे त्याने ढुंकुनही पाहिले नाही.

सुप्रभात.

दिनेशदा, साधना - माझे ऑफिस ज्या डोंगरात आहे त्या डोंगरात दोन वर्षापुर्वी मोर दिसायचे. हल्ली नाही ऐकले बरेच दिवस. आमच्याइथे येतील की नाही माहीत नाही कारण वस्तीही वाढत आहे. पण मी अगदी लहान होते तेंव्हाचे स्वप्न मला अजुन आठवते. माझ्या स्वप्नात आमच्या वाडीतील ताडावर मोराची दोन पिल्ले आलेली मी स्वप्नात पाहीली. ते ताडाच झाड अजुन आहे पण मोर काही कधी दिसला नाही.

साधना हा बघ तोच मोर Happy
गेल्यावर्षी कर्नाळ्याला मोबाईलने काढला होता याचा फोटो. Happy

२६, २७ वर्षांपुर्वी माझ्या घराच्या आसपास ३ मोर असायचे. ठराविक वेळी दारात डोकवायचे त्याना खायला दिले की जायचे. कुत्र्यांचा मात्र त्रास होतो त्यांना. आता वेताळ टेकडीवर पहायला मिळतात भरपूर मोर.
007.jpg

जिप्स्या तुझे मोबाइलने काढलेले फोटो एकदम भारी असतात - हा आत्ताचा मोराचा आणि मागचा अंजनीचा.

माझ्या गावापासून जवळच बाळेश्वरला शंकराच मंदिर खूप प्रसिद्ध आहे. गावी गेल्यावर मोस्टली आमच घरी येताना जाण होत तिकडे.मंदिर एका छोट्या डोंगरावर आहे व तिथे पोचायला गाडीने अर्धा तास लागतो. ह्यावेळेस गेलेलो तेव्हा येताना तिकडे निघालो.डोंगरावर जायचा रस्ता लागताच आईने सांगितल की सगळ्यांनी एकदम शांत बसा,जरासुद्धा आवाज करू नका.ह्या दिवसांत अगदी वाटेवरपण भरपूर मोर असतात. शांत बसलो तर ते पळून जात नाहित.ड्रायव्हरला पण सूचना दिली की साईड सिग्नल वगैरेचा आवाज नको व्हायला. आणि रहदारी नसतेच तिथे एरवी, फक्त श्रावणात गर्दि असते.आम्ही शांतपणे निघालो. बच्चेकंपनी देवाला प्रार्थना करत होती की आम्हाला मोर दिसू दे म्हणून आणि काय आश्चर्य वाटेत आम्हाला तब्बल सात मोर दिसले. त्यातील दोन रोडवर होते आणि बाकीचे बाजूच्या पठारावर होते.आजूबाजूला लांडोर पण होत्या.वळणावरच आम्हि गाडी थांबवली आणि खाली उतरून भान हरपून मोर पाहू लागलो. पावसाळी हवा होती. जरावेळातच त्यातील एका मोराने पिसारा फुलवून स्वतःभोवती गिरक्या घ्यायला सुरवात केली.आणि एकामागोमाग एक जवळजवळ सर्वच मोरांनी पिसारा फुलवून नाच सुरू केला. त्यासोबतच ते मोर त्यांची केकावली-म्याओ म्याओ असा आवाज पण काढत होते. आम्ही सर्वजण नि:शब्द होउन ते बघत होतो.

colorful-and-beautiful-pictures-of-peacock-5.jpgcolorful-and-beautiful-pictures-of-peacock-3.jpgcolorful-and-beautiful-pictures-of-peacock-2.jpg

पण हाय रे देवा दहा-बारा मिनीटांनी आमच्यापैकी कोणाच्यातरी फोनची रींग वाजली : आणि आवाजाची चाहूल लागताच ते सर्व मोर तिथून गायब झाले. पण ते दहा-बारा मिनीट आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहेत. नंतर वर जाउन आम्ही दर्शन घेतले व दर्शन घेउन येताना आम्ही खूप आशेने बघत होतो की परत मोर दिसतील पण Sad

अरे म्हणजे हा मोर एकदम प्रोफेशनल दिसतोय. शोच्या वेळेस एकदम टापटिप, पिसारा फुलवुन उभे राहायचे...

उजु, कसला पिसारा आहे त्या मोराचा. देवाने काय मेहरबानी केलीय या पक्ष्यावर.. काय रंग, काय पिसारा... सगळेच अद्भुत.

उजू, कसले मस्त फोटो आहेत सगळे.

तुझ्या गावाला एकदा आले पाहिजे. आधी आजोबांच्या पाया पडून मग मोर बघायला जाता येइल. Happy

माधव एनीटाईम.:)
खरतर गावी पावसाळ्याच्या सुरवातीला शेतात पण येतात मोर. पण कधी पाहायचा योग नाही आला अजून(त्या दिवसांत गावी गेले नाहीये कधी).
पूर्वी मामाचा कुत्रा होता एक ईलू नावाचा, त्याला पडवीतून रात्री वाघाने ओढून नेल होत सात वर्षांपूर्वी. आजोबा बाजूलाच खाटेवर झोपले होते, त्यांनी आवाज ऐकून जाग आल्यावर आरडाओरडा केला होता. मामा आणि आजूबाजूचे लोक वाघाच्या मागे गेले पळत काठ्या घेउन . त्या आवाजाने वाघाने ईलूला सोडून दिल होत पण मानेतच नख घूसल्यामूळे डॉक्टरी उपायांनी देखिल तो वाचला नाही Sad
गावी हिवाळ्याच्या दिवसांत जेव्हा गहू तयार होतो तेव्हा अजूनही वाघ येतात शेतात. आणि आजोबा मळ्यात रहात असल्याने शेत म्हणजे अंगणच आहे त्यांच.खबरदारी म्हणून शेकोटी जळती ठेवतात पडवी बाहेर रात्रभर आणि गुरांचा गोठा नीट बांधून घेतला आहे आणि त्याचा दरवाजा बंद करून घेतात.
साधना. पिसारा फूलवलेला मोर बघायला मस्तच वाटत ना.
दा, तुम्ही म्हणतात तेच आमच्या गावी पण म्हणतात की बिच्चारा मोर अडकतो वाघाच्या नजरेत आणि कधी कधी जीव गमावतो आपला.

सगळ्यांचे मोराचे फोटो व वर्णने सुरेखच...... आज एकंदरीत 'मयूर पुराण' दिस्ते आहे नि ग वर......
मला वाटतं बहुतेक सप्तसूरांपैकी "षड्ज (सा)" हा मोराच्या ओरडण्यातून घेतला आहे - चू भु दे घे

साधना, त्या मोराचे नाव राजा आहे (तोच असावा) त्याला नाचण्यासाठी पाऊस नाही तर प्रेक्षक लागतात. अगदी हुकुमी नाच करतो तो. मग मान झुकवून जवळ येतो, डोक्यावरुन बोट पण फिरवू देतो.

उजू, मस्त्च फोटो.

अगदी हुकुमी मोर दिसायची ठिकाणे कोल्हापूर सांगली रस्ता आणि गोव्यातील पर्वरी भाग.

उजु, तुम्ही चक्क मोरनाची पाहिलीत!! ग्रेट. ते पठार म्हणालीस ना तस मोकळं पठार मोरांची ठरलेली जागा असते. त्यालाच मोरनाची म्हणतात. मेटिंगच्या वेळी तिथे येऊन सर्वात सुंदर मोर आधी नाच सुरु करतो आणि मग हळुहळू बाकीचे मोरही नाचतात. त्याच वेळी त्यांची लांडोरींशी जोडी जमते. अशा मोरनाच्या जंगलात बर्‍याच आत असतात.

आणि हो तुझा दुसरा फोटॉ अप्रतिम आहे. अशी पोझ आधी पाहिली नाहीये कधीच. अगदी ब्राईडल ड्रेस घालुन रँप वर चालणार्‍या मॉडेलसारखी पोझ आहे Wink

मग मान झुकवून जवळ येतो, डोक्यावरुन बोट पण फिरवू देतो.

तिथली जाळी केवळ एक सेमी बाय एक सेमी इतकी आहे. बोट जाऊ शकत नाही आता. Sad

रच्याकने, तिथे पक्षी अनाथालय असे लिहिलेले आणि इथले प्राणी/पक्षी काही कालावधी नंतर परत जंगलात सोडले जातात असे लिहिलेले. ते लिहिल्यावर कोणी परत वाचलेच नाही बहुतेक.

जंगलात जाऊन प्लॅस्टिक टाकणे, मोठ्याने गाणी लावणे, माकडांना खायला घालणे इ.इ. धर्मकार्ये करणा-या लोकांकडुन दंड गोळा करुन त्यांची नावे गावासकट लावलीत तिथे. Happy

अगदी हुकुमी नाच करतो तो

तो स्वतःच्याच प्रेमात पार बुडालेला. इतका आनंदी मोर मी याआधी कधी पाहिला नाहि, राजस्थानवाली मैत्रिणही 'दंग रह गयी'...

अगदी हुकुमी मोर दिसायची ठिकाणे कोल्हापूर सांगली रस्ता आणि गोव्यातील पर्वरी भाग.
दिनेशदा,
माझ्या मते गावा-गावात (घनदाट) ओढ्याकाठी मोरांच दर्शन खुप होतं...अलिकडे शिकार देखील खुप वाढली आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात तर बहुतेक पेरण्या अजुन न झाल्यामुळे मोरांच दर्शन कमी दिसलं, शेतात भुईमुग पेरलं कि मोर ते उकरुन खायला हमखास दिसतात.

माझे काका पुर्वी चेंबूरला विद्याविहार मध्ये रहायचे. त्यांची नविनच बिल्डींग झाली होती तेंव्हा त्यांच्या गच्चीत मोर यायचा. त्याची पिसेही काही प्रमाणात गळाली होती. तो आवाज करायचा आणि कधी कधी माणसांना टोचायचा पण. लोक त्याला घाबरायची.

उजू, सावली म्हणते तशी तू खरंच मोरनाची बघितलीस गं!! भाग्यवान आहेस! श्री.चितमपल्लींनी ह्या मोरनाचीबद्दल खूप मस्त माहिती दिलीये. आणि मोराचे सगळे फोटो एकदम सुंदर आलेत.विशेषत: दुसरा फोटो खूप आवडला..........................अगदी ब्राईडल ड्रेस घालुन रँप वर चालणार्‍या मॉडेलसारखी पोझ आहे>>>>>>>>>>+१

आज आमच्या बागेत एक गंमत झाली. एका बुलबुल जोडीने जास्वंदीवर जागा पसंत करून घरटं करायला सुरुवात केली. काही काड्या आणून काम सुरू झालं. आणि बहुधा दुपारी काड्या आणायला गेलेली ही जोडी बराच वेळ जास्वंदीवर आली नाही. ते नाहीयेत हे बघून चश्मेवाली जोडी (व्हाईट आय) बुलबुलांच्या घरट्यातल्या काड्या उपसून उपसून घेऊन बागेच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या जाईच्या वेलीत घरटं करायला घेऊन गेली. थोड्यावेळाने बुलबुल आले.त्यांच्या लगेच लक्षात आलं. ते पण इतके हुशार ना! काहीही चाहूल लागू न देता टेलिफोनच्या वायरवर थोडावेळ बसून राहिले. चश्मेवाली जोडी परत आयत्या काड्या न्यायला आल्यावर यांना चोर कोण ते कळले! मग काय विचारताय! जागू कडे जसं साळुंक्यांचं भांडण होतं ना त्या टाईप भांडण सुरू झालं!! शेवटी बहुधा चश्मेवाल्यांनी पांढरं निशाण दाखवलं असावं!

प्रोफेशनल मोर ..:) मस्त आहे फोटॉ...

कान्हेरीला तोंड करून उभं राहिलं की लांब डाव्या बाजूला जे थोडं पठार आहे त्याला पण मोराची माची म्हणतात नं?

>>>>इथे पुस्तक आहे फुकुओकांचे.

साधना, पुस्तकाच्या लिंकबद्दल मनापासून धन्यवाद. अक्षरशः एका बैठकीत वाचले. अतिशय प्रेरणादायी आहे. जमीन माझ्यासाठीही बघ थोडीशी Happy

वर मोराच्या चिंचोलीबद्दल विचारले आहे. आम्ही मुद्दाम मोर बघायला गेलो होतो तिकडे. गावात रस्त्यालगतच शेतात खूप मोर फिरत असतात. गावकरी त्यांना धान्य वगैरेही टाकतात. सकाळी लवकर खूप मोर दिसतात, संध्याकाळीही दिसतात. बरेच लोक येतात त्यामुळे आता रहाण्याची वगैरे सोयही झाली आहे तिकडे.

Pages