निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.
सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.
महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.
एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.
(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
अनुक्रमणीका:
पान १ -
प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.
माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...
माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती
पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय
पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख
पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...
पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.
पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new
पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new
पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड
पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा
पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325
पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल
माहीती : बिब्बा
लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html
पान १३
प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित
पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल
पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm
पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन
पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001
पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,
पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता
पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/
पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134
पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090
पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I
पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512
पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,
पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,
पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्या-गिधाडे, वारी
पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक
पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/
पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/
पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली
पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली
पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\
पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक
शशांक, मधुरा छान माहीती आणि
शशांक, मधुरा छान माहीती आणि फोटो.
मी मागे हे सरड्याचे फोटो टाकले होते.
आला पावसाळा रंग बदला - http://www.maayboli.com/node/26325
इथे येउन अगदी बेसिक
इथे येउन अगदी बेसिक (मुर्खासारखे) प्रश्न विचारले तर चालतील का? पुण्यातल्या बाल्कनीतली बाग (३ कुंड्या ?) आहे माझी. बर्याचदा माझ्या प्रवासामुळे दुर्लक्षित राहते.
माझ्या कढिपत्त्याच्या झाडानी मात्र साथ दिली आहे. पण सध्या, त्यावर बेचक्यात पांढरी किड आणि मुंग्या दिसतायत.
ह्यावर काय उपाय करायचा? त्याचा फोटो टाकु का इथे म्हणजे सांगता येइल?
हे काल टाकलेले पण गायब झालेल
हे काल टाकलेले पण गायब झालेल तामण चे फुल.
इथे येउन अगदी बेसिक
इथे येउन अगदी बेसिक (मुर्खासारखे) प्रश्न विचारले तर चालतील का?>>>>>>>इथे असं काही म्हणू नका.


इथे बरेच पहिलीतले विद्यार्थी आहेत. (माझ्यासारखे :डोमा:)
त्याचा फोटो टाकु का इथे म्हणजे सांगता येइल?>>>>>>तज्ञ जरूर उपाय सांगतील.
शशांक, छान माहिती. काही
शशांक, छान माहिती.
काही वर्षान्पूर्वी श्री वरद गिरि, बी.एन.एच.एस., यान्नी सरपटणारया प्राण्यान्वर कार्यशाळा घेतली होती. तेव्हा पाहिला / हाताळला होता "रंग बदलणारा सरडा" , अर्थात मेलेला.
सरपटणारया प्राण्याची त्वचा खवलेवाली किन्वा दाणेदार असते असेही सान्गितल्याचे आठवते.
इन्ना असे प्रश्न
इन्ना असे प्रश्न विचारल्यामुळेच सगळ्यांच्या ज्ञानात भर पडते. तुम्ही जरुर प्रश्न विचारा.
त्या झाडावर थोडी फवारणी करा. आता औषध एक्सपर्ट आले की सांगतीलच.
सध्या माझ्याकडे अशी जांभळे लटकलेली आहेत. उंच असल्याने काढायची पंचाईत.

हे मागच्या पावसाळ्यात काढलेले
हे मागच्या पावसाळ्यात काढलेले सरड्याचे फोटो.
जागू - सरड्याचे फोटो छानच
जागू - सरड्याचे फोटो छानच आलेत. मी शॅमेलिऑन म्हणून जे लिहिले आहे तो यापेक्षा खूपच वेगळा असतो.
ओह हां.. सॉरी सॉरी..
ओह हां.. सॉरी सॉरी.. चिमुरी+१... थांकु जिप्सी..



शशांक छान माहिती, मधु. अत्यंत सुंदर प्रचि. ...
जागु .. तामणी चं फूल... या कळ्या चिमटीत धरून मुद्दाम फुलवण्याचे उद्योग केले लहानपणी..
ही झाडावरची जांभळं आमच्याकरता ' खट्टे अंगूरच' की गं..
सरडा रुबाबदार आहे अगदी!!!
मधुरा जबरदस्त फोटो. तेथे सरडा
मधुरा जबरदस्त फोटो. तेथे सरडा आहे हे माहिती असुनही शोधावे लागले.
जागू सरडा रुबाबदार आहे वर्षू म्हणते तसा. व धष्टपुष्ट पण.
शोभा तु पहिलीत, वॉव. मी तर अजुन केजीत धडपडतेय
मोनाली, शोभा आता म्हणू नका
मोनाली, शोभा आता म्हणू नका आम्ही पाळण्यातच आहोत
वर्षू, शशांक
जागु सरडा जबरदस्तच!!! फोटो
जागु सरडा जबरदस्तच!!! फोटो काढेपर्यन्त तो थाम्बाला .... कमालच
जागूटले पाळण्यात नको घालुस
जागूटले पाळण्यात नको घालुस आम्हाला, तुझी ती एनर्जी आमच्यावर वेस्ट नको करुस.
शॅमेलिऑन - फोटो आंतरजालावरुन
शॅमेलिऑन - फोटो आंतरजालावरुन साभार......
मधुरा, जागू, शशांक मस्त फोटो,
मधुरा, जागू, शशांक मस्त फोटो,
शशांकजी, सरड्याबद्दल छान/रंजक
शशांकजी,
सरड्याबद्दल छान/रंजक माहिती मिळाली, शॅमेलिऑन फोटो मस्त !
जागु,
सगळे फोटो छान !
साधना,
गटग चा वृतांत कुठे आहे ? गटगला येणं मनात असुनही शक्य झालं नाही.(माफी असावी)
जागूटले पाळण्यात नको घालुस
जागूटले पाळण्यात नको घालुस आम्हाला, तुझी ती एनर्जी आमच्यावर वेस्ट नको करुस. >>>>>>>

गटगसठी मागची पाने पाहा
गटगसठी मागची पाने पाहा
शॅमेलिअन / कॅमेलिअन कसलं गोड
शॅमेलिअन / कॅमेलिअन कसलं गोड दिसतंय.
ए, मला ना अचानक घरी मशरूम्स उगवण्याची सुरसुरी आलेय. काय आणि कसं करता येईल? मी मागे कोणत्यातरी एका मासिकात एक लेख वाचला होता. त्यात एका लेखिकेनं तिची कोकणातली आजी दर पावसाळ्याच्या सुरवातीला एक भिंत सारवून त्यावर अळंबी उगवायची अशी काहीशी आठवण लिहिली होती. ती बहुधा अळंबीचं बी शेणा, मातीतच कालवून मग विटांच्या भिंतीवर लेप द्यायची. खूप सुरेख वर्णन होतं. नविन फुटणार्या अळंब्या चांदण्यांसारख्या दिसतात असं लिहिलं होतं.
तेव्हाच मी हरखून गेले होते आणि कधीतरी हे करायचंच असं ठरवलं होतं. आताच्या पावसाळ्यात मनातल्या इच्छेला धुमारे फुटलेत. कोणाला माहिती असेल तर मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
रच्याकने, या जिप्सीने मला फोन करून धमकी दिलेय. तो नसताना आपण जे जे खाल्लं ते सगळं त्याला हवंय म्हणे.
मधे एकदा हेम यांनी एका फळाचे
मधे एकदा हेम यांनी एका फळाचे फोटो टाकले होते. त्यांचे नावही विचारले होते. त्या फळांचे नाव राम राखी असे सांगितले होते.त्याचं बोटॅनिकल नाव आहे Diplocletia glauscens . परवा मुळशी परिसरात गेल्यावर ती वेल दिसली आणि तिच्या पाना-फळांचे फोटो काढले. तिला 'वाटोळी' असंही गमतीशीर नाव आहे. बहुधा जरा गोलसर पानांमुळे हे नाव पडलं असावं.
आणि ही फळं................
आपल्याकडे अळू नावाचं पण झाड असतं. त्याचेही फोटो काढायला मिळाले. मस्त हिरवीकंच पानं असतात याची.............
शिवाय पानाच्या देठाकडे चांगले मोठे मोठे काटे पण असतात..
आणि फांदीवर पानांची रचना अशी असते...
शांकली माझ्याकडे पण अळूच्या
शांकली माझ्याकडे पण अळूच्या झाडाचा फोटो होता आता शोधायला लागेल. त्यावर अळूही आलेले आहेत.
शांकली मस्त फोटो.. कोकणातली
शांकली मस्त फोटो..
कोकणातली आजी दर पावसाळ्याच्या सुरवातीला एक भिंत सारवून त्यावर अळंबी उगवायची अशी काहीशी आठवण लिहिली होती. ती बहुधा अळंबीचं बी शेणा, मातीतच कालवून मग विटांच्या भिंतीवर लेप द्यायची. खूप सुरेख वर्णन होतं. नविन फुटणार्या अळंब्या चांदण्यांसारख्या दिसतात असं लिहिलं होतं.>>>>>>>>>>>>> हे मी गेल्याच आठवड्यात मैत्रिणीकडुन ऐकलं.. कदाचीत तिने पण मासिकातच वाचलं असावं..
शांकली रामराखी.. किती गोड नाव
शांकली रामराखी.. किती गोड नाव आणी तसच झाड्,फळंही क्यूट दिस्तायेत..
मामी.. बेस्ट ऑफ लक..
(No subject)
मोनाली वाढदिवसाच्या हार्दिक
मोनाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
मोनाली वाढदिवसाच्या अनेकानेक
मोनाली वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..
जिप्सी च्या सुंदरश्या भेटी सदृष्य तुझेही प्रत्येक दिवस प्रसन्न आणी फ्रेश राहोत
मोनाली वाढदिवसाच्या खुप खुप
मोनाली वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा....
मोनाली - वाढदिवसाच्या हार्दिक
मोनाली - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..... जास्ती जास्त निसर्गसान्निध्य लाभो....
नविन फुटणार्या अळंब्या
नविन फुटणार्या अळंब्या चांदण्यांसारख्या दिसतात असं लिहिलं होतं. >>> त्यान्ना भुईफोड असेही म्हणतात.
घराच्या आजूबाजूला साधारण
घराच्या आजूबाजूला साधारण कोणती झाडे/फूलझाडे लावावीत. बंगल्याच्या शेजारी ,मागे अशी जागा आहे.उपयोगी आणि गुणकारी (उदा. तुळस, निंब, इ.) अश्या झाडांची छोटीशी यादी मिळू शकेल का?
Pages