मुक्ता बर्वे फॅन क्लब

Submitted by गिरीकंद on 29 May, 2012 - 03:19

मुक्ता बर्वेच्या सर्व चाहत्यांचे इथे स्वागत आहे.
मुक्ताच्या आवडलेल्या मालिका, चित्रपट यांची चर्चा इथे करु शकतो. Happy

http://www.muktabarve.com/ - अधिकृत वेबसाईट

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तिच्या सगळ्याच भूमिका आवडताच.
एलदुगो फक्त तिच्या अभिनयामुळे चालली आले. बाकी कुणीही असती तर झोपली असती ती मालिका.

मुक्ता मला सगळीकडेच आवडते.
तिच्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की तिला पुर्वी अजिबात अभिनय येत नव्हता
एक तर माझा यावर विश्वास नाहिये
आणि जर विश्वास ठेवलाच तर मग आताचे तिचे रोल पहाता, ती कसली जबरी आहे राव.

मुक्ता आवडतेच. अगदी सरळ साधा तरीही परिणामकारक अभिनय, लौकिकार्थाने फार सुंदर नाही पण टपोरे डोळे आणि चेहर्‍यावरचे हावभाव, न बोलताच परिणाम साधतात. तिला कब्बड्डी कब्बडी आणि फायनल ड्राफ्ट मधे ज्यांनी बघितलय ते लोक नक्कीच माझ्या या मताला पुष्टी देतील.
जोगवा मधे पण मला ती आवडलेली.

तिला पुर्वी अजिबात अभिनय येत नव्हता>>
कॉलेजात असाताना पण तिला अभिनयाची बक्षिसं मिळालेली आहेत.
>>
माहीत नाही
कदाचित ती त्याआधी म्हणत असेल
कॉलेजात काम करायच्या आधी...

एडाधो.. आवडते डायलॅग :-

दादा, मी काशीत जाते.....काशीला जाते..

तो ना, मला ना .... अमेरिकेला नेणारे..

पोटुशी

>>>>

अगदी अगदी Rofl
हे राहिलेच की :
मुका वैगेरे घ्या की राव!
तुमची माणसं आणि पोलीस पकडुन पकडुन मला परत आणतात.

@मित, आणि तो डायलॉग

"घ्या कि राव मुका" Rofl

मुक्ता बर्वेचा अभिनय छानच असतो. विविध प्रकारच्या भुमिका ती सहज करते.
जोगवा मधील अभिनय मला खुप आवडला.

घडलंय बिघडलंय मधेही छान काम केलं होतं मुक्तानं..!!
मुक्ताचा आघात नावाचामराठी चित्रपटही खुप चांगला आहे..
Happy

मुक्ताने २००० किंवा २००१ ला ललित कला केंद्रातून बी ए - नाट्य केले आहे. त्यानंतर ती मुंबईला गेली. पहिलं नाटक देहभान

मला त्यांची ती घडलय बिघडलय्ची टीमच खुप आवडायची आणि त्यातल्या त्यात मुक्ता आणि रसिका जास्त लक्षात राहिल्यात.

मुका वैगेरे घ्या की राव >>>> अरे हो..विसरलोच Happy

मग एखादा मुका बिका घ्या की राव Proud

अजून एक आहे.. पण पूर्ण आठवत नाहीये..

तुम्ही मला अ‍ॅक्टर होऊ देत नाही ...... मग मी अमेरिकेला जाणार कशी ?

Pages